Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शरीराच्या विकासासाठी अनेक व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. प्रत्येक व्हिटॅमिन शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी हातभार लावतं. त्यातल्यात्यात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत आवश्यक ठरतं. पण काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, जर तुम्ही अशा पदार्थांचं सेवन करत असाल, ज्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं, तर त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.



त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका 15 टक्क्यांनी कमी

जवळपास 1 लाख 25 हजार अमेरिकी नागरिकांवर करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये असं आढळून आलं की, जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए चं सेवन करणाऱ्या लोकांमध्ये squamous cell स्किन कॅन्सरचा धोका जवळपास 15 टक्क्यांनी कमी होतो. जामा डर्मेटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, लोकांनी जास्ती जास्त व्हिटॅमिन एचा स्त्रोत असणाऱ्या पदार्थांचे सेवन केलं होतं.


फळं आणि भाज्यांपासून मिळणारं व्हिटॅमिन ए सुरक्षित

अमेरिकेतील ब्राउन यूनिवर्सिटीचे असोशिएट प्रोफेसर यूनुंग चो यांनी सांगितले की, ' संशोधनामधून समोर आलेल्या निष्कर्षांमधून आहारामध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश करणं कितपत आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. फळं आणि भाज्यांमध्ये मिळणारं व्हिटॅमिन ए सुरक्षित असतं. 'यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) यांनी सांगितल्यानुसार, व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांमध्ये रताळी, गाजर, लोबिया, लाल शिमला मिरची, ब्रोकली, पालक, डेअरी प्रोडक्ट, मासे यांचा समावेश होतो.


जास्त उन्हामध्ये राहिल्याने स्किन कॅन्सरचा धोका

स्क्वॅमस सेल कार्सिनोमा स्किन कॅन्सरचा एक सामान्य प्रकार आहे. संशोधकांनी असं सांगितलं आहे की, 11 टक्के अमेरिकी नागरिक स्क्वॅमस सेल स्किन कॅन्सरने ग्रस्त आहेत. हा कॅन्सर प्रामुख्याने जास्तीत जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात राहिल्याने होतो. खासकरून चेहरा आणि कपाळ जास्तवेळ उन्हाच्या संपर्कात येतात. या संशोधनामध्ये सरासरी 50 वर्षांच्या व्यक्तींमध्ये 75 हजार पेक्षा जास्त अधिक महिला आणि जवळपास 50 हजार पुरूषांचा डेटा समाविष्ट आहे. संशोधनामध्ये सर्वांना त्यांचं सरासरी आहार आणि सप्लिमेंट्सबाबत विचारण्यात आलं. यांमध्ये 4 हजार लोकांमध्ये स्किन कॅन्सर आढळून आला आणि या सर्व व्यक्ती व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करत असल्याचे समोर आले.


जास्त 'व्हिटॅमिन ए'च्या सेवनाने हाडांवर होतो परिणाम

व्हिटॅमिन ए एक फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, याचा अर्थ असा आहे की, हे फॅट सेल्समध्ये जमा होतं. परंतु, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, जेव्हा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन एचं सेवन केलं जातं. तेव्हा हे असुरक्षित स्तरापर्यंत पोहोचलं जातं. दरम्यान, व्हिटॅमिन एचं जास्त सेवन केल्याने ऑस्टियोपोरोसिस आणि हिप फ्रैक्चर चा धोका वाढतो.

टिप : वरील सर्व बाबी या संशोधनातून सिद्ध झालेल्या आहेत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरतं.

सर्दी आणि खोकल्याच्या व्हायरसच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करणं खरचं शक्य आहे का? तुम्ही म्हणाल काही काय म्हणताय? पण या प्रश्नाचं उत्तर ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. खरचं सर्दी आणि खोकल्याच्या व्हायरसच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करणं खरचं शक्य असल्याचे संशोधकांनी एका संशोधनातून सिद्ध केलं आहे. म्हणजेच, कॉमन कोल्डचे व्हायरस कॅन्सरच्या पेशींना मुळापासून नष्ट करण्यासाठी मदत करत असल्याचे सिद्ध झाले आहे. मेडिकल एक्सप्रेस या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधकांचे म्हणणे आहे की, कोल्ड व्हायरस म्हणजेच, coxsackievirus किंवा CVA21 ब्लॅडरमधील कॅन्सरच्या पेशी मुळापासून नष्ट करण्यासाठी मदत करतात.

संशोधनाच्या ट्रायलसाठी इंग्लंडमधील यूनिवर्सिटी ऑफ सरी द्वारे करण्यात आलेल्या एका तपासणीमध्ये पित्ताशयाच्या कॅन्सरने (ब्लॅडर कॅन्सर) ग्रस्त असणाऱ्या 15 रूग्णांना सामाविष्ट करण्यात आलं होतं. सर्जरी करण्याच्या आधी या रूग्णांना coxsackievirus किंवा CVA21 नावाचं कोल्ड व्हायरस इंजेक्ट करण्यात आलं. सर्जरी केल्यानंतर जेव्हा रूग्णांच्या पेशींची तपासणी करण्यात आली, त्यावेळी कोल्ड व्हायरसने फक्त कॅन्सरच्या पेशीच नष्ट नाही केल्या तर प्रजननामार्फत या व्हायरसने आपली संख्या देखील वाढवल्याचे दिसून आले.

वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार, कोल्ड व्हायरस कॅन्सरच्या पेशींमध्ये प्रवेश केल्यानंतर एका प्रतिरोधात्मक प्रोटिनला जन्म देतात, ज्यामुळे इतर पेशींना संकेत मिळतो आणि त्यादेखील या व्हायरसशी जोडल्या जातात. तपासणीमध्ये सहभागी करण्यात आलेल्या सर्व रूग्णांमध्ये असं दिसून आलं की, त्यांच्यामध्ये ट्यूमर नष्ट होण्यासोबतच कॅन्सरच्या पेशीही मुळापासून नष्ट झाल्याचं दिसून आलं. एवढचं नाही तर काही आठवडे ट्रिटमेंट घेतल्यानंतर कॅन्सरची काही लक्षणं आणि संकेतही पूर्णपणे नष्ट झाले.

आजकाल ब्लॅडर कॅन्सर म्हणजेच, पित्ताशयाच्या कॅन्सरही इतर कॅन्सरप्रमाणे साधारण झाला आहे. सुरुवातीला या कॅन्सरची लक्षणं समजणं कठिण असतं, कदाचित म्हणूनच या कॅन्सरला ब्रेस्ट कॅन्सरप्राणेच सायलेन्ट किलर म्हटलं जातं. जास्तीत जास्त रूग्णांना या आजाराची लक्षणं वाढल्यानंतर समजतात. 2016मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, ब्लॅडर कॅन्सरने ग्रस्त असलेले सर्वात जास्त रूग्ण उत्तर भारतामध्ये आढळून आले होते.

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

शस्त्रक्रिया, रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी आणि किरणोपचार अर्थात रेडिएशन, या कर्करोगाच्या तीन उपचारपद्धती. परंतु रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी हा त्यातील प्रमुख उपचार. कधी शस्त्रक्रियेपूर्वी तर कधी शस्त्रक्रियेनंतर तो केला जातो. ‘किमो’ हा कधी, कोणता व किती द्यायचा ते मात्र डॉक्टर ठरवितात. या किमोथेरपीतून कर्करोग पेशींची वाढ खुंटते, मात्र चांगल्या पेशींवर तात्पुरते साइड इफेक्ट होतात. परंतु कर्करोग आटोक्यात राहण्यासाठी आणि कालांतराने निरोगी होण्यासाठी रसायनोपचार अर्थात किमोथेरपी महत्त्वाची आहे.

कर्करोगाचे निदान झाल्यानंतर जी उपचारपद्धती अवलंबण्यात येते. त्यात प्रमुख तीन गोष्टी असतात, त्या म्हणजे शस्त्रक्रिया, रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी किंवा किमो आणि तिसरी गोष्टी म्हणजे किरणोपचार अथवा रेडिएशन. रसायनोपचारात कर्करोगनाशक औषधांचा वापर करून कर्करोगाच्या पेशींचा नाश केला जातो. यात वापरलेली रासायनिक औषधे कर्करोग पेशींची वाढ व त्यांचे विभाजन थांबवितात. परंतु त्याचा परिणाम चांगल्या पेशींवरही होतो. त्यामुळेच याचे काही सहपरिणाम (साइड इफेक्ट) दिसून येतात. रुग्णाला झालेला कर्करोगाचा प्रकार, रुग्णाचे वय, आरोग्य हे सर्व लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टर ‘किमो’ कधी, कोणती व किती द्यायची ते ठरवितात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला वेगळा असू शकतो. कधी शस्त्रक्रियेपूर्वी कर्करोगाची गाठ आकुंचित करण्यासाठी किमो दिले जातात. शस्त्रक्रिया किंवा किरणोपचारानंतर तर कधी कर्करोग पुन्हा उद्भवू नये म्हणून किमो दिले जातात. किरणोपचारांबरोबर परिणाम वाढविण्यासाठीही किमो दिले जातात.

रसायनोपचार वा किमोथेरपी ही वेगवेगळ्या पद्धतीनेही दिली जाते. जसे शिरेवाटे इंजेक्शनद्वारा, तोंडावाटे कॅप्सुलच्या स्वरुपात यकृत, जठर, अंडाशय अशा अवयवांमध्ये रोपण करून अथवा स्रायूंमध्ये किंवा त्वचेखाली इंजेक्शनने. बहुतेक वेळा किमो ही हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात अथवा रसायनोपचाराच्या विशेष दिवस कक्षात (डे केअर युनिट) दिले जातात. कुठले रसनोपचार द्यायचे व कसे द्यायचे हे तज्ज्ञ डॉक्टर ठरवतात. प्रशिक्षित परिचारिकेच्या निगराणीखाली ते दिली जातात. काही रुग्णांना त्यासाठी हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.

रसायनोपचारात वापरलेल्या वेगवेगळ्या रसायनांचे सहपरिणाम (साइड इफेक्ट) वेगवेगळे असतात. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते, त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्तींवर कमी-जास्त प्रमाणात साइड इफेक्ट होतात. ते सर्व थोड्याच काळासाठी असतात व किमोची सर्व चक्रे पूर्ण झाली की, ते हळूहळू नाहीसे होतात. शरीराच्या ज्या पेशींचा व अवयवांचा वापर जास्त असतो व जेथे सतत पेशींचे पुनर्निमाण होत असते. त्या भागांवर रसायनोपचाराचा सर्वात अधिक परिणाम दिसतो. तोंडाचे आतील अस्तर, जठर वा पचनसंस्थेचे आतील अस्तर त्वचा, केस आणि अस्थिमज्जा जेथे नव्या रक्तपेशी तयार होत असतात.

रसायनोपचारामुळे पचनसंस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. अन्नाची चव बदलू शकते, कधी अन्न बेचव लागते वा ते जास्त खारट, कडवट लागते. तोंडात आतून लहान फोड येऊन ते लाल होतात. मळमळ-ओकारीसारखे वाटू लागते. अतिसार वा बद्धकोष्ठताही होऊ शकते. तोंडाची चव गेल्यास थंड व गोड पदार्थ खावेत. तर अननस खाल्यास तोंड आतून स्वच्छ राहते. मळमळ कमी करण्यासाठी आले-लिंबू रस, पुदिनायुक्त पेय घेता येईल. पोटाचे विकार टाळण्यासाठी ताजे, तंतूमय सकस अन्न, ताजी फळे खाण्याबरोबर हलका व्यायामही आवश्यक आहे. रसायनोपचारात केस गळण्याची बरीच जास्त शक्यता असते. पुरुष रसायनोपचाराआधीच केस बारीक कापून घेऊ शकतात. महिलांनी आपल्या केसांचा वा त्यांच्याशी मिळता-जुळता विग करून तो वापरल्यास परक्या लोकांच्या भोचक प्रश्नांना सामोरे जावे लागणार नाही.

रसायनोपचारानंतर रक्तातील विविध पेशींची संख्या कमी होते. याचे कारण अर्थात अस्थिमज्जेवर रासायनिक औषधांनी झालेला सहपरिणाम होय. प्रत्येक चक्रानंतर रोगजंतूंशी लढणाऱ्या पांढ-या रक्तपेशी कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जंतूसंसर्ग होऊन आजारी पडण्याची शक्यता वाढते. याशिवाय रसायनोपचाराचा परिणाम मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर, कानांच्या श्रवणक्षमतेवर होऊ शकतो. हातापायाला मुंग्या येणे, हातपाय बधीर होणे, त्वचा कोरडी पडणे यासारखे परिणाम दिसतात. रसायनोपचाराचे म्हणजेच किमोथेरपीचे असे वेगवेगळे सहपरिणामत होत असले तरी ते तात्पुरते असतात. तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरविलेली चक्रे पूर्ण करणे आवश्यक असते व उपचारानंतर सहपरिणाम थांबतात किंवा हळूहळू कमी होतात.


प्रत्येक चक्रामध्ये रसायनोपचारानंतर काही काळ हा विश्रांतीचा असतो. त्यादरम्यानही सहपरिणाम कमी होऊन रक्तपेशींची संख्या वाढू लागते व रुग्ण पुढील चक्रासाठी शारीरिकदृृष्ट्या तयार होऊ शकतो. रसायनोपचारादरम्यान रुग्णाला आपले मानसिक आरोग्य राखणेही गरजेचे असते. यासाठी रुग्णाने दैनंदिन व्यवहार सुरु ठेवावेत. मित्रमैणिणींमध्ये मिसळावे. योग्य आहार घ्यावा. हलका व्यायाम करावा. डायरी लिहावी, आपले मन रमेल असा छंद जोपासावा. रसायनोपचाराला इतर आयुर्वेदासारख्या पूरक उपचारांची जोड देऊन सहपरिणाम कमी करता येऊ शकतात. रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी कर्करोगाची लक्षणे कमी होऊन तो आटोक्यात येण्यास व रुग्ण पूर्णपणे निरोगी होण्यास अत्यावश्यक आहे, हे लक्षात घेतल्यास अधिक सकारात्मकतेने सहपरिणामांना सामोरे जाता येईल.

अनेकांना गरमागरम चहा पिण्याची सवय असते. मात्र यामुळे इसॉफेगस कॅन्सर होण्याचा धोका असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.

गरमागरम चहा पिण्याची सवय प्यायला अनेकांना आवडतो. या चहाचं तापमान साधारणत: 75 डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

काहीजण चहा कपात ओतल्या ओतल्या लगेच पिण्यास सुरुवात करतात. मात्र असं न करता 4 मिनिटं चहा थांबल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.

अमेरिकेच्या कॅन्सर सोसायटीचे मुख्य लेखक फरहद इस्लामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरमागरम चहा किंवा अन्य पदार्थांचं सेवन कॅन्सरचं कारण ठरू शकतं. यामुळे इसॉफेगस कॅन्सर होऊ शकतो.

जवळपास 50,045 लोकांचा या अभ्यासात विचार करण्यात आला. त्यांचं वय साधारणत: 40 ते 75 वर्षांच्या दरम्यान होतं. चहा प्यायल्यानं ग्रासनली कॅन्सरचा धोका 90 टक्क्यांनी वाढतो, असा निष्कर्ष अभ्यासातून पुढे आला.

ग्रासनली कॅन्सर हा देशातील सहाव्या क्रमांकाचा मोठा कॅन्सर आहे. यामध्ये महिलांचं प्रमाण मोठं आहे.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

सीए -125 चाचणी म्हणजे काय ?
सीए -125 चाचणी आपल्या रक्तातील काही प्रथिने शोधते. डिम्बग्रंथि कर्करोगाकरिता ही प्रथिने कारण असू शकतात परंतु इतर परिस्थितीमुळे देखील ते आपल्या रक्तामध्ये येऊ शकतात.

ही चाचणी खालील नावाने देखील ओळखल्या जाते:
सीए-125 ट्यूमर मार्कर चाचणी
कर्करोगाचे अँटीजन 125 चाचणी

आपण डिम्बग्रंथि कर्करोगासाठी उपचार सुरू करणार असल्यास आपले डॉक्टर सीए -125 चा ऑर्डर देऊ शकतात. चाचणी आता आणि आपल्या थेरपी नंतर किती सक्रिय आहे हे निर्धारित करण्यात मदत करेल. हे आपले उपचार किती चांगले कार्य करीत आहे याची एक चांगली छायाचित्रे देईल. आपल्या डिम्बग्रंथि कर्करोगाच्या उपचारांदरम्यान आपण ही चाचणी अनेक वेळा केली पाहिजे. जर डिम्बग्रंथि कर्करोगाचा धोका असेल तर आपले डॉक्टर नियमितपणे ट्रान्सव्हॅगिनल अल्ट्रासाऊंडसह सीए-125 रक्त तपासणी करण्यास शिफारस करु शकतात. डिम्बग्रंथि कर्करोग असलेल्या 80% किंवा त्यापेक्षा जास्त महिला सीए -125 च्या उच्च पातळीवर असतात. पण बरेच अपवाद आहेत. डिम्बग्रंथि कर्करोगाच्या प्रारंभिक अवस्थेत सुमारे अर्ध्या स्त्रिया सामान्य पातळीवर असतात. अशा तपासणीची आवश्यकता आणि वेळेबद्दल नेहमी आपल्या डॉक्टरांशी बोला. आपल्या पॅल्विक क्षेत्रामध्ये कुठलीही गळती होत असल्यास CA-125 चाचणी देखील केली जाऊ शकते. हे आपल्या डॉक्टरांना गाठीचे कारण समजण्यात मदत करेल.

ही चाचणी कुठल्या परिस्थिती कार्य करणार नाही ?
जोपर्यंत आपणास कर्क रोगाचा जास्त धोखा नाही तोपर्यंत डिम्बग्रंथि कर्करोगासाठी आपले डॉक्टर कदाचित सीए-125 चाचणी वापरणार नाहीत. याचे कारण असे की सर्व डिम्बग्रंथि कर्करोगांमुळे सीए -125 पातळी वाढू शकत नाहीत

इतर गोष्टी ज्यामुळे डिम्बग्रंथि कर्करोगाव्यतिरिक्त तुमचे सीए -125 पातळी वाढू शकते:
डायव्हर्टिक्युलिटिस
एंडोमेट्रोसिस
फायब्रोइड्स
इन्फ्लॅमेटरी आंत्र रोग
लिव्हर रोग
मासिक पाळी
ओटीपोटाचा दाह रोग
पेरीटोनिटिस
गर्भधारणा
अलीकडील शस्त्रक्रिया
बदललेले डिम्बग्रंथि पित्त

आपले चाचणी परिणाम समजून घ्या:
सीए-125 ची उच्च पातळी म्हणजे डॉक्टर ज्याचा शोध घेऊ इच्छितात, परंतु याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीस डिम्बग्रंथि कर्करोग आहे. चाचणी परिणाम कदाचित तो उपयुक्त होणार नाही. आरोग्य स्थिती किंवा समस्या निदान करण्यासाठी बदलते स्तर दर्शविणारे परिणाम चांगले असतात. आपले स्तर उच्च असल्यास, कारण निर्धारित करण्यासाठी आपले डॉक्टर इतर चाचण्या जसे की पेल्विक किंवा ट्रान्सव्हॅग्नल अल्ट्रासाऊंडची शिफारस करू शकतात.
जर डिम्बग्रंथि कर्करोगासाठी उपचार केले जात आहेत आणि या वेळी आपल्या सीए -125 पातळी खाली गेल्या आहेत तर याचा अर्थ असा आहे की आपला उपचार कार्यरत आहे. जर ते सारखेच राहिले किंवा वर गेले तर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या थेरपीची आवश्यकता असू शकते. आपले डॉक्टर आपल्याबरोबर आपल्या उपचार पर्यायांबद्दल चर्चा करतील. डिम्बग्रंथि कर्करोगाचा उपचार पूर्ण झाल्यानंतर सीए -525 ची उच्च पातळी आपल्याला कर्करोग परत आला असल्याचे लक्षण असू शकते.

तुम्हाला चाचणीसोबतच तज्ञांची गरज आहे का?
सीए -125 चाचणी परिपूर्ण नाही आणि वैयक्तिक परिणाम समजून घेणे कठिण असू शकते. एका महिलेसाठी चे परिणाम म्हणजे दुसर्या स्त्रीसाठी ते समान असणे आवश्यक नाही. कारण ही गोंधळात टाकणारी गोष्ट आहे,आपण आपल्या चाचणी परिणामांविषयी एखाद्या विशेषज्ञाशी बोलू शकता ज्यास स्त्रीविज्ञानविषयक कर्करोगात जास्त अनुभव आहे. त्यासाठी आपल्या डॉक्टरांना रेफरलसाठी विचारा.

Dr. Sairandhri Shinde
Dr. Sairandhri Shinde
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Reshma P. Ransing
Dr. Reshma P. Ransing
BHMS, Family Physician, Pune
Dr. Shashikant J Avhad
Dr. Shashikant J Avhad
MD - Allopathy, Obstetrics and Gynecologist, 5 yrs, Pune
Dr. Dhanraj Helambe
Dr. Dhanraj Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Hellodox
x