Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

अनेकदा नवीन चप्पल किंवा सॅंडल घातल्याने पायाला इजा होते. पायाची त्वचा निघते, जळजळ होते. चप्पल, सॅंडल घालून चालणे कठीण होते. याचा अनुभव तुम्हीही नक्कीच घेतला असेल. अशावेळेस पाय ओलसर राहिल्यास अल्सर होण्याची शक्यता वाढते. यावर काही सोपे घरगुती उपाय कामी येतील. तसंच याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तर तुम्ही करुन पाहा हे घरगुती उपाय..

कोरफड
कोरफड बहुगुणी आहे, हे आपण जाणतोच. त्यामुळे शू बाईट झाल्यानंतर त्यावर कोरफड जेल लावा. त्यामुळे सूज कमी होऊन जळजळीवर आराम मिळेल. त्याचबरोबर याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. कोरफड जेल पूर्णपणे सुकल्यावर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा. अधिक चांगल्या परिणामांसाठी कोरफड जेल दिवसातून दोनदा लावा.

ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये अॅंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यातील अॅंटीऑक्सीडेंट आणि व्हिटॉमिन्स वेदना, सूज कमी करतात. गरम पाण्यात ग्रीन टी आणि बेकिंग सोडा घाला. टी बॅग थंड झाल्यावर काही वेळ शू बाईट झालेल्या ठिकाणी लावा. बेकिंग सोड्यातील अॅँटीसेप्टीक गुणधर्मांमुळे इंफेक्शनला आळा बसतो. असे दिवसातून २-३ वेळा करा. लवकर आराम मिळेल.


मीठ
शू बाईटमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी थंड पाण्यात मीठ घाला. पाण्यात कपडा घालून शू बाईटवर लावा. या कपड्याने १५ मिनिटे पाय शेका. सूज आणि वेदन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

अॅपल व्हिनेगर
शू बाईट दूर करण्याचा हा सोपा घरगुती उपाय आहे. अॅपल व्हिनेगर कापसाच्या बोळ्यावर घेऊन शू बाईटवर लावा. त्यामुळे वेदना, सूज कमी होईल. इंफेक्‍शन दूर होण्यास मदत होईल. कांद्याच्या पेस्टमध्ये अॅपल व्हिनेगर घालून शू बाईटवर लावा आणि सुकल्यानंतर पाण्याने धुवा. यामुळे नक्कीच आराम मिळेल.

एरंडेल तेल
कोरडेपणा, खाज, त्वचेचा लालसरपणा दूर करण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त ठरते. रात्री झोपण्यापूर्वी शू बाईटवर एरंडेल तेल लावा.

पेट्रोलिअम जेली
फक्त फाटलेल्या ओठांसाठी नाही तर शूट बाईट दूर करण्यासाठीही पेट्रोलिअम जेली फायदेशीर ठरते. यामुळे वेदना आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. पाय दिवसातून दोनदा १५ मिनिटांसाठी पाण्यात बुडवून ठेवा. नंतर टॉवेलने कोरडे करा आणि त्यावर पेट्रोलिअम जेली लावा. गरम पाण्यामुळे वेदना आणि इंफेक्‍शन दूर होईल. तर पेट्रोलिअम जेली त्वचा मॉईश्चराईज ठेवण्यास मदत करेल.

तणावग्रस्त आणि झपाट्याने बदलत जाणार्‍या आपल्या लाईफस्टाईलचा आरोग्यावर गंभीरपणे परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढता ताणताणाव रक्तदाबाची समस्या वाढवण्यामागील एक कारण आहे. हा त्रास कमी करण्यासाठी केवळ औषध उपचार पुरेसे नाहीत. कारण एका टप्प्यानंतर औषधोपचारांचेही साईड इफेक्ट्स दिसतात. त्यामुळे तुम्हांलाही उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यावर मात करण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचीही मदत होऊ शकते.

उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नैसर्गिक उपाय -
स्ट्रेन्थ ट्रेनिंग -
स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते. वेट ट्रेनिंग, क्रन्चेस अशा व्यायाम नियमित करणं फायदेशीर ठरते.

स्विमिंग -
स्विमिंगदेखील एक उत्तम व्यायामप्रकार आहे. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी स्विमिंग हा उत्तम कार्डिओ व्यायामप्रकार आहे.


ब्रिस्क वॉकिंग -
30 मिनिटांचा ब्रिस्क वॉकिंग हा व्यायामप्रकार उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी उत्तम व्यायामप्रकार आहे.

ट्रेड मिल -
उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी ट्रेड मिलवर चालणं फायदेशीर आहे. 10 मिनिटं ट्रेड मिलवर चालायला सुरूवात करा. हळूहळू तुमचा वेग वाढवा.

योगा -
नियमित योगासनं केल्यानेही उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. योगासनाचा अभ्यास कोणीही आणि कुठेही करू शकतो त्यामुळे योगासनं करणं हा सोयीस्कर मार्ग आहे. यामध्ये पुरेशी काळजी घेतल्यास इजा होण्याचा धोका कमी होतो.

घरच्या घरी व्यायाम -
घरच्या घरी रश्शी उड्या मारणं, मेडिसीन बॉलसोबत व्यायाम करणं, हलकेच स्ट्रेचिंग करणं अशा व्यायामप्रकारांमुळे उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

मसाज -
उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी व्यायामापूर्वी वॉर्म अप करणं आणि व्यायामानंतर शरीराला थंड होण्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचे आहे. वाढलेली हृद्याची धडधड पुन्हा सामान्य स्वरूपात आणण्यासाठी त्याची मदत होते.

मुली प्रामुख्याने त्वचा आणि सौंदर्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतात. त्यामध्येही चेह्र्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात. तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये ओपन पोअर्सचा त्रास अधिक जाणवतो. वाढत्या वयानुसार ओपन पोअर्स वाढतात. म्हणूनच सुरूवातीच्या टप्प्यावर ओपन पोअर्स जाणवल्यास या उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

ओपन पोअर्सच्या समस्येवर घरगुती उपाय -

केळं -
केळ्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हांला ठाऊक असतील परंतू त्याचा फायदा सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो. त्वचेवरील मृत पेशींचा थर हटवणयसाठी, चेहर्‍यावर पुन्हा तजेला येण्यासाठी केळं फायदेशीर ठरते. आठवड्यातून दोनदा केळ स्मॅश (कुस्करून) करून चेहर्‍यावर लावल्याने ओपन पोआर्सचा त्रास कमी होतो.

काकडी आणि लिंबू -
ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठी काकडीमध्ये लिंबू पिळा. या मिश्रणाचा रस चेहर्‍यावर लावा. यामुळे चेहर्‍यावरील ओपन पोअर्स टाईट होण्यास मदत होते.

दूध आणि ओट्स -
दोन चमचे ओट्स आणि चमचाभर गुलाबपाणी, मध यांचे एकत्र मिश्रण बनवा. ही पेस्ट 10 मिनिटं चेहर्‍यावर लावा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवाव. यामुळे ओपन पोअर्ससोबतच चेहर्‍यावरील डागही कमी होण्यास मदत होते.

चेहर्‍यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी अनेकजण थ्रेडिंगचा पर्याय निवडतात. थ्रेडिंगद्वारा आयब्रो (भुवया) आणि अप्पर लिप्सवरील केस हटवले जातात. मात्र ही प्रक्रिया काही प्रमाणात वेदनादायी आहे. संवेदनशील त्वचेच्या लोकांमध्ये थ्रेडिंगमुळे वेदनांसोबत पुरळ, पिंपल्सचा त्रासही बळावण्याची शक्यता असते. थ्रेडिंगनंतर काही दिवसातच पिंपल्स येण्याचा तुम्हांलाही त्रास असेल तर या उपायांनी त्यावर नक्की मात करा.

थ्रेडिंगनंतर या उपायांनी कमी करा पिंपल्सचा त्रास :

1. थ्रेडिंगनंतर येणारे पिंपल्स टाळण्यासाठी कोमट पाणी फायदेशीर आहे. याकरिता थ्रेडिंगपूर्वीच कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. कोमट पाण्यामुळे चेहरा मुलायम होतो, सोबतच थ्रेडिंगदरम्यान वेदना कमी होतात.

2.आयब्रो केल्यानंतर त्वचेवर बर्फ फिरवा. यामुळे जळजळ, इंफेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होईल.


3. थ्रेडिंगनंतर पिंपल्सचा त्रास टाळायचा असल्यास आयब्रोवर टोनर लावावे. टोनर नसल्यास दालचिनीचा काढा लावणंही फायदेशीर ठरते.

4. थ्रेडिंग केल्यानंतर चेहर्‍यावर गुलाबपाणी लावणं फायदेशीर आहे. यामुळे त्वचा खुलवण्यास मदत होते. थ्रेडिंग केल्यानंतर 12 तासांपर्यंत शक्यतो कोणत्याही ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करणं टाळा.

फोडणी करतांना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास दूर सरतील.

एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू हे combination आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे anaemia ला bye bye
ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की पचनाच्या तक्रारी चक्क गायब.



कणकेत चिमूटभर चुना add करून, कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापरून हाडांना strong ठेवता येईल.

Fitness मंत्र :
सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठी देऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास. दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून टाचदुखी ला कायमचा निरोप देऊया.

Energy boosting:

पाव किलो खारीक पावडर, पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी cerelac तयार करता येईल.
दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही energy level maintain ठेवता येईल.

बस्स पांच मिनिटंवाला नाश्ता with देशी अंदाज:

नाश्ता compulsory प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात, तुपसाखर पोळी, लोणी-साखर पोळी, राजगिरा लाही व दुध, लाह्यांचे पीठ व ताक, नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी, पुलाव, थालीपीठ, उपमा, शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.

ओट्स, कॉर्नफ्लेक्स, packed juices, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी यांना ठामपणे "NO" म्हणायचे.

Dr. Vijay Shirke
Dr. Vijay Shirke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 17 yrs, Pune
Dr. Richa Lal
Dr. Richa Lal
MBBS, Anesthesiologist, 8 yrs, Pune
Dr. Varun kumar  PT
Dr. Varun kumar PT
BPTh, Homecare Physiotherapist Physiotherapist, 10 yrs, Pune
Dr. sandeep shivekar
Dr. sandeep shivekar
BHMS, Diabetologist, 10 yrs, Pune
Dr. Jyoti Kumari
Dr. Jyoti Kumari
BDS, Chest Physician Child Abuse Pediatrician, Ranchi
Hellodox
x