Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

ऋतू बदलतोय. जूनच्या पहिल्या आठवड्यात नेहमी असं भरून आल्यासारखं, रिझल्टची धाकधूक असल्यासारखं, टेन्शन आल्यासारखं वाटतं. उकाडाही असतो आणि मळभ दाटून येऊन पाऊस कधीही येईल याची एक आसवजा धास्तीही असते. म्हणून याकाळात मंद, उदास वातावरण असतं. मळभ येतं. एकदम उदास वाटतं. आळसही येतो. अनेकदा एकदम डिप्रेस वाटून रडू येऊ शकतं. ही सगळी वातावरणाची कृपा आहे असं मानलं तरी, अशी काही लक्षणं असतील तर किंवा दरवर्षी हवा बदलली की आपल्याला हमखास सर्दीखोकला होत असेल तर आपल्या आहाराविहारात काही बदल करायला हवेत. पूर्वीच्या काळी रीतिभातीतून ऋतूप्रमाणे आहारबदल होत असे. आता आपण त्या साऱ्याकडे जुनाट म्हणून लक्ष देत नाही आणि आहारात योग्य बदल न केल्यानं ऋतूबदल त्रास देऊ शकतो.
त्यावर उपाय काय?
उपाय म्हणून आपण काही गोष्टी करू शकतो.

१) व्हिटॅमिन डी
आपल्याकडे उदंड सूर्यप्रकाश असूनही अनेक स्त्री-पुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. स्त्रियांमध्ये तर जास्तच. त्यावर उपाय काय? खरं तर रोज सकाळी १० मिनिटं तरी किमान कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला हवा. उन्हात जायला हवं. त्यामुळे सूर्योदयानंतर लगेच काही काळ उन्हात फिरून या, खुर्ची टाकून बसा. त्यानं डी जीवनसत्त्व तर मिळेलच. फ्रेश वाटेल. हे जीवनसत्त्व फारच कमी असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्या.

२) प्रो बायोटिक
फार मोठा वाटतो हा शब्द. त्या साठीची औषधंही बाजारात ढिगानं मिळतात. म्हणजे काय तर आपल्या पोटात पचनाला मदत करणाºया हेल्दी बॅक्टेरियांची आतड्यांना मदत होणं. ते आतड्यात असणं. त्यासाठीची औषधं घेण्यापेक्षा आहारात दह्या-ताकाचा वापर करावा. शक्यतो दही सकाळच्या जेवणात, नास्तयात घ्यावं. त्यानं पचनशक्ती चांगली राहते.

३) झिंक
झिंक सप्लिमेण्ट प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करते. घरचा गुळाचा शिरा, साधा शिरा, पौष्टिक सुकामेवा, मनुका यातून हे मिळू शकतं. पण इन्फेक्शन सतत होत असतील तर डॉक्टरच्या सल्ल्यानं झिंक सप्लिमेण्टची औषधं घेऊ शकतात.

४) आयर्न
लोह. रक्तवाढीसाठी आवश्यक. नाचणीचं पीठ, गुळाचा शिरा, बीट, राजगीरा लाडू असं खरं तर या काळात खायला हवं. आणि शक्यतोवर लोखंडी कढईतच भाज्या करायला हव्या. त्यातून लोह पोटात जातं. आपलं हिमोग्लोबिन तपासून घ्यावं. ते फारच कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.

५) नास्ता
हा सगळ्यात सोपा उपाय. या काळात आणि पुढे पावसाळ्यातही भरपेट नास्ता चुकवायचा नाही. गरमागरम, घरचं, पोळीभाजी, पोहेसांजा, असं खाल्लेलं उत्तम. शक्यतो आंबवलेले पदार्थ टाळावेत. सकाळी पोटभर नास्ता केला तर त्यानं आपली एनर्जी लेव्हल चांगली राहते, मूडही चांगला राहतो दिवसभर. याकाळात अ‍ॅडमिशनची धावपळ असते तेव्हा घरातून निघतानाच भरपेट नास्ता आणि सोबत घरचा जेवणाचा डबा असणं उत्तम. एवढं केलं तरी आपण पावसाच्या स्वागताला सज्ज होतो.

भारतामध्ये स्त्रिया त्यांच्या आरोग्याबाबत फारशा जागृत नाहीत. त्यामुळेच कॅन्सरसारखे अनेक गंभीर आजार अंतिम टप्प्यावर आल्यानंतर समजतात. अशापैकी एक म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर. एकूण सर्व्हायकल कॅन्सरच्या रूग्णांपैकी एक चतुर्थांश रूग्ण केवळ भारतामध्ये आढळतात. म्हणूनच या आजाराबाबत समाजात जनजागृती आणि स्त्री आरोग्याकडे प्रामुख्याने पाहण्याची गरज वाढली आहे.

भारतात गोळा केले जातात सॅनिटरी पॅड्स

भारतीय समाजात अजूनही मासिकपाळी या विषयाबाबत फार खुलेपणाने बोलले जात नाही. परिणामी अनेक तरूण मुली आणि स्त्रियांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ग्रामीण भागात वैद्यकीय सोयींचा अभाव आणि मासिकपाळीदरम्यान कापड वापरण्याची पद्धत असल्याने अशा भागामध्ये स्त्रीया सर्व्हायकल कॅन्सरबाबत चाचणी करायला लाजतात. परिणामी अनेक स्त्रियांना वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे.

कशी केली जाते चाचणी

स्त्रिया सर्व्हायकल कॅन्सर संबंधी चाचणी करायला लाजत किंवा टाळत असल्याने आता वैद्यकीय सेवा त्यांच्यापर्यंत पोहचवून या गंभीर आजाराचा धोका ओळखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिता महिलांनी मासिकपाळी दरम्यान वापरलेली कापडं प्लॅस्टिक बॅगेमध्ये बंद करून आरोग्यसेविकांमार्फत डॉक्टरांच्या हवाली केले जातात. त्यानंतर ही कापडं -20 सेल्सियसमध्ये साठवली जातात. पॅड्समधून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) ओळखता येतो. हा व्हायरस सर्व्हायकल कॅन्सरला कारणीभूत ठरतो. ग्रामीण भागात अशाप्रकारे कॅन्सरचा धोका ओळखणं सोयीस्कर आहे.

सोयी सुविधांचा अभाव

महिलांमध्ये जननेंद्रिय स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा ग्रामीण भागात नाहीत. परिणामी मासिकपाळीच्या दिवसात त्यांना पुरेसा आराम, स्वच्छ स्वच्छतागृह आणि स्वच्छ पॅड्स/ कापडं न मिळाल्याने त्रास अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

काय आहेत सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं

अनियमित मासिकपाळी ,

सतत होणारी पाठदुखी आणि ओटीपोटीच्या भागाजवळ होणार्‍या वेदना हे सर्व्हायकल कॅन्सरचे सुरवातीच्या टप्प्यातील लक्षण आहे.

मलविसर्जनातून रक्त जाणे.

थकवा जाणवणे - मासिकपाळी दरम्यान रक्त गेल्याने कमजोर वाटणे किंवा सतत थकवा जाणवणे हे सर्व्हायकल कॅन्सरचे लक्षण आहे. त्यामुळे 'त्या' दिवसां व्यतिरिक्तदेखील तुम्हांला कमजोर वाटत असेल तर सर्व्हायकल कॅन्सरची चाचणी करा.

एकाच पायाला येणारी सूज हे सर्व्हायल कॅन्सरमधील एक महत्त्वाचे लक्षण आहे. त्यामुळे वारंवार आणि अचानक पायावर येणार्‍या सूजेकडे दूर्लक्ष करू नका.
मोनोपॉजच्या टप्प्यानंतरही योनीमार्गातून रक्त जात असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सर्व्हायकल कॅन्सरची शक्यता दूर करा.

HPV व्हायरसचा संसर्ग झाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी भूकही मंदावते.

वारंवार आणि अत्यंत वेदनादायी पोटदुखी हे सर्व्हायकल कॅन्सर अंतिम टप्प्यात असल्याचे एक लक्षण आहे.

आजकाल सार्‍यांचेच आयुष्य धावपळीचे झाले आहे. त्यामुळे मुलांपासून घरात ऑफिसला जाणार्‍यांच्या डब्ब्याची सकाळी घाई नको म्हणून अनेक गृहिणी रात्रीच तयारी करतात. रात्रीच्या वेळेस तुम्ही भाजी कापून ठेवणं ठीक आहे. मात्र चपात्या किंवा पोळ्याचं कणीकही भिजवून ठेवणं आरोग्याला त्रासदायक आहे. या वस्तू फ्रीजमध्ये साठवण्याची चूक कधीच करू नका !

काय आहे वैज्ञानिकांचे मत ?

संशोधकाच्या दाव्यानुसार कणकेचं पीठ भिजवल्यानंतर त्याचा ताबडतोब आहारात समावेश करावा. मळलेलं पीठ साठवून ठेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मळलेलं पीठ साठवून ठेवल्याने त्यामध्ये रासायनिक बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीठ खराब होण्यास सुरूवात होते. अशा साठवलेल्या पीठाच्या पोळ्या खाणं आरोग्याला त्रासदायाक आहे.

समज - गैरसमज

शिळ्या अन्नाबाबत आपल्या समाजात, संस्कृतीमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. मळलेलं पीठ फ्रीजमध्ये साठवणं हे पिंडाप्रमाणे असते. याचे भक्षण करण्यासाठी घरात भूत -प्रेतांचा प्रवेश होतो असे मानूनदेखील अनेकजण कणकेचं पीठ साठवणं टाळतात.


शिळ्या किंवा साठवलेल्या पीठाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
फ्रीजमध्ये साठवलेल्या पीठापासून पोळ्या केल्यास त्यामुळे पोटात गॅस होणं, पचन प्रक्रियेमध्ये बिघाड होणं, बद्धकोष्ठतेचा त्रास वाढण्याची शक्यता असते.

घरी जेवण्याचा मूड नसला, सुट्टी असली किंवा मुलांनी हठ्ठ केला की आपण लगेच पिझ्झा ऑर्डर करतो. आणि अर्ध्या तासात घरी येणारा पिझ्झा खूप चव घेऊन खातो परंतू जंक फूड म्हणून पिझ्झा धोकादायक असला तरी त्याहून धोकादायक पिझ्झा बॉक्स आहे हे जाणून आश्चर्य वाटत असलं तरी हे विचार करण्यासारखे आहे.

पिझ्झा बॉक्स कागदाने तयार केलेला असतो हा विचार करून त्याने आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकत नाही अशी आमची समजूत असते. परंतू काय आपल्याला माहीत आहे की हा बॉक्स अनेक प्रकाराच्या मटेरिअल आणि केमिकलने तयार केलेला असतो.

धोकादायक रिसाइकल्ड मटेरिअल ने तयार केलेल्या या बॉक्समध्ये गोंद, हाइज आणि विषारी शाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पिझ्झा गरम राहावा म्हणून वापरलं जातं आणि गरम पिझ्झ्यासोबत हे केमिकलही आमच्या पोटात जातात.

पिझ्झा बॉक्समध्ये ऑइल, चीज किंवा फॅट्स शोषले जाऊ नाही म्हणून एका प्रकाराची कोटिंग केली जाते. या कोटिंगमुळे ही कर्करोग होण्याची शक्यता असते. यात डीआयबीपी अर्थात डायिसोबायटील फेथलेट नावाचे केमिकल आढळतं ज्याने प्रजनन विकासावर विपरित परिणाम टाकतं. हे शरीरात एन्डोक्रायनाइनला नुकसान पोहचवतं.

विशेषज्ञांप्रमाणे या बॉक्स तयार करताना वापरण्यात येणार्‍या वस्तूंमध्ये परफ्लूरोकाइलिल एथिल आढळतं जे शरीरात अनेक वर्ष राहतं आणि यामुळे कर्करोग साखरे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गरम पिझ्झा खाण्याचा शौक आम्हालाच महागात पडू शकतो कारण अधिक वेळ पिझ्झा गरम राहावा यासाठी डिलेव्हरीपूर्वी त्याला 60 ते 65 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केलं जातं. गरम पॅकेजिंगमुळे यात केमिकल मिसळतात आणि पिझ्झा विषारी होऊन जातं.

बर्‍याच वेळा अस होत की जास्त केमिकल आणि शॅम्पूचा वापर केल्याने केसांचे बरेच आजार होण्याची शक्यता असते. जास्तकरून महिलांचे कोरडे केस, कोंडा आणि
केसांची ग्रोथ थांबल्या सारखे वाटते. महागडे केमिकल युक्‍त हेयर प्रॉडक्ट सोडून तुम्ही नॅचरल उपायांच्या मदतीने केसांच्या सर्व समस्येला दूर करू शकता. बटाटा एक अशी वस्तू आहे ज्याचे सेवन केल्याने तुम्ही केसांच्या सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता.

तुम्ही बटाट्यात मध, दही आणि लिंबाचा रस मिसळून तुमच्या केसांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.

1. दाट आणि सॉफ्ट केसांसाठी

दोन ते तीन बटाटे घ्या, याला सोलून याचे पेस्ट तयार करा. यानंतर या पेस्टमध्ये अंड्याचा पिवळा भाग आणि मध मिसळा. त्यानंतर या पेस्टला केसांवर लावा. याला काही वेळ वाळू द्या. जेव्हा हा पॅक वाळून जाईल तेव्हा चांगल्या माइल्ड शँपूने केस धुऊन घ्या. दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने तुम्हाला केसांमध्ये फरक दिसू लागेल.

2. लांब केसांसाठी

दोन बटाटे घ्या आणि याचा रस काढा. यात दोन चमचे एलोवेरा जेल मिसळा. या मिश्रणाला केसांच्या मुळांना लावा. याला 30 ते 40 मिनिटापर्यंत केसांमध्ये राहू द्या. यानंतर पाण्याने केस धुऊन घ्या. लगेचच शँपू लावायची गरज नसते.

3. कोंडा असलेल्या केसांसाठी

एक किंवा दोन बटाटे घेऊन त्यांचा रस काढून घ्या. या रसात लिंबू आणि दही मिसळून त्या पेस्टला केसांना लावून थोड्यावेळेसाठी राहू द्या. नंतर एखाद्या चांगल्या शँपूने केस धुऊन घ्या.

Dr. Aakash Bora
Dr. Aakash Bora
BHMS, Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Dinkar Padade
Dr. Dinkar Padade
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 30 yrs, Pune
Dr. Gauri Karve
Dr. Gauri Karve
MBBS, 6 yrs, Pune
Dr. Jyoti Sharma
Dr. Jyoti Sharma
BHMS, Homeopath, 5 yrs, Pune
Dr. D. Malekar
Dr. D. Malekar
MBBS, Family Physician, 21 yrs, Pune
Hellodox
x