Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
नितळ आणि उजळ त्वचा मिळवण्यासाठी पार्लर नको...करा हा उपाय
#स्वतःचे

मुंबई : गोरी आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी मुली नानाविध उपाय करत असतात. तासनतास पार्लरमध्ये घालवतात. महागड्या क्रीम्सवर खर्च करतात. अनेकजण मेडिकल ट्रीटमेंट करुन घेतात. मात्र खरंच या सगळ्याची गरज आहे का? आपल्या किचनमध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांच्या सहाय्याने तुमची चेहरा नितळ आणि गोरा होऊ शकतो.

नारळपाणी - नारळपाणी चेहऱ्यावरील डागांसाठी रामबाण उपाय आहे. सकाळी सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर नारळपाणी लावा. काही वेळाने साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा कोमल आणि साफ होईल.

जिरे - फोडणीमध्ये जिऱ्याला मोठे महत्त्व असते. मात्र खाण्यासोबतच जिऱ्याचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठीही होतो. जिरे दूधात वाटून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा कोमल होईल आणि त्वचाही उजळेल.

दही-दूध - दह्यामध्ये लिंबू मिसळून लावल्याने त्वचा गोरी होते. तसेच चेहरा दुधाने धुतल्यास रंग उजळतो.

लिंबू - लिंबामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावा. काही दिवसांतच तुमची त्वचा उजळेल.

गुलाबजल - गुलाबजलमध्ये लिंबाचा रस मिसळून त्वचेवर लावा. यामुळे चेहरा उजळ होईल.

Dr. Pooja Hemnani
Dr. Pooja Hemnani
MPTh, Cardiovascular And Pulmonary Physiotherapist Neuro Physiotherapist, 1 yrs, Pune
Dr. Bhushan Chaudhari
Dr. Bhushan Chaudhari
MD - Allopathy, Addiction Psychiatrist Adolescent And Child Psychiatrist, 10 yrs, Pune
Dr. Sandeep Sandbhor
Dr. Sandeep Sandbhor
MS/MD - Ayurveda, General Medicine Physician, 16 yrs, Pune
Dr. Mahesh Zagade
Dr. Mahesh Zagade
BHMS, Homeopath General Physician, 3 yrs, Pune
Dr. Rekha Y Sanap
Dr. Rekha Y Sanap
MD - Homeopathy, 13 yrs, Pune