Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पुदीना म्हटलं की त्याचा पहिल्यांदा त्याचा गंध आठवतो आणि मग त्याची चटपटीत चटणी लक्षात येते. पुदीना आरोग्यदायी असून अनेक ड्रिंक्समध्ये त्याचा वापर केला जातो. पोटाला थंडावा देण्यासाठी पुदीना गुणकारी ठरतो.

पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी पुदीना उपयुक्त ठरतो. पण पुदीना फक्त आरोग्यदायी आहे असे नाही तर तो सौंदर्यवर्धकही आहे.

त्वचेसाठी लाभदायी असलेला पुदीना नेमका कसा वापरावा, पाहुया...

# पुदीन्यात मिंथॉल आणि अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. पिंपल्स, रॅश, घामोळ्या, सनबर्न यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी पुदीन्याची पाने उपयुक्त ठरतात.

# मुलतानी माती देखील त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्वचेतील ऑईल नियंत्रित करून त्वचा स्वच्छ करण्याचे काम मुलतानी माती करते. मुलतानी मातीत पुदीन्याची पान्यांची पेस्ट, मध, दही घालून त्वचेवर लावा. २० मिनिटांनंतर चेहरा धुवा. त्यानंतर त्वचेवर मॉईश्चरायजर लावा. तेलकट त्वचेचा त्रास कमी होईल.

# त्वचेची पीएच लेव्हल सुरळीत ठेवण्यासाठी, अतिरिक्त ऑईल नियंत्रित करण्यासाठी गुलाबपाणी फायदेशीर ठरते. त्यामुळे पुदीन्याची पाने, मध आणि गुलाबपाणी एकत्र मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. त्वचा मुलायम होईल व हायड्रेट राहिल.

अनेकदा पावसात भिजताना काळजी न घेतल्यास, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करतानादेखील कानात पाणी जाते. कानात पाणी गेल्यास अनेकांना तीव्र कानदुखीचा त्रास होतो. कानात पाणी जमा राहिल्यास इंफेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर पाणी काढून टाकावे.

कानातून पाणी काढण्यासाठी काय कराल ?
कानाचा बाहेरचा भाग खेचा -
कानामध्ये पाणी गेल्यास ते तात्काळ बाहेर काढणं गरजेचे अअहे. याकरिता तुमचं डोकं एका बाजूला झुकवा. आणि कानाजवळील बाहेरचा भाग थोडा खेचा. कानात नलिकेमध्ये साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी यामुळे मदत होते.

डोकं एका बाजूला झुकवा -
कानात पाणी गेल्यानंतर कानाच्या त्या बाजूला डोकं झुकवा. आणि एका पायावर उड्या मारा. असे 2-4 वेळेस केल्यानंतर कानातील पाणी बाहेर येईल.

त्वचेचा रंग ठरवण्यासाठी मेलॅनिन हा घटक सर्वात महत्त्वाची भूमिका साकारतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तेव्हा त्वचेचा रंग अधिक गडद होतो. या समस्येला हायपर पिंगमेंटेशन असेही म्हणतात.

हळूहळू विशिष्ट भाग अधिक गडद होण्यास सुरूवात होते. प्रामुख्याने चेहर्‍यावर हायपरपिंगमेंटटेशनमुळे त्वचा काळवंडणं अनेकींना सौंदर्याच्या दृष्टीने नकोसं वाटतं. यावर मात करण्यासाठी अनेकदा ब्युटी ट्रीटमेंटसची मदत घेतली जाते. महागड्या ब्युटी ट्रीटमेंटपेक्षा काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते.

हायपर पिंगमेंटेशनवर घरगुती उपाय
1. लिंबू -
लिंबातील सायट्रिक अ‍ॅसिड त्वचा ब्लिच करण्यास मदत करतात. नियमित लिंबाचा त्वचेवर वापर केल्यास यामुळे हायपर पिगमेंटेशनचा त्रास दूर करण्यास मदत होते.
चेहर्‍यावर लिंबाचा रस लावून 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. संवेदनशील त्वचा अस्णार्‍यांनी लिंबाचा रस थेट त्वचेवर लावणं त्रासदायक ठरू शकते अशावेळेस लिंबामध्ये थोडं पाणी मिसळून ते त्वचेवर लावणं फायदेशीर आहे.


2. बटाटा -
बटाट्यामध्येही ब्लिचिंग घटक मुबलक प्रमाणात असतात. चेहर्‍यावर बटाट्याचा रस लावल्याने हायपर पिगमेंटटेशनचा त्रास कमी होतो.

3. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर -
हायपर पिंगमेंटेशनचा त्रास कमी करण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरदेखील फायदेशीर आहे. यामधील अ‍ॅसिडीक गुणधर्म त्वचेचे सौंदर्य खुलवण्यास मदत करतात.

4. कोरफड
कोरफडीचा गरदेखील त्वचेसाठी वरदानचं आहे. मृत पेशींचा थर हटवून नव्या पेशींना पुन्हा ताजंतवानं करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. नियमित कोरफडीचा गर त्वचेवर लावल्यास हायपर पिगमेंटशनच्या समस्येपासून सुटका मिळते.

सतत उभे राहणार्‍यांमध्ये, सतत हाय हिल्स घालून चालल्यानेही पायदुखीचा आणि प्रामुख्याने टाचा दुखतात. स्टाइल्सच्या या काही कारणांसोबतच शरीरात पोषकतत्त्वांची कमतर्ता असल्यास, साखर, फॅट्स, हार्मोन्स यांच्या असंतुलनामुळे टाचा दुखतात. टाच्यांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी नेमकं काय करावं? हे अनेकांना ठाऊक नसते. त्यामुळे टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करतात.

टाचदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
1. टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी दिवसांतून किमान 3 वेळेस नारळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा.

2. हळदीमध्ये अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. टाचदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी ग्लासभर दूधात हळद व मध मिसळून प्यावे.


3. टाचा दुखत असतील टपअम्ध्ये कोमट पाणी घेऊन त्यात मीठ मिसळा. या पाण्यात पाय बुडवून काही वेळ बसल्याने थकवा कमी होण्यास, टाचदुखीचा त्रास काम होण्यास मदत होईल.

4. नियमित सकाळी रिकाम्यापोटी कोरफडीचा रस प्यावा. यामुळे वारंवार टाचदुखीचा त्रास असणार्‍यांना आराम मिळतो.

जेव्हा दातांचा प्रश्न येतो तेव्हा आपण म्हणतो की दात हा शरिराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण दातांशिवाय तुम्ही जेवण करु शकणार नाहीत. अनेक गोष्टींना तुम्हाला नाही म्हणावं लागेल. अनेकांना दात दुखण्याची समस्या असते. अशावेळी काही घरगुती उपाय करुन देखील तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

1. लवंग : लवंग एक अशी नैसर्गिक वस्तू आहे. जी आपल्या दातांसाठी खूप लाभदायक आहे. लवंगमध्ये अनेक औषधी गुण असतात. जे दातांमधील बॅक्टेरिया आणि जर्म्सला संपवतात आणि दातांना मजबूत करतात. तुमची दाढ जर दुखत असेल कर लवंग यावर गुणकारी उपाय आहे. लवंगमुळे दातांचं दुखणं कमी होतं. पण याचा वापर तुम्ही नियमित केला पाहिजे.

2. मीठ : मीठ देखील तुमच्या दातांमधील दुखणं कमी करतं. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या पाहिजे. यामुळे तुमच्या दातांचं दुखणं कमी होतं.

Dr. Nirnjn P.
Dr. Nirnjn P.
MD - Allopathy, Diabetologist Physician, 9 yrs, Pune
Dr. Cliford John
Dr. Cliford John
BDS, Dental Surgeon Root canal Specialist, 6 yrs, Pune
Dr. Jitendar Choudhary
Dr. Jitendar Choudhary
BHMS, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. Kalpana Dongre Ladde
Dr. Kalpana Dongre Ladde
BAMS, Ayurveda Family Physician, 11 yrs, Pune
Dr. Neha Sawant
Dr. Neha Sawant
BPTh, Orthopedic Physiotherapist Physiotherapist, 11 yrs, Pune
Hellodox
x