Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

झोप ही गोष्ट प्रत्येकालाच अत्यंत प्रिय असते. त्यामुळेच मग सुट्टीच्या दिवशी अगदी तासन्‌ तास अंथरुणात लोळत राहणे अनेकांची सवय असते. मात्र तुम्हाला हे माहितीय का? की, शनिवार, रविवार म्हणजेच आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी भरपूर झोपल्यामुळे आपलं आयुष्य वाढण्यास मदत होते. झोप या विषयावर संशोधन करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय टीमच्या जर्नल ऑफ स्लीप रिसर्चमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अनेकदा कामाच्या धावपळीत आठवड्याभरात झोप पूर्ण होत नाही आणि त्याचाच परिणाम हा आरोग्यावर होत असतो. झोपेवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, जे लोक दररोज सहा किंवा सात तास झोपतात त्यांच्या तुलनेत पाच किंवा त्यापेक्षा कमीतास झोपणार्‍यांना लवकर मृत्यू येण्याचा धोका हा अधिक असतो.

तसेच सुट्टीच्या दिवशी जे लोक अधिक तासांची पुरेशी झोप घेतात त्यांचं आयुष्य वाढण्यास मदत होते. मात्र ज्याप्रमाणे पाच तासांपेक्षा कमी तास झोपणं जसं आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतं. तसेच पुरेशा झोपेपेक्षा जास्तीची झोप घेणंही महागात पडू शकतं. स्वीडनध्ये जवळपास 40,000 लोकांचा या संशोधनासाठी अभ्यास केला गेला.

लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे हे वचन आपण लहानपणी ऐकलेले असते. घरातील आजी-आजोबा रात्री लवकर जेवत असल्याचेही पाहिले असेल. आजही खेडेगावात रात्री 8 च्या सुमारास जेवतात. पण शहरात परिस्थिती वेगळी आहे. शहरांतील बरेचजण रात्री 10 आणि त्यानंतर जेवतात. नाईटशिफ्टमुळे काहींच्या जेवणाच्यावेळा अनिश्चित असतात. मात्र, आरोग्यशास्रानुसार रात्री उशिरा जेवण करणे हे अयोग्य मानले गेले आहे.

चयापयच क्रियेवर परिणाम- चयापचय क्रिया वेगवान असेल तर शरीरातील चरबी वेगाने जळून आपण सडपातळ राहू शकतो. मंद वेग असलेल्या चयापचय क्रियेच्या व्यक्तींध्ये चरबीचे ज्वलन होण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे काही व्यक्ती जाड होतात. रात्री उशिरा जेवल्यामुळे जास्त कॅलरीज पोटात जाऊन आपली झोप पूर्ण होत नाही. परिणामी आपले वजन वाढते.

स्थूलता वाढते : रात्री उशिरा भूक लागल्यावर बर्‍याचदा हवे ते खाल्ले जाते. त्यावेळी वजन वाढेल याचा विचार केला जात नाही. यामुळे चयापचयाच्या वेगात बदल होतो. दिवसा जेवतो, तेव्हा शरीराची काही ना काही हालचाल होत राहाते. पणरात्री झोपताना चयपचयाचा वेग कमी होतो. त्यामुळे रात्री उशिरा आपण जे काही खाऊ ते अत्यंत कमी वेगाने पचते आणि त्यामुळे वजन वाढते.
पित्तप्रकोप : रात्री उशिरा जेवल्यास पित्तप्रकोप किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. छातीत जळजळ होते. खूप रात्री जेवल्यास त्याचे पचन योग्यप्रकारे होत नाही आणि अन्न पचण्यासाठी आवश्यक आम्ल पुन्हा अन्ननलिकेत जाते. त्यामुळे अपचन होते. सातत्याने हे होत राहिल्यास गरगरणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्‌भवतात.

उच्च रक्तदाब : रात्री उशिरा जेवल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाच्या आजाराला आमंत्रण मिळते. म्हणूनच रात्रीच्या जेवणाची वेळ सांभाळणे गरजेचे आहे.
रात्री उशिरा जेवल्याने झोपेशी निगडित समस्याही निर्माण होतात. रात्री उशिरा जेवणार्‍या लोकांमध्ये चिडचिडेपणावाढू शकतो.

आज जगभरात World No Tobacco Day हा दिवस पाळला जातो. तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी लाखों लोकांचा मृत्यू होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं तंबाखूच्या विळख्यात अडकली आहेत. तंबाखूमुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या विविध आजारांसोबतच हाडांचीही समस्या होते. अशा जर तुम्हाला तंबाखू सोडायचा असेल तर आणि त्यासाठी उपाय शोधत असाल तर खालीलप्रमाणे काही गोष्टींचा वापर करु शकता.

सकारात्मक रहा

तुम्ही जर दिवसभर तंबाखूचं सेवन करत असाल तर ही सवय मोडणे तुमच्यासाठी मोठं आव्हानच असणार आहे. अशावेळी तुम्ही सकारात्मक विचार करणे आणि मनाची तयारी करणे आवश्यक आहे. आपण हे करु शकतो अशी गाठ मनात बांधून ठेवा. स्वत:वर विश्वास ठेवा. अशात तुमच्या मनात अनेक चुकीचे विचार येणार आणि पुन्हा तुम्ही त्याच मार्गावर जाण्याचा प्रयत्न कराल अशावेळी स्वत:ला रोखण्याची तुमची परीक्षा असेल.

प्लॅन आखून काम करा

तंबाखूची सवय मोडण्यासाठी एक दिवस ठरवा. तंबाखू खाण्याचे नुकसान, त्याने काय होतं याबाबात जे वाचायला मिळेल ते वाचा. मनाची पूर्ण तयारी करा.

स्वत:ला बिझी ठेवा

तंबाखूची सवय मोडायची असेल तर सर्वात चांगला उपाय म्हणजे स्वत:ला कामात व्यस्त करुन घेणे. लोकांसोबत वेळ घालवा, सतत पाणी प्यायला हवे, टीव्ही बघा. हे सगळं करताना काही दिवस तुम्हाला त्रास होईल पण याने तुमचं मन डालव्हर्ट होईल आणि तुमची सवय मोडण्यास मदत होईल.

या गोष्टींपासूनही रहा दूर

त्या गोष्टींपासूनही दूर रहा ज्यामुळे तंबाखूचं सेवन करण्यास प्रोत्साहन मिळतं. कॉफी ब्रेक किंवा ड्राईव्ह करताना याची खास काळजी घ्या. घरातून तंबाखू बाहेर फेकून द्या. जे तंबाखू खाणारे लोक आहे त्यांच्यापासून दूर रहा.

हे ट्राय करा

तंबाखूचं व्यसन मोडण्यासाठी तुम्हाला तुमचं मन दुसऱ्या गोष्टीत लावावं लागेल. तुम्हाल जर तंबाखू खाण्याची तलब आली तर च्यूईंगम, ओवा खावा. याने तुम्हाला आलेली तबल त्या वेळेपुरती मारली जाते.

रोजच्या धावपळीत भूक लागली म्हणून कुठलेही खाद्यपदार्थ खाणे आरोग्यासाठी मानवणारे नसते. आपल्या शारीरिक गरजेनुसार पाहिजे तेच खाणे केव्हाही चांगले. नियमबाह्य खाणेपिणे आपल्या शरीराला परवडणारे नसते. चांगले आणि वाईट गुण लक्षात घेऊन आहार घेतल्यास नकोसा वाटणारा लठ्ठपणा टाळता येऊ शकेल.

आजकालच्या जीवनशैलीचा विचार केल्यास आरोग्यदायी खाद्यसंस्कृती अंगीकारणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपापली शरीररचना किंवा रेग्युलर हेल्थ चेकअप करून शरीराच्या आवश्यकतेनुसार आहारात त्यात्या गोष्टींचा समावेश करण्याची गरज आहे. कारण, कोणत्याही गोष्टींचा आहारात समावेश करायचा असेल, तर त्याची गरज, फायदेतोटे लक्षात घेऊनच व्हावा. उगाचच डोळे बंद करून एखाद्या गोष्टींचा समावेश आहारात करणे चुकीचे आहे. चांगले, वाईट गुण लक्षात घेऊन खाल्ल्यास आपल्या शरीरावर भविष्यातील परिणाम टाळता येणे शक्य आहे.
वाचण्यात येणारी पुस्तके, आर्टिकल, बातम्यांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे समर्थन करण्यापेक्षा किंवा दिलेल्या माहितीचा एकाच बाजूचा विचार करू नये. सर्वांगाने विचार करून आवश्यकतेनुसार बदल करणे गरजेचे आहे. तो न केल्यास वेगवेगळ्या आरोग्यसमस्येला तोंड द्यावे लागते. त्यामध्ये सद्य:स्थितीत महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर आजार म्हणजे फॅटी लिव्हर. याबद्दल बºयाच लोकांच्या मनात फारच शंकाकुशंका आहेत. दैनंदिन जीवनशैलीत बदल करून नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण, योग्य औषधोपचार घ्यावा. अल्कोहोलवर नियंत्रण, कमी कर्बोदके असणाºया पदार्थांचे सेवन व संतुलित आहाराचा समावेश केल्यास फॅटी लिव्हरची तक्रार आपण नक्कीच कमी करू शकतो.

लिव्हर हा एक आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. म्हणूनच त्याला ‘फादर आॅफ आॅर्गन’ म्हणतात. लिव्हर हा पित्त निर्माण करतो. तो डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतो. नॅचरल रेंजपेक्षा लिव्हरच्या कोशिकांमध्ये फॅटचे प्रमाण जेव्हा वाढत जाते, तेव्हा फॅटी लिव्हर ही गंभीर समस्या भेडसावत जाते. त्यामध्ये फॅटी लिव्हरचे मुख्यत: दोन प्रकार आढळतात.

१. अल्कोहोल फॅटी लिव्हर

२. नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हर

रोजच्या आहारात ज्यांचे अल्कोहोलचे प्रमाण जास्त आढळते तसेच अल्कोहोलमध्ये शर्करा आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असले, तर फॅटी लिव्हरची शक्यता असते. त्यामुळे अल्कोहोलिक लोकांना हा धोका जाणवणार आहे.२नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा आहारात असलेले खूप जास्त कर्बोदके तसेच साखर तसेच खूप प्रमाणात फळे यामुळे होतो. वजन कमी करण्याच्या नादात किंवा खूप जास्त फॅटलॉस करण्याच्या नादात खूप लोक अतिक्रश डाएट करतात. त्यामुळे जेवणाऐवजी जास्त प्रमाणात केलेल्या फ्रूट डाएटमुळे व फळातील फ्रूक्टोझमुळे फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते. आजार पूर्णपणे बरा होत नाही; पण त्याची तीव्रता कमी करू शकतो.
मुख्यत: जेव्हा फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते, तेव्हाच साधारणत: पुढील लक्षणे आढळतात. थकवा, पोटदुखी, वजन कमी होणे, भूक कमी लागणे. त्यामुळे कोणतीही लक्षणे आढळली तर थेट डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, परंतु यावर योग्य उपचार किंवा निदान न झाल्यास लिव्हरला इजा होऊन सॉरेसेस होऊ शकतो. त्याचप्रमाणे पिलिया (कावीळ) सारखे आजार होऊन खूप जास्त प्रमाणात लिव्हरला सूज होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळेत

१. शारीरिक परीक्षण

२. रक्ततपासणी

३. अल्ट्रासाउंड टेस्टद्वारे इमेजिंग परीक्षण

४. लिव्हर बायोप्सीद्वारे तपासणी करून घ्यावी.

सगळी फळं कापल्यावर लगेच संपवता येत नाहीत. कापून तुकडे केलेल्या फळांचा हवेशी संपर्क आल्यावर ती लगेच काळी पडतात. त्यामुळे फळे कापल्यावरही ताजी राहावीत यासाठी काही प्रयत्न करता येतील. सफरचंदासारख्या फळांमध्ये लोह असते. फळे कापल्यावर त्यातील अंतर्गत पेशी मरु लागतात, त्यांचा हवेशी संपर्क आला की पोलीफेनॉल नावाचे संप्रेरक निर्माण होते आणि आयर्न ऑक्साइडचा एक थर फळांवर तयार होतो. त्यामुळे कापलेली फळं काळी दिसू लागतात.

1) लिंबाच्या रस या फळांना लावल्यामुळे फळांचे तुकडे काळे होण्याची क्रिया मंदावते. लिंबाच्या रसाचा उपयोग करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात.

2) फळं कापल्यामुळे त्यांचा हवेशी संपर्क येतो आणि ती काळी पडतात, हे रोखण्यासाठी फळं थंड पाण्यात पूर्णपणे बुडवावीत. तू पूर्ण बुडवणे अत्यंत आवश्यक आहे.

3) अर्धा चमचा मीठ पाण्यात विरघळवून त्या मिश्रणामध्ये कापलेली फळे तीन ते पाच मिनिटे बुडवावीत. त्यामुळेही कापलेल्या भागाचा हवेशी संपर्क कमी येतो आणि ती काळी पडत नाहीत.

4) फळ कापल्यावर त्यांच्यावर रबर बँड लावून त्यांना पुन्हा मूळ फळाच्या आकारात बांधून ठेवता येईल त्यामुळेही त्यांचा हवेशी संपर्क कमी येईल.

5) सायट्रिक अॅसिड असलेल्या कोणत्याही सोड्यात फळ बुडवल्यास त्यांचा हवेशी संपर्क कमी होईल. मात्र सोड्यामुळे फळांचा स्वाद कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळांवर साखर घालून ती खाता येतील.

6) फळांचे तुकडे हवाबंद पिशवीत घालून ठेवता येतील, हा एकदम सोपा उपाय आहे.

7) अॅस्कॉर्बिक अॅसिडची पावडरही फळांवर शिंपडता येईल. यामुळे फळं काळी पडणार नाहीत. अॅस्कॉर्बिक अॅसिड म्हणजे क जिवनसत्त्व होय.

Dr. Hitendra Ahirrao
Dr. Hitendra Ahirrao
BAMS, Family Physician General Physician, Pune
Dr. Vijay  Badgujat
Dr. Vijay Badgujat
MD - Homeopathy, Homeopath Family Physician, 7 yrs, Pune
Dr. Rohan Shirole
Dr. Rohan Shirole
MS/MD - Ayurveda, Dermatologist Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Mangal Thube - Buchade
Dr. Mangal Thube - Buchade
BAMS, Ayurveda Yoga and Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Harshad Danwale
Dr. Harshad Danwale
MD - Homeopathy, Homeopath, 5 yrs, Pune
Hellodox
x