Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
मुलांची माती खाण्याची सवय दूर करतील हे '५' घरगुती उपाय!
#खाण्याचा विकार #बाल संगोपन#आरोग्याचे फायदे

काही लहान मुलांना माती खाण्याची सवय असते. मुलांच्या या सवयीमुळे पालकांना खूप सतर्क राहावे लागते. कारण मुले कधी कुठे जावून माती खातील याचा थांगपत्ता लागत नाही. आरोग्यासाठी घातक असलेली मुलांची ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. तुमच्या मुलांनाही आहे का ही सवय? मग हे उपाय तुमच्या कामी येतील...

# मुलांची माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. यासाठी लवंग पाण्यात उकळवा. आणि ते पाणी दिवसातून २-३ वेळा १-१ चमचा मुलांना द्या. काही दिवसात मुलांची ही सवय दूर होईल.

# मुलांच्या माती खाण्याच्या सवयीमागे कॅल्शियमची कमतरता असते. यासाठी मुलांना आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.

# थोड्या पाण्यात आंब्याच्या बाटचे चुर्ण मिसळून दिवसातून २-३ वेळा द्या. यामुळे मुलांच्या पोटातील जंत मरतील आणि त्याचबरोबर मुलांची माती खाण्याची सवयही दूर होईल.

# दररोज मुलांना केळं आणि मध एकत्र करुन द्या. यामुळे मुलांची माती खाण्याची सवय सुटण्यास मदत होईल.

# रोज रात्री झोपण्यापूर्वी मुलांना कोमट पाण्यासोबत ओव्याचे चुर्ण द्या. यामुळेही मुलांची माती खाण्याची सवय दूर होईल.

Dr. Sujeet Ranjane
Dr. Sujeet Ranjane
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Varshali Mali
Dr. Varshali Mali
MBBS, Gynaecologist Obstetrician, 6 yrs, Pune
Dr. Surbhi Agrawal
Dr. Surbhi Agrawal
Specialist, Diabetologist General Physician, 8 yrs, Nagpur
Dr. Yogeshwar Sanap
Dr. Yogeshwar Sanap
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Niket Lokhande
Dr. Niket Lokhande
MDS, Dentist Root canal Specialist, 14 yrs, Pune