Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

कर्करोगाचे रुग्ण आणि कोविड -19 बद्दल आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे आणि त्या पासून होणारे धोके कमी कसे करावे?



सíव्हक्स (गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव)च्या ऊतींमध्ये तयार होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग. हा सामान्यत: धीम्या गतीने वाढणारा कर्करोग आहे, ज्याची लक्षणे दिसतातच असं नाही. पण नियमित पॅपटेस्टने त्याचे निदान करता येऊ शकते. (पॅप टेस्ट ही एक प्रकिया आहे, ज्यामध्ये सíव्हक्सपासून पेशीचा एक भाग काढला जातो आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला जातो.) हा नेहमीच पॅपिल्लोमा व्हायरस (एचपीव्ही) संसर्गामुळे उद्भवतो. ही गर्भाशय ग्रिव्हामध्ये असणा-या पेशींपासून निर्माण होणारी घातक सूज आहे. आता गर्भाशय कर्करोगामुळे मरण पावणा-यांमध्ये भारत जगात सर्वोच्च स्थानी आहे.

निदान कसे होते?
लॅब टेस्ट : डॉक्टर किंवा नर्स सíव्हक्सपासून पेशींचा नमुना काढतात. पॅपटेस्टसाठी लॅब गर्भाशय कर्करोग पेशी किंवा अ‍ॅबनॉर्मल पेशीसाठी नमुना तपासते, ज्यांवर उपचार केले नाहीत तर कालांतराने कर्करोग होऊ शकतो.
गर्भाशय (सव्‍‌र्हायकल) परीक्षा : डॉक्टर सíव्हक्स पाहण्यासाठी कॉल्पोस्कोप वापरतात. कॉल्पोस्कोप उती सहज दिसावी म्हणून मॅग्निफाइंग लेन्ससह ब्राईट लाईटचा वापर केला जातो.

टिश्यू सॅम्पल : कर्करोग पेशी पाहण्यासाठी ऊती काढून बायोप्सी करणे.

लक्षणे : गर्भाशयाच्या कर्करोगामध्ये पहिल्यांदा कदाचित कोणतीही लक्षणे उद्भवणार नाहीत, पण सर्वाधिक सामाईक लक्षण म्हणजे योनीमार्गातून अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे पण काही केसेसमध्ये प्रगत टप्प्यांपर्यंत कर्करोग होईपर्यंत कदाचित सुस्पष्ट अशी कोणतीच लक्षणे दिसून येणार नाहीत. नंतर तुम्हाला कदाचित ओटीपोटाच्या वेदना किंवा योनीमार्गातून रक्तस्त्राव होऊ शकतो.

नियमित मासिक पाळी दरम्यानचा संभोगानंतर, डाऊचिंग किंवा ओटीपोटीच्या परीक्षणानंतरचा रक्तस्त्राव, मासिक पाळी हे दीर्घकाळ राहिल्यास आणि त्यावेळेस पूर्वीपेक्षा जास्त रक्तस्त्राव होणे यांसारखी इतर काही लक्षणे आहेत.

उपचार पद्धतींमध्ये सर्जरी (लोकल छेदनासहित) लवकरच्या टप्प्यामध्ये आणि केमोथेरपी आणि/किंवा रेडिओथेरेपी रोगाच्या सर्वाधिक प्रगत टप्प्यांमध्ये यांचा समावेश आहे. यामध्ये कदाचित सर्जरी, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी किंवा यांच्या एकत्रिकरणाचा समावेश असू शकतो. उपचार पद्धती रोगाच्या गाठीच्या आकारावर अवलंबून असते, जर कर्करोग विस्तारित असेल किंवा तुम्हाला काही काळाने गरोदर बनायची इच्छा असेल. मुख्य कारण एचपीव्ही ट्रान्समिशन हे आहे, हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरतो. सर्वाधिक स्त्रियांची शरीर एचपीव्ही संसर्गाशी लढण्यासाठी सक्षम असतात. पण कधीतरी या विषाणूमुळे कर्करोग होतो. तुम्ही धुम्रपान करत असाल, अनेक मुले असतील, दीर्घकाळासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला असेल किंवा एचआयव्ही बाधित असाल तर तुम्हाला जास्त धोका असू शकतो. हा फक्त स्त्रियांमध्ये विकसित का होतो आणि इतरांमध्ये का होत नाही याचे वास्तविक स्पष्टीकरण डॉक्टर्स देऊ शकत नाहीत. तथापि, आम्हाला माहिती आहे की इतर स्त्रियांपेक्षा ठराविक धोकादायक फॅक्टर्स असणा-या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. रिस्क फॅक्टर त्यांना म्हटले जाते, जे रोग विकसित करण्याची शक्यता वाढवू शकतात. अभ्यासानुसार असा निष्कर्ष निघाला आहे की, एचपीव्ही नामक विषाणू जवळ-जवळ सर्व गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण आहे. सर्वाधिक वयस्कर माणसांना त्यांच्या जीवनामध्ये कधी-ना-कधी एचपीव्हीचा संसर्ग होतो, पण सर्वाधिक संसर्ग स्वत:हून निवळतात. एचपीव्ही संसर्ग, जो नष्ट होत नाही व त्याच्यामुळे काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग उद्भवू शकतो.

रिस्क फॅक्टर्स खालीलपमाणे
> धूम्रपानामुळे एचपीव्ही बाधित स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढतो.
> मौखिक गर्भनिरोधक गोळ्या (ओसीज) दीर्घकाळासाठी घेतल्या तर सíव्हक्सच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. संशोधन सुचवते की, ओसीज घेणा-या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढतो पण ओसीज घ्यायच्या बंद केल्या की धोका कमी होतो.
> असुरक्षित संभोगामुळे एचपीव्ही पसरु शकतो, म्हणूनच संसर्ग वाढण्याचा धोका कंडोम वापरुन कमी करता येऊ शकतो. तथापि एचपीव्ही सामाईक आहे आणि तो विस्तृत गुप्तांगामध्ये स्किन-टू-स्किन संपर्काच्या माध्यमातून मोठ्या पमाणावर पसरतो. सुरक्षित संभोगाद्वारे याचा प्रतिबंध करणे कठीण आहे.
> गर्भाशयाचा कर्करोग काही कुटुंबांमध्ये अनुवंशिक असू शकतो. जर स्त्रीच्या आईला किंवा बहिणीला गर्भाशयाचा कर्करोग असेल तर कुटुंबामध्ये कुणालाही कर्परोग नसणा-या स्त्रीपेक्षा या स्त्रीमध्ये रोग होण्याची शक्यता २ ते ३ वेळा जास्त असते.

गर्भाशयाचा कर्करोग नियमित स्किनिग टेस्ट करुन कमी करता येऊ शकतो. जर गर्भाशयाच्या पेशीमध्ये अस्वाभाविक बदल लवकर दिसून आले तर त्या पेशी कर्परोग पेशी बनण्यापूर्वी काढून टाकून किंवा त्यांना नष्ट करुन हा कर्करोग प्रतिबंधित करता येऊ शकतो.



सध्याच्या काळात तंबाकू-गुटखा सेवन, धूम्रपान, मद्यप्राशन या सवयी पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात वाढत चालल्या आहेत. या सर्व सवयी ब्‍लॅडर कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या आहेत. या व्यतिरिक्त जे लोक केमिकल, ग्रीस, पेंट, रबर, टेक्स्टाईल, लेदर इ. गोष्टींशी संबंधित काम करतात, त्यांना यूरिनरी ब्‍लॅडर कॅन्सर होण्याची शक्यता जास्त राहते. ब्‍लॅडर कॅन्सर कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो परंतु 55 वयाच्या लोकांना होण्याची शक्यता 90 टक्क्यापर्यंत राहते. हा कॅन्सर महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त प्रमाणात होतो.

1. लघवीमधून रक्त पडणे - या समस्येला हेमतुरीया असेही म्हणतात, जी ब्‍लॅडरमधील कॅन्सरचे सामान्य लक्षण आहे. यामध्ये खूप वेदना होतात. तुम्हाला तुमच्या अंडरवेअरमध्ये किंवा युरीनमध्ये लाल रंगाचे डाग दिल्यास डॉकटरांशी अवश्य संपर्क साधा.
2. लघवी करताना जळजळ - प्रत्येक वेळी लघवी करताना जळजळ आणि खूप त्रास होत असल्यास हे ब्‍लॅडर कॅन्सरचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नका.
3. युरिनमधून व्हाईट टिशु बाहेर पडणे - लघवी करताना त्यामधून व्हाईट टिशू किंवा थोड्या प्रमाणातही पांढऱ्या रंगाचे काही डिस्चार्ज होत असेल तर हा ब्‍लॅडर कॅन्सरचा संकेत असू शकतो.
4. विनाकारण वजन कमी होणे - जिममध्ये न जाता, व्यायाम न करता वजन हळू-हळू कमी होत असल्याचे जाणवत असल्यास हा ब्‍लॅडरमधील कॅन्सरचा संकेत असू शकतो.
6. पाठीच्या खालील भागात त्रास होणे विशेषतः किडनीच्या ठिकाणी खूप वेदना होणे. ब्‍लॅडर किडनीशी एक नसेच्या माध्यमातून जुळलेले असते.
7. पायांवर सूज - हे लक्षण सामान्यतः किडनीच्या आजराचा संकेत असू शकतो. यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये त्वरित डॉक्टरांना दाखवून घ्यावे.
8. वारंवार लघवी लागणे - लघवी आली नसेल तरीही वारंवार लघवी आल्याचे जाणवणे हेसुद्धा ब्लॅडर कॅन्सरचे एक लक्षण आहे. या व्यतिरिक्त लघवी मंद गतीने होणे हासुद्धा ब्लॅडर कॅन्सरचा संकेत असू शकतो.

मूत्रपिंडाचा कर्करोग हा छुपा आणि इतर कर्करोगांप्रमाणेच संथपणे वाटचाल करणारा विकार आहे. लक्षणांच्या आधारे लवकरात लवकर निदान आणि उपचार केल्यास कर्करोगाच्या विळख्यातून बाहेर पडता येऊ शकते. शरीराच्या आरोग्याचे संतुलन राखणाऱ्या मूत्रपिंडात मुतखडा होण्याची कारणे आपल्या दैनंदिन सवयीच असतात; परंतु मूत्रपिंडाचा कर्करोग हा कधीही आणि कोणालाही होऊ शकतो. मूत्रपिंडावर आलेल्या गाठींची वेळेत तपासणी केली तर संभाव्य कर्करोगापासून आपला बचावही होऊ शकतो. फक्त गरज आहे ती वेळेत निदान करण्याची.

मूत्रपिंडातील गाठींचे प्रकार

1. अघातक (बेनाइन) गाठ

नावाप्रमाणेच या गाठी शरीराला घातक नसतात,त्यांच्यामुळे कुठल्याही प्रकारचा कर्करोग उद्भवत नाही. कुठल्या तरी इतर तपासण्यांसाठी अल्ट्रासाउंड केल्यानंतर या गाठी दिसून येतात. अडिनोमास, एँजिओमायोलिपोमास आणि सिस्ट असे त्याचे प्रकार होत. कुठलीही लक्षणे किंवा त्रास होत नसल्यास त्यावर कुठल्याही प्रकारच्या उपचारांचीही गरज पडत नाही. परंतु, काही त्रास उद्भवल्यास किंवा कर्करोग होण्याची शंका वाटल्यास या गाठी काढता येतात.

2. घातक (मलाइन) गाठी

या गाठी कर्करोगाच्या असू शकतात. मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे वेळेत निदान झाले की उपचारांच्या मदतीने त्यातून बरे होणे सहज सोपे आहे.

मूत्रपिंडाचा कर्करोग म्हणजे काय?
मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत; परंतु यातील बहुतेकांना मूत्रपिंडातील पेशींचा कर्करोग (रिनल सेल कॅन्सर) असतो.

मूत्रपिंडातील पेशींचा कर्करोग

मूत्रपिंडातच या कर्करोगाची वाढ होते. कर्करोगाची वाढ होत त्याची मूत्रपिंडातच गाठ तयार होते. गाठ मोठी झाल्याने त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होऊन त्याचाही आकार वाढू शकतो. मूत्रपिंडाच्या बाहेर पडून आजुबाजूचे स्नायू, मणका, यकृत आणि रक्तवाहिन्यांमध्येही तो प्रवेश करू शकतो. जवळच्या लसिकांमध्ये (लिम्फ) प्रवेश केल्यास हा कर्करोग शरीरभर पसरून इतर अवयवांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. लहान मुलांमध्ये विल्म्स ट्यूमर आणि क्लिअर सेल सार्कोमा हे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे प्रकार आढळतात.

कारणे

1. वय. बहुतेक पेशंटमध्ये वयाच्या साठीनंतरच हा कर्करोग झाल्याचे आढळतो.

2. धूम्रपान. हा कर्करोग झालेल्या पेशंटपैकी एक तृतीयांश व्यक्ती धूम्रपान करत असल्याचे आढळतात.

3. स्थुलता. अतिरिक्त वजन हे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे कारण नेहमीच असते. २५ टक्के पेशंटमध्ये मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याचे कारण केवळ स्थुलता असते.

4. डायलिसिस. प्रदीर्घ काळ डायलिसिसवर असणाऱ्या पेशंटनाही या कर्करोगाची भीती असते.

5. उच्च रक्तदाबही मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे कारण बनू शकते.

6. काही विषारी रसायनांमुळेही मूत्रपिंडाच्या कर्करोगाची शक्यता वाढू शकते.

लक्षणे

- अनेक पेशंटमध्ये या कर्करोगाची काहीही लक्षणे आढळून येत नाहीत; पण जसजसा त्याचा प्रादुर्भाव वाढतो तसतसा त्याची लक्षणे तीव्र होत जातात.
- लघवीतून रक्त येणे. हे लक्षण कर्करोगाचे अत्यंत मुलभूत लक्षण समजले जाते. यात पेशंटला कुठल्याही वेदना होत नाहीत.
- गाठ जसजशी मोठी होते तसतशी त्याची लक्षणे वाढतात.
- पाठीत किंवा कमरेजवळ वेदना.
- ताप येणे, घाम सुटणे
- रक्तदाब वाढणे
- वजन घटणे.

उपचार

कर्करोगाची तपासणी अल्ट्रासाउंड किंवा कम्प्यूटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅनच्या माध्यमातून करण्यात येते. कर्करोग किती बळावला आहे त्यावरून त्यावरील उपचार ठरतात. कधी गाठ काढून तर कधी मूत्रपिंड काढून कर्करोगापासून पेशंटची सुटका होऊ शकते. लवकर निदान झाल्यास रेडिएशनच्या माध्यमातूनही यावर नियंत्रण मिळवता येते.



टेस्टीक्युलर कर्करोग : पुरुष बीजाण्ड/ वृषणाचा कॅन्सर

टेस्टीक्युलर कर्करोग हा एक कर्करोग वाढ आहे वृषणात जे इतर अवयव इतर कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाच्या बाबतीत जसे की खळखळ अल्सर सौम्य पुटीचा वाढीचा दर अंडकोशाच्या आतील अवयवाच्या आतल्या कोणत्याही संरक्षणातून उद्भवतो. ते कर्करोगसारखे धोकादायक नसले तरी, त्यांना काही क्षणी उपचार करावे लागतील.
टेस्टिक्युलर कर्करोग अनेक प्रकारची असू शकतात. टेरिटोमा आणि सेमिननोमा यापैकी काही सामान्य प्रकार आहेत. टेस्टिक्युलर कर्करोग तुलनेने तरुण वयोगटातील पाहिले जाते लवकर आढळून आले तर, कॅन्सर अंडकोषापर्यंत मर्यादित असताना, त्याच्याकडे बराच बरा बरा असतो तथापि, जर ऍन्फॉथच्या बाहेर पसरले असेल तर बराबर कमी होईल. टेस्टिक्युलर कर्करोग अनेक विशिष्ट लक्षणांच्या लक्षणांना सूचित करू शकतात जसे की अंडकोशस्थानामध्ये जडपणा, वृषण किंवा तीव्र वेदना किंवा दाट दुखणे. टेस्टीक्युलर कर्करोगासाठी वेदना वेगवेगळय़ा फरक नाही, आणि इतर इतर सौम्य स्थितीमुळे वृषणासंबंधी वेदना होऊ शकते. म्हणून, टेस्टाकार्युलर कर्करोग वगळण्यासाठी कोणतीही टेस्टिकोलिक गाठ काळजीपूर्वक तपासली पाहिजे. अंडाशय च्या प्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) स्कॅन घातक क्षमता सह लंप्स शोधू शकता बायोप्सी आणि ऊतकपदार्थाद्वारे निश्चित निदान केले जाईल. या कर्करोगाने अनेक प्रकारचे हार्मोन्स सोडले. बायोमार्कर्स म्हणून हे हार्मोन्स उपयुक्त असू शकतात जे कॅन्सर शोधू शकतात. काही उदाहरणे अल्फा-फॉटेप्रोटीन, मानवी कोरियोनिक गोनाडोट्रोपिन ("गर्भावस्था हार्मोन") आणि एलडीएच-1 आहेत. एकदा कर्करोगाचे निदान झाले की दूरच्या पसरण्याच्या मर्यादेवर निर्णय घेण्यासाठी स्टेजिंग आवश्यक आहे. स्कॅनिंग करून हे केले जाते. कर्करोगाच्या अवस्थेच्या आधारावर, उपचार निश्चित केले जाते. ओरिचिवरॉमी म्हणजे वृषणाचा शस्त्रक्रिया काढून टाकणे जे सुरुवातीच्या काळात रोगग्रस्त आहे. याव्यतिरिक्त, रुग्णास हॉरमॉन इब्लिशन थेरपी, रेडियोथेरपी किंवा केमोथेरपी दिली जाते. एकदा उपचार पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही पुनरावृत्त्यांचा शोध लावण्यासाठी नियमित पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

पुरुष बीजाण्ड हा पुरुष जननेंद्रिय संस्थेतील महत्त्वाचा अवयव असून प्रजोत्पादनासाठी आवश्यक असलेले शुक्राणू (स्पर्मस्) व टेस्टोस्टेरॉन या अंतस्रावाची (हार्मोन्सची) निर्मिती करणे हे याचे प्रमुख कार्य आहे. पुरुष बीजाण्डात निर्माण होणाऱ्या कॅन्सरपकी ९५ टक्के कॅन्सर जर्म सेल टय़ुमर या प्रकारचे, ४ टक्के कॅन्सर लिफोमा स्वरूपाचे व उर्वरित १ टक्का कॅन्सर अन्य प्रकारचे असतात. पुरुषांत १५ ते ३४ या वयोगटात आधिक्याने आढळणाऱ्या या कॅन्सरचे प्रमाण एकूणच कमी असले तरी गेल्या ४० वर्षांत हे प्रमाण दुपटीने वाढले आहे.

नसíगकत: वृषण हा अवयव शरीराबाहेर स्थित असला तरी काही पुरुषांत स्त्री बीजाण्डे उदरपोकळीतच स्थित असतात, याला वैद्यकीय परिभाषेत अनडिसेंडेड टेस्टिज असे म्हणतात. अशा पुरुषांमध्ये पुरुष बीजाण्डाचा कॅन्सर होण्याची संभावना अधिक असते. याशिवाय ज्यात पुरुष बीजाण्डांची विकृत निर्मिती होते अशा क्लायनेफेल्टर सिंड्रोमसारख्या विकारांनी त्रस्त व्यक्तींतही हा कॅन्सर आधिक्याने आढळतो. याशिवाय कुटुंबातील अन्य व्यक्तींत टेस्टिक्युलर कॅन्सर असल्यास, त्याच रुग्णात एका पुरुष बीजाण्डात कॅन्सर असल्यास एच.आय.व्ही. एड्सबाधित रुग्णांत व गोऱ्या वंशाच्या रुग्णांत टेस्टिक्यूलर कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.

वृषणाचा आकार वाढणे, तेथे जडपणा किंवा गाठ निर्माण होणे, तेथे वेदना किंवा जलसंचिती होणे, पोटात विशेषत: अधोदरात मंदस्वरूपी वेदना होणे ही पुरुष बीजाण्डाच्या कॅन्सरची लक्षणे असून सोनोग्राफी, सी.टी स्कॅन, बायॉप्सी, ए.एफ.पी. व एच.सी.जी. या रक्तातील तपासण्यांच्या सहाय्याने टेस्टिक्युलर कॅन्सरचे निदान निश्चित होते. आधुनिक वैद्यकशास्त्रात यास बायलॅटरल ऑíकडेक्टोमी (दोनही पुरुष बीजांण्ड निर्हरण), त्यासह आवश्यकता असल्यास वंक्षणातील व उदरपोकळीतील लसिकाग्रंथीचे निर्हरण ही शस्त्रकर्मे, केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपी ही चिकित्सा उपलब्ध आहे.

आयुर्वेदानुसार पुरुष शुक्राणू हे सौम्य गुणाचे असल्याने या अवयवातील कॅन्सरमध्ये गोक्षुर, शतावरी, अश्वगंधा, पुनर्नवा, कुष्मांड, मधुर औषधांनी सिद्ध घृत अशी शीत व शामक औषधे उपयुक्त ठरतात. हा अवयव अपान व प्राण वायूच्या आधिपत्याखाली असल्याने यापन बस्ति, उत्तर बस्ति व नस्य या चिकित्साही व्याधिप्रतिबंधासाठी व व्याधीचा पुनर्भव होऊ नये म्हणून उपयुक्त ठरतात. आहारात दुधी किंवा कोहोळ्याच्या वडय़ा, हलवा, पाक, उडदाचे पदार्थ, मूग-रवा किंवा कणकेचे लाडू, दलिया, शेवयांची खीर किंवा शिरा, रव्याचा शिरा, विविध प्रकारच्या खिरी, गव्हाची पोळी यांची रेलचेल असावी. मनाची शुचिता व प्रसन्नता यांचा प्रजनन संस्थेतील अवयवांच्या स्वास्थ्यावर निश्चितच अनुकूल परिणाम होत असल्याने मनोनुकूल छंदात मन गुंतवणे व प्राणायाम, सूर्यनमस्कार, शवासनासारख्या योगासनांची त्यास जोड देणे हे निश्चितच पुरुष बीजाण्डाच्या कॅन्सरमध्ये फलदायी ठरते.



त्वचेचा कर्करोग

वातावरणातील बदल, तसेच प्रदूषण आणि वाढलेल्या उष्णतेचा थेट परिणाम मानवाच्या त्वचेवर होत आहे. जगात कार्बन उत्सर्जनाची पातळी वाढल्यामुळे वातावरणातील ओझोनच्या थराला छिद्रे पडत आहेत. सूर्याची अतिनील किरणे थोपवणे हे ओझोनच्या थराचे काम आहे. त्यालाच छिद्रे पडल्याने ही अतिनील किरणे थेट जमिनीवर येत आहेत. या अतिनील किरणांमुळे त्वचेचे विकार वाढू लागले आहेत. त्वचेचा कर्करोग हा त्याचा एक भीषण चेहरा आहे. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांच्यामध्ये हा आजार लवकर होण्याची शक्यता असते. कर्करोगाचे प्रमाण वाढत जाण्याचे मुख्य कारण आपल्याकडील खाण्यापिण्याच्या सवयी आहेत. तंबाखू, गुटखा यांचे सेवन केल्यामुळे कर्करोग होऊ शकतो. कर्करोग अनेक प्रकारचे असतात. त्यात तोंडाचा, मेंदूचा, आतड्यांचा, हाडांचा हे प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात. जगात त्वचेच्या कर्करोगाचे कोट्यवधी प्रकरणे दरवर्षी पुढे येतात. याची कारणे कोणती, तो कसा होतो, बचावासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

मिलानोसाईटस् पेशींमध्ये त्वचेचा कर्करोग होतो. त्यालाच मेलानोमा असे म्हणतात. त्वचेचा कर्करोग मुख्यत: त्वचेच्या बाहेरच्या बाजूला होतो. मानवी शरीरात रोज नव्या पेशी बनतात व नष्ट होतात. अनेकदा नष्ट होणार्‍या पेशींची संख्या वाढून त्याची गाठ तयार होते. त्याचे पुढे जाऊन त्वचेच्या कर्करोगात रूपांतर होते. त्वचेचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण जास्त वेळ तीव्र उन्हात राहणे हे आहे. त्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. सूर्याची अतिनील किरणे त्वचेच्या आत जाऊन कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे उन्हात जाताना शरीर झाकणे गरजेचे ठरते. तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लोशनचा वापर करावा. सनस्क्रीन लोशनमुळे त्वचेला अनेक फायदे होतात.

ज्यांची रोगप्रतिकारकशक्‍ती कमी आहे त्यांना या कर्करोगाचा धोका जास्त असतो. जगात अमेरिकेमध्ये त्वचेचा कर्करोग असणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील संशोधकांनी त्वचेच्या कर्करोगाचा एक गंध शोधून काढला आहे. यानुसार या गंभीर आजाराचा तपास आणि उपाय करण्यात मदत मिळणार असल्याचा त्यांचा दावा आहे. सध्या त्वचेवर टॅटू बनविण्याची फॅशन आहे. काही तरुण-तरुणी अंगभर टॅटू करून घेतात. मात्र, संशोधकांच्या म्हणण्यानुसार त्वचेवर टॅटू करणे हेही त्वचेच्या कर्करोगाला आमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे टॅटू करणे टाळावे. रोजच्या जेवणात व्हिटॅमिन डी 3 चा योग्य वापर केल्यास त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. व्हिटॅमिन डी 3 मुळे मानवी शरीरातील हाडे मजबूत होतात. सोबतच सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षणही मिळते. तेलाने त्वचेची मालीश केल्यानेही त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. मात्र, ज्या तेलात सन प्रोटेक्शन फॅक्टर (एसपीएफ) जास्त असेल त्याच तेलाचा वापर करावा. बदाम तेल, खोबरेल तेलाचा वापर मुख्यत्वे केला जातो. या तेलाद्वारे सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण केले जाते. रोजच्या जेवणात द्राक्षे, सफरचंदसारख्या फळांचा समावेश केला, तरी त्वचेच्या कर्करोगाचा धोका टळू शकतो.

कार्बन उत्सर्जन, मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, वायू प्रदूषण याचा थेट परिणाम पृथ्वीच्या वातावरणावर होत आहे. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे वातावरणातील वायूंच्या थरांचे नुकसान होत आहे. ओझोनला छिद्रे पडत असल्यामुळे सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. अशा स्थितीत त्वचेचे संरक्षण न करता घराबाहेर पडल्यास त्वचेचा कर्करोग होण्याची भीती असते. स्त्री अथवा पुरुष दोघांनाही या कर्करोगाचा धोका असतो. अतिनील किरणांचा हल्‍ला कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकतो. मात्र, उन्हाळ्यात त्याची तीव्रता जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतचे ऊन जास्त घातक असते. कर्करोगांच्या इतर प्रकारांपेक्षा त्वचेचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे त्वचेला सुरक्षितपणे झाकूनच घराबाहेर पडावे.

त्वचेचा कर्करोग कुणालाही होऊ शकतो. मात्र, गोर्‍या रंगाच्या, निसर्गत: ज्यांचे केस लाल अथवा करडे आहेत, त्वचेवर सुरकुत्या असणार्‍या, नाजूक त्वचा अथवा घरातील कुणाला त्वचेचा कर्करोग झालेला असणार्‍यांनी त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी उन्हात न फिरणे, त्वचा जास्तीत जास्त झाकणे या उपायांसह डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कर्करोगापासून वाचण्याचे उपाय केले जाऊ शकतात. बालकांची त्वचा खूप नाजूक असल्यामुळे त्यांच्या त्वचेचे संरक्षण करणे खूप गरजेचे आहे. त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्याची साधने तुलनेने सोपी आहेत.

मेलानोमा आणि नॉन मेलेनोमा हे त्वचेच्या कर्करोगाचे दोन मुख्य प्रकार आहेत. मेलेनोसाईटस्मध्ये त्वचेचा रंग तयार केला जातो. त्याला मिलेनीन असे म्हटले जाते. मिलेनीन सूर्याच्या घातक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. मेलानोमा हा कर्करोगाचा प्रकार मेलेनोसाईटस्मध्ये होतो. या रोगाचे लवकर निदान झाल्यास इलाज करणे शक्य आहे. त्वचेच्या कर्करोगांच्या इतर प्रकारांपेक्षा हा सर्वात घातक प्रकार आहे. 2012 साली त्वचेच्या कर्करोगाची 75 हजार प्रकरणे समोर आली आहेत.

बेसल आणि स्क्‍वैमस कर्करोग
त्वचेच्या कर्करोगाचा हा प्रकार मेलानोमाप्रमाणे नसतो. हा कर्करोग बेसल आणि स्क्‍वैमस पेशींमध्ये होतो. या पेशी त्वचेच्या बाह्य आवरणावर असतात. या पेशींमध्ये होणार्‍या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्याचा पूर्ण इलाज करणे शक्य आहे.

फायदा अन् तोटाही
त्वचेच्या कर्करोगाबाबत झालेल्या संशोधनानुसार अतिनील किरणे त्वचेचा कर्करोग होण्यात मोठी भूमिका बजावतात. मात्र, हीच सूर्यकिरणे व्हिटॅमिन डी 3 चे मुख्य स्रोत आहेत. म्हणजे या किरणांचे अस्तित्व मानवाच्या हाडांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे कडक, प्रखर उन्हापासून बचाव करण्यासोबतच सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फिरणेही आवश्यक आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय जास्त वेळ प्रखर उन्हात थांबल्यास युवी-ए आणि युवी-बी ही किरणे त्वचेवर गंभीर परिणाम करतात. त्वचेतील डीएनएला हानी पोहोचवून त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता अजून वाढवतात. त्यामुळे उन्हात काम करणार्‍यांनी त्वचा झाकणे हा साधा सोपा उपाय करावा.

Dr. Swapnil Dhamale
Dr. Swapnil Dhamale
BHMS, Family Physician Homeopath, 1 yrs, Pune
Dr. Amarsinha Nikam
Dr. Amarsinha Nikam
MD - Homeopathy, Homeopath, 33 yrs, Pune
Dr. Vishwas Takale
Dr. Vishwas Takale
BAMS, General Physician, 19 yrs, Pune
Dr. Sonawane Shivani
Dr. Sonawane Shivani
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 3 yrs, Pune
Dr. Sanjeev Sambhus
Dr. Sanjeev Sambhus
BAMS, Family Physician Physician, 34 yrs, Pune
Hellodox
x