Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
लहान मुलांमध्ये डायरियाचा त्रास रोखण्याचे ५ उपाय!
#जुलाब#बाल संगोपन

डायरिया पोटासंबंधितचा मुख्य आजार आहे. इंफेक्डेट अन्न, पाणी घेतल्याने हा त्रास सुरु होतो. नाशिकमध्ये या आजाराने थैमान घातले आहे. या आजाराची आठवड्याभरात २०० लोकांना लागण झाली आहे. तर यामुळे जाणाऱ्या बळींच्या संख्येतही दिवसागणित वाढ होत आहे. त्यामुळे याबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे.

स्वच्छता ठेवा
मुलांमधील डायरियाचा त्रास रोखण्यासाठी गरजेचे आहे घर स्वच्छ ठेवणे. मुलांना अन्न भरवण्यापूर्वी हात साबण, हॅंडवॉश किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवून घ्या. त्याचबरोबर अस्वच्छ वस्तूला हात लावल्यानंतर किंवा दूसऱ्याच्या घरातून आल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

मुलांना शुद्ध पाणी पिण्यास द्या
ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी मुलांना पिण्यास द्या. त्याचबरोबर पाणी स्वच्छ भांड्यात स्वच्छ ठिकाणी भरुन ठेवा.


मुलांना नेहमी हायड्रेट ठेवा
डायरिया झाल्यास उलटी आणि जुलाबामुळे डिहाड्रेशन होते. यामुळे शरीरातील मिनरल्स आणि पोषकतत्त्व बाहेर निघून जातात. शरीरातील इलेक्ट्रोलाईटचा बॅलन्स बिघडतो. डिहाड्रेशन अधिक प्रमाणात झाल्यास ब्रेन डॅमेज किंवा इतर अवयवांना नुकसान पोहचू शकते. त्यामुळे मुलांना इलेक्ट्रोलाईट आणि पाणी सातत्याने देत रहा.

इलेक्ट्रोलाईट सप्लीमेंट्स द्या
डायरियाने पीडित मुलांमध्ये पोषकघटकांची कमतरता निर्माण होते. अशावेळी त्यांना इलेक्ट्रोलाईट सप्लीमेंट्स देणे फायदेशीर ठरेल. त्यांना पाण्यात ओआरएस घालून द्या.

हलके भोजन द्या
मुलं जर खूप लहान असेल तर त्यांला आईचे दूध देणे योग्य ठरेल. कारण त्यामुळे पोषकतत्त्वांची कमतरता भरून निघेल. त्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांना बिना मसाल्याचे अन्न द्या. त्यामुळे अन्न सहज पचेल. उदा. इडली, मूग डाळ खिचडी, तांदळाची खीर, यांसारखे.

Dr. Gauri Karve
Dr. Gauri Karve
MBBS, 6 yrs, Pune
Dr. Smita  Patil
Dr. Smita Patil
BHMS, Homeopath, 15 yrs, Pune
Dr. Arati Bayas-Pawar
Dr. Arati Bayas-Pawar
BPTh, Physiotherapist Homecare Physiotherapist, 12 yrs, Pune
Dr. Devyani S. Ahire
Dr. Devyani S. Ahire
BDS, Dentist, 4 yrs, Pune
Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune