Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
हिंग - लहान मुलांंमधील पोटदुखी दूर करण्याचा रामबाण उपाय
#बाल संगोपन#पोटात कळा

अनेकदा लहान मुलं अचानक रडायला लागतात. नेमकं काय होतंय हे घरात कोणालाच समजत नाही. बाळ अगदीच लहान असल्याने त्यांना होणारा त्रास बोलून व्यक्तदेखील होत नाही. अशावेळेस रडारड करून मुलं अधिक हैराण होतात. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते.

हिंग ठरते फायदेशीर ?

स्वयंपाकघरात वापरले जाणारे हिंग हा त्रास कमी करायला मदत करते. फेरुला या वनस्पतीपासून हिंग बनवले जाते. हिंग़ातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा व स्वच्छ होतो. पोटाचे विकार तसेच श्वसनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. लहान मुलांना थेट हिंग देणे त्रासदायक ठरू शकते. म्हणून त्यांच्या पोटावर हिंगाच्या पाण्याने मसाज करणे फायदेशीर ठरते.

कसा कराल हा उपाय ?

अर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा.
पोटाजवळ हलक्या हाताने या पेस्टने मसाज करा.
मात्र ही पेस्ट बेंबीत जाणारा नाही याची काळजी घ्या. बेंबीजवळील पेस्ट कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसा.
पाण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलातही हिंग मिसळून पेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.

पेस्ट लावल्यानंतर थोडावेळ ती थंड होऊ द्यावी तसेच सुकू द्या.

पोटदुखी कमी करण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम पाळा.

पेस्ट सुकल्यानंतर मुलांना ढेकर येऊ देण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे गॅस बाहेर पडेल तसेच पोटदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल.

त्यानंतर ओल्या कापडाने बाळाचे पोट स्वच्छ पुसावे.

लहान मुलांप्रमाणेच प्रौढांमध्येही हा उपाय फायदेशीर ठरतो.

Dr. Abhinandan J
Dr. Abhinandan J
BAMS, Ayurveda Family Physician, 1 yrs, Pune
Dr. Sadashiv K. Deshpande
Dr. Sadashiv K. Deshpande
BHMS, Homeopath, 40 yrs, Pune
Dr. Krishnath Dagade
Dr. Krishnath Dagade
BAMS, General Physician Family Physician, 28 yrs, Pune
Dr. Sujit Shinde
Dr. Sujit Shinde
BHMS, Family Physician Homeopath, 24 yrs, Pune
Dr. Yogesh  Wankhede
Dr. Yogesh Wankhede
BAMS, Ayurveda Acupressurist, 5 yrs, Pune