Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

उन्हाळा असो किंवा हिवाळा भरपूर पाणी पिण्याचा सल्ला हमखास दिला जातो. घरातील वरिष्ठ मंडळी, तज्ञ हे नेहमी भरपूर पाणी पिण्यास सांगतात. उन्हाळ्यात तर पाण्याची गरज अधिक वाढते. पण तुम्हाला हे माहित आहे का? की गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. पाहुया गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यास काय होऊ शकते....

हायपोट्रिमियाचा धोका
शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक झा्ल्याने सोडिअमचे प्रमाण जलद गतीने वाढते. त्यामुळे डोक्याला सूज येऊ शकते. सुज वाढल्यास हायपोट्रिमियाचा धोका वाढतो.

पचनक्रिया प्रभावित होते
भरपूर पाणी प्यायल्याने अन्नपचनास मदत होते. पण पाण्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे अन्नपचनासाठी मदत करणारा पाचन रस काम करणे बंद करतो. त्यामुळे अन्न उशिरा पचते आणि पोटासंबंधित विकार जडण्याची शक्यता उद्भवते.

हार्टअॅटकचा धोका
अनेकदा अधिक पाणी प्यायल्याने हृदयविकार किंवा हार्टअॅटकचा धोका वाढतो. बायपास सर्जरी झालेल्या रुग्णांना कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

किडनीची समस्या
अधिक पाणी प्यायल्याने किडनीवर दबाव पडतो. यामुळे किडनीची समस्या होऊ शकते. कारण अधिक पाणी प्यायल्याने किडनीला क्षमतेपेक्षा अधिक काम करावे लागते.

झोप कमी येते
अधिक पाणी प्यायल्याने रात्री नीट झोप येत नाही. वारंवार लघवीला जावे लागते. मधुमेहींना रात्री कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण अधिक पाणी प्यायल्याने मधुमेहींना रात्री बरेचदा लघवीला जावे लागते.

किती पाणी गरजेचे?
स्वस्थ शरीराला पाण्याचे संतुलित प्रमाण आवश्यक असते. सामान्य दिनचर्या असल्यास एका दिवसात कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. जर तुम्ही अधिक शारीरिक श्रम असलेले काम करत असाल तर त्यानुसार शरीरात पाण्याचा इनटेक वाढवा.

पुरेशी झोप घेतल्यानंतरही ऑफिसमध्ये सुस्तावल्यासारखे वाटते का? तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव असेलही. आणि जर नसलास तर तुमच्या आसपासच्या लोकांना तरी तुम्ही ऑफिसमध्ये डुलकी घेताना पाहिले असेल. यापैकी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. पुरेशी झोप घेऊनही ऑफिसमध्ये झोप येत असल्यास याचा थेट परिणाम कामावर होतो. तर तुमची ही समस्या दूर करण्यासाठी या काही टिप्स...

दिवसभर पाणी प्या
पुरेसे पाणी न प्यायल्यास आवश्यक तितकी झोप घेऊनही तुम्हाला सुस्तावल्यासारखे वाटते. जर तुम्हाला ऑफिसमध्ये पूर्ण वेळ फ्रेश राहायचे असेल तर दिवसातून कमीत कमी १० ग्लास पाणी प्या.

हेव्ही जेवण टाळा
ऑफिसमध्ये असताना दुपारचे जेवण हलके असणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे आळस येणार नाही. परिणामी नकळत येणारी झोपही टाळता येईल. दुपारच्या जेवणात ताक, सलाड यांचा समावेश करा.

चॉकलेट
काम करताना थकल्यासारखे वाटत असेल तर जवळ चॉकलेट ठेवा. थकवा, सुस्ती जाणवल्यास चॉकलेट खा. त्यामुळे शरीराला इंस्टेंट एनर्जी मिळेल. त्याचबरोबर ताण दूर होण्यासही मदत होईल.

व्यायाम करा
रोज सकाळी न चुकता व्यायाम करा. त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि अॅक्टीव्ह रहाल.

चहा आणि कॉफी घेणे टाळा
चहा-कॉफी घेतल्याने सुस्ती दूर होते, असा अनेकांचा समज आहे. परंतु, हे काही नाही. चहा घ्यायचा असल्यास ग्रीन टी घेणे फायद्याचे ठरेल. सकाळी तुळस घातलेला चहा अवश्य घ्या.

पचनक्रियेशी निगडित तक्रारी या सध्या अतिशय सामान्य झाल्या आहेत. आपल्या जीवनशैलीमध्ये असणाऱ्या विविध गोष्टींचा परिणाम झाल्याने पचनक्रिया बिघडते. अपुरी झोप, खाण्याच्या वेळा, जंकफूडचा समावेश आणि इतर अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असतात. मग गॅसेस होणे, बद्धकोष्ठता किंवा अपचन अशा अनेक तक्रारी सातत्याने सुरु होतात. पण या पचनाशी निगडित तक्रारींवर वेळीच मात करायची असेल तर आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक असते. यामध्ये नियमितता ठेवल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. आता या गोष्टी नेमक्या कधी केलेल्या चांगल्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दिवसाची सुरुवात म्हणजेच सकाळ यासाठी उत्तम वेळ आहे.

पाणी प्या

सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यावे असे आपण अनेकदा ऐकतो. पण कधी मोबाईलच्या नादात नाहीतर ऑफीसला जाण्याच्या धावपळीत आपण ती गोष्ट विसरुन जातो. पण उठल्यावर पाणी पिणे हे तुमच्या पचनक्रियेसाठी उपयुक्त असते. त्यामुळे उठल्यावर किमान एक ग्लास पाणी प्यायलाच हवे. पोटाचे कार्य सुरळीत होण्याबरोबरच मेंदूचे काम चांगले होण्यासाठीही पाणी पिणे उपयुक्त ठरते. याच पाण्यात लिंबू पिळल्यास आणखी चांगले.

योगासने

योगासने हा भारतीय पारंपरिक व्यायाम समजला जातो. सकाळी झोपेतून उठल्यामुळे आपले शरीर काहीसे कठिण झालेले असते. त्यामुळे स्ट्रेचिंग केल्यास ते मोकळे होण्यास मदत होते. किमान १५ ते २० मिनिटे केलेला व्यायामही उपयुक्त ठरतो.

ध्यानधारणा

ध्यान हे मनाच्या शांतीसाठी अतिशय गरजेचे असते. त्यामुळे रिलॅक्स होण्यासाठी ध्यान करण्याची सवय अतिशय गरजेची आहे. त्यामुळे सकाळच्या वेळात तुम्ही किमान ५ ते १० मिनिटांसाठी ध्यान केले तर तुमचा दिवस चांगला जाण्यास मदत होऊ शकते.

पोटाला मसाज करा

झोपेतून उठल्यावर पोटाला हलका मसाज करणे पचनाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. हा मसाज उजव्या बाजूने डाव्या बाजूला करायला हवा. असे हळूवारपणे काही मिनिटे केल्यावर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

समतोल न्याहरी

न्याहरी ही दिवसभरातील पहिलेच खाणे असल्याने ती समतोल असायला हवी. हे खाणे पौष्टीक असायला हवे. चांगली न्याहरी घेतल्यास शरीराचे पोषण होण्यास मदत होते आणि शरीरातील उर्जा टिकून राहते. त्यामुळे न्याहरीत फायबरचे प्रमाण असेल असा प्रयत्न करा. न्याहरीत तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांची लापशी असल्यास उत्तम.

फक्त नाव घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चटपटीत, आंबट, गोड,तिखट चवीची पाणीपुरी अनेकांसाठी मूड सेट करायला मदत करते. पण केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही पाणीपुरी खाणं फायदेशीर आहे. बाजारात मिळणारी पाणीपुरी आणि स्वच्छता हा वादाचा मुद्दा असतो. म्हणूनच घरच्या घरी आणि झटपट तयार होणारी पाणीपुरी या फायद्यांसाठी बिनधास्त चाखायला हवी.

तोंड येणं -

अति तिखट किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने तोंड येण्याचा त्रास जाणवतो. मात्र अशावेळेस पाणीपुरीचा आस्वाद घेतल्यास तोंड येण्याचा येण्याच्या समस्येवर तात्काळ आराम मिळण्यास सुरूवात होते.

पोटाचा त्रास -

चूकीच्या किंवा अति खाल्ल्याने पोट जड वाटणं, पचनाचा त्रास जाणवणं हा त्रास तुम्हांला होत असेल तर पाणीपुरीचा आस्वाद घ्या. पाणीपुरीच्या तिखट पाण्यामध्ये पुदीना, काळं मीठ, जीरं यांचा समावेश केलेला असतो. हे पदार्थ पाचक असल्याने पचनाचा सौम्य स्वरूपातील त्रास दूर होण्यास मदत होते. वाटाण्याऐवजी मूगाचा वापर करणं अधिक आरोग्यदायी आहे. घरच्या घरी बनवलेलं पाणीपुरीचं तिखट पाणी केवळ पिणंदेखील अपचनाचा त्रास दूर करण्यास फायदेशीर आहे.

चिडचिड -

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा मूड स्विंग्समुळे होणारी चिडचिड कमी करण्यासाठी पाणीपुरी हा उत्तम पर्याय आहे. मिश्र चवीची पाणीपुरी तुमचा मूड सुधारायला मदत करते.

किती आणि कधी खावी पाणीपुरी ?
संध्याकाळच्या वेळेस पाणीपुरीचा आस्वाद घेणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. एका वेळेस 5-6 पाणीपुरी खाणं आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षित आहे. जेवणापूर्वी 10-15 मिनिटं पाणीपुरी खाणं आरोग्यदायी आहे. मात्र वर्क आऊट पूर्वी आणि नंतर शक्यतो पाणीपुरी खाणं टाळा.

काही पदार्थ, फळं, भाज्या या दीर्घकाळ टिकाव्यात या करिता आपण त्या फ्रीजमध्ये साठवून ठेवतो.

काही पदार्थ, फळं, भाज्या या दीर्घकाळ टिकाव्यात या करिता आपण त्या फ्रीजमध्ये साठवून ठेवतो. फ्रीजमध्ये वस्तू ठेवल्याने ती अधिक दिवस टिकून राहते असे तुम्हांला वाटू शकते. मात्र तुमची ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. म्हणून या वस्तू फ्रीजमध्ये साठवण्याची चूक मूळीच करू नका.

कॉफी -
पावसाळ्याच्या दिवसात गरम कॉफी पिण्याचा आनंद काही औरच असतो. परंतू अधिक दिवस कॉफी टिकावी म्हणून ती फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. फ्रीजमध्ये कॉफी ठेवल्याने दुसर्‍या पदार्थांचा वास कॉफीला येतो आणि कॉफी खराब होऊ शकते.

मध -
मध फ्रीजमध्ये साठवू नका. मध सामान्य रूम टेम्परेचरमध्येचा उत्तम राहते. फ्रीजमध्ये मध ठेवल्यास त्याचे क्रिस्टल होऊ शकतात.

लोणचं -
बाजारात विकत मिळाणार्‍या विकतच्या लोणच्यामध्ये व्हिनेगरचा वापर केला जातो. व्हिनेगरयुक्त पदार्थ फ्रीजमध्ये साठवल्यास खराब होतात. त्यासोबत इतर पदार्थदेखील खराब होतात.

केळं -
केळं फ्रीजमध्ये साठवू नये. यामुळे ते काळं पडण्याची दाट शक्यता असते. यामधील ईथाईलीन घटक बाहेर पडतात. हा एक प्रकारचा गॅस असून त्यामुळे आजुबाजूची फळंदेखील खराब होऊ शकतात.

टोमॅटो -
फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवू नयेत. यामुळे ते खूप लवकर मऊ होतात. सोबतच त्याची चवदेखील उतरते. टोमॅटो अधिक काळ टिकवण्यासाठी खास टीप्स

बटाटा -
बटाट्यामध्ये स्टार्च शुगर असल्याने फ्रीजमध्ये ते अधिक दिवस ठेवल्याने चव खराब होण्याची शक्यता असते.

आंबट फळं -
संत्र,लिंबू, मोसंबी यासारखी आंबट फळं टाळा. फ्रीजमध्ये ही फळं खराब होतात, सुकतात

Dr. Santoshkumar Gaikwad
Dr. Santoshkumar Gaikwad
BDS, Dentist Root canal Specialist, 24 yrs, Pune
Dr. Sachin Patil
Dr. Sachin Patil
BHMS, Family Physician Homeopath, 11 yrs, Pune
Dr. Sandip  Jagtap
Dr. Sandip Jagtap
MBBS, Addiction Psychiatrist Adolescent And Child Psychiatrist, 14 yrs, Pune
Dr. Suchita Tupdauru
Dr. Suchita Tupdauru
BSMS, Homeopath, 18 yrs, Pune
Dr. D. Malekar
Dr. D. Malekar
MBBS, Family Physician, 21 yrs, Pune
Hellodox
x