Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  

पोट साफ होत नसल्यास हे ५ पदार्थ खाणे टाळा!

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

मुंबई : पोटाचे आरोग्य व्यवस्थित राखणे अत्यंत गरजेचे आहे. कारण शरीराच्या अनेक क्रिया पोटाशी निगडीत असतात. अवेळी खाणे, अपूरी झोप यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. पोट साफ न झाल्याने अनेक शारीरिक-मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी हे ५ पदार्थ खावू नका.

दुधापासून बनलेले पदार्थ
दुधापासून बनलेले पदार्थ पचण्यासाठी खूप वेळ लागतो. यात फॅट्स अधिक प्रमाणात तर फायबर्स कमी प्रमाणात असतात. अन्नाचे नीट पचन होत नसेल तर दुधापासून बनलेले पदार्थ खाल्याने बद्धकोष्ठता होण्याची शक्यता अधिक असते.

चिप्स
चिप्स अपचनाची समस्या अधिक वाढवतात. बटाट्यात फॅट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते पचण्यासाठीही इतर पदार्थांपेक्षा अधिक वेळ लागतो. यामुळे चिप्स, तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

फ्रोजन फूड
फ्रोजन फूड पोटात गडबड करु शकतात. त्यामुळे ते खाणे टाळा. त्याऐवजी ताजी फळे, भाज्या याचा आहारात समावेश करा.

बिस्कीट
बिस्कीट, कुकीजमध्ये मैद्याचे प्रमाण अधिक असते. मैदा पोटासाठी हानिकारक असतो. त्यामुळे याचे सेवन टाळा.

कच्चे केळे
अन्नपचनासाठी केळे अतिशय फायदेशीर ठरते. पण जर केळे कच्चे असेल तर याचा प्रभाव उलटा होतो. त्यामुळे चुकूनही कच्चे केळे खावू नका.

Published  

मायग्रेनचा त्रास केवळ डोक्यात नाही तर पोटातही वाढतो

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

मुंबई : मायग्रेनचा त्रास असणार्‍यांमध्ये डोकेदुखी तीव्र स्वरूपात जाणावते. प्रामुख्याने हा त्रास डोक्यामध्येच आढळत असावा असे सामान्यपणे तुम्हांला वाटत असेल. परंतू मायग्रेनचा त्रास हा पोटदुखीच्या स्वरूपातूनही वाढतो. मायग्रेन केवळ डोक्यात नव्हे तर पोटातही त्रासदायक ठरू शकतो. पोटात वाढणार्‍या या त्रासाला अ‍ॅबडॉमिनल मायग्रेन असे म्हटले जाते. यामध्ये पोटात तीव्र वेदना जाणवणं, मुराडा मारणं, थकवा, उलटीचा त्रास जाणवतो.

धोका कोणाला?
पोटातील मायग्रेनचा त्रास हा प्रामुख्याने अनुवंशिक असतो. सर्वाधिक हा त्रास लहान मुलांमध्ये आढळतो. आई-वडीलांना मायग्रेनचा त्रास असल्यास मुलांमध्येही हा त्रास वाढतो. मुलींना हा त्रास अधिक प्रमाणात जाणवतो. लहान मुलांमध्ये अ‍ॅबडॉमिनल मायग्रेनचा त्रास असेल तर मोठेपणी मायग्रेनचा त्रास हा डोक्यात वाढण्याची शक्यता असते.

पोटातील मायग्रेनचं कारण काय?
पोटात वाढणार्‍या मायग्रेनचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट नाही. मात्र डॉक्टरांच्या मते, शरीरात हिस्टामाइन आणि सेरोटोनिन या हार्मोन्समुळे वेदना वाढतात. नैराश्य किंवा सतत चिंता करण्यामुळे शरीरात मायग्रेनचा त्रास वाढतो. चायनीज फूड, इन्स्टंट नूडल्स यांच्या अतिसेवनामुळे शरीरात मोनोसोडियम ग्लुटामेट, एमएसजी, प्रोसेस्ड मीट, चॉकलेट अतिप्रमाणात खाल्ल्यानेही आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.

लक्षणं काय?
पोटात तीव्र वेदना
पोटाचा भाग पिवळसर दिसणं
दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवणं
भूक मंदावणं
डोळ्यांखाली डार्क सर्कल्स दिसणं

अनेकदा ही लक्षण सामान्य आणि इतर अनेक आजारांमध्येही दिसणारी असल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जाते. सुरूवातीपासून ही लक्षण दिसतातच असे नाही.

पोटातील मायग्रेनचा त्रास अर्धा तासामध्ये ठीक होतो. तर काही जणांना हा त्रास 2-3 दिवस जाणवतो.

Published  

कैरी खा आणि तंदुरुस्त राहा

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

कैरी असे नुसते ऐकले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. मग शाळेच्या बाहेर तिखट मीठ लावून ठेवलेले कैरीचे काप असोत कींवा शेजारच्या काकूंच्या झाडावरची दगड मारुन पाडलेली कैरी असो. आंबट गोड चवीची ही कैरी खायला तर चविष्ट असतेच पण तितकीच ती आरोग्यासाठीही उपयुक्त असते. कैरीचे लोणचे, मुरांबा, मेथांबा, गुळांबा, साखरांबा असे अनेक प्रकार या सिझनमध्ये जेवणाचा स्वाद वाढवतात. याबरोबरच वर्षभरासाठी करुन ठेवले जाणारे हे पदार्थ आपल्या कधी कामी येतील सांगता येत नाही. याबरोबरच पन्हे, कैरीचा भात, कैरीची डाळ हे पदार्थही तितकेच चविष्ट असतात. आता काही दिवसांतच आंब्याचा सिझन कमी होईल आणि घरोघरी हे साठवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरु होईल. पाहूयात आहारात कैरीचा नेमका काय आणि कसा उपयोग होतो.

पोटाच्या तक्रारींसाठी उपयुक्त

या दिवसांत पोटाशी निगडित समस्या उद्भवतात. गॅसेस, अपचन यांसारख्या तक्रारी वाढतात आणि पचनशक्ती क्षीण होते. मात्र कैरीमुळे या तक्रारी दूर होण्यास निश्चितच मदत होते. कैरीचे पदार्थ खाल्ल्याने ही बिघडलेली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

हिरड्यांच्या मजबूतीसाठी फायदेशीर

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. काहींना विविध कारणांनी हिरड्यांमधून रक्त येते. ते रोखण्यासाठी कैरी अतिशय उत्तम काम करते. कैरीमुळे दात मजबूत राहतात. तसेच तोंडाचा वास येण्याची समस्याही कमी होते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

आंबा खाल्ल्याने वजन वाढते असे आपण या काळात अनेकदा ऐकतो. पण आंब्यामुळे वजन वाढत नाही. तसेच कैरी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. शरीरावर वाढलेल्या अतिरिक्त चरबीला कमी करण्यासाठी कैरीचे सेवन फायदेशीर ठरते.

त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय

उन्हामुळे त्वचेवर येणारे रॅशेस कमी करण्यासाठी कैरीचा उपयोग होतो. उन्हामुळे शरीरात वाढणारा थंडावा कमी करण्यासाठी कैरीचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात घाम येणे हे अतिशय सामान्य आहे. मात्र कैरीचा रस प्यायल्यास घाम येणे कमी होते. घामाद्वारे शरीरातील आयर्न आणि सोडियम क्लोराईडची पातळी कमी होते. मात्र कैरीचा आहारातील समावेश ही पातळी भरुन काढण्यास उपयुक्त ठरतो.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत

सध्या मधुमेह ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहणे आवश्यक असते. कैरीच्या सेवनाने हे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठीही कैरीची मदत होते.

Published  

पोट साफ होण्यासाठी हे पाच पदार्थ ठरतात उपयुक्त

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

सकाळी उठल्यानंतर पोट साफ झाले नाही तर संपूर्ण दिवसभर एकप्रकारची अस्वस्थतता जाणवते. कुठल्याही आजाराची सुरुवात पोटापासून होते असे म्हटले जाते. पोट साफ नसेल तर दुसऱ्या आजारांचीही लागण होते. त्यामुळे पोट साफ ठेवण्यासाठी या पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.

– पोट साफ ठेवण्यासाठी सफरचंद खाणे खूप उपयुक्त ठरू शकते. एका सफरचंदात ४.५ ग्रॅम फायबर असते. तुमची पचन क्रिया व्यवस्थित ठेवण्यात फायबर महत्वाची भूमिका बजावते.

– पोटाच्या आरोग्यासाठी संत्र सुद्धा खूप उपयुक्त आहे. एका संत्र्यामध्ये ४ ग्रॅम फायबर असते तसेच त्यामध्ये कॅलरीचा स्तरही खूप कमी असतो. क जीवनस्तव असलेले संत्र खाल्ल्यानंतर तुमची रोगप्रतिकारक शक्ति सुद्धा खूप वाढते. संत्र्यामध्ये फ्लेवेनॉल असते. संत्र तुमच्या त्वचेसाठी सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे.

– पॉपकॉर्न सुद्धा पोटाच्या स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण आहे. एक कप पॉपकॉर्नमध्ये १ ग्रॅम फायबर असते.

– अपचनाचा त्रास असेल तर ओट्सही उपयुक्त ठरु शकतात. एक कप ओट्समध्ये दोन ग्राम सोल्यूबल आणि इनसोल्यूबल फायबर असते. पोटाला तंदुरुस्त ठेवण्यामध्ये ओट्स उपयुक्त ठरु शकतात.

– एलोवेराचा उपयोग लोक त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्यासाठी करतात. पण ते तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. एलोवेराच्या सेवनानंतर पोटाचे विकार दूर होऊ शकतात.

Dr. Amar Kamble
Dr. Amar Kamble
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Brinda Dave
Dr. Brinda Dave
MPTh, Neuro Physiotherapist Physiotherapist, 4 yrs, Pune
Dr. Sayali Khare - Pendse
Dr. Sayali Khare - Pendse
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 3 yrs, Pune
Dr. Chetana  Mahajan
Dr. Chetana Mahajan
DHMS, Homeopath, 22 yrs, Pune
Hellodox
x
Open in App