Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Pregnancy :
Pregnancy is a beautiful phase of every women's life; with little precaution this journey can be memorable. Hellodox wishes happy nine months with expert advice on yoga, exercise, meal plans, natural care and home care. Get the best pregnancy care tips and charts on HelloDox.

गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी जिर्‍याचे पाणी फारच फायदेकारक असते.

कसे प्यावे गर्भवती महिलेने जीऱ्याचे पाणी
जीऱ्याचे पाणी पिण्यासाठी आधी एक लिटर गरम पाण्यात एक चमचा जीरे टाकून ते उकळून घ्यावे. जेव्हा पाणी थंड होईल तेव्हा गाळून ते पाणी प्यायला पाहिजे.


जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

१. ब्लड प्रेशरचे नियंत्रण ठेवते.
जीऱ्यात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशिअम ब्लड प्रेशरचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

२. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊ नाही देत.
गर्भवती महिला दोन जीवांची असते. तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होण्याचा संभव असतो. जीऱ्याच्या पाण्याने हिमोग्लोबीन वाढते आणि शरीरातील लोहाचे प्रमाणही वाढते.

३. रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
जीऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

स्तनपान करवणारी आईद्वारे घेत असलेला आहार बाळाला मिळत असतो. अशात आईच्या आहाराचा प्रभाव ब्रेस्ट मिल्कच्या गुणवत्तेवर येत असतो. अधिक प्रोटीन आढळणारे आहार जसे साबूत धान्य, डाळी, ड्राय फ्रूट्स, ताज्या भाज्या-फळं, अंडी आणि चिकन सारख्या वस्तू आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी आईला ताज्या फळांचा ज्यूस, नारळ पाणी, लस्सी आणि लिंबाचा रस पिऊ शकतात.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

* आमच्या देशात तूप आईसाठी उत्तम मानलं जातं. याचे फायदे तर आहे परंतू याने नंतर वजन वाढण्याची शक्यता नाकारता येते नाही. डिलेव्हरीनंतर तीन महिन्यापर्यंत आयरन आणि कॅल्शियम सप्लिमेंट घेतले पाहिजे.

*भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, याने दुधाचा प्रवाह वाढेल. ओटमील, बडीशेप, लसूण, आणि गाजर सारख्या वस्तू सेवन केल्याने दुधाचं उत्पाद वाढतं.

*मसालेदार आहार घेणे टाळावे कारण याने पचन शक्ती प्रभावित होते.

*पुरेसं दूध नसेल येत तरी ताण घेऊ नये. ताण घेतल्याचा प्रभाव हार्मोंसवर पडतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल.

गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी जिर्‍याचे पाणी फारच फायदेकारक असते.

कसे प्यावे गर्भवती महिलेने जीऱ्याचे पाणी
जीऱ्याचे पाणी पिण्यासाठी आधी एक लिटर गरम पाण्यात एक चमचा जीरे टाकून ते उकळून घ्यावे. जेव्हा पाणी थंड होईल तेव्हा गाळून ते पाणी प्यायला पाहिजे.


जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

१. ब्लड प्रेशरचे नियंत्रण ठेवते.
जीऱ्यात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशिअम ब्लड प्रेशरचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

२. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊ नाही देत.
गर्भवती महिला दोन जीवांची असते. तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होण्याचा संभव असतो. जीऱ्याच्या पाण्याने हिमोग्लोबीन वाढते आणि शरीरातील लोहाचे प्रमाणही वाढते.

३. रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
जीऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

नियमित व्यायाम करणारे लोक फक्त निरोगी व ताजेतवानेच राहत नाहीत, तर आजारही त्यांच्यापासून कोसो दूर राहतात. सामान्य लोकांप्रमाणेच गर्भवती महिलांनाही व्यायाम केल्याने चांगला लाभ मिळतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नियमितपणे व्यायाम करणार्‍या महिलांना प्रसववेदनांचा वेळ 50 मिनिटांनी कमी होतो. स्पेनमधील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ माद्रिदच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांनी असे सांगितले की, गर्भावस्थेदरम्यान नियमितपणे व्यायाम करणार्‍या महिलांना जास्तवेळ प्रसववेदना सहन कराव्या लागत नाहीत.

या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी 508 महिलांच्या माहितीचे पहिल्या तिमाहीपासूनच अध्ययन करण्यास सुरुवात केली. त्यात निम्म्या महिलांना दर आठवड्याला तीन तास व्यायाम करण्याचा सल्ला दिला. उरलेल्या अर्ध्या महिलांना आरामाचा सल्ला देण्यात आला.

त्यानंतर शास्त्रज्ञांना मुलाच्या जन्मवेळच्या प्रसववेदनेचा कालावधी व नियमित व्यायाम यांच्यात संबंध दिसून आला. त्यांनी सांगितले की, नियमित व्यायाम करणार्‍या महिलांचे स्नायू प्रसूतीच्या प्रक्रियेत पूर्ण योगदान देण्यास सक्षम होते.

या अध्ययनाच्या निष्कर्षामुळे गर्भवती महिलांना नियतिम व्यायामासाठी प्रेरित केले जाऊ शकते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार गर्भावस्थेदरम्यान तंदुरुस्तीवर लक्ष देणे धोकादायक ठरते, हा विचार आता जुनाट झाला. उलट प्रसववेदनांदरम्यान जिवासमोरचे संकट दूर करण्यासाठी व्यायाम चांगला उपाय असल्याचे या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे.

गर्भावस्थे दरम्यान एका स्त्रीने योग्य आहार घ्यायला पाहिजे ज्याने आई व बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहील. शेवग्याच्या शेंगा देखील त्यातून एक आहे, जे गर्भवती महिलेने खायला पाहिजे. यात कॅल्शियम, फास्फोरस कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असत. शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो. याने डिलवरीमध्ये होणार्‍या समस्येपासून आराम मिळतो आणि डिलवरीनंतर देखील प्रसूतीला होणारा त्रास कमी होतो.

गर्भावस्थेत उलटी, मॉर्निंग सीकनेस आणि प्रसवमध्ये होणार्‍या त्रासाला शेवग्या खाल्ल्याने कमी केला जाऊशकतो. म्हणून आज आम्हीतुम्हाला शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे सांगत आहे.

प्रसव : शेवग्या खाल्ल्याने प्रसवच्या वेळेस होणार्‍या त्रासात आराम मिळतो. याने रक्ताची कमतरता होत नाही व प्रसूती झाल्यानंतरचा त्रासदेखील कमी होतो.

मॉर्निंग सिकनेस : गर्भावस्थे दरम्यान होणार्‍या आळसाला शेवग्याने कमी करता येत. ह्या शेंगा उलटी आणि चक्कर येण्या सारखे मॉर्निंग सिकनेसला कमी करतात.

स्वस्थ हाड : शेवग्यामध्ये आयरन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर मात्रेत असतं. ज्याने हाड मजबूत होतात. एवढंच नव्हे तर रक्त देखील
साफ होत.

संक्रमणापासून बचाव : एंटीबॅक्टीरियल असल्यामुळे शेवग्या गळा, त्वचा आणि छातीत होणार्‍या संक्रमणापासून बचाव करते.

पोटाशी संबंधित त्रासांपासून बचाव : शेवग्या पोटाशी निगडित आजारांपासून बचाव करते. शेवग्या आणि नारळ पाण्याचे एकत्र सेवन केल्यानेजुलाब आणि कावीळ बरा होतो.

मधुमेहाला नियंत्रित करतो : शेवग्याचे पानं गर्भावस्थेत ब्लड शुगर लेवलला नियंत्रित ठेवतात. याला आपल्या आहारात सामील केल्याने तुम्ही मधुमेहापासून वाचून राहाल आणि गर्भावधि मधुमेह जो नेमही गर्भवती महिलांना होत असतो त्यातून तुम्हाला नक्कीच सुटकारा मिळेल.

Dr. Nitin Dongre
Dr. Nitin Dongre
MBBS, General Physician, 37 yrs, Pune
Dr. Pooja Hemnani
Dr. Pooja Hemnani
MPTh, Cardiovascular And Pulmonary Physiotherapist Neuro Physiotherapist, 1 yrs, Pune
Dr. Sandeep Borse
Dr. Sandeep Borse
MBBS, Internal Medicine Specialist Neurotologist, 5 yrs, Pune
Dr. Dennis David
Dr. Dennis David
MS - Allopathy, General and Laparoscopic Surgeon, 7 yrs, Palakkad
Dr. Suhas Shingte
Dr. Suhas Shingte
BAMS, Family Physician General Physician, 18 yrs, Pune
Hellodox
x