Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
थॅलेसेमिया
#रोग तपशील#थॅलेसेमिया



थॅलेसेमिया

आई-वडिलांकडून मुलाला आनुवंशिकतेमुळे जनुकांद्वारे अनेक शारीरिक वैशिष्टय़े, गुणधर्म प्राप्त होतात. याचे एका पिढीतून दुसऱ्या पुढच्या पिढीत वहन होत जाते. बिटा थॅलेसेमिया आजारात बिटा थॅलेसेमिया जनुक आई किंवा वडिलांच्या माध्यमातून अपत्यात येते आणि काही वेळा दोघांकडून प्रत्येकी एक जनुक येतानाही दिसून येतात. परिणामी, रक्ताशी संबंधित थॅलेसेमियाचा आजार होण्याची शक्यता बळावते.

या रोगात शरीरातील (हिमोग्लोबीन) रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. अशा वेळी रुग्णांच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या १२० दिवसांऐवजी कमी दिवस पुरेल इतकी खाली येते. त्याचा परिणाम सरळ शरीरातील हिमोग्लोबीनवर होतो. बिटा थॅलेसेमियाचे ट्रेटवाहक (मायनर) व दुसरा ट्रेटवाहक (मेजर) हे दोन प्रकार आहेत. बिटा थॅलेसेमिया असलेल्या रुग्णाच्या शरीरात निरोगी व्यक्तीपेक्षा फिक्कट निस्तेज व लहान आकाराच्या तांबडय़ा रक्तपेशी असतात. थोडय़ा प्रमाणात यांच्यात पंडुरोग (अ‍ॅनेमिया) असतो, परंतु याला सहसा उपचाराची गरज भासत नाही, पण या व्यक्तीद्वारे बिटा थॅलेसेमियाचे एक जनुक त्यांच्या मुलांत संक्रमित होते, तर बिटा थॅलेसेमिया (मेजर) हासुद्धा गंभीर आजार आहे. या रुग्णांच्या शरीरातील प्रत्येक पेशी जगण्यासाठी प्राणवायूचा योग्य प्रमाणात सातत्याने पुरवठा होणे गरजेचे आहे. प्राणवायू वाहून नेण्यासाठी योग्य प्रमाणात तांबडय़ा पेशींत हिमोग्लोबीन असणे अत्यावश्यक आहे. शरीरात हिमोग्लोबीन नसल्याने शरीराला गरजेइतकाही प्राणवायू न मिळाल्याने रुग्णाच्या मृत्यूचा धोका संभवतो.

बिटा थॅलेसेमियाची (मेजर) लक्षणे लहान बाळांत वयाच्या ३ ते ६ महिन्यांदरम्यान दिसू लागतात. हा आजार जडल्यानंतरच लक्षात येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्री आणि पुरुष हे दोघेही थॅलेसेमियाचे वाहक (थॅलेसेमिया मायनर)असतील तर त्यांच्या मुलांमध्ये बिटा थॅलेसेमिया आढळून येण्याची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत असते.

गंभीर थॅलेसेमियाची लक्षणे
- बाळाचे वजन घटू लागते.
- पोटात अन्न, दूध राहात नाही.
- वारंवार ओकाऱ्या होतात.
- मुलाची वाढ खुंटते.
- मुलांना कमालीचा थकवा जाणवतो.
- थोडय़ाही हालचालीमुळे धाप लागते.
- रक्त देण्याला विलंब झाल्यास मुले निस्तेज होतात.

गुंतागुंत आणि महत्त्वाचे
- ठरावीक कालावधीत नियमित रक्त न मिळाल्यास पंडुरोगाचा (अ‍ॅनेमिया) धोका
- जंतुसंसर्ग होण्याचा धोका.
- उपचारात रुग्णाला आधार देणे व संयम राखणे गरजेचे.
- योग्य औषधोपचार व काळजी घेऊन आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

उपचार
- बिटा थॅलेसेमिया व्याधीग्रस्तांना जगण्यासाठी नियमित रक्त देण्याची गरज असते.
- दर ४ ते ६ आठवडय़ांनी त्यांना रक्त मिळायलाच हवे.
- काविळसारखे आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याची गरज.
- व्याधीमुक्त होण्यासाठी मुलांचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपाय आहे.
- थोडाही त्रास झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आजार टाळण्यासाठी
- लग्नापूर्वी युवक-युवतीच्या रक्ताची चाचणी करणे.
- युवक-युवती दोघेही थॅलेसेमिया वाहक असल्यास लग्न टाळावे.
- पती-पत्नीपैकी एकही थॅलेसेमियाग्रस्त असल्यास मुलाला आजार संभावतो, ते टाळण्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी.
- गर्भवती माता थॅलेसेमिया वाहक वा रुग्ण असल्यास १० आठवडय़ांनी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करावी.

Dr. Dr.Rajendra  Chavat
Dr. Dr.Rajendra Chavat
MBBS, Family Physician, 35 yrs, Pune
Dr. Kamlesh Manikhedkar
Dr. Kamlesh Manikhedkar
BDS, Dental Surgeon, 9 yrs, Pune
Dr. Abhijit Shirude
Dr. Abhijit Shirude
MS - Allopathy, ENT Specialist, 5 yrs, Pune
Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Mahendra Sahu
Dr. Mahendra Sahu
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune