Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
…म्हणून दहीभात आरोग्यासाठी उपयुक्त
#आहार आणि पोषण

दहीभात हा आपल्याकडे कधी पोट खराब झाल्यावर किंवा आणखी काही कारणाने केला जाणारा पदार्थ. मात्र दक्षिण भारतात दहीभात ही स्पेशल डिश म्हणून ओळखली जाते. दहीभाताचे आरोग्यासाठी अनेक उपयोग असतात. एकीकडे भातामध्ये असणारे पोटॅशियम, लोह, कार्बोहायड्रेटस, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी असे घटक असतात. तर दुसरीकडे दह्यामध्ये प्रोटीन, अँटीऑक्सिडंटस, प्रोबायोटीक्स, कॅल्शियम आणि इतरही अनेक घटक असतात. त्यामुळे या दोन्हीचे मिश्रण मिळून आरोग्याला अनेक उपयुक्त घटक दहीभातातून मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात तर गार दहीभात खायलाही छान वाटतो आणि तोंडाला चवही येते. पाहूयात दहीभात खाण्याचे नेमके फायदे…

पचनशक्ती सुधारण्यास उपयुक्त

आपण खात असलेले अन्न योग्य पद्धतीने पचणे आवश्यक असते. दह्यामध्ये असलेल्या प्रोबायोटीक्समुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. या घटकामुळे पोटाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते. दहीभातामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास, पोटदुखी यांसारखे पोटाशी निगडत आजार दूर होण्यासही मदत होते.

शरीर थंड ठेवण्यास उपयुक्त

दह्यामध्ये असणारी खनिजे शरीर थंड आणि शांत ठेवण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत दहीभात खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. दक्षिण भारत हा उष्ण प्रदेश असल्याने येथील लोक दहीभात खाणे पसंत करतात आणि म्हणूनच हा त्यांच्याकडील प्रसिद्ध पदार्थ समजला जातो.

ताण दूर करण्यासाठी तसेच भिती घालविण्यासाठी फायदेशीर

दह्यामध्ये असणाऱ्या अंटीऑक्सिडंटसमुळे तसेच स्निग्ध पदार्थांमुळे शरीराला फायदा होतो. या घटकांमुळे तुमचा ताण कमी होण्यास तसेच मनातील भिती दूर होण्यास मदत होते. म्हणून तुम्ही दहीभात खाल्लात तर तुमच्या मेंदूची क्रिया अधिक चांगल्या पद्धतीने होते आणि ताण कमी होण्यास फायदेशीर ठरते.

वजन कमी करण्यासाठी गरजेचे

दहीभातामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबरमुळे तुमचे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेटसही जास्त असतात त्यामुळेही पोट भरलेले राहते. त्यामुळे तुम्ही दुपारच्या जेवणात दहीभात खाल्लात तर तुमचे पोट रात्रीच्या जेवणापर्यंत भरलेले राहते. त्यामुळे आपले अनावश्यक खाणे बंद होते आणि वजन नियंत्रणात येण्यासही मदत होते.

Dr. Rohan Shirole
Dr. Rohan Shirole
MS/MD - Ayurveda, Dermatologist Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Richa Lal
Dr. Richa Lal
MBBS, Anesthesiologist, 8 yrs, Pune
Dr. Pradnya Bafna
Dr. Pradnya Bafna
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Dr. Suryakant Bhoite
Dr. Suryakant Bhoite
BAMS, Family Physician, 34 yrs, Pune
Dr. Vidya Deore
Dr. Vidya Deore
MS/MD - Ayurveda, Gynaecologist, 14 yrs, Pune