Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

सांधेदुखी/अर्थरायटिस ही आजकालची सामान्स समस्या उतारवयात अनेकांना त्रासदायक ठरते.

मुंबई : सांधेदुखी/अर्थरायटिस ही आजकालची सामान्स समस्या उतारवयात अनेकांना त्रासदायक ठरते. पूर्वी उतारवयात जाणवणाऱ्या या समस्येने सध्या तरुणाईही त्रासली आहे. तुम्ही देखील या समस्येला सामोरे जात असाल तर आहारात या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

लसूण
दैनंदिन आहारात लसणाचा अवश्य समावेश करा. याच्या सेवनाने अर्थरायटिस रुग्णांना फायदा होतो. यात असलेल्या अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल, अॅंटी बायोटिक आणि अॅंटी इंफ्लेमेट्री गुणधर्मांमुळे सांधेदुखीवर आराम मिळण्यास मदत होते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात लसणाच्या २ हुन अधिक पाकळ्या खावू नका. कारण लसूणही गरम असतो.

ब्रोकोली
पोषकघटकांनी परिपूर्ण अशी ब्रोकोली सांधेदुखीवर अतिशय फायदेशीर ठरते. यात कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, आयर्न, व्हिटॉमिन ए-सी, क्रोमियम असते. त्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते.

हळद
हळदीत करक्यूमिन नावाचे तत्त्व असते. त्यामुळे आजार पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर सांधेदुखीवरही अत्यंत प्रभावी ठरते.

ओमेगा ३ अॅसिड
अर्थरायटिसपासून सुटका मिळवण्यासाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे सेवन करा. यासाठी आहारत मासे, फिश ऑईल याचा समावेश करा.

ही काळजी घ्या
फिरणे बंद करु नका.

नियमित व्यायाम करा.

फास्ट फूड आणि डबाबंद पदार्थांचे सेवन टाळा.

फॅट्सयुक्त पदार्थ खाणे टाळा.

तुम्हाला ॲल्युमिनियम फॉईल्सबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

ॲल्युमिनियमपासून तयार केलेल्या चंदेरी रंगाच्या वेष्टनांचा अन्नपदार्थ शिजवताना उपयोग करणे वा अन्नपदार्थ त्यामध्ये बांधून देणे हे दोन, तीन दशकांपूर्वी उच्चभ्रू-श्रीमंत वर्गामध्ये सर्रास होते. कारण ते पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मग उच्च मध्यम वर्ग, पुढे मध्यम आणि कनिष्ठ वर्गातले लोक सुद्धा आजकाल या ॲल्युमिनियम फॉईल्सचा नित्य उपयोग उपयोग करु लागले आहेत. कोण आनंद होतो, घरातल्या स्त्रियांना, त्या आपल्या नवर्‍याला वा मुलामुलीला त्यांच्या डब्यातले जेवण गरम राहावे म्हणून ॲल्युमिनियमच्या चकचकीत-चंदेरी वेष्टनामध्ये बांधून देतात तेव्हा. मात्र याचा आरोग्याला धोका संभवतो, याची यांना कल्पना असते काय?

ॲल्युमिनियमच्या संपर्कात येणार्‍यांना कॅन्सर, दमा, हाडांवर विपरित परिणाम होऊन हाडे कमजोर होणे व चेताकोषांवर विपरित परिणाम होऊन स्मृतिभ्रंशाचा धोका, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड, या विकृती संभवतात. मेंदुमधील चेताकोषांमध्ये ॲल्युमिनियमचे सूक्ष्म कण अडकल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे, ज्याचा संबंध स्मृतिभ्रंशाशी( अल्झायमर्सशी) असण्याची शक्यता आहे. एकंदरच मेंदुमधील चेताकोषांच्या वाढीमध्ये व कार्यामध्ये ॲल्युमिनियमच्या कणांमुळे अडथळा येण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करतात. याशिवाय हाडांना सुदृढ ठेवणार्‍या कॅल्शियमच्या कणांना हाडांपर्यंत पोहोचण्यात ॲल्युमिनियमचे कण अडथळा आणतात, ज्यामुळे एकीकडे रक्तामध्ये नको तितके कॅल्शियम आणि हाडांमध्ये मात्र कॅल्शियमची कमी, परिणामी हाडे कमजोर अशी विचित्र परिस्थिती ओढवते.

या सर्व संशोधनाला विरोध करणारे शास्त्रज्ञ सुद्धा आहेत, ज्यांच्या मते ‘अल्प मात्रेमध्ये शरीरात जाणारे ॲल्युमिनियम बाहेर फेकणे शरीराला शक्य आहे व अत्याधिक मात्रेमध्येच वरील धोके संभवतात’. त्यामुळे आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.
हे तर नक्की आहे की ॲल्युमिनियम फॉईल्स कधीकाळी महाग होत्या आणि आता स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत. सहज उपलब्धी आणि स्वच्छतेसाठी अनुकूल या निकषावर समाजाला ॲल्युमिनियम फॉईल्स उपयुक्त वाटत असले तरी पाश्चात्त्यांच्या या गोष्टी स्वस्त आणि मुबलक उपलब्ध झाल्या की मनात शंका उभी राहते. महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त करणार्‍या संशोधकांच्या मतांकडेसुद्धा दुर्लक्ष करता येत नाही. अशा वेळी तारतम्याने नेमकी काय काळजी घ्यायची ते बघू.

* अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम अन्नामध्ये झिरपण्याचा धोका अधिक.
* गरम अन्नपदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये बांधून देणे सुद्धा कटाक्षाने टाळावे.
* मसाले, सॉस, टॉमेटॉ केचप, आंबट फळांचे रस, आंबट फळे, वा आंबट पदार्थ शिजवताना तर ॲल्युमिनियम फॉईल मुळीच वापरु नये, असे संशॊधक सांगतात. आपले जेवण तर मसाल्याशिवाय तयार होत नाही.
* रस्सायुक्त भाज्या, कालवण, सांबार, तळलेले पदार्थ, लोणचं, पापड तसेच अन्य तेलतूपयुक्त अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी यांचा वापर करु नये.
* अम्लीय( ॲसिडीक) पदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून देण्याची चूक कधीही करु नये.
* बिर्याणी वगैरे तयार करताना ॲल्युमिनियम फॉईलचे आवरण त्यावर बांधणे धोक्याचे होऊ शकते.
* मायक्रोवेव्ह, ओव्हनमध्ये अन्नपदार्थ तयार करताना त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल्सचा उपयोग करु नये. त्यासाठी अधिक जाडीच्या वेगळ्या शीट्स वापरण्याचा सल्ला दिला जातो, तरीही अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम झिरपण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* सॅन्डविचसारखे गार पदार्थ गुंडाळायला हरकत नाही असे म्हणतात, पण विषाची परिक्षा घ्यायचीच कशाला?

वॉटरप्रूफ मेकअपला पर्याय आहे का? हे अवश्य वाचा.


स्विमींग पूल मध्ये डुंबताना अथवा पावसात भिजताना तुम्हाला तुमचा मेक-अप तसार रहावा असे वाटत असते.मग यासाठी तुम्ही अशा ठिकाणी जाताना वॉटरप्रूफ मेकअप करता.Cosmetologist डॉ.नंदीता दास यांच्याकडून जाणून घेऊयात वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का? तसेच वाचा मेकअप करताना कोणती काळजी घ्याल ?


वॉटरप्रूफ कॉस्मेटीक्स वापरणे सुरक्षित आहे का?

लक्षात ठेवा मेक-अप केल्यावर त्वचेतील घाम अथवा तेलामुळे तो खराब होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मेक-अप मध्ये वापरण्यात येणारे घटक हे त्वचेसाठी हानिकारक असू शकतात.वॉटरप्रुफ मेक-अप मधील काही घटक जे तुमच्या त्वचेमधील पिगमेंटेशन झाकण्यासाठी वापरण्यात येतात ते घटक जर नैसर्गिक सौदर्यप्रसाधनांप्रमाणे केमिकल-फ्री असतील तर ते वापरणे सुरक्षित असू शकते.पण काही वेळा अशा वॉटरप्रूफ मेक-अपची सौदर्यप्रसाधने वापरणे सुरक्षित असू शकत नाही.जाणून घ्या अ‍ॅक्नेचा त्रास असणार्‍यासाठी ‘4’ महत्त्वाच्या मेकअप टीप्स !


अॅनिमल व व्हेजीटेबल बेस वॅक्स,पॉलिमर व वॅक्स प्रमाणेच वॉटरप्रूफ मेक-अपच्या साहित्यामध्ये मध्ये देखील सिलिकॉन वापरण्यात येते ज्यामुळे तुमच्या त्वचेतील छिद्रे बंद होतात.ज्यामुळे तुम्हाला पिम्पल येऊ शकतात,त्वचेवर पुरळ व अॅलर्जी येऊ शकते.वॉटरप्रूफ फॉऊंडेशन मध्ये सामान्यपणे सिलिकॉन वापरण्यात येते.तसेच वॉटरप्रूफ मस्कारा मध्ये देखील कंडीशनिंग घटक असलेले तेल न वापरलेल्यामुळे या प्रसाधनाच्या वापरामुळे तुमच्या डोळ्याच्या पापण्या कोरड्या होण्याचा धोका असतो.वाचा फाऊंडेशनचा वापर करताना या ‘4’ चूका टाळा ‍!


वॉटरप्रूफ मेक-अप कसा काढावा?


चेह-यावरील जाड वॉटरप्रूफ मेक-अप काढण्यासाठी तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे महागडे क्लिनझर विकत घ्यावे लागते.वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरणे उत्तम ठरेल.यासाठी डोळे व डोळ्यांच्या पापण्यांवर थोडेसे ऑलिव्ह ऑईल लावा.थोड्यावेळ ते तेल तसेच राहू द्या व काही मिनीटांनी तो भाग स्वच्छ धुवा.चेहरा व मानेवरचा वॉटरप्रूफ मेक-अप काढण्यासाठी जुन्या पद्धतीचे कोल्ड क्रीम वापरणे देखील फायद्याचे ठरते.वाचा खोबरेल तेल- त्वचा स्वच्छ करण्याचा आणि मेकअप काढण्याचा उत्तम उपाय !

टीप-जर तुम्हाला मेक-अप केल्यावर घाम येत असेल तर लगेच त्यासाठी वॉटरप्रूफ मेक-अप करण्याऐवजी Water Resistant चा मेकअपचा पर्याय निवडा.तसेच वाचा तेलकट त्वचेच्या समस्या दूर करतील ही ‘6’ तेलं.वॉटर रेसिस्टंट मेक-अप वॉटरप्रूफ मेकअप पेक्षा हलका असतो.त्याचा परिणाम अगदी वॉटरप्रूफ मेकअप सारखाच असतो मात्र त्याचे वजन हलके असते.तसेच या मान्सून मेकअप टीप्सनी रहा पावसाळ्यातही ‘ मोस्ट ब्युटीफुल’ !

आहारात सकाळच्या नाश्त्याला अत्यंत महत्त्व आहे.
सकाळचा नाश्ता कधी चुकवू नये, असे म्हटले जाते. आणि हे अगदी खरे आहे. आहारात सकाळच्या नाश्त्याला अत्यंत महत्त्व आहे. गरोदरपणात तर मातेवर बाळाचे भरणपोषण अवलंबून असल्याने उशिरा नाश्ता करणे किंवा नाश्ता करणे टाळणे बाळासाठी आणि आईसाठी त्रासदायक ठरू शकते.


अनेक गरोदर महिला ज्यांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो अशा महिला नाश्ता करणे टाळतात किंवा उशिरा नाश्ता करतात. नाश्ता टाळण्याचे किंवा उशिरा करण्याचे कारण म्हणजे सकाळी मळमळ्यासारखे किंवा उलटीसारखे वाटते. बरेचदा मॉर्निंग सिकनेसमुळे उठून बसणे आणि नाश्ता करणे शक्य होत नाही.

परंतु, त्रास होत असला तरी देखील नाश्ता टाळणे योग्य ठरणार नाही. रात्री झोपल्यानंतर साधारण ९-१२ तास अन्न खाण्याला आराम असतो. त्यावेळेस तुमच्या शरीरात ऊर्जेचे स्त्रोत साठवलेले असतात. त्यामुळे शरीराची विविध कार्ये सुरळीत होतात आणि बाळाला पोषकघटकांचा पुरवठा देखील होतो. म्हणून, इतक्या वेळच्या अंतराने शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि बाळाला पोषकघटक मिळण्यासाठी नाश्ता करणे गरजेचे आहे.


मॉर्निंग सिकनेसमुळे जर नाश्ता करणे शक्य होत नसेल तर ज्यामुळे मळमळ होणार नाही असे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या. ज्यामुळे पोट भरेल, खाण्याचे समाधान मिळेल आणि मॉर्निंग सिकनेसला आळा बसेल असे पदार्थ खा. खरंतर, नाश्ता टाळण्यापेक्षा नाश्ता केल्याने मॉर्निंग सिकनेसवर मात करण्यास मदत होईल.
त्याचबरोबर नाश्ता केल्याने मेटॅबॉलिझम सुरळीत होण्यास, ब्लड ग्लुकोज, इन्सुलिन, फ्री फॅटी अॅसिड आणि ग्लुकोज नियंत्रित राहण्यास मदत होते. the Lancet journal च्या अभ्यासानुसार नाश्ता टाळणे विशेषतः गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात योग्य ठरणार नाही. तसंच खूप वेळ काहीही न खाल्यास अधिक भूक लागते आणि जास्त खाल्ले जाते. गरोदरपणात अधिक कॅलरीज घेणे त्रासदायक ठरू शकते.
अशावेळी काय करावे?

1.हलका नाश्ता करा. डिशभर पोहे, उपमा, इडली, डोसा खाणे योग्य ठरेल.

2.सकाळी उठल्यावर पहिल्यांदा कोणतेही पेय घेऊ नका. त्यामुळे मळमळ वाढते.

3.नाश्त्याला अधिक खाणे किंवा नाश्ता पूर्णपणे टाळणे, असे काहीही करू नका. कारण त्यामुळे तुम्हाला आळसावल्यासारखे वाटेल किंवा नाश्ता केल्यानंतर काही तासांतच शरीरातील साखरेचे प्रमाण वाढेल.

मुंबई : हळदीचे दूध अत्यंत आरोग्यदायी आहे. हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. रोगप्रतिकारकशक्ती सुधारते, पचनक्रिया सुरळीत होते, असे इतर अनेक फायदे होतात. तर आज वर्ल्ड मिल्क डे निमित्त जाणून घेऊया का प्यावे हळदीचे दूध...

रोगप्रतिकारकशक्ती सुधारते
हळदीच्या दुधामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. त्याचबरोबर सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर हळदीचे दूध अवश्य प्या. शारीरिक व्यायाम करणाऱ्यांसाठी हळदीचे दूध फायदेशीर ठरते.

पचनविकार दूर होण्यास मदत
हळदीच्या दूधामुळे पचनक्रिया सुधारते. छातीतील जळजळ, ब्लोटिंग, गॅसेस या समस्या दूर होण्यास मदत होते. तसंच भूक न लागणे, अपचन या समस्या दूर होतात.

आरोग्याच्या इतर समस्यांवर
रोगप्रतिकारकशक्ती कमकूवत असल्याने होणारे आजार दूर करण्यास हळदीचे दूध उपयुक्त ठरते. सांधेदुखी, पचनासंबंधित समस्या, त्वचेच्या समस्या दूर करण्यास हळदीचे दूध फायदेशीर आहे.

शांत झोप येण्यासाठी
निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी हळद घातलेले कोमट दूध झोपण्यापूर्वी प्या. साध्या दूधापेक्षा हळदीचे दूध पिणे अधिक फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे शरीरातील अमिनो अॅसिडची निर्मिती वाढते. हळदीमुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरात अमिनो अॅसिड घेण्याचे प्रमाण वाढते. परिणामी शरीर रिलॉक्स होते, मूड शांत होतो आणि शांत झोप लागते.

रक्त शुद्ध होते
हळद डिटॉक्सिफिकेशनचे काम अत्यंत उत्तमरित्या करते. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये दूर होतात. कारण ही विषद्रव्ये रक्तवाहिन्यात जमा होऊन इतर आजारांना आमंत्रण देतात. हळदीमुळे रक्तातील लिव्हरचे कार्य सुरळीत होऊन रक्तातील टॉक्सिन्स दूर होतात.

Dr. Kshitija Kulkarni
Dr. Kshitija Kulkarni
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda Panchakarma, 5 yrs, Pune
Dr. Anushree Bhonde
Dr. Anushree Bhonde
BPTh, Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Suryakant Bhoite
Dr. Suryakant Bhoite
BAMS, Family Physician, 34 yrs, Pune
Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Aakash Bora
Dr. Aakash Bora
BHMS, Homeopath, 12 yrs, Pune
Hellodox
x