Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

आवळा हा अत्यंत औषधी आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्याचबरोबर शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते. आवळ्याचे सेवन जितके फायदेशीर आहे. तितकेच त्याचे तेलही केसांसाठी उपयुक्त आहे. आवळ्याचे गुणधर्म जाणून तुम्ही बाजारातील तेल वापरता? पण त्यात केमिकल्स असण्याची शक्यता असते. तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आवळ्याचे तेल बनवू शकता. पाहा तेल बनवण्याची प्रक्रिया...

आवळ्याचे तेल बनवण्याची कृती
आवळ्याचे तेल बनवण्यासाठी आवळा कापून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर पेस्ट खोबरेल तेलात घालून आठवडाभरासाठी बाटली बंद करुन ठेवा. आठवडाभरानंतर तेल गाळून घ्या. आवळ्याचे तेल तयार.

तेल वापरण्याची पद्धत
आठवड्यातून दोनदा तेलाने स्कॉल्पला मसाज करा. मसाज हलक्या हाताने बोट्यांच्या साहाय्याने करावा. त्यानंतर ३०-४० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा.

तेल लावण्याचे फायदे

आवळ्याचे तेल कॅल्शियम, व्हिटॉमिन सी, आयर्न आणि फॉस्फोरस याने युक्त असते. त्यामुळे केस आणि स्कॉल्प हेल्दी राहण्यास मदत होते.

याशिवाय केस पांढरे होण्यास आळा बसतो.

केस मजबूत व दाट होतात.

केस वाढण्यास मदत होते.

केस मऊ मुलायम होतात.

गरोदरपणाचा काळ संपल्यानंतर पोटावर स्ट्रेचमार्क येतात. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर काही दिवसातच जेव्हा तुमचं पुन्हा रूटिन सुरू होतं तेव्हा स्ट्रेचमार्कमुळे काही कपडे घालण्यावर बंधनं येतात. क्रॉप टॉप, लो वेस्ट जीन्स घालताना स्ट्रेचमार्क दिसू नयेत म्हणून प्रयत्न सुरू होतात. अशावेळेस स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरणार आहेत. सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य !

अंड्यांचा पांढरा बल्क -
स्ट्रेच मार्क्सच्या भागाला नीट स्वच्छ करा. त्यावर अंड्याचा पांढरा भाग लावा. हे सुकल्यानंतर पुन्हा थंड पाण्याने पोटाजवळचा भाग स्वच्छ करा. त्यानंतर ऑलिव्ह ऑईलचा मसाज करा.

बटाटा -
बटाट्याचा रस काढा. हा रस स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर लावा. तीन आठवडे हा उपाय नियमित करा. हळूहळू स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल.


कोरफड -
स्ट्रेचमार्क्सवर कोरफडीचा गर नियमित लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने सारा भाग स्वच्छ करा. सलग काही आठवडे हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास दूर होईल.

तेलाचा मसाज -
तेलाचा मसाज नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल. याकरिता नारळ, बदाम, ऑलिव्ह ऑईलचा मसाज करणं फायदेशीर ठरत.

कॉफी आणि कोरफड पॅक -
कॉफी आणि कोरफडीचा गर एकत्र मिसळा. हा पॅक स्ट्रेच मार्कवर लावा. 15-20 मिनिटांनी हा पॅक पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर मॉईश्चरायझर क्रिम लावा. महिनाभार हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सच्या त्रासातून तुमची सुटका होऊ शकते.

मुली त्यांच्या फीटनेसची जितकी काळजी घेतात त्यापेक्षा थोडी जास्त किंबहुना थोडी अधिकच त्यांच्या त्वचेची काळजी घेतात. त्वचेवर पिंपल्स, टॅनिंग कमी, निस्तेजपणा कमी करण्यासाठी मुली सतत प्रयत्न करतात. ब्युटी पार्लरप्रमाणेच काही घरगुती उपायांच्या मदतीनेदेखील त्वचेचं सौंदर्य खुलवता येतं. त्वचेवरील समस्या कमी करण्यासाठी मुलतानी माती फायदेशीर ठरते. मग मुलतानी मातीमध्ये नेमके काय मिसळल्यास ते अधिक फायदेशीर ठरतात हे तुम्हांला ठाऊक आहे का?

फेसपॅक ठरतात फायदेशीर

मुलतानी मातीमध्ये बेसन आणि चंदनाची पावडर मिसळणं फायदेशीर ठरतं. हे तिन्ही पदार्थ चमचाभर घेऊन एकत्र करून मिश्रण बनवा. यामध्ये गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. हा फेसपॅक चेहर्‍यावर लावून नैसर्गिक रित्या सुकू द्यावा.

हा फेसपॅक लावण्यापूर्वीदेखील त्वचेवर गुलाबपाणी कापसाच्या बोळ्याने लावा.

फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवावा.

आठवड्यातून हा फेसपॅक दोनदा चेहर्‍यावर लावणं फायदेशीर आहे.

नियमित या फेसपॅकचा वापर केल्याने त्वचा सतेज आणि मुलायम होण्यास मदत होते.

वातावरणामध्ये बदल झाला की लगेच आजारपण डोकं वर काढतात. अशातच रोगप्रतिकारक्षमता कमजोर असलेल्यांमध्ये व्हायरल फिव्हर जडण्याचं प्रमाण वाढतं. व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्यासाठी अनेक अ‍ॅन्टीबायोटिक्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्याचा दुष्परिणाम आरोग्याला त्रासदायक ठरू शकतो. व्हायरल इंफेक्शनपासून बचावण्यासाठी प्रत्येक वेळेस औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. काही घरगुती उपायांच्या मदतीनेदेखील व्हायरल इंफेक्शनचा सामना करता येऊ शकतो.

घरगुती आणि सुरक्षित उपाय -
आलं -
व्हायरल फिव्हरचा सामना करताना आल्यासोबत, हळद, काळामिरी आणि साखर मिसळून त्याचा काढा बनवा. दिवसातून तीन-चार वेळेस हा काढा प्यायल्यास ताप कमी होण्यास मदत होईल.

धने -
ग्लासभर पाण्यामध्ये चमचाभर धने टाकून पाणी उकळा. त्यानंतर पाणी गाळा. गरजेनुसार त्यामध्ये साखर/ गूळ किंवा मध मिसळून काढा बनव. चहाच्या स्वरूपात प्यायचा असल्यास त्यामध्ये दूध मिसळा. यामुळे व्हायरल फिव्हरचा सामना करण्यास मदत होते.


तुळस -
मूठभर तुळशीच्या पानांसोबत चमचाभर लवंगाची पावडर मिसळा. एक लीटर पाण्यामध्ये हे मिश्रण उकळा. काढ्याचा अर्क झाल्यानंतर दर 2 तासांनी गरजेनुसार प्यायल्यास त्याचा फायदा होतो.

मेथी -
रात्री चमचाभर मेथीचे दाणे भिजत ठेवा. सकाळी मेथीच्या दाण्यांमध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळा. या मिश्रणामुळे व्हायरल इंफेक्शनचा सामना करण्यास शरीर सक्षम होते.

तांदूळ -
एक भाग तांदूळ आणि निम्मा भाग पाणी मिसळून वाफवा. तांदूळ अर्धा शिजल्यानंतर पाणी काढा. या पाण्यामध्ये मीठ मिसळा. कांजी म्हणजेच पेजेचं पाणी असेही याला म्हणतात. व्हायरल इंफेक्शनचा सामना करण्यासाठी हे फायदेशीर आहे.

लसूण -
लसूण सोलून त्यामध्ये मध मिसळा. हे मिश्रण खाल्ल्याने इंफेक्शन कमी होण्यास मदत होते.

मनुका -
रात्रभर मनुका पाण्यात भिजत ठेवा. भिजलेल्या मनुका सकाळी खाल्ल्याने व्हायरल इंफेक्शनचा त्रास कमी होतो.

अनेकदा वातावरण, हंगाम बदलल्याने काही लोकांच्या हाताची त्वचा निघू लागते. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास ही समस्या गंभीर रुप धारण करु शकते. हाताची त्वचा निघाल्याने काही वेदना होत नाहीत पण काम करताना थोडा त्रास होतो. पण काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. पाहुया कोणते आहेत ते घरगुती उपाय...

गरम पाणी
रोज १० मिनिटे हात गरम पाण्यात बुडवून ठेवा. या गरम पाण्यात तुम्ही मध आणि लिंबू देखील घालू शकता. त्यामुळे हाताची त्वचा नरम होईल आणि त्वचा शुष्क होणे बंद होईल.

व्हिटॉमिन ई युक्त तेल
स्किन पीलिंगपासून सुटका मिळवण्यासाठी व्हिटॉमिन ई युक्त तेल उपयुक्त ठरते. म्हणून रोज या तेलाने हातांना मालिश करा. आराम मिळेल.


ओट्स
एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ओट्स भिजत घाला. काही वेळानंतर ओट्स नरम पडतील. तेव्हा त्यात १०-१५ मिनिटे हात बुडवून ठेवा. त्यानंतर हात पाण्याने स्वच्छ करा आणि त्यावर मॉश्चराईजर लावा.

कोरफड जेल
रोज झोपण्यापूर्वी हातांना कोरफड जेलने मालिश करा. सकाळी उठल्यावर हात कोमट पाण्याने धुवा आणि मग त्यावर मॉश्चराईजर लावा.

Dr. Rohit Patil
Dr. Rohit Patil
MDS, Dentist Implantologist, 5 yrs, Pune
Dr. Suchita Tupdauru
Dr. Suchita Tupdauru
BSMS, Homeopath, 18 yrs, Pune
Dr. Sachin Patil
Dr. Sachin Patil
BHMS, Family Physician Homeopath, 11 yrs, Pune
Dr. Pramod Bhimrao Patil
Dr. Pramod Bhimrao Patil
BAMS, 10 yrs, Pune
Dr. Varun kumar  PT
Dr. Varun kumar PT
BPTh, Homecare Physiotherapist Physiotherapist, 10 yrs, Pune
Hellodox
x