Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

तुम्ही काळे चणे किंवा फुटाण्यांचे फायदे अनेकदा ऐकले असतील, पण काय तुम्हाला हरभरा खाण्याचे फायदे माहीत आहेत? हरभरा चवीला स्वादिष्ट लागण्यासोबतच आरोग्यासाठीही चांगला असतो. हरभऱ्याचा उपयोग वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो. हरभऱ्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी, फॅट, फायबर, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट आणि आयर्नसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे चणे खाल्याने एनर्जी मिळते. त्यासोबतच याने हाडेही मजबूत होतात. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर हरभरा खाणे फायद्याचे ठरेल. चला जाणून घेऊ हरभरा खाण्याचे आणखीही काही आरोग्यदायी फायदे...

१) हृदय चांगलं राहतं

जर तुम्ही रोज हरभरा खाल तर तुमचं हृदय निरोगी राहील. याच्या नियमीत सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते. त्यामुळे तुमचं हृदय निरोग आणि चांगलं राहतं.

२) ब्लड शुगरवर नियंत्रण

आजकाल अनेकांना ब्लड शुगरची समस्या असते. जर तुम्ही एक आठवडा अर्धी वाटी हरभरा खाल्यास तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकतं.

३) शारीरिक कमजोरी होते दूर

हरभऱ्यामध्ये प्रोटीन आणि मिनरल्ससोबतच व्हिटॅमिनही अधिक प्रमाणात आढळतात. हे खाल्याने तुमच्या शरीराची कमजोरी दूर होते आणि तुम्हाला एनर्जी मिळते.

४) आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव

हरभऱ्यामध्ये फायबर्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात, जे आतड्यातील बेकार बॅक्टेरियाला नष्ट करतात. आणि आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव करतात.

५) हाडे मजबूत होतात

हरभऱ्यांमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असतात. रोज नाश्त्यात याचे सेवन केल्यास तुमची हाडे आणखी मजबूत होऊ शकतात.

६) पचनक्रिया सुधारते

एक वाटी हरभरा रोज खाल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. याने तुमची पचनक्रिया सुधारते.

७) त्वचेवर ग्लो येतो

हरभऱ्यांमध्ये क्लोरोफिलसोबतच व्हिटॅमिन ए, इ, सी, के आणि बी कॉम्प्लेक्स आढळतात. या तत्वांचे त्वचेला खूप फायदे आहेतय त्यामुळे चणे खाल्यास त्वचेवर ग्लो येतो.

८) वजन कमी करण्यास मदत

जर हरभरा तुम्ही नियमीत खाल्ला तर तुमचं पोट भरलेलं राहिल. त्यामुळे तुमचा ओव्हर डाएटपासून बचाव होतो. याप्रकारे तुम्ही सहजतेने तुमच्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.

९) वाढतं वय दिसत नाही

हरभऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असण्यासोबतच अॅंटीऑक्सिडेंट्सही आढळतात. याने वेगवेगळ्या आजारांना तुम्ही दूर ठेवू शकता आणि तुमचं वाढतं वयही दिसून पडत नाही.

१0) रक्त वाढतं

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आजच हरभरा खाण्यास सुरुवात करा. हरभऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे याच्या नियमीत सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.

रात्रपाळी करणार्‍या महिलांना स्तनल त्वचा व पोटाच्या कर्करोगाची शक्यता असते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. जगात अनेक महिलांमध्ये कर्करोगाचे निदान होत असते.

त्यांना होणार्‍या कर्करोगाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यात रात्रपाळी करणार्‍या महिलांमध्ये कर्करोगाची शक्यता जास्त दिसून आली, पण एका अभ्यासावर आधारित असे हे संशोधन केले असून त्यात दीर्घकाळ रात्रपाळी करणार्‍या महिलांना होणार्‍या कर्करोगाचा अभ्यास केला आहे. त्यात 12 प्रकारचे कर्करोग या महिलांना होत असल्याचे दिसून आले आहे.

मेटाअॅनॅलिसिस पद्धतीने यात उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया व आशिया या देशातील 39,09,152 महिलांच्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आले. यातील 11,42,628 महिलांना कर्करोग झालेला होता.

विशेष करुन परिचारिका रात्रपाळी जास्त काळ करीत असतात त्यांच्यात सहा प्रकारचे कर्करोग दिसून आले आहेत.

स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात अंड खाणे हा उपाय लाभदायक ठरु शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

मात्र, अंड्यातील पिवळ्या भागामध्ये कोलेस्टेरॉल अधिक असल्याने अनेकजण केवळ पांढरा भाग खाणे पसंत करतात, परंतू योग्य प्रमाणात अंड्याचा आहारात समावेश केल्यास ते आरोग्यदायी ठरते.

अंड्यामध्ये ओमेगा 6 फॅटी अॅसिड आढळते. हे एका प्रकाराचे पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आहे.

त्याचा होणारा परिणाम ठाम आणि नेमका अजूनही समजला नसला तरीही ओमेगा 6 फॅटी अॅसिड स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरते.

तसेच अंड्यामध्ये बी कॉम्प्लॅक्स, वेगवेगळी जीवन सत्वे आढळतात.

व्हिटॅमिन डी मुळे यकृताच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण अतिशय कमी असते, असे एका पाहणीत दिसून आले आहे. सूर्यप्रकाश त्वचेवर पडल्यानंतर त्यातून व्हिटॅमिन डी तयार होते. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य ठेवतानाच हाडे, दात आणि स्नायू देखील व्हिटॅमिन डी मुळे मजबूत राहतात, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र या जीवनसत्त्वाचा त्यापेक्षाही पुढचा उपयोग कॅन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी होऊ शकतो, असा दावा जपानच्या संशोधकांनी केला आहे.

युरोप आणि अमेरिकेतील लोकांमध्ये केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. जपानच्या शिगा वैद्यकशास्त्र विद्यापीठात याबाबत संशोधक सुरु असून सर्वच प्रकारच्या कॅन्सरवर व्हि‍टॅमिन डी उपयोगी ठरु शकेल काय? याचीही चाचणी केली आहेत. 40 ते 69 वयोगटातील 33 हजार पुरुष आणि महिलांची पाहणी या संशोधनात करण्यात आली.

व्हिटॅमिन डी मुळे यकृताचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अतिशय कमी हे तर सिद्ध झाले आहे.

टीव्ही पाहणे ताणतणाव कमी करण्याचे आणि वेळ घालविण्याचे उत्तम साधन आहे. त्यामुळे मनोरंजनही होते आणि नवनवीन माहितीही मिळते. मात्र गरजेपेक्षा जास्त टीव्ही पाहण्यासाठी एकजागी बसून राहणे घातक ठरू शकते.

रोज चार तासांपेक्षा जास्त टीव्हीच्या समोर बसून राहिल्याने पुरुषांमध्ये आतड्याचा कर्करोग बळावण्याची शक्यता वाढते, असा धक्कादायक खुलासा एका ताज्या अध्ययनातून समोर आला आहे.

सुमारे पाच लाख पुरुष आणि महिलांच्या माहितीचे विश्र्लेषण करून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. तब्बल सहा वर्षे या लोकांवर नजर ठेवण्यात आली. या अध्ययनात असे दिसून आले की, ज्या लोकांनी टीव्ही पाहण्यात कमी वेळ खर्च केला, त्यांच्यातील फारच थोडे लोक पुढे जाऊन आतड्याच्या कर्करोगाने ग्रासले गेले. या अध्ययनात सहभागी लोकांपैकी 2391 जणांच्या आतड्यात कर्करोगाची सुरुवात झाली.

फ्रान्समधील इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी), ब्रिटनधील इम्पिरियल कॉलेज लंडन आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्यासंबंधीच्या माहितीचे विश्र्लेषण करून आतड्याचा कर्करोग आणि तासन्‌तास टीव्ही पाहण्याची सवय यांच्यातील संबंध शोधून काढला. शारीरिक हालचालींचा पुरुषांमधील पोटाच्या कर्करोगाशी जवळचा संबंध असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Dr. Vinod Shingade
Dr. Vinod Shingade
BHMS, General Physician Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Shweta Muley
Dr. Shweta Muley
BHMS, Homeopath, 6 yrs, Pune
Dr. Annasaheb Labade
Dr. Annasaheb Labade
BAMS, Ayurveda Family Physician, 19 yrs, Pune
Dr. Nandita Bhati
Dr. Nandita Bhati
BDS, Dentist Implantologist, 14 yrs, Pune
Dr. Ajaykumar Kumawat
Dr. Ajaykumar Kumawat
BHMS, Family Physician, 14 yrs, Pune
Hellodox
x