Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



थॅलेसेमिया

आई-वडिलांकडून मुलाला आनुवंशिकतेमुळे जनुकांद्वारे अनेक शारीरिक वैशिष्टय़े, गुणधर्म प्राप्त होतात. याचे एका पिढीतून दुसऱ्या पुढच्या पिढीत वहन होत जाते. बिटा थॅलेसेमिया आजारात बिटा थॅलेसेमिया जनुक आई किंवा वडिलांच्या माध्यमातून अपत्यात येते आणि काही वेळा दोघांकडून प्रत्येकी एक जनुक येतानाही दिसून येतात. परिणामी, रक्ताशी संबंधित थॅलेसेमियाचा आजार होण्याची शक्यता बळावते.

या रोगात शरीरातील (हिमोग्लोबीन) रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. अशा वेळी रुग्णांच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या १२० दिवसांऐवजी कमी दिवस पुरेल इतकी खाली येते. त्याचा परिणाम सरळ शरीरातील हिमोग्लोबीनवर होतो. बिटा थॅलेसेमियाचे ट्रेटवाहक (मायनर) व दुसरा ट्रेटवाहक (मेजर) हे दोन प्रकार आहेत. बिटा थॅलेसेमिया असलेल्या रुग्णाच्या शरीरात निरोगी व्यक्तीपेक्षा फिक्कट निस्तेज व लहान आकाराच्या तांबडय़ा रक्तपेशी असतात. थोडय़ा प्रमाणात यांच्यात पंडुरोग (अ‍ॅनेमिया) असतो, परंतु याला सहसा उपचाराची गरज भासत नाही, पण या व्यक्तीद्वारे बिटा थॅलेसेमियाचे एक जनुक त्यांच्या मुलांत संक्रमित होते, तर बिटा थॅलेसेमिया (मेजर) हासुद्धा गंभीर आजार आहे. या रुग्णांच्या शरीरातील प्रत्येक पेशी जगण्यासाठी प्राणवायूचा योग्य प्रमाणात सातत्याने पुरवठा होणे गरजेचे आहे. प्राणवायू वाहून नेण्यासाठी योग्य प्रमाणात तांबडय़ा पेशींत हिमोग्लोबीन असणे अत्यावश्यक आहे. शरीरात हिमोग्लोबीन नसल्याने शरीराला गरजेइतकाही प्राणवायू न मिळाल्याने रुग्णाच्या मृत्यूचा धोका संभवतो.

बिटा थॅलेसेमियाची (मेजर) लक्षणे लहान बाळांत वयाच्या ३ ते ६ महिन्यांदरम्यान दिसू लागतात. हा आजार जडल्यानंतरच लक्षात येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्री आणि पुरुष हे दोघेही थॅलेसेमियाचे वाहक (थॅलेसेमिया मायनर)असतील तर त्यांच्या मुलांमध्ये बिटा थॅलेसेमिया आढळून येण्याची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत असते.

गंभीर थॅलेसेमियाची लक्षणे
- बाळाचे वजन घटू लागते.
- पोटात अन्न, दूध राहात नाही.
- वारंवार ओकाऱ्या होतात.
- मुलाची वाढ खुंटते.
- मुलांना कमालीचा थकवा जाणवतो.
- थोडय़ाही हालचालीमुळे धाप लागते.
- रक्त देण्याला विलंब झाल्यास मुले निस्तेज होतात.

गुंतागुंत आणि महत्त्वाचे
- ठरावीक कालावधीत नियमित रक्त न मिळाल्यास पंडुरोगाचा (अ‍ॅनेमिया) धोका
- जंतुसंसर्ग होण्याचा धोका.
- उपचारात रुग्णाला आधार देणे व संयम राखणे गरजेचे.
- योग्य औषधोपचार व काळजी घेऊन आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

उपचार
- बिटा थॅलेसेमिया व्याधीग्रस्तांना जगण्यासाठी नियमित रक्त देण्याची गरज असते.
- दर ४ ते ६ आठवडय़ांनी त्यांना रक्त मिळायलाच हवे.
- काविळसारखे आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याची गरज.
- व्याधीमुक्त होण्यासाठी मुलांचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपाय आहे.
- थोडाही त्रास झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आजार टाळण्यासाठी
- लग्नापूर्वी युवक-युवतीच्या रक्ताची चाचणी करणे.
- युवक-युवती दोघेही थॅलेसेमिया वाहक असल्यास लग्न टाळावे.
- पती-पत्नीपैकी एकही थॅलेसेमियाग्रस्त असल्यास मुलाला आजार संभावतो, ते टाळण्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी.
- गर्भवती माता थॅलेसेमिया वाहक वा रुग्ण असल्यास १० आठवडय़ांनी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करावी.

येथील सरकारी आयुर्वेद रूग्णालयात थॅलेसिमिया रूग्णांवर बक ऱ्याच्या रक्ताने उपचार करण्यात येणार असून या प्रकल्पाला पंजाब सरकार व केंद्राने मंजुरी दिली आहे. एकूण ३५ लाख रूपये खर्चाचा हा प्रकल्प असून तो केंद्रीय आरोग्य मंत्रालय राबवित आहे, असे सरकारी आयुर्वेद रूग्णालयाचे अधिकारी हेमंत कुमार यांनी सांगितले. पंजाब सरकारने या प्रकल्पासाठी तेरा लाख रूपये दिले आहेत. चार ते पाच महिन्यात हे उपचारकेंद्र सुरू केले जाणार आहेत.

मलाशयाच्या मार्गाने रूग्णांना बकऱ्याचे रक्त टोचण्यात येणार असून त्यामुळे रूग्णाचे हिमोग्लोबिन कमी होणार नाही. कालांतराने रक्त देण्याची गरजही रूग्णाला भासणार नाही. तीनदा, दोनदा असे रक्त देण्याचे प्रमाण कमी केले जाईल. सीएमसी रूग्णालयाचे डॉ. ए.जी थॉमस यांनी सांगितले की, या उपचार पद्धतीचे काहीही पुरावे नसून ज्यांनी ही उपचार पद्धती शोधली असेल त्यांनी आंतरराष्ट्रीय वैद्यक नियतकालिकात आधी त्याची माहिती प्रकाशित करावी. कुमार व शेवली अरोरा या आयुर्वेद डॉक्टरांनी मात्र ही नवीन पद्धत असून अहमदाबाद रूग्णालयातून शिकून आल्याचे सांगितले. अहमदाबादच्या अखंडानंद आयुर्वेदिक रूग्णालयात सध्या या पद्धतीने उपचार सुरू आहेत.

गुजरातमधील अतुल बाकर याच्यावर या पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. यासाठी उपकरणे खरेदी करण्यात आली असून पाच हजार वर्षे जुनी अशी ही उपचार पद्धत आहे. बाकर नावाच्या रूग्णावर उपचार यशस्वी झाले आहेत, असे आयुर्वेदिक डॉक्टर वात्सायन यांनी सांगितले.

Dr. Neha  Khandelwal
Dr. Neha Khandelwal
BHMS, Homeopath Family Physician, 5 yrs, Pune
Dr. Pruthviraj  Ugale
Dr. Pruthviraj Ugale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diabetologist, 1 yrs, Pune
Dr. Pallavi U Bhurse
Dr. Pallavi U Bhurse
BAMS, Ayurveda Family Physician, 5 yrs, Pune
Dr. Pramod Bhimrao Patil
Dr. Pramod Bhimrao Patil
BAMS, 10 yrs, Pune
Dr. Gauri Karve
Dr. Gauri Karve
MBBS, 6 yrs, Pune
Hellodox
x