Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. या वातावरणात इतर समस्यांपेक्षा सर्वात जास्त त्रास होणारी समस्या म्हणजे, खोकला. परंतु, प्रत्येकवेळी खोकल्यासाठी औषधं घेणं फायदेशीर ठरेल असं नाही. जर तुम्हालाही खोकला झाला असेल तर कोणत्याही औषधाआधी काही घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरतं.

आल्याचा चहा

आल्याचा चहा खोकला दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला खोकला असेल तर दररोजच्या चहामध्ये आल्याचा एक तुकडा एकत्र करा. आलं इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतो. तसेच गरम चहा घशाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.

गरम पाण्याने गुळण्या करा

अनेकदा खोकला झाल्यावर घशामध्ये कफ जमा होतो. यावर सर्वात योग्य उपाय म्हणजे, गरम पाण्यामध्ये मीठ घालून त्याच्या गुळण्या करणं. गुळण्या केल्यामुळे घशातील सर्व कफ दूर होण्यास मदत होते.

वाफ घ्या

खोकला आणि सर्दी या दोन्ही परिस्थितीमध्ये श्वास नलिकेमध्ये कफ जमा होतो. ज्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो. कफ दूर करण्याची सर्वात उत्तम पद्धत म्हणजे, वाफ घेणं. ही पद्धत खोकला आणि घशात होणारी खवखव दूर करण्यासाठी मदत करते. तुम्ही वाफ घेण्यासाठी स्टिमरची मदत घेऊ शकता.

आल्याचा रस आणि मध

आल्याच्या रसामध्ये मध एकत्र करा आणि तयार मिश्रण दिवसातून दोन वेळा एक-एक चमचा घ्या. आराम मिळेल. आलं शरीराला इन्फेक्शनपासून लढण्यासाठी शक्ती देतं. तसेच घशाच्या समस्या दूर करण्यासाठीही मध अत्यंत लाभदायक ठरतं. त्यामुळे या दोन्ही पदार्थांच मिश्रण खोकला दूर करण्यासाठी मदत करतं.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती असून आम्ही ते केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

स्ट्रेच मार्क्स हे शरीरासाठी हानिकारक नसतात. मात्र शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालायला मिळत नाहीत, अशी अनेकांची प्रामुख्याने तक्रार असते. गर्भावस्थेनंतर महिलांना स्ट्रेच मार्क्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. पोट, पाठ, छाती आणि हातांवर स्ट्रेच मार्क येतात. अचानक वजन वाढल्यामुळे आणि कमी झाल्याने तसेच टीनएजर्समध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजेंसमुळेदेखील स्ट्रेच मार्क्स येतात. महिला आणि तरूणींना तर हमखास स्ट्रेच मार्क्सच्या समस्यांना सामोरे जावे .

स्ट्रेच मार्क्ससाठी अनेक उपचार आहेत, मात्र ते पूर्णतः गायब होत नाहीत. लेझर ट्रिटमेंटसोबत ट्रेटिनोईन आधारित क्रीम, जेल आणि लोशनच्या मदतीनं स्ट्रेच मार्क कमी होण्यास मदत मिळू शकते. स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत, यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. वजन नियंत्रणात राहील अशा जीवनशैलीचे अनुसरण करावे. गर्भवती महिलांनी अधिकाअधिक पाणी प्यावे. नियमित व्यायाम करावा. तेलकट त्वचेऐवजी कोरड्या त्वचेवर लवकर स्ट्रेच मार्कची समस्या निर्माण होते. आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानुसार डाएट फॉलो करावा.


व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई ला ब्यूटी व्हिटॅमिन असं देखील म्हटलं जातं. डॅमेज स्किन सेल्स रिपेअर करून स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई फायदेशीर ठरतं. त्यामुळे आपल्या आहारामध्ये बदाम पालक यांचा समावेश करा कारण यामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण हे अधिक असते.

व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन ए शरीरासाठी फायदेशीर असल्याने आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए चा समावेश करा. गाजर, फिशमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण हे अधिक असते.

व्हिटॅमिन सी

स्ट्रेच मार्क्सच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर आहारात व्हिटॅमिन सी चा समावेश नक्की करा. लिंबू, आवळा, संत्र, द्राक्ष खा.

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के बाबत फार कमी लोकांना माहीत आहे. मात्र त्याचा देखील आहारात समावेश करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन के हे स्ट्रेच मार्क्स हटवण्यासोबतच डार्क सर्कल्सही दूर करतात.

नियमितपणे व्यायाम केल्याने शरीरासंदर्भातील अनेक तक्रारी दूर होतात. लठ्ठपणामुळे देखील स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवते. त्यामुळे व्यायाम केल्याने लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येते आणि स्ट्रेच मार्क्सवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

वजन कमी करायचं असेल तर लोकांना जिम जाण्याचा सल्ला दिला जातो. वेट लॉस वर्कआउटची अशात सतत चर्चा सुरू असते. मात्र जिमला न जाताही तुम्ही वजन कमी करू शकता. जिममध्ये तासंतास वर्कआउटचा फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज योग्यप्रकारे करतो. तुम्ही घरीच वजन कमी करण्यासाठीची एक्सरसाइज करू शकता. अशात काही डाएट टिप्सही फॉलो कराल तर फायदा लवकर बघायला मिळेल.

जेव्हा तुम्ही कधी एखाद्या डाएट एक्सपर्टसोबत बोलता तेव्हा ते तुम्हाला हेच सांगतात की, केवळ डाएट बदलून फायदा होणार नाही. डाएटसोबतच तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइलमध्येही बदल करावा लागेल. जर तुम्ही लाइफस्टाईलमध्ये काहीच बदल करणार नाही तर तुम्हाला काही फायदाही होणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

घरीच करा एक्सरसाइज

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिमला जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरीच एक्सरसाइज केली पाहिजे. घरी एक्सरसाइज करताना तुम्हाला जिममधील कोणत्या उपकरणांची देखील गरज नसते. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, काही हलक्या आणि सोप्या एक्सरसाइज करूनही तुम्ही वजन कमी करू शकता. तुम्हाला घरीच एक्सरसाइज करायची असेल तर HIIT एक्सरसाइजबाबत जाणून घेतलं पाहिजे. याने तुम्हाला बराच फायदा होईल.

झोपेची वेळ निश्चित करा

जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या झोपेची वेळ निश्चित करायला पाहिजे. कारण वेळेवर न झोपण्याच्या कारणामुळे शरीराचं मेटाबॉलिज्म प्रभावित होतं. खराब मेटाबॉलिज्म रेटमुळे लठ्ठपणा वाढतो. जेव्हा तुम्ही वेळेवर झोपता तेव्हा तुमची पचनक्रिया चांगली होते. याने तुम्हाला लठ्ठपणा दूर करण्यास मदत मिळेल.

वजन कमी करण्यासाठी पाणी किती प्यावे?

जर तुम्ही वजन करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं. काही लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यायला हवं? पण असं सांगणं चुकीचं ठरेल. कारण प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. मात्र, सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी थोड्या थोड्या वेळाने पित रहावे. पाणी पिताना याची काळजी घ्या की, एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नये.

गरम पाणी आणि लिंबू

जर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार झाले असाल तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही सकाळी गरम पाण्यात लिंबाचा रस मिश्रित करून सेवन करावं. तसा तर हा सर्वात प्रसिद्ध घरगुती उपाय आहे. गरम पाण्यासोबत लिंबाचा रस सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली होते. सोबतच आतड्यांची सूजही कमी होते. जर तुमच्या पोटाचा घेर अधिक वाढला असेल याने तुम्हाला कमी करण्यास फायदा होईल.

वजन कमी करण्यासाठी चॉकलेट डाएट

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट खायला पाहिजे. याचा अर्थ हा नाही की, एकाच दिवशी खूपसारे चॉकलेट खावेत. रोज डार्क चॉकलेटचा एक तुकडा खावा. यानेही फायदा होईल.

ग्रीन टी

अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, ग्रीन टीमुळे वजन कमी करण्यास मिळते. जे लोक वजन कमी करण्याचा प्रक्रियेत असतात. रोज कमीत कमी २ कप ग्रीन टी सेवन करावी. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचा पदार्थ असतो, ज्याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत मिळते.

(टिप : वरील लेखात सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यातील कोणत्याही उपायाचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

साधारणतः आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात मेथीचा वापर करण्यात येतोच. फक्त पाल्याभाज्यांमध्ये समावेश होणाऱ्या मेथीच्या पालेभाजीचाच नाही तर मेथीच्या दाण्यांचाही अनेक पदार्थांमध्ये समावेश करण्यात येतो. मेथीच्या भाजीचे आणि मेथीच्या दाण्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मेथीच्या दाण्यांचा कढी आणि सांबार यांसारख्या पदार्थांमध्ये फोडणी देण्यासाठी वापर करतात. मेथी फक्त पदार्थांची चव वाढविण्यासाठी नाही तर ब्लड शुगर आणि बीपी यांसारख्या आजारांवरही परिणामकारक ठरते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? मेथी वजन कमी करण्यासाठीही गुणकारी ठरते.

मेथी ठरते फायदेशीर
जर तुम्ही वाढणाऱ्या वजनामुळे त्रस्त असाल आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मेथी तुमची मदत करेल. फक्त तुम्हाला मेथीचा योग्य वापर करता आला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी मेथीचा कसा वापर करावा त्याबाबत जाणून घेऊया...

भाजून वाटलेले मेथीचे दाणे
वजन कमी करण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे एका पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्यावे. त्यानंतर ते वाटून त्याची पावडर तयार करावी. दररोज सकाळी एक चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्यावी.

मेथीचं पाणी
मेथीच्या दाण्यांच पाणीही वजन कमी करण्यासाठी मदत करतं. रात्री दोन चमचे मेथी एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावी. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावं. दररोज असं केल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. दरम्यान मेथीचं पाणी प्यायल्याने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंगपासून दूर रहाता.

मेथी स्प्राउट्स
मेथीचे दाणे तुम्ही स्प्राउट्स म्हणूनही खाऊ शकता. परंतु लक्षात ठेवा की, दाण्यांना पूर्णपणे मोड आलेले असावेत. मेथी स्प्राउट्समध्ये मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी, ई, बी याव्यतिरिक्त कॅल्शिअम, झिंक आणि कॅरोटिन असतं. सकाळी रिकाम्यापोटी मोड आलेले मेथीचे दाणे खाल्याने अनेक तासांपर्यंत पोट भरल्याप्रमाणे वाटते.

मेथीचा चहा
मेथीचा चहा वजन कमी करण्यासाठी मदत करतो. आतापर्यंत तुम्ही मिल्क टी किंवा ग्रीन टी ट्राय केला असेल. परंतु आता वेट लॉस करण्यासाठी मेथीचा चहा ट्राय करा. हा वजन कमी करण्यासाठी मदत करण्यासोबतच डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतं. तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हा चहा मदत करतो.

होळी म्हटलं की रंग हे आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र हे रंग बऱ्याचदा तुमच्या त्वचेचं, केसांचं नुकसान करू शकतात. तुम्ही अगदी ऑरगॅनिक रंग वापरत असलात तरी सूर्यप्रकाशात आणि रंगांच्या पाण्यात तुमचा बराच वेळ जाणार आहे. पण, काळजी करू नका. अशा काही टिप्स आहेत, ज्यामुळे होळीची धमाल केल्यानंतरही तुमच्या त्वचेचा तजेला कायम राहील.

एसपीएफ: एसपीएफ किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या लोशनचे संरक्षण तुमच्या त्वचेला द्या. त्यामुळे त्वचा मॉईश्चराइज होईल आणि सूर्याच्या प्रखर किरणांपासून तिचे संरक्षण होईल. रंग, धूळ आणि उष्णतेचा सामना तुमच्या त्वचेला करावा लागणार आहे. त्यामुळे, यापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. चेहरा, मान, हात आणि रंग लागेल अशा शरीराच्या अन्य सर्व भागांना नीट लोशन लावा.

नारळाचे तेल: नारळाच्या तेलामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि रंग त्वचेत कमी प्रमाणात झिपरतात. शिवाय, त्वचा आणि केसांवर संरक्षक कवच असल्यास रंग धुवून काढणेही सोपे होते. त्वचेला अधिक मॉइश्चराइज करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून लावू शकता.

लिप बाम: ओठांच्या भेगांमध्ये रंग अगदी सहज जातात. चांगल्या दर्जाच्या लिप बामचे ४ ते ५ कोट्स लावून ओठांना नीट घासून घ्या आणि ओठ मऊ व मॉइश्चराइज्ड राहतील, याची काळजी घ्या.

हँड क्रीम: होळीमध्ये सर्वाधिक दुर्लक्ष होतं ते हातांची काळजी घेण्याकडे. नखांमध्ये रंग चटकन अडकून बसतात आणि ते काढणं अगदी अशक्य होऊन जातं. नखांमध्ये रंग अडकू नयेत आणि क्युटिकल्सचे नुकसान होऊ नये यासाठी भरपूर हँड क्रीम लावा. नखं लहानच ठेवा. शिवाय, होळीच्या आधी अॅक्रॅलिक किंवा जेल नेल्सचा वापर टाळा.

शॉवर जेल: शरीरावर लागलेले रंग धुवून काढण्यासाठी कोणत्याही तीव्र साबणाऐवजी नैसर्गिक शॉवर जेलचा वापर करा. अंग घासण्याचा स्पंज किंवा इतर साधनांचा वापर करतानाही जरा जपून.

शॅम्पू: केसांना पूर्णपणे वाचवणे अशक्य आहे. पण, हा त्रास कमी करता येईल. त्यासाठी सौम्य कडिंशनिंग असणारा माइल्ड स्वरुपातील शॅम्पू वापरून केसांमधील मॉइश्चर संरक्षित ठेवा. सारखे केस धुवू नका. त्याऐवजी, केस धुण्यामध्ये काही काळाचे अंतर ठेवा. त्यामुळे, त्वचेतून निर्माण होणारे नैसर्गिक तेल धुवून जाणार नाही आणि केस कोरडे होणार नाहीत.

फेस स्क्रब: मृत त्वचा काढून टाकणे आणि बंद झालेली छिद्रे मोकळी करण्यासाठी होळीनंतर दुसऱ्या दिवशी फेस स्क्रब वापरा. चेहऱ्यावर हळुवारपणे गोलाकार लावा. शरीराच्या इतर भागांवरही स्क्रबचा वापर करता येईल. कोमट पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर त्वचा कोरडी पडू नये यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा.

फेस मास्क: होळीमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि इतर घटकांचा तुमच्या त्वचेशी संपर्क होतो. त्यामुळे, त्वचेला आराम देण्यासाठी तुम्ही हर्बल फेस पॅक वापरू शकता. त्वचेवर हळुवार मालिश करा आणि मास्क १० ते १५ मिनिटं राहू द्या. मास्कमुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल, कमी झालेले माइश्चरायझर पुन्हा निर्माण होईल आणि त्वचेची स्वच्छता होईल. एक-दोन वेळ मास्क लावल्यास त्वचा पुन्हा पुर्ववत होत असल्याचे तुम्हाला जाणवेल.

Dr. Nandita Bhati
Dr. Nandita Bhati
BDS, Dentist Implantologist, 14 yrs, Pune
Dr. Ajaykumar Kumawat
Dr. Ajaykumar Kumawat
BHMS, Family Physician, 14 yrs, Pune
Dr. Mayur Patil
Dr. Mayur Patil
BHMS, Family Physician General Physician, 5 yrs, Pune
Dr. Deodutta Kamble
Dr. Deodutta Kamble
BDS, Dental Surgeon Dentist, 22 yrs, Pune
Dr. Manohar Wani
Dr. Manohar Wani
MBBS, General Physician, 44 yrs, Pune
Hellodox
x