Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.



पुरुष जननेंद्रियाच्या अवयवांचे ट्यूमर

पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग लक्षण
खालील वैशिष्ट्ये पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग दर्शवितात:
- गळती
- अल्सर
- पुरुषाचे जननेंद्रिय विकृती
- जखमेतून सोडणे
- सूज लिम्फ नोड्स
- वेदना
- पुरुषाचे जननेंद्रिय पासून रक्तस्त्राव
- मूत्र उत्तीर्ण करण्यात अडचण
- वजन कमी होणे

पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग चे साधारण कारण
पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग चे साधारण कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) संक्रमण

पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग साठी जोखिम घटक
खालील घटक पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग ची शक्यता वाढवू शकतात:
- जननांग विवांचा इतिहास किंवा मानव पॅपिलोमाव्हायरसचा इतिहास (एचपीव्ही)
- धूम्रपान
- पुरुषाला दुखापत
- स्वच्छता न ठेवणे

पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग टाळण्यासाठी संभव आहे?
होय, पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग प्रतिबंधित करणे संभव आहे. खालील गोष्टी करून प्रतिबंध करणे शक्य आहे:
- चांगले जननेंद्रिय स्वच्छता
- लैंगिक भागीदारांची संख्या मर्यादित करणे
- एचपीव्ही संसर्ग टाळण्यासाठी कंडोम वापरणे
- धूम्रपान टाळा

पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग ची शक्यता आणि प्रकरणांची संख्या खालीलप्रमाणे जगभरात प्रत्येक वर्षी दिसली आहेत:
- 1 के - 10 के प्रकरणांमध्ये फारच दुर्मिळ

सामान्य वयोगट
पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग खालील वयोगटात सर्वात सामान्यपणे आढळते:
- वय> 50 वर्षे

सामान्य लिंग
पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग खालील लिंगात सर्वात सामान्यपणे आढळते:
- पुरुष

प्रयोगशाळेतील चाचण्या आणि प्रक्रियांचा वापर पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग शोधण्यासाठी केला जातो:
- शारीरिक परीक्षा: कर्करोगाचे लक्षण आणि लक्षणे तपासण्यासाठी
- वाढीची बायोप्सीः कर्करोगाच्या चिन्हे तपासण्यासाठी

पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग च्या निदान साठी वैदय
जर रुग्णांना पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग चे लक्षण असतील तर खालील तज्ञांना भेट द्यावे:
- ऑन्कोलॉजिस्ट

उपचार न केल्यास पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग च्या अधिक समस्या गुंतागुंतीची होते?
होय, जर उपचार न केल्यास पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग गुंतागुंतीचा होतो. पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग वर उपचार न केल्यास, उद्भवणार्या गुंतागुंती आणि समस्यांची सूची खाली दिली आहे:
- कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो.

पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग वर उपचार करण्यासाठी खालील पद्धतींचा उपयोग केला जातो:
- शस्त्रक्रिया: कर्करोग कापून काढण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी
- रेडिएशन थेरपीः कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी उच्च-शक्तीयुक्त क्ष किरणांचा वापर करते.
- केमोथेरपीः कर्करोगाच्या पेशी नष्ट करणे.

खालीलप्रमाणे आत्म-काळजी किंवा जीवनशैलीत बदल पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग च्या उपचार किंवा व्यवस्थापनास मदत करू शकतात:
- कंडोमचा वापर: एचपीव्ही संबंधित पेनिलाइल कर्करोगाविरूद्ध संरक्षणात्मक
- चांगले जननेंद्रिय स्वच्छताः पुरुषाला दररोज पुरुषाचे जननेंद्रिय, स्क्रोटम आणि फोरसीक धुणे, बॅलेनायटिस आणि पेनिल कैंसर टाळता येते.
- धूम्रपान टाळा: पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोगाचा धोका कमी करा.

पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग संसर्गजन्य आहे का?
होय, पुरुषाचे जननेंद्रिय कर्करोग संक्रामक असल्याचे माहीत आहे. हे खालील माध्यमांद्वारे लोकांमध्ये पसरू शकते.
- लैंगिक संपर्काद्वारे पसरणे

प्रतिबंध:
- जिव्हाळ्याच्या भागांना दिवसातून दोन वेळा झुकवा आणि प्रत्येक संभोगानंतर गिळंकृत होणे अशा प्रकारे टाळा अशा स्राव काढून टाका
- आयुष्याच्या बाराव्या वर्षादरम्यान प्राथमिकतेने पौगंडावस्थेतील एंट्री-एचपीव्ही लसीकरण करा.
- कंडोमचा पद्धतशीरपणे वापर करा, जी प्राथमिकतेमध्ये वापरली जावी;
- सोओरेल आणि यूवी किरण थेरपी बाबतीत जननेंद्रियाच्या ऊती काळजीपूर्वक समाविष्ट ठेवा
- या उपचारांमुळे, कंडरोगाचा उपचार करण्याकरिता वापरला जातो, पेनिल कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.
- धूम्रपान करू नका. धूम्रपान शरीराचा डीएनए नष्ट करतो, ऑन्कोजेनिक पेशींमध्ये परिवर्तन होतो.



ल्यूकोप्लाकिआ

नियमित दातांची निगा न राखल्यामुळे दातदुखी,तोंड येणे,दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे यांच्या समस्या निर्माण होतात.मात्र एवढंच नाही तर हे तोंडाच्या कर्करोगाचेही लक्षण असु शकते. डेंट्झ डेंटल क्लिनिक, मुंबईच्या सौंदर्याचा दंतचिकित्सक, डॉ. करिश्मा जार्दी यांच्या मते, "तोंडाचा कर्करोग" हा जबडयाच्या आतल्या बाजुला असलेली त्वचा स्नायु,नसा,हिरड्यांमध्ये होण्याची शक्यता असते.ओरल कॅन्सरवर उपचार असले तरी दुर्देवाने निष्काळजीपणा व अयोग्य मार्गदर्शनामुळे आत्तापर्यंत अनेकांचा यात मृत्यु झाला आहे.’

सामान्यत: तोंडामधील कर्करोग हा ५० वर्षांवरील लोकांमध्ये जास्त आढळतो पण काहीवेळा तरुणांमध्येही या रोगाची लक्षणे दिसुन आलेली आहेत.डॉ. जार्दी यांच्या मतानुसार धुम्रपान,मद्यपान,तंबाखु व सुपारीचे अतिसेवन,ओठांचा सतत सुर्यप्रकाशाशी सबंध आल्याने हा आजार अधिक बळावतो.तसेच तोंडातील अस्वच्छतेमुळेही तोंडातील कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते. त्यासोबतच जर पुर्वी कधी तुम्हाला डोक्याचा किंवा मानेचा कर्करोग झाला असेल,वारंवार तोंडातील इन्फेक्शन होत असेल किंवा मग घरातील कोणाला याचा त्रास असेल तर त्यांना हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.

तोंडाच्या कर्करोगामुळे जबडयाच्या आतील भागात अनेक समस्या निर्माण होतात.या आजाराच्या उपचारा दरम्यान हिरडयांचे आजार,दात किडणे असे अनेक त्रास उद्धभवू शकतात. या आजारामुळे तोंडातील लाळ निर्माण करणा-या ग्रंथींना इजा होते ज्यांच्यामुळे खरंतर तोंडाच्या आतील भागाचे इनफेक्शन पासून संरक्षण होत असते.

ओरल कॅन्सरचा काय परिणाम दिसुन येतो.
- ओरल कॅन्सर होण्यासाठी कितीही गोष्टी कारणीभूत असल्या तरी तोंडांतील अस्वच्छतेमुळेच तो होतो हे मात्र नक्की.
- ओरल कॅन्सरमध्ये सुरुवातीच्या काळात तोंडातील आतल्या त्वचेवर फोड येतात किंवा गाठ येते.
- ओरल कॅन्सरमुळे दात सैल होतात,दातांचे व हिरडयांचे खुप नुकसान होते.दात जबडयापासून सैल होऊ लागतात.
- ओरल कॅन्सरमुळे अन्नपदार्थ चावण्यास त्रास होतो.घास गिळताना वेदना होतात.
- कर्करोगाच्या या गाठीमुळे गिळता न आल्यामुळे पुरेसे अन्न खाल्ले जात नाही व त्यामुळे कुपोषण होते.
- ओरल कॅन्सरची लक्षणे काय असतात.

हा ओरल कॅन्सर आहे का हे जाणून घेण्यासाठी काही महत्वाची लक्षणे
- दोन आठवडयापेक्षा जास्त दिवस तोंडामध्ये फोड येतात किंवा घसा दुखतो.
- तोंड किंवा मानेवर गाठ येते.
- घास चावण्यास व गिळण्यास त्रास होतो.
- गालाची जाडी वाढते.
- जबडा किंवा चेहरा बधीर होतो.
- खुप दिवस आवाज घोगरा असतो.
- तोंडात लाल किंवा पांढरे चट्टे पडतात.
- जबडा किंवा जीभेची हालचाल करणे कठीण होते.
- कवळी नीट बसत नाही.
- दात सैल होतात.
- बोलताना त्रास होतो.
- तोंडावाटे किंवा ओठातून रक्त येते.
- तोंडात गाठीप्रमाणे छोटे फोड येतात.
अशी कोणतीही लक्षणे आढल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टर किंवा डेंटिस्टकडे तपासणीसाठी जा.घाबरु नका कारण प्रत्येक वेळी ही लक्षणे आढळल्यास कॅन्सर असेलच असे नाही पण ही कर्करोगाची लक्षणे आहेत तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

ओरल कॅन्सर पासुन बचावण्यासाठी काय कराल.

काही महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला या आजारापासून दुर ठेऊ शकतात.त्यासाठी या गोष्टींचे जरुर पालन करा.

- धुम्रपान व तंबाखुचे सेवन टाळा-
धुम्रपान व तंबाखुच्या सेवन हानिकारक आहे.कारण सिगार,तंबाखु,सिगारेट,पाईप या गोष्टी कर्करोगाला आमत्रंण देतात.दारुमुळे कर्करोगाचा धोका अधिक निर्माण होतो.या गोष्टींचे अतिसेवन करणा-यांना कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.धुम्रपान व मद्यपानापासून दुर रहा.

- जास्त वेळ सुर्यप्रकाशात राहाणे टाळा-
सुर्यप्रकाशांमुळे ओठांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.जो खालच्या ओठाला मोठ्या प्रमाणात झालेला आढळुन येतो.यापासुन स्वत:चे संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन व लीपबाम वापरा.

- समतोल आहार घ्या-
सकस व समतोल आहार देखील तुम्हाला तोंडाच्या कर्करोग या आजारापासून दुर ठेवण्यास मदत करतो.

- स्वत:ची नियमित तपासणी करा-
स्वत:ची नियमित तपासणी करणे तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरु शकते. तुम्ही यासाठी स्वत:च स्वत:ची तपीसणी करु शकता.जीभ बाहेर काढा व सर्व बाजूने नीट तपासा.घशामध्ये आवाजात काही बदल जाणवतात का ते बघा.जर जबडयात किंवा मानेत कोणतीही गाठ आढल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- डेटिस्टकडे नियमित जा-
जरी तुम्ही स्वत:ची नियमित तपासणी करीत असाल तरी देखील कधी कधी तोंडामधील डाग व फोड लहान असल्याने तुम्हाला समजण्यास कठीण जाऊ शकतात तेव्हा त्यासाठी नियमित दंतवैद्याचा सल्ला घ्या.

- स्वत:च स्वत:ची तपीसणी करु शकता. जीभ बाहेर काढा व सर्व बाजूने नीट तपासा.घश्यामध्ये आवाजात काही बदल जाणवतात का ते बघा.जर जबडयात किंवा मानेत कोणतीही गाठ आढळल्यास त्वरीत डेंटिस्टचा सल्ला घ्या.

- जर तुम्ही स्वत:ची नियमित तपासणी करत असाल तरी देखील कधी कधी तोंडामधील डाग व फोड लहान असल्याने तुम्हाला समजण्यास कठीण जाऊ शकतात तेव्हा त्यासाठी नियमित दंतवैद्याचा सल्ला घ्या.

- योग्य वेळी निदान झाले तर तोंडातील कर्करोग पुर्ण बरा करता येऊ शकतो.जर तुम्ही धुम्रपान किंवा मद्यपानासारख्या वाईट सवयींचे बळी पडला असाल तर या लक्षणांना अजिबात दुर्लक्षित करु नका.

अत्यंत वाईट असा मुखरोगाचा राष्ट्रीय संसर्ग - घाणेरडे दात आणि कॅन्सर (कर्करोग) आपल्याला झाला आहे. यातील सर्वाधिक दु:खदायक भाग असा की तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे हा कर्करोग होतो. तोंडात वारंवार फोड येऊ लागतात आणि त्यामुळे तोंड उघडणे कठीण होऊन जाते. हीच मुखाच्या कर्करोगाची सुरुवात असते. यालाच 'ओरल सबम्युकस फायब्रोसिस' म्हटले जाते. यासोबतच तोंडाच्या आतील भागात लाल आणि पांढऱ्या रंगाचे डाग येतात. घसा किंवा गालांच्या आतील भागात फोड येतो आणि मुखाचा कर्करोग शरीरात स्थिरावतो. या फोडांमुळे प्रचंड वेदना होतात आणि दुर्गंधीसुद्धा येते. त्यातून रक्तही गळू लागते.

'बायोप्सी' आणि इतर चाचण्यांच्या माध्यमातून मुखाच्या कर्करोगाचे निदान केले जाते. कॅन्सरचे निदान झाले, की सिटी स्कॅन आणि मॅमोग्राफीच्या माध्यमातून कॅन्सरचा आकार आणि त्याची व्याप्ती निश्चित केली जाते. सामान्यपणे शस्त्रक्रिया करून कॅन्सर काढून टाकण्यालाच प्राधान्य दिले जाते. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून हाडे आणि गालांमधील कॅन्सर समूळ नष्ट केला जातो. मानेला कॅन्सरच्या गाठी निर्माण झाल्या असतील, तर त्यासुद्धा पहिल्याच टप्प्यात काढून टाकल्या जातात. कॅन्सरच्या उपचारातील शस्त्रक्रियेचा हा भाग कॅन्सर सर्जन पूर्ण करतात. दुसऱ्या टप्प्यात जबडा आणि हाडे; तसेच गाल एकमेकांशी जुळवावे लागतात. यासाठी प्लास्टिक सर्जनची मदत घ्यावी लागते.

शस्त्रक्रियेच्या जखमा वाळल्यानंतर कॅन्सरचे विषाणू पुन्हा शरीरात पसरू नयेत, यासाठी उपचार घ्यावे लागतात. रेडिओथेरपी अथवा किमोथेरपीद्वारे हे उपचार केले जातात. आजाराची व्याप्ती आणि खोली यावर उपचारांचे भवितव्य अवलंबून असते. सुरुवातीलाच जखमेवर उपचार केले गेले, तर कॅन्सर पूर्णपणे बरा होण्याची शक्यता ८० टक्के किंवा त्याहून अधिक असते; परंतु कॅन्सरचा प्रसार अधिक झाला असेल, तर एक तृतीयांश रुग्णसुद्धा पाच वर्षांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाहीत. त्यामुळे कॅन्सरच्या सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार करणे आवश्यक असते.

गुटखा किंवा तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी कॅन्सरचा इशारा देणारे तोंडातील लाल अथवा पांढरे डाग; तसेच फोडांकडे दुर्लक्ष करू नये. मात्र, कॅन्सरचा इशारा मिळण्यापूर्वीच तंबाखू खाण्याची सवयच बंद केली पाहिजे. कशाला उगीच हात दाखवून अवलक्षण करून घ्यायचे? तोंडाचा कॅन्सर टाळता येऊ शकतो, हे लक्षात घ्या.



पित्ताशयाचा कर्करोग

कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.

प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ होय. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत.

कर्करोगाचे प्रकार
1. बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.

2. मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणाऱ्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात.
जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसऱ्या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसऱ्या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात.

कर्करोगाचे ऊतीवरून केलेले प्रकार- शरीरातील उतीँवरून कर्करोगाचे तीन प्रकार केलेले आहेत.
1. संयोजी ऊतीना होणारा कर्करोग उती अर्बुद किंवा सारकोमा. या प्रकारातील कर्करोग स्नायू, अस्थि आणि रक्तवाहिन्यामध्ये होतो.
2. अपिस्तर उऊना होणारा कर्करोग ‘कार्सिनोमा’ अभिस्तर ऊती कर्करोग किंवा कर्क अर्बुद स्तने, बृहदांत्र,आणि फुफ्फुस अशा अवयवांमध्ये होतो.
3. ल्युकेमिया आणि लिंफोमा हा अस्थिमज्जेमधील रक्तपेशीना होणारा कर्करोग आहे. कधी कधी तो लसिका ग्रंथीमध्ये आढळतो.
आयुष्याच्या कोणत्याही कालखंडामध्ये कर्करोग होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग लहान मुलांमध्ये होतात. उदाहरणार्थ डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींच्या कर्करोग. बहुतेक प्रकारचे ल्यूकेमिया- रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट –पौरुष ग्रंथी, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रौढपणी होतो.

कर्करोगाचे मुख्य प्रकार

- कार्सिनोमा: त्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणाऱ्या कर्करोगाचे नाव.
- सार्कोमा: हाडे, कूर्चा, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारिक ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग.
- ल्यूकेमिया: रक्त तयार करणाऱ्या ऊतींमध्ये (उदा. अस्थिमज्जा) उगम पावणारा कर्करोग. ह्यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्या रक्तप्रवाहात मिसळतात.
- लिंफोमा आणि मायलोमा: शरीराच्या प्रतिकारयंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग.
- सेंट्रल नर्वस सिस्टिम कॅन्सर: मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ऊतींना होणारा कर्करोग.

कर्करोगाची वाढ
क्ष किरण चिकित्सा किंवा प्रत्यक्ष पाहणीमधून लक्षात आलेली गाठ लक्षात येईपर्यँत बरीच वर्षे झालेली असतात . उतीच्या प्रकाराप्रमाणे कर्करोगाच्या गाठीच्या वाढीच्या वेगामध्ये फरक आहे. बिनाइन ट्यूमर हा कर्करोग शरीरातील एखाद्या ठिकाणी म्हणजे कर्करोगाची प्राथमिक अवस्था. काही तज्ज्ञांच्या मते ही कर्करोगपूर्व स्थिति आहे. एका ठिकाणी आणि आवरण असणाऱ्या बिनाइन ट्यूमरच्या गाठी आसपासच्या अवयवामध्ये सह्सा पसरत नाहीत. पण अशा गाठी वाढ्ण्याची आणि शेजारील अवयवामध्ये पसरण्याची शक्यता असल्यानेत्या शस्त्रक्रियेने काढून टाकतात. काही कर्करोग एकाच ठिकाणी तर काही ठरावीक भागात असतात. ठरावीक भागामध्ये असलेल्या गाठी पसरण्याची अधिक शक्यता असते. पसरणाऱ्या गाठी मेटॅस्टॅटिक म्हणजे लसिकावाहिन्यामधून आणि रक्तवाहिन्यामधून शरीराच्या दूरवरच्या भागामध्ये नवीन गाठी निर्माण करतात.

कर्करोगावर उपचार
कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचा उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही. अचूक निदान आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज ५८ टक्के कॅन्सर बरे होतात किंवा आटोक्यात राहू शकतात. ६३ टक्के कॅन्सरांमध्ये उपचारानंतर रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. कोणाला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आणि कोणाला नाही हे मात्र अजून नक्की सांगता येत नाही. कॅन्सर कोणाला होण्याची शक्यता आहे हे मात्र सांगता येते. कॅन्सरचा धोका काही व्यक्तीमध्ये वाढतो. त्याच प्रमाणे काही उपायामुळे कॅन्सर धोक्याचे प्रमाण कमी होते.

असे असले तरी डॉक्टरना एखाद्या व्यक्तीस कॅन्सर का झाला हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता धूम्रपानामुळे वाढते. पण धूम्रपानामुळे कॅन्सर नक्की होईलच असे नाही. आयुष्यात कधीही सिगरेट न ओढणाऱ्या व्यक्तीस कदाचित फुफ्फुसाचा कॅन्सर होईल. कॅन्सर होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही कारणांच्या जवळपास कधीही नसलेल्या व्यक्तीस सुद्धा कॅन्सर झाल्याचे आढळून आले आहे.

कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाही. एका रुग्णापासून तो दुसऱ्या रुग्णामध्ये संक्रमित होत नाही. पण अ‍ॅल्युमिनियमची भांडी स्वयंपाकासाठी वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. कधीकधी डोक्याला लागलेल्या टेंग़ळामुळे कॅन्सर होतो. कॅन्सर होण्यासाठीच्या कारणापासून तुम्ही दूर राहू शकता. आनुवंशिक कारणानी कधीकधी कॅन्सर होतो. पण बहुतेक कॅन्सर होण्यामागे पर्यावरणातील काही घटक कारणीभूत आहेत. आपले खाणे, पिणे, सिगरेट ओढणे, कॅन्सर कारकांचा संपर्क उदाहरणार्थ किरणोत्सर्ग आणि पर्यावरणातील काही विषारी पदार्थ. सिगरेट आणि अल्कोहोलमुळे चाळीस टक्के कॅन्सर झाल्याचे सिद्ध झाले आहे. तेहतीस टक्के कॅन्सर नको ते पदार्थ खाण्यात आल्याने होतात.

माता पित्याकडून आलेला जनुकीय वारसा, वय, लिंग, आणि वंश ही कॅन्सर उद्भवण्यामधील आणखी काही कारणे. या कारणापासून स्वतःची सुटका करून घेता आली नाही तरी, कॅन्सर उद्भवण्यामधील काही कारणापासून दूर ठेवणे शक्यआहे. कॅन्सरच्या पर्यावरणीय घटकापासून दूर राहता येते. डॉक्टर यासाठी लागणारा सल्ला देऊ शकतात. अधून मधून कॅन्सरसाठीची तपासणी केल्यास कॅन्सरचे निदान लवकर होते. अशा चाचण्या लाभदायक आहेत की नाहीत हे डॉक्टर उत्तमपणे सांगू शकतो.

कर्करोगाची शक्यता खालील कारणानी वाढते
तंबाखू कर्करोगामुळे होणाऱ्या तेहतीस टक्के – एक तृतीयांश मृत्यू तंबाखू ओढल्याने, चघळल्याने किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखूच्या संपर्कात आल्याने होतात. तंबाखू ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये दररोज ओढली जाणारी तंबाखू, किती वर्षे धूम्रपान चालू आहे आणि किती खोलवर तंबाखूचा धूर फुफ्फुसात जातो, तेवढी फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत जाते. दररोज दहा सिगरेट्स ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता सिगरेट न ओढणाऱ्या व्यक्तीपेक्षा दहा पटीनी अधिक असते. याशिवाय धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीना स्वरयंत्र, घसा, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, मूत्राशय आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. धूम्रपानामुळे जठर, यकृत, प्रोस्टेट, मोठे आतडे आणि आमाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान करणाऱ्याया व्यक्तीने धूम्रपान सोडल्यानंतर कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. धूर विरहित तंबाखू ओढल्यास कर्करोगपूर्व ऊतींमधील झालेले बदल बहुतेक वेळा सामान्य होतात. क्लोरीनयुक्त पाणी हेही वाढत्या कर्करोगांचे कारण आहे.

आहार
अति तेलकट आहाराचा आणि मोठे आतडे, गर्भाशय व प्रोस्टेट कॅन्सरचा संबंध आहे असे काही प्रमाणात सिद्ध झाले आहे. तरीपण यावर झालेल्या संशोधनामधून हे पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. उदाहरणार्थ तेलकट पदार्थ खाण्याचा आणि स्तनांच्या कॅन्सरचा संबंध निर्विवादपणे जोडता येत नाही. आहारातील एकूण मेदाम्लाचे कर्करोगाशी सरळ संबंध जोडता आला नाही तरी आहारामधील जादा उष्मांकाचा स्तनांच्या कर्करोगाशी संबंध आहे असे आकडेवारी सांगते. अधिक उष्मांकाचे अन्न घेतल्यानंतर मासिकपाळी कमी वयात सुरू होते. नंतर च्या आयुष्यात अधिक मेदाम्लांचे सेवन केल्याने लठ्ठ्पणा येतो. लठ्ठ्पणामुळे शरीरातील स्त्री संप्रेरकाचे –इस्ट्रोजेनची पातळी वाढल्याने स्तनांच्या कर्करोगाची शक्यता वाढते.

योग्य आहार घेतल्याने काही प्रकारचे कर्करोगापासून संरक्षण मिळते. तंतुमय पदार्थाचे सेवन, जीवनसत्त्वे, क्षार, तेलाचे कमी प्रमाण आणि संतुलित आहार घेतल्याने कर्करोगाची शक्यता कमी होते. आहारामध्ये ताजी फळे पालेभाज्या, कोंड्यासह बनविलेला ब्रेड, कडधान्ये, पास्ता, तांदूळ आणि घेवडा यांचा समावेश आवश्यक. अतिनील किरण आणि किरणोत्सार. अतिनील किरणामुळे त्वचेचा कर्करोग होतो. त्वचा तपकिरी किंवा काळी करण्यासाठी वापरले जाणारे कृत्रिम अतिनील किरण उपकरणे यामुळे त्वचेचे नुकसान होते. आणि त्वचेच्या कर्करोगाचा घोका वाढतो. अतिनील किरणामुळे होणाऱ्या त्वचा कर्करोगाच्या शक्यतेपासून संरक्षण करण्यासाठी काही उपाय करता य्रेतात.

- त्वचा संरक्षक क्रीम वापरणे. अशा क्रीममध्ये त्वचा संरक्षक घटक १५% किंवा त्याहून अधिक प्रभावी असावा. हे क्रीम दिवसातून दोनदा उघड्या त्वचेवर चोळतात. घाम आल्यानंतर आणि पोहून झाल्यानंतर क्रीम आणखी एकदा लावतात.. तीव्र उन्हाळ्यात जेथे अतिनील किरणांची तीव्रता अधिक आहे अशा ठिकाणी दर दोन तासानी सन स्क्रीन क्रीम लावल्यास फायदा होतो. समुद्र किनाऱ्यावर जेथे हवेमध्ये धूलिकणांचे प्रमाण कमी असते तेथे अतिनील किरणांची तीव्रता अधिक असते.
- दिवसा १० ते दुपारी चार पर्यंत सूर्यप्रकाशामध्ये उभे राहणे टाळावे. उन्हामध्ये केव्हा जावे यासाठीचा एक सोपा नियम म्हणजे स्वतःच्या लांबीपेक्षा सावली जेव्हा लहान असेल तेव्हा उन्हामध्ये उभे राहू नये.
- मोठ्या काठाची हॅट वापरावी.
- अधिक वेळ उन्हामध्ये उभे रहावयाचे असल्यास अंगभर पूर्ण कपडे घालून उन्हामध्ये जावे. अधूनमधून सावलीत उभे रहावे. डोळ्यावर अतिनील किरण प्रतिबंधक गॉगल घालावा.
- गोरेपणा कमी करण्यासाठी अतिनील किरण उपचार केंद्रामध्ये (टॅनिंग सेंटर मध्ये) जाणे टाळावे.

- अल्कोहोल- अति मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये तोंड, घसा, अन्ननलिका, स्वरयंत्र आणि यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. एका अभ्यासात केवळ एक औंस (अंदाजे साठ मिली) एवढे मद्य घेणाऱ्या व्यक्तीमध्ये स्तनांच्या कर्करोग़ाची शक्यता वाढल्याचे दिसून आले. तुम्ही मुळीच अल्कोहोल घेत नसाल तर नव्याने अल्कोहोल घेण्याची सुरवात करण्याचे कारण नाही.

- किरणोत्सर्ग- आयनीभवन करू शकणाऱ्या विकिरणामुळे उदा०, क्ष किरणांच्या समवेत सतत काम करणे, किरणोत्सारी धातूंच्या संपर्कात येणे, अवकाश प्रवासाच्या वेळी पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर किंवा आत येणे ज्यामध्ये विश्वकिरणांच्या संपर्कात येणे किंवा अपघात यामुळे कॅन्सर होऊ शकतो. जपानमध्ये अणुबॉम्ब स्फोटानंतर तीव्र किरणोत्सार झाला. ज्या व्यक्ती स्फोटातून वाचल्या त्याना कॅन्सरला तोंड द्यावे लागले. क्ष किरण तपासणी करताना रुग्ण फार थोड्या वेळेपुरता आणि कमी क्षमतेच्या किरणोत्सारास सामोरे जातो. तसेच कॅन्सरवरील उपचाराचा भाग म्हणून ठरावीक तीव्रतेचा किरणोत्सार कॅन्सर गाठीवर सोडला जातो. त्याच्या परिणामांची आणि उपचाराची माहिती तज्ज्ञ डॉक्टर देऊ शकतात.

- रसायने आणि कर्करोगकारक काही रसायने- कीटकनाशके आणि धातू यांच्या संपर्कात आल्यास कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. ॲजबेस्टॉस, निकेल, कॅडमियम, युरेनियम, रॅडॉन, व्हिनिल क्लोराईड, बेंझिडिन, आणि बेंझीन ही रसायने कॅन्सरचे कारक असल्याचे ठाऊक आहे. अशा रसायनांच्या संपर्कात काम करावे लागत असेल तर सुरक्षेची पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.

- संप्रेरक उपचार पद्धत- (एचआरटी) हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी- ऋतुनिवृत्तीनंतर काही स्त्रियामध्ये काही स्त्रियामध्ये चेहऱ्यावरून गरम वाफा गेल्यासारखे वाटणे किंवा योनी कोरडी पडणे अशा तक्रारीवर ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचे उपचार केले जातात. अशा उपचारानंतर मिळालेले कॅन्सरचे निष्कर्ष मिश्र स्वरूपाचे आहेत. ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे मिश्र उपचार घेतलेल्या स्त्रियामध्ये स्तनांच्या कर्करोगाचा धोका फक्त इस्ट्रोजेन घेणाऱ्या स्त्रियांहून वाढलेला दिसला. पण इस्ट्रोजेन घेणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर अधिक प्रमाणात दिसून आला. एच आर टी उपचार घेणाऱ्या स्त्रियानी आपापल्या डॉक्टरशी याबाबत बोलणे आवश्यक आहे.

- डाय एथिल स्टिल्बेस्ट्रॉल ( डीईएस)- डाय एथिल स्टिल्बेसस्ट्रॉल हे एक कृत्रिम स्टेरॉईड संप्रेरक आहे. गर्भारपणातील काही प्रॉब्लेम दूर करण्यासाठी हे वापरण्यात येते. पण डायएथिल स्टिल्बेस्ट्रॉलच्या वापराने गर्भाशयमुख आणि योनिमार्गामध्ये काही अस्वाभाविक पेशी उत्पन्न झाल्याचे आढळले. याशिवाय डीईएस वापरणाऱ्या स्त्रियामध्ये एक विरळा योनिमार्गाचा आणि गर्भाशयमुखाचा कॅन्सर आढळला. डीईएस १९५० ते १९७१पर्यंत वापरात होते. यावर अवलंबून असणाऱ्या स्त्रियामध्ये स्तनाच्या कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. याचा वापर चालू असता ज्या स्त्रियांना मुली झाल्या त्या मुलीमध्ये जन्मानंतर स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले. ज्या स्त्रियांना मुलगे झाले त्यामध्ये नेहमीपेक्षा लहान अंडकोश तयार होणे किंवा अंडकोश अंडपिशवीमध्ये न उतरणे अशास सामोरे जावे लागले.

काही कर्करोग उदाहरणार्थ मेलॅनोमा, स्तन, बीजांड, प्रोस्टेट, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग काही कुटुंबांमध्ये अधिक प्रमाणात आढळल्याचे दिसले. हा प्रकार जनुकीय वारशाचा इतर कौटुंबिक वातावरणाचा किंवा खाण्यापिण्याच्या सवयीचा आहे की कसे यावर एकमत झालेले नाही. सामान्य पेशी विभाजनाच्या वेळी जनुकामध्ये आकस्मिक बदल होऊन कॅन्सर होतो. जनुकामधील बदल होण्यास जीवनशैली किंवा पर्यावरणातील काही कारणांचा सहभाग असावा. काही बदल मातापित्याकडून अपत्याकडे जनुकीय वारशाच्या स्वरूपात येत असावेत. जनुकीय कारणाने आलेले जनुकीय बदल मुलामध्ये असले म्हणजे त्याला कॅन्सर होईलच असे नाही.



आतड्याचे कर्करोग

प्रचलित वैद्यकीय शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना आतड्याचा आणि त्यातही गुदाशयाचा कर्करोग होऊन गेला असेल, तर या आजारांची अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता सर्वांत जास्त असते.

आधुनिक जीवनशैलीमुळे होणाऱ्या गंभीर आजारांत आतड्याच्या शेवटच्या भागाच्या, म्हणजे गुदाशयाच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. आनुवंशिकता हे गुदाशयाच्या कर्करोगाचं मुख्य कारण असलं, तरी आजच्या जगातील आहारातील बदल, हे कारणही तितकंच महत्वाचं ठरतं आहे. मांसाहारी पदार्थ, विशेषतः फास्ट फूडशी निगडीत प्रक्रिया केलेल्या मांसाहारी खाद्यांचा वाढता वापर, यामुळे गुदाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीय वाढतं आहे.

आज जगभरातील आकडेवारीचा विचार केला, तर फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर गुदाशयाच्या कर्करोगाचा क्रमांक लागतो. विकसित देशात याचं प्रमाण जास्त आहे. आज युरोपात दर १ लाख लोकांत २६, अमेरिकेत ४० आणि ऑस्ट्रेलियामध्ये ४८ व्यक्तींना हा आजार आढळून येतो. भारतात आज जरी या आजाराचे रुग्ण तुलनेनं कमी असले, तरी आहारविहारात पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण करणाऱ्या आजच्या पिढीमध्ये या आजाराचं प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.

डेन्मार्कमधील इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर एपिडिमिऑलॉजी मधील डॉ. अॅन जॉनलँड यांच्या वैद्यकीय संशोधनातून असं सिद्ध करण्यात आलं आहे, की गुदाशयाचा कर्करोग हा जीवनशैलीत आरोग्यदायी बदल केल्यास टाळला जाऊ शकतो. या संशोधनाच्या आधारावर धूम्रपान टाळणं, अतिरिक्त मद्यपान न करणं, अतिप्रमाणात मांसाहारी आहार केल्यास आणि नियमित व्यायाम करून पोटाचा घेर कमी ठेवला तर गुदाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीय कमी होऊ शकते.

या संशोधनामध्ये ५० ते ६४ वर्षे वयाच्या एकूण ५५,४८५ स्त्री-पुरुषांच्या आणि त्यांच्या जीवनशैलीच्या तब्बल १० वर्षं व्यापक प्रमाणात असंख्य चाचण्या केल्या गेल्या. दहा वर्षांच्या चाचणी काळानंतर यामधील ५७८ जणांना गुदाशयाचा कर्करोग झाल्याचं निष्पन्न झाले. या ५७८ रुग्णांचा आणि ज्यांना हा कर्करोग झाला नाही अशा बाकीच्या व्यक्तींचा तौलनिक अभ्यास आणि परिशीलन करून त्यांनी जीवनशैलीत ठराविक पाच बदल केल्यास हा कर्करोग २३ टक्के रुग्णांमध्ये टाळता येईल, असं जाहीर केलं. एवढेच नव्हे, तर या पाचपैकी एक जरी बदल लोकांनी अमलात आणला, तरी १३ टक्के व्यक्तींना गुदाशयाचा कर्करोग झाला नसता, असं प्रतिपादन त्यांनी केलं.

जीवनशैलीतील पाच बदल

१. स्थूलत्व टाळणं : आपलं वजन आणि उंची यांनुसार आदर्श वजन राखणं. त्याचबरोबर आपल्या शरीराची मापं म्हणजे, पोट आणि कंबर यांच्यातलं तुलनात्मक प्रमाण योग्य राखणं आवश्यक असतं. स्थूलत्वामुळे शरीरातल्या नैसर्गिक इन्सुलिनला होणारा प्रतिरोध वाढतो आणि त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ वेगानं होऊ शकते, असं अनुमान आहे.

२. नियमित शारीरिक व्यायाम करणं. बैठी जीवनशैली टाळणं. उदा. छोट्या मोठ्या कामांसाठी शरीराची हालचाल करणं. म्हणजे जवळच्या अंतरावर वाहनानं जाण्याऐवजी चालत जाणं, लिफ्टऐवजी जिना वापरणं इत्यादी.

३. आहारातील बदलः रेड मीट म्हणजे प्राण्यांचं मांस आणि त्यापासून बनणारे पदार्थ. तसंच कोंबडीच्या तंगडीचं मांस. या पदार्थांचं सेवन टाळणं.

४. धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो, हे सर्वश्रुत आहेच. ते टाळल्यानं गुदाशयाचा कर्करोग होण्याची शक्यतासुद्धा कमी होते.

५. मद्यपानाचं प्रमाण कमी करणं. पाश्चात्य देशात, मद्यपान विशेषतः वाइन घेणं, हे रूढीपरंपरागत आहे. मद्यार्क असलेल्या पेयांचं सेवन दैनंदिन जीवनात खूप मर्यादित ठेवल्यास हा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

प्रचलित वैद्यकीय शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना आतड्याचा आणि त्यातही गुदाशयाचा कर्करोग होऊन गेला असेल, तर या आजारांची अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. त्याचप्रमाणे ज्यांच्या आतड्यामध्ये पॉलिप्स (आतड्याच्या मांसल पेशींची वाढ) असतात, अशांमध्येदेखील या आजाराचा धोका सर्वाधिक असतो. या संशोधनानुसार जीवनशैलीतील हे बदल आचरणात आणलं, तर हा कर्करोग होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि झालाच, तर तो खूप उत्तरायुष्यात होऊ शकतो. यामुळेच वयाच्या पन्नाशीमध्ये ज्या सर्वसाधारण तपासण्या केल्या जातात, त्यामध्ये गुदाशयाच्या कर्करोगाच्या शक्यतेच्या दृष्टीनं वैद्यकीय तपासण्या करून घेतल्यास या आजाराचं निदान योग्य वेळेत होऊन, त्यावर यशस्वी उपचार केले जाऊ शकतात.



आतडय़ाचा कर्करोग

जगामध्ये कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या विविध अवयवांची क्रमवारी लावल्यास, मोठय़ा आतडय़ाचा तिसरा क्रमांक लागतो. जगभर या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: पाश्चात्त्य देशांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्या मानाने आशिया, आफ्रिका खंडामध्ये कमी आहे. परंतु हल्ली ज्या ज्या देशामध्ये पाश्चात्त्य देशांप्रमाणे राहणीमान व खाणेपिणे बदलले आहे, त्या देशामध्ये मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचे प्रमाणसुद्धा वाढत आहे.
मोठे आतडे म्हणजे आपल्या अन्नपचन संस्थेच्या सर्वात शेवटचा नळीसारखा अवयव. ज्यात चयापचय क्रियेनंतर उरलेला कचरा किंवा मल साठवलेला असतो. मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग हा आतडय़ाच्या आतील आवरणांपासून सुरू होतो व तेथून पुढे पसरतो. अनेकदा मोठय़ा आतडय़ामध्ये छोटय़ा छोटय़ा गाठी आढळून येतात. हे पॉलिप्स (Polyps) सुरुवातीस कर्करोगाचे नसतात. परंतु अनेक वर्षे तसेच आतडय़ामध्ये राहिल्यास त्याचे परिवर्तन कर्करोगामध्ये होऊ शकते, म्हणून अनेकदा सर्जन्स कोलोनोस्कोपी (Surgeons – Colonoscopy दुर्बिणीचा तपास) करताना हे पॉलिप्स आढळल्यास काढून टाकतात असे पॉलिप्स काढून ते तपासणीस पाठवून त्यात कर्करोग आहे की नाही, हे पडताळून पाहिले जाते.
हा कर्करोग जरी संसर्गजन्य नसला तरी आनुवंशिक वा खानदानी आहे. म्हणजेच एखाद्या कुटुंबात हा आजार झाला तर त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना (भावंडे, मुले) हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

आतडय़ाचा कर्करोग होण्याची कारणे –
असमतोल आहार – स्निग्ध पदार्थ म्हणजेच चरबी जास्त असलेला आहार कर्करोगास आमंत्रित करतो. ज्या देशामध्ये जास्त चरबीयुक्त आहार घेतला जातो, तिथे या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळते. स्निग्ध (RGYM) पदार्थाच्या पचनक्रियेनंतर जे अंतिम घटक तयार होतात ते कार्सिनोजेनिक (Carcinogenic) म्हणजेच कर्करोगास आमंत्रण देतात.
याउलट ज्या आहारामध्ये खूप प्रमाणात फळे, भाज्या, पालेभाज्या व फायबरयुक्त पदार्थाचा समावेश असतो (उदा. भारतीय चौरस आहार) त्या देशात/त्या व्यक्तींना हा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

मोठय़ा आतडय़ातील गाठी-पॉलिप्स
या गाठी (पॉलिप्स) बऱ्याचदा कर्करोगाच्या नसल्या तरी काही वर्षांनी पुढे जाऊन त्याचे रूपांतर कर्करोगामध्ये होऊ शकते.
मोठय़ा आतडय़ाचे काही आजार
कोलायटिस , कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या मोठय़ा आतडय़ात खूप गाठी असणे, हे आजार रुग्णांना अनेक वर्षे असतात. हे आजार ज्या रुग्णांना अनेक वर्षे असतात त्यांना मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग होण्याची शक्यता दसपटीने वाढते.

आनुवंशिकता व जनुकांचा प्रभाव :
कुटुंबामध्ये म्हणजेच रक्ताच्या नात्यामध्ये जर कुणाला मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग झाला असेल तर हा कर्करोग इतर व्यक्तींना होऊ शकतो. अशा व्यक्तींनी तसेच ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस १० वर्षांपेक्षा जास्त काळ असेल तर वर्षांतून एकदा सर्जनकडून वा दुर्बिणीद्वारे मोठय़ा आतडय़ाची तपासणी करणे आवश्यक असते.

या कर्करोगाची लक्षणे
* थकवा, अशक्तपणा

* शौचाला जाण्याच्या सवयींमध्ये बदल होणे म्हणजे जी व्यक्ती रोज सकाळी शौचास जाते त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा शौचाला जायला लागणे वा दोन-चार दिवसांतून एकदा पोट साफ होणे

* शौचाला पातळ होणे किंवा बद्धकोष्ठाचा त्रास सुरू होणे

* शौच पहिल्यापेक्षा अरुंद होणे

* शौचावाटे रक्त जाणे

* वजन घटणे, पोटात दुखू लागणे वा पोट फुगल्यासारखे वाटणे.
मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाची लक्षणे आजार सुरू झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर जाणवायला लागतात. कर्करोग पोटात कुठल्या भागात आहे, यावरून लक्षणे बदलू शकतात. कर्करोगाची गाठ जर उजव्या बाजूला आतडय़ात असेल तर हे आतडे मोठे असल्याने कॅन्सरची गाठ खूप मोठी झाल्याशिवाय त्रास सुरू होत नाही. त्यामुळे हा आजार फार उशिरा लक्षात येतो. या कर्करोगामध्ये बराच काळ शौचावाटे रक्त जाऊन त्या रुग्णामध्ये अनेमिया (रक्त कमी होण्याची) लक्षणे म्हणजेच थकवा, दम लागणे ही लक्षणे दिसतात.

तपासण्या कोणत्या कराव्यात?
रुग्णास जेव्हा मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग असण्याची शक्यता वाटते तेव्हा पुढील तपासण्या कराव्यात.
* कोलोनोस्कोपी यामध्ये एक नळी (दुर्बीण) शौचाच्या जागेमधून मोठय़ा आतडय़ापर्यंत आत टाकली जाते व आतडे आतून पूर्णपणे पाहून घेतले जाते. काही संशयास्पद आढळल्यास वा पॉलिप्स आढळल्यास ते काढून बाहेर घेतले जातात व पॅथॉलॉजिस्टकडून कॅन्सरसाठी तपासून घेतले जातात.

* सीटी स्कॅन – आतडय़ाचा कॅन्सर कुठे व किती पसरलाय हा तपास केला जातो.

* बा एनिमा – बेरीयम नावाचे पांढरे औषध एनिमाद्वारे मोठय़ा आतडय़ात टाकून एक्स-रे काढणे. दुर्बिणीच्या तपासामुळे हल्ली याची आवश्यकता कमी पडते.
काय खबरदारी घ्यावी?

* योग्य आहार घ्यावा, ज्यात पालेभाज्या, सलाड, तंतुमय पदार्थ म्हणजे कोंडा न काढता केलेल्या चपात्या, पॉलिश न केलेले तांदूळ वगैरे अन्न घ्यावे, चरबीयुक्त पदार्थाचे प्रमाण कमी करावे, जसे की तेल, अंडी, मटण, चीज, बटर.

* पन्नाशीनंतर प्रत्येकाने दरवर्षी किंवा शौचाच्या सवयीत बदल झाल्यास आपले शौच तपास करून त्यातून रक्त जात नाही ना हे पाहावे तसेच शौचाची जागा आतून तपासून घ्यावी.

* कॅन्सर रुग्णाच्या फॅमिलीमध्ये कुणी संशयास्पद असेल तर त्याच्या रक्त, लघवी, शौचाचा तपास करून घ्यावा. सोनोग्राफी, एन्डोस्कोपी, तपास जरुरीप्रमाणे करून घ्यावे.

उपाययोजना
योग्य उपाययोजना जर योग्य वेळेत झाल्या तर मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचे रुग्ण अनेक वर्षे चांगले राहू शकतात, म्हणूनच कर्करोगाचे लवकर निदान हे महत्त्वाचे ठरते,

शस्त्रक्रिया : मोठय़ा आतडय़ाचा खराब झालेला भाग काढून टाकणे, हीच सर्वात चांगली उपाययोजना. कर्करोगाच्या दोन्ही बाजूंचा पाच-दहा सेंमी भाग काढून ते पुन्हा जोडले जाते. मोठय़ा आतडय़ाच्या आजूबाजूचा भागही काढला जातो. जर आजूबाजूचे अवयव या कर्करोगाला अडकलेले असतील तर तेही शक्य असल्यास काढले जातात.
सर्वसाधारणत: मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचे उपाय केल्यानंतर रुग्ण जगण्याची शक्यता चांगली असल्यामुळे मोठय़ा शस्त्रक्रिया केल्या जातात. यकृत/फुप्फुस हेही कर्करोगामुळे ग्रस्त झाले असल्यास त्याचा भाग काढून रुग्णास वाचवता येते. अगदी पुढे गेलेल्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करता येत नाही.

केमोथेरपी (Chemotherapy)- आज अनेक नवीन औषधे बाजारात उपलब्ध आहेत. ही औषधे वापरून कर्करोगाची गाठ कमी करता येते. यामुळे मोठय़ा गाठी काढणे सुकर होते. तसेच शस्त्रक्रिया केल्यानंतर थोडासा आजार बरा करता येतो. ही औषधे जरी महाग असली तरी त्याचा चांगला परिणाम होतो. परंतु कुठल्याही कर्करोगाच्या औषधांप्रमाणे याचेही शरीरावर अनावश्यक परिणाम होतात. त्यामुळे काळजी बाळगणे आवश्यक असते.

Dr. Jitendar Choudhary
Dr. Jitendar Choudhary
BHMS, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. Mahesh Mahjan
Dr. Mahesh Mahjan
BAMS, Ayurveda, 19 yrs, Pune
Dr. DUSHYANTSINH RAUL
Dr. DUSHYANTSINH RAUL
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 5 yrs, Pune
Dr. Nandita Bhati
Dr. Nandita Bhati
BDS, Dentist Implantologist, 14 yrs, Pune
Dr. Sanjay  Babar
Dr. Sanjay Babar
BAMS, Ayurveda General Surgeon, 15 yrs, Pune
Hellodox
x