Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

नितळ, तजेलदार त्वचा कोणाला नको असते. पण धूळ, प्रदूषण, तणावग्रस्त जीवनशैली यामुळे चेहऱ्यावरील तेज गायब होऊ लागते. तसंच यामुळे ओपन पोर्सची समस्या उद्भवते. तेलकट त्वचा असणाऱ्यांना हा त्रास अधिक संभवतो. वयानुसार हे पोर्स देखील वाढू लागतात. त्यामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते. तुम्हालाही या समस्येमुळे त्रस्त असाल तर हे काही घरगुती उपाय करुन पाहा...

केळं

केळं खाण्याचे तर अनेक फायदे तुम्हाला ठाऊक असतील. पण तुम्हाला माहित आहे का? की त्वचेसाठी देखील केळं खूप फायदेशीर आहे. केळ्यामुळे त्वचेतील डॅमेज टिश्यूज दूर होऊन त्वचा ग्लो होण्यास मदत होते. आठवड्यातून दोनदा केळं मॅश करुन लावल्याने त्वचेवरील ओपन पोर्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

काकडी आणि लिंबू

ओपन पोर्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काकडी आणि लिंबाचा वापर तुम्ही करु शकता. यासाठी काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळून लावा. असे नियमित केल्यास स्किन पोर्स टाईट होण्यास मदत होईल.


दूध आणि ओट्स

दूध आणि ओट्सचा पॅक बनवण्यासाठी २ चमचे ओट्समध्ये चमचाभर गुलाबपाणी आणि १ चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे ओपन पोर्सची समस्या तर दूर होईलच पण चेहऱ्यावरील डाग दूर होण्यासही मदत होईल.

ओठ हा अत्यंत नाजूक अवयव आहे. सौंदर्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे चेहर्‍याप्रमाणेच ओठांची काळजी घेणं आवश्यक आहे. ओठांचा काळसरपणा वाढण्यामागे वातावरणातील काही गोष्टी जितक्या आवश्यक असतात तितक्याच आपल्या काही सवयीदेखील कारणीभूत ठरतात.

ओठ काळे का होतात ?
ओठ काळे होण्यामागे डेड स्किन म्हणजेच मृत त्वचादेखील आहे. सतत ओठांना जीभ लावण्याची तुमची सवय ओठांमधील मुलायमपणा कमी होतो. त्यामुळेही ओठांवरील त्वचा काळवंडू शकते.

काय आहे उपाय ?
ब्रशच्या मदतीने ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी मदत होते.


ग्लिसरीन आणि लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण एका बाटलीत मिसळा. नियमित त्याचा वापर करा. या मिश्रणामुळेही ओठांवरील काळसरपणा कमी होण्यास मदत होते.

लिंबू आणि साखरेचे एकत्र मिश्रण करा. नैसर्गिक स्क्रबरच्या मदतीने ओठांना तुम्ही स्वच्छ करू शकता.

बीटाचा रसदेखील ओठांवरील नैसर्गिक गुलाबी रंग टिकून राहण्यास मदत होते.

सौंदर्य खुलवण्यासाठी मध हे अत्यंत फायदेशीर आहे. मध आरोग्याला जितके फायदेशीर आहे तितकेच ते सौंदर्य खुलवण्यासाठीही मदत करते. घरगुती उपायांनी सौंदर्य खुलवण्यास प्रयत्न करत असल्यास मधासोबत हे काही पदार्थ मिसळून चेहर्‍यावर त्याचा उपयोग करावा.

मध आणि हळद -

हळद आणि मध दोन्हींमध्ये अ‍ॅन्टी सेप्टिक गुणधर्म आहेत. यामुळे चेहर्‍यावरील अ‍ॅक्नेचा त्रास कमी होण्यास मदत होते. हळद आणि मधाचा फेसपॅक चेहर्‍यावर लावल्यानंतर 20 मिनिटांनी स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोन वेळेस हा फेसपॅक लावल्याने अ‍ॅक्नेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

मध आणि ओटमील -

ओट्स चेहर्‍यावरील डाग कमी करण्यास मदत करतात. अर्धा कप शिजवलेले ओट्स आणि 2 चमचे मध एकत्र करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. अर्धा तासानंतर हा फेसपॅक कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

मध आणि व्हिनेगर -

मधासोबत अ‍ॅपल सायडर व्हिनेगर एकत्र मिसळणं फायदेशीर आहे. हे दोन्ही अ‍ॅसिडीक प्रकृतीचे आहेत. यामुळे त्वचेतील pH पातळी जपण्यास मदत होते. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण चेहर्‍यावर लावावे. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.

मध आणि लिंबू -

मधामध्ये लिंबाचा रस मिसळणं फायदेशीर आहे. यामधील अ‍ॅन्टि ऑक्सिडंट घटक, व्हिटॅमिन सी घटक अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यास मदत करतात. मध आणि लिंबाच्या रसाचा पॅक चेहर्‍यावर लावल्यानंतर 10मिनिटांनी चे
हरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा.

मध आणि नारळाचं तेल -

नारळाच्या तेलामध्ये मध मिसळा. या मिश्रणामुळे एक्झिमा, सोयरासिससारख्या आजारांचा धोका कमी होतो. यामुळे अ‍ॅक्नेचा त्रास कमी होतो. 15 मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा.

खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात. मग यावर औषधं-गोळ्या घेतल्या जातात. पण यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. म्हणून या समस्यांवर काही घरगुती उपाय करुनही तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकता. त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे- हिंगाचा काढा. त्यामुळे पोटांच्या सर्व समस्यांवर तात्काळ आराम मिळतो. तर जाणून घेऊया हिंगाचा काढा बनवण्याची पद्धत...

घरात बनवलेला हिंगाचा काढा सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे पोटातील गॅस, अॅसिडिटी यापासून तात्काळ सुटका मिळेल.

साहित्य-

ओवा- अर्धा चमचा
शतपुष्प- अर्धा चमचा
हिंग- पाव चमचा
काळं मीठ- चवीनुसार
सुंठ- एक तुकडा
ज्येष्ठमध- एक लहानसा तुकडा


कृती
हा काढा बनवण्यासाठी सर्वात आधी वरील सर्व साहित्य २५० मीली लीटर पाण्यात घालून उकळवा. ५ मिनिटे हे चांगल्या प्रकारे उकळवल्यानंतर ते गाळून घ्या. जेवल्यानंतर अर्धा तासानंतर काढा प्या. त्यामुळे पचनतंत्र सुरळीत होईल. लहान बाळाला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास चमचाभर काढा बाळाला पाजा. ताबडतोब याचा परिणाम जाणवेल.
याशिवाय बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी अधिक पाणी प्या. फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करा. फायबरयुक्त आहार घ्या. तसंच मिनरल्स आणि मॅग्नेशियमचे सेवन करा.

किडनीस्टोनचा त्रास अत्यंत वेदनादायी त्रासांपैकी एक आहे. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास रूग्णाला वारंवार असह्य वेदनांचा आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांचा सामना करावा लागतो. जेव्हा मूत्राशयामध्ये खडे निर्माण होतात तेव्हा सुरूवातीच्या टप्प्यावर त्याचा धोका ओळखता आला तर काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते. मात्र मूतखड्याचा आकार मोठा असल्यास शस्त्रक्रियेच्या माध्यमातून मूतखडा काढावा लागतो. मूतखड्याचा त्रास नेमका कशामुळे होतो?

आवळा -
किडनीस्टोनचा त्रास असलेल्यांनी आवळा खाणं फायदेशीर आहे. आवळा चूर्ण मुळ्यासोबत खाल्ल्याने किडनीस्टोनचा त्रास कमी होतो.

तुळस -
किडनीस्टोनच्या रूग्णांसाठी तुळशीची पानं फयादेशीर आहे. तुळशीपानांमध्ये व्हिटॅमिन बी घटक आढळतात. यामुळे किडनीस्टोनचा त्रास कमी होतो.


वेलची -
किडनीस्टोनचा त्रास कमी करण्यासाठी वेलची देखील फायदेशीर आहेत. चमचाभर वेलची, कलिंगडाच्या बीया, दोन चमचे खडीसाखर, कपभर पाणी मिसळून उकळा. सकाळ-संध्याकाळ हे मिश्रण प्याय्ल्यास मूत्रामार्गे किडनीस्टोन बाहेर पडण्यास मदत होते.

जीरं -
किडनीस्टोनच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी जीरं फायदेशीर आहे. जीरं आणि साखर समप्रमाणात मिसळा. या मिश्रणाला थंड पाण्यासोबत प्यावे. हे मिश्रण दिवसातून 3 वेळेस घेणं अधिक फायदेशीर आहे. यामुळे नैसर्गिकरित्या किडनीस्टोन बाहेर पडण्यास मदत होते.

Dr. Richa Lal
Dr. Richa Lal
MBBS, Anesthesiologist, 8 yrs, Pune
Dr. Akash Kadam
Dr. Akash Kadam
BDS, Dentist Oral Medicine Specialist, 4 yrs, Pune
Dr. Sushil Shinghavi
Dr. Sushil Shinghavi
MS/MD - Ayurveda, Diabetologist General Physician, 13 yrs, Pune
Dr. Bharat Oza
Dr. Bharat Oza
BAMS, General Surgeon Proctologist, 9 yrs, Pune
Dr. Sandip Nimbhorkar
Dr. Sandip Nimbhorkar
BAMS, Ayurveda Naturopathy Specialist, 21 yrs, Pune
Hellodox
x