Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Diabetes :
Are you worried about sugar level in your body? Diabetes is a condition that impairs the body's ability to process blood glucose. Well! Read natural treatments & necessary precautions to overcome this problem. You can ask your query to both Allopathy & Ayurveda experts.

अनेकदा मधुमेहामुळे डोळे, किडनी आणि हृदयाला नुकसान पोहचल्यावरच हा आजार असल्याचे निष्पन्न होते. सुरुवातीला याचा पत्ताही आपल्याला लागत नाही. शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करणाऱ्या या आजाराचे लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन त्यावर उपचार करता येतात. शरीरात होणारे हे बदल मधुमेहाचा संकेत देतात. पाहुया काय आहेत याची लक्षणे...

वारंवार लघवी येणे
जेव्हा शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण वाढते तेव्हा वारंवार लघवी येते. शरीरात जमा झालेली शुगर मुत्राद्वारे शरीराबाहेर टाकली जाते.

खूप तहान लागते
ब्लड शुगरने पीडित व्यक्तीला सारखी तहान लागते.

भूक वाढते
शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्याने सारखी भूक लागते. तुम्हालाही हे लक्षण दिसताच एकदा ब्लड शुगर तपासून पहा.

वजन कमी होणे
भूक वाढूनही वजन मात्र कमी होत असल्यास ब्लड शुगर जरुर तपासा.

थकवा येणे
दिवसभर आळसावलेले वाटणे, थोडेसे काम केल्याने थकवा जाणवणे किंवा रात्रभर झोपूनही झोप पूर्ण झाल्यासारखी न वाटणे. ही लक्षणे मधुमेहाचा इशारा देतात. तेव्हा याकडे दुर्लक्ष करु नका.

कोणत्याही कामात मन न लागणे किंवा एकाग्रता कमी होणे
ब्लड शुगर अधिक असलेल्या व्यक्तीचे मन कोणत्याही कामात लागत नाही. कोणत्याही कामात एकाग्र करणे त्यांना अवघड होते.

अंधूक दिसणे
मधुमेहाचा सर्वात अधिक प्रभाव डोळ्यांवर पडतो. त्यामुळे व्यक्तीला कमी दिसू लागते. ब्लड शुगरमुळे डोळ्यांच्या पडद्यांना नुकसान पोहचते.

जखम उशिरा ठीक होणे
भाजी कापताना बोट कापल्यास किंवा शेव्हींग करताना कट गेल्यास ते लवकर ठीक होत नाही? मग हे ब्लड शुगर वाढल्याचे लक्षण आहे.

त्वचेची समस्या
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्वचेच्या समस्या तोंड वर काढू लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स खूप जलद गतीने वाढू लागतात.

वरवर रुक्ष दिसणारी कोरफड ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्म असलेली आहे. विशेषतः डायबेटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही वनस्पती वरदान ठरते. अनेक संशोधनातून हे समोर देखील आले आहे.

कोरफडीमध्ये क्रोमियम आणि मँगनीझ ही तत्वे देखील आहेत. यामुळे शरीरातील इंश्युलीनची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेह होण्यापासून बचाव होतो. कोरफडीच्या गराचा किंवा रसाचा वापर करण्याऐवजी ताज्या कोरफडीचा उपयोग करणे जास्त फायद्याचे आहे. दररोज दोन लहान चमचे कोरफडीचा ताज्या गराचे सेवन केल्याने शरीरामध्ये असलेले साखरेचे प्रमाण पुष्कळ अंशी कमी होण्यास मदत मिळते.

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना लहानशी जखम देखील भरून येण्यास खूप वेळ लागतो. वरही कोरफड उपयुक्त आहे. कोरफडीचा गर सरळ जखमेवर लावल्याने जखमेमुळे होणारी आग किंवा वेदना कमी होतात, व जखम लवकर भरून येण्यास मदत मिळते. योग्य आणि संतुलित आहाराच्या जोडीने कोरफडीचे नियमित केलेले सेवन मधुमेह नियंत्रित ठेवण्यास सहायक ठरते.

मश्रुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो.

1. मश्रुममध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.
2. मश्रुममध्ये उपस्थित तत्त्व रोग प्रतिरोधक क्षमतेला वाढवतात. याने सर्दी पडसं सारखे आजार वारंवार होत नाही. मश्रुममध्ये उपस्थित सेलेनियम इम्यून सिस्टमच्या रिस्पॉन्सला उत्तम बनवतो.
3. मश्रुम विटामिन डी चा चांगला पर्याय आहे. हे व्हिटॅमिन हाडांच्या मजबुतीसाठी फारच गरजेचे आहे. मश्रुमाचे सेवन नियमित केले तर आमच्या आवश्यकतेचे 20 टक्के व्हिटॅमिन डी आम्हाला मिळून जात.
4. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कार्बोहाइड्रेट्स असतात, ज्याने वजन आणि ब्लड शुगर लेवल वाढत नाही.
5. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कोलेस्टरॉल असल्यामुळे याचे सेवन केल्याने बर्‍याच वेळेपर्यंत भूक लागत नाही.
त्या शिवाय मश्रुम केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फार फायदेशीर आहे. काही स्टडीत असे आढळून आले आहे की मश्रुमच्या सेवनामुळे कँसर होण्याची आशंका कमी असते.

मुंबई : जर तुम्हाला देखील मधुमेहाचा त्रास असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण आता कोणतेही औषध न खाता तुम्ही तुमच्या शरीरातील साखर कमी करू शकता. अगदी घर बसल्या हा उपया तुम्ही करू शकता. भेंडी खाऊन तुम्ही तुमच्या शरीरातील साखर कमी करू शकता. याचा कोणताही साइड इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार नाही.

बघूया कसं कराल मधुमेह कंट्रोल
कच्ची भेंडी खाल्यामुळे मधुमेह आटोक्यात येतो. यामध्ये असलेल्या फायबर डायबिटिक असलेल्या लोकांना साखर कमी करण्यास अतिशय मदत करते.

कच्ची भेंडी अशा प्रकारे शरीरात करते काम
दोन भेंडी घेऊन ते वरून आणि खालून दोन्ही बाजूने कापा. यामधून एक सफेद चिकट द्रव बाहेर पडेल तो तसाच राहू द्या. जेव्हा रात्री तुम्ही झोपायला जाल तेव्हा या कापलेल्या भेंडी तुम्ही ग्लासभर पाण्यात टाकून ठेवा. आणि हे ग्लास झाकून ठेवा.

सकाळी उठल्यावर ही कापलेली भेंडी काढून टाका आणि ते पाणी प्या. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील साखर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही हा असा प्रकार अनेक महिने करा. कच्चा भेंडीप्रमाणेच शिजवलेली भेंडी देखील अतिशय फायदेशीर आहे.

किडनी रोगापासून देखील होईल सुटका
टाइप 2 डायबिटीज झाल्यामुळे किडनीवर देखील त्याचा फरक पडतो. त्यावेळी जर तुम्ही भेंडी खाल्ली तर त्याचा नक्की फरक पडेल.

डॉक्टर दीक्षित/जिचकार सरांच्या या साध्या सोप्या उपायाने शरीरात अतिरिक्त इन्सुलिनची निर्मिति होणे थांबते.त्यामुळे शरीरात पोटासारख्या चुकीच्या ठिकाणी जमा झालेली चरबी ऊर्जा मिळवण्यासाठी वापरली जाते.त्यामुळे पोट व वजन कमी होते. या उपायामुळे शरीर इन्सुलिनला अधिक संवेदनशील बनते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते किंवा मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो.

परिणाम:

वजन कमी होते, पोट कमी होते, मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो किंवा त्याची शक्यता कमी होते.

१) हा उपाय किंवा आहार योजना अठरा वर्षाखालील मुलांसाठी तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाही (मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टर दीक्षित सरांशी संपर्क साधावा व त्यानी परवानगी दिली तरच हा उपाय अमलात आणावा)

२) तुम्हाला खरी कड़क भूक केंव्हा लागते त्या दोन वेळा ओळखा. त्या दोन वेळानाच जेवण करा. ह्या वेळा व्यक्तिनुसार वेगवेगळ्या असू शकतात. सामान्यपणे सकाळी ९ व संध्याकाळी ६ किंवा दुपारी १ व रात्रि ९ अश्या भुकेच्या वेळा असतात. प्रत्येक जेवणासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५५ मिनिटांचा वेळ उपलब्ध आहे. या वेळात तुम्हाला जे खायचे ते तुम्ही खाऊ शकता.

३) या दोन जेवणाच्या व्यतिरिक्त जर भूक लागली तर खालील पदार्थ हवे तेवढे घेऊ शकता:

अ) पातळ ताक (हवे असल्यास चवीसाठी मीठ, जिरेपुड टाकू शकता)

ब ) २५% दूध व ७५% पाणी वापरून बनवलेला बिन साखरेचा चहा (शुगर फ्री, मध, गुळदेखील नको); ग्रीन टी/ब्ल्याक टी देखील चालेल

क) लिम्बु पाणी (विना साखरेचे)

ड) नारळ पाणी (शहाळ्यातील मलई खाऊ नका)

इ) टोमॅटो (जास्तीत जास्त १)

ई) काकड़ी तसेच ताकात किसून काकड़ी किंवा संत्र्याचा रस हे पदार्थ घेण्याची परवानगी नाही (आमच्या नविन संशोधनामुळे असा बदल करण्यात आला आहे...)

४) एकदा जेवणाच्या वेळा ठरल्या की त्या वेळानाच जेवा. पंधरा वीस मिनिटे वेळ मागे पुढे झाले तर चालते पण खूप बदल करू नका.

५) बाहेर गावी जाणे किंवा लग्न आदी समारंभ असे काही असल्यास त्या दिवशी तुम्ही या डाइट प्लॅनला सुट्टी देऊ शकता! दुसरया दिवसापासून लगेच प्रामाणिकपणे डाइट प्लान चालू करा.

६) दररोज ४५ मिनिटात ४.५ किलोमीटर चाला. हा व्यायाम आठवड्यातून पाच दिवस तरी करा.(हृदयाची गति वाढवणारा कोणताही व्यायाम करू शकता.)

७) हा उपाय सुरु करण्याच्या पहिल्या दिवशी खालील गोष्टी करा:

अ) सकाळी पोट साफ झाल्यावर वजन करा. नंतर दर महिन्याला त्याच वजन काट्यावर त्याच पद्धतीने वजन करा.

ब) बेम्बिपाशी पोटाचा घेर मोजा. दर महिन्याला पोटाचा घेर मोजा.

क) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level) तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यांनी परत करा.

ड) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन एचबीएवनसी (HbA1C) तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यानी परत करा.

८) तुमचे योग्य वजन असे काढ़ा: तुमच्या सेंटीमीटर मधिल उंचीतून १०० वजा केले म्हणजे तुमचे कमाल वजन तुम्हाला कळेल. हे तुमचे जास्तीत जास्त वजन असायला हवे. उदाहरणादाखल, एखाद्याची ऊँची १७० सेमी असेल तर त्याचे जास्तीत जास्त वजन ७० किलो असायला हवे.

९)जर या आहार योजने चे अवलंबन केल्यावर आपणास फायदा झाला तर दुसऱ्यांनाही या आहार योजनेत सहभागी होण्यास सांगा व "स्थूलत्व
आणि मधुमेह मुक्त "भारत" अभियानात सामिल व्हा.

या आहार योजनेमुळे व साध्या उपायाने खालील चार फायदे होतात:

१) वजन कमी होते

२) पोटाचा घेर कमी होतो

३) एचबीएवनसी (HbA1C) कमी होते

४) उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) कमी होते

म्हणून या उपायाने आपल्याला काय फायदा होत आहे हे कळण्यासाठी वजन आणि पोटाचा घेर दर महिन्याला मोजा तर एचबीएवनसी (HbA1C) आणि उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) दर तीन महिन्याला मोजा.

Dr. Pratibha Labade
Dr. Pratibha Labade
BAMS, Ayurveda Immuno Dermatologist, 19 yrs, Pune
Dr. Sandeep Darunde
Dr. Sandeep Darunde
BAMS, Optician Ophthalmologist, 3 yrs, Pune
Dr. Dr.Rajendra  Chavat
Dr. Dr.Rajendra Chavat
MBBS, Family Physician, 35 yrs, Pune
Dr. Hitesh Karnavat
Dr. Hitesh Karnavat
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 12 yrs, Pune
Dr. Vivek Patil
Dr. Vivek Patil
MDS, Dentist Pediatric Dentist, 13 yrs, Pune
Hellodox
x