Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर तो तुमच्या हृदयाच्या आजारांचा संकेत असू शकतो आणि ते अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या शास्त्रज्ञांनी झोप आणि हृदयासंबंधी हालचालींवर केलेल्या 74 अध्ययनांच्या समीक्षेनंतर असा निष्कर्ष काढला आहे की, जे लोक दिवसातून दहा तास झोप घेतात, त्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता आठ तास झोपणारांच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढते. या अध्ययनांमध्ये 33 लाख लोकांच्या माहितीचा समावेश करण्यात आला होता. उशिरापर्यंत म्हणजे नऊ तासांपेक्षा जास्त झोपणार्‍या लोकांमध्ये कार्डियोवॅस्कुलर डिसिज म्हणजे ह्रदयासंबंधी आजार होण्याचा धोका 50 टक्के जास्त दिसून येतो. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, सात तासांपेक्षा कमी झोपणार्‍या लोकांमध्ये अकाली मृत्यू वा हृदयाचा धोका आढळून आला नाही. मात्र गरजेपेक्षा जास्त झोप आरोग्यासाठी घातक का असते, हे अद्याप शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेले नाही. मात्र कमी झोप व जास्त झोपेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, यावर ते सहमत आहेत.

बैठी कामामुळे बर्‍याच आजारांना आवतण मिळत असते. दुर्दैवाने बहुतांश लोकांची कामे बैठीच असतात आणि आपण किती वेळ बसून राहिलो आहे याची त्यांनाही जाणीव होत नसते. दीर्घकाळ असे एकाच जागी बसून राहिल्याने मेंदूतील रक्तपुरवठा मंदावतो. त्याचे परिणाम अतिशय घातक होऊ शकतात. यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोकाही संभवतो. बैठी काम असले तरी यावरही आपण उपाय काढू शकतो. दर अर्ध्या तासाने दोन मिनिटांसाठी का होईना जर फिरून पाय मोकळे केले तरी त्याचा लाभ होऊ शकतो. अशा चालण्याने मेंदूतील रक्तसंचार सुधारतो. मेंदूत रक्तसंचार होणे ही आपल्या शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे.

रक्तसंचारामुळेच मेंदूची आठवण्यासारखी प्रक्रिया सुरळीत होऊ शकते. मेंदूत काही मोठ्या रक्तवाहिन्याही असतात. दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने अशा वाहिन्यांच्या कार्यातही अडथळा येऊ शकतो.

आपण दररोज आपले आरोग्य निरोगी राहावे त्यासाठी विविध उपाय योजना करत असतो. यासाठी आपण फळ किंवा भाज्यांचे सेवन करतो ते आपल्या आरोग्यांच्या दृष्टीने उपयुक्त असते. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पेरू हे फळ ही लाभकारी आहे ते कसे..

बॉडी फिट ठेवण्यासाठी : पेरूमधील पौष्टिक तत्व शरीराला फिट आणि फाईन ठेवण्यात मदत करतात. परंतु पेरू योग्य वेळेवर खावेत. रात्री पेरू खाल्ल्यास खोकला होण्याचा धोका राहतो.

वजन कमी करण्यासाठी : लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्ट्रॉल असते. पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळे वजन वाढत नाही व जर तुम्हांला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या डाईट मध्ये पेरूला आवर्जून स्थान द्या.

महिलांमधील फर्टिलिटी वाढवण्यासाठी : पेरूमध्ये असलेले फॉलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे महिलांमधील फर्टिलिटी वाढते. जर एखाद्या महिलेला आई होण्यात अडचण निर्माण होत असेल तर त्या महिलेने दररोज पेरूचे सेवन करावे.

डोळे उत्तम राहण्यासाठी : पेरूमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते. जे डोळे निरोगी ठेवण्यात सक्षम ठरते. या व्यतिरिक्त पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात.


त्वचा उजळण्यासाठी : पेरूमध्ये पोटॅशिअम तत्व असल्यामुळे याच्या सेवनाने त्वचा उजळते. तसेच त्वचेवरील पुरळ, काळे डाग त्यामुळे दूर होतात.



तोंड आले असल्यास : जर तुमचे तोंड आले असल्यास किंवा तुम्हांला माउथ अल्सरची समस्या असेल तर पेरूची कोवळी ताजी पाने चावून -चावून खाल्ल्यास आराम मिळतो.

व्हिटॅमिन सी : पेरूमध्ये संत्रीपेक्षा चार पट्टीने जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे ब्लेशप्रशेर संतुलित राहते. तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तरही कमी होतो.

नशा कमी करण्यासाठी : एखाद्या व्यक्तीला दारू किंवा भांग जास्त झाल्यामुळे खूप नशा झाली असेल तर पेरूच्या पानांचा रस प्यायला दिल्यास नशा कमी होऊ शकते.

गुलाबाच्या नियमित सेवानाने रंग उजळतो. हृदयाची धडधड कमी होते, रक्त मूळव्याध व श्वेतप्रदर कमी होतो, निद्रानाश, उन्माद, नेत्ररोग आणि मूत्रव्याधी गुलाब पाण्याने कमी होतात. गुलकंदामुळे उन्हाळ्याचा त्रास घटतो.

चाफ्याची फुले ज्वरहर, उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात. रक्तविकार आणि विषबाधेतसुद्धा यांचा लेप लाभदायक असतो.

कमळाच्या फुलाचे सरबत घेतल्याने चेहरा खुलतो. चेहेर्‍यावरील यौवनपिटीका कमी होतात, त्वचा नितळ होते, तृष्णा, दा‍ह व रक्तविकारात आराम होतो.

पारिजातकाच्या पानांचा रस ज्वर आणि वात रोगात गुणकारी असतो. याचा काढा कंबरेच्या दुखण्यावर फायदेशीर असतो. ही फुले वातहर व केसांसाठी लाभदायी असतात.

जुईच्या फुलांचे चूर्ण किंवा गुलकंद आम्लपित्त व पोटाच्या अल्सरवर गुणकारी असते. जुई शीतल, पित्तनाशक, दंतरोग, नेत्ररोग निवारक असते.

हृदयरोगासाठी सूर्यफुलाचे तेल चांगले असते. रक्तविकार, योनीशूल, यकृतरोग आणि फुफ्फुसांच्या विकारात सूर्यफुलांचा चांगला उपयोग होतो.

जास्वंदाची फुले मलरोधक, केशवर्धक असतात. फुलांचा रस केसांना लावल्यास केसांचा पांढरेपणा कमी होतो. ही फुले तुपात तळून खाल्ली तर श्वेतप्रदर विकारात आराम होतो. फुलांचे पाणी घेतल्यास मळमळ, आम्लपित्त, वमन यासाठी लाभ होतो.

केवड्याची फुले शीतल, कांतिदायक, वेदना निवारक, चर्मरोग दूर करणारी आणि डोळ्यांसाठी गुणकारी ‍असतात. रक्तप्रदर, मायग्रेनमध्ये लाभदायक. फुलांचा रस कानासाठी चांगला.


काही वर्षांपूर्वी आपण सगळेच पाणी पिण्यासाठी काचेची, स्टीलची किंवा तांब्याची भांडी वापरात होतो. काळाच्या ओघात अचानक प्लास्टिकचा प्रभाव वाढला. प्लास्टिक हे वापरण्यास सोपे आणि ते सहज तूटत ही नाही, प्लास्टिकच्या वस्तूंना खूप सांभाळावे लागत नाही. सहज हाताळता येणारे आहेत. परंतु या प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात. दैनंदिनी जीवनामध्ये प्लास्टीकचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे त्या मधील हानिकारक रसायने पाण्यामार्फत शरीरात जातात आणि आपल्या शरीरास घातक ठरतात. प्लास्टिकमुळे पाण्यावाटे आपल्या शरीरात फ्लोरॉईड, डायॉक्झिन आणि बीपीए सारखी विषारी रसायने पोहोचतात.

प्लास्टिकमुळे आरोग्यावर अनेक घातक परिणाम होतात हे संशोधनातून आढळले आहे. संशोधनाप्रमाणे डायॉक्झिन मुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर बीपीए हे इस्ट्रोजेन सदृश रसायन असल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. यामुळे मधुमेय लठ्ठपणा, लवकर वयात येणं, रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे, वंध्यत्व असे आरोग्यावर विविध दुष्परिणाम होतात.

प्लास्टिकमुळे आपल्याला अनेक दुष्परिणाम होतात हे आपल्याला माहित असेल तरी प्लास्टिक ने आणलेला सोयीस्करपणा आपल्याला भुरळ घालत होता. पण आता पर्यावरणाच्या मुदद्यामुळे कायद्यानेच प्लास्टिकवर बंदी आली आहे. त्यामुळे आपण आपोआपच जुन्या पद्धतीकडे वळू लागलो आहोत.

कोणत्या भाड्यातून पाणी पिणे आरोग्यास हितकारक ?

१.काचेच्या भांड्यातून पाणी पिणे उत्तम कारण काचेमुळे पाण्यामध्ये काहीच बदल होत नाहीत.

२. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो.

तांब्याच्या भांड्यातून पाणी का प्यावे?

१. तांब्याच्या भांड्यातील पाणी जास्त आरोग्यदायी असते कारण तांब्याचा अंश भांड्यातील पाण्यामध्ये उतरतो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात.

२. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात.

३. आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते.

४. मज्जातंतूवरील प्रवाहकीय आवरणाच्या डागडुजीसाठी आणि ह्या आवरणाला सशक्त करण्यासाठी तांबे मदत करते.

५. तांब्यामध्ये ऍन्टिऑक्सिडेंट तत्व असल्यामुळे तांबे हे उत्तम ऍन्टिएजिंग आहे.

६. या तत्वामुळे तांबे कॅन्सर विरुद्धच्या लढाई मध्ये शरीराला मदत करते.

७. तांब्यामुळे हाडे व स्नायू मजबूत होतात.

८. रक्तदाब समप्रमाणात होण्यास मदत होते,

९. ऍन्टिइनप्लमेट्री असल्यामुळे संधीवातासारखे आजार बरे होण्यास मदत होते.

अशा प्रकारे तांब्याचा वापर करून आपण आपले आयुष्य सुकर करू शकतो. तसं पाहिलं तर सोने, चांदी नंतर तांबे या धातूचा तिसरा क्रमांक लागतो. काही वर्षांपूर्वी लग्नात तांब्यांच्या भांड्यांचा आहेर देणे हे प्रतिष्ठेचे मानले जाई. काही घरांत तर आज सुद्धा तांब्यांची भांडी शो-केस मध्ये दिमाखाने दिसतात. या तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जी शरीरास उपकारक आहेत. म्हणूनच जुनं ते सोनं असं का म्हणतात ते तांबे या धातूला पाहून उमजतं. तेव्हा तांब्यांच्या भांड्यातून पाणी प्यायला सुरुवात करुया. सुदृढ होऊया.

Dr. Vijay U. Jadhav
Dr. Vijay U. Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, 15 yrs, Pune
Dr. Geetanjali Ghule Karad
Dr. Geetanjali Ghule Karad
BHMS, Homeopath, 9 yrs, Pune
Dr. Pallavi U Bhurse
Dr. Pallavi U Bhurse
BAMS, Ayurveda Family Physician, 5 yrs, Pune
Dr. Abhijit Shirude
Dr. Abhijit Shirude
MS - Allopathy, ENT Specialist, 5 yrs, Pune
Dr. Sushma Todkar
Dr. Sushma Todkar
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Hellodox
x