Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

Tests for bacterial vaginosis take samples of fluid from the vagina. The samples are looked at under a microscope to see if they show signs of infection. Bacterial vaginosis is caused by a change in the balance of bacteria in the vagina. Normally, there are a lot of "good" bacteria and some "bad" bacteria in the vagina. The good types help control the growth of the bad types.
But when you have bacterial vaginosis, there are not enough good bacteria and too many bad bacteria. Many women with bacterial vaginosis don't have symptoms. The most common symptom is an increase in vaginal discharge. The discharge often has a fishy smell.
Women who have this problem during pregnancy have a higher chance of miscarriage, early delivery, and an infection after delivery.So it's important for pregnant women with symptoms to be tested.

What are Test options?
Tests for bacterial vaginosis include:
Wet mount: A sample of vaginal discharge is checked for bacteria, white blood cells, and unusual cells called clue cells. If clue cells are present, it means you may have bacterial vaginosis.
Whiff test: A sample of discharge is checked to see if a strong fishy odor is created when a special solution is added. A fishy odor usually means you have bacterial vaginosis.
Vaginal pH: The pH of a sample of vaginal discharge is measured. Bacterial vaginosis often causes a pH that is higher than normal.
Oligonucleotide probe: A sample of vaginal discharge is tested for the genetic material, or DNA, of this bacteria. This test is not often used.

Why this test is performed?
Tests for bacterial vaginosis are done to help find the cause of symptoms such as abnormal vaginal discharge, irritation, or pain.

How to prepare for test?
Do not douche, have sex, or use vaginal medicines for 24 hours before this test. Talk to your doctor if you have any concerns about the need for the test, its risks, how it will be done, or what the results will mean.

How this test is performed?
You will take off your clothes below the waist. You'll have a gown to drape around your waist. You will then lie on your back on an examination table. Your feet will be raised and supported by stirrups. This is similar to having a pelvic examination or Pap test. Your doctor will insert a lubricated tool called a speculum into your vagina. The speculum gently spreads apart the vaginal walls. This allows your doctor to see the inside of the vagina and the cervix. Samples of fluid inside the vagina are then collected with a swab or wooden stick.

How it feels during test?
You may feel some discomfort when the speculum is put in, especially if your vagina is irritated and tender.

Are there any risks with this test?
There is little chance of having a problem from a bacterial vaginosis test.

How are test results interpreted?
Tests for bacterial vaginosis take samples of fluid from the vagina. The samples are looked at under a microscope to see if they contain signs of infection.



योनीमार्गाचा संसर्ग

महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत. जिवाणू व बुरशी ही योनीमार्गाचा संसर्ग होण्याची दोन प्रमुख कारणे. योनीमार्गातील त्वचा कायम ओली राहिली, नियमितपणे स्वच्छ केली गेली नाही किंवा जंतुसंसर्ग असलेल्या साथीदारासोबत लैंगिक संबंध ठेवल्यास जिवाणूजन्य संसर्गाचा धोका असतो. याशिवाय योनीमार्ग अस्वच्छ राहिल्यास अनेक स्त्रियांना विशेषत: मधुमेही स्त्रियांनाही योनीमार्गात कॅण्डिडा या बुरशीमुळे दाह सहन करावा लागतो. या संसर्गात लघवी होण्यास सुरुवात झाल्यावर वेदना होतात. अशा प्रकारचा त्रास १५ ते ४५ या वयोगटांतील महिलांमध्ये अधिक दिसतो.

योनीमार्गाचा संसर्ग होण्याची कारणे व घ्यावयाची काळजी

ट्रायकोमोनियासिस : हा आजार ट्रायकोमोनास व्हेजिनालीस या जिवाणूच्या संसर्गामुळे होतो. हा आजार लैंगिक संपर्काच्या माध्यमातून पसरतो. हे सूक्ष्म जंतू ओलाव्यात जिवंत राहतात. हा संसर्ग झाल्यास केवळ महिलेने उपचार करण्यापेक्षा साथीदारालाही सोबत घेऊन जावे. या प्रकारात जर लैंगिक संबंध ठेवणाऱ्या साथीदाराला हा संसर्ग असल्यास आणि फक्त महिलेवर उपचार केल्यास कालांतराने पुन्हा संसर्ग होऊ शकतो, तसेच उपचार घेत असताना लैंगिक संबंध ठेवू नये.

प्रसूतीनंतर संसर्गाचा धोका : बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांच्या प्रजनन भागात जिवाणूंमुळे संसर्ग होतो. नैसर्गिक प्रसूतीच्या तुलनेत प्रसूतिसाठी शस्त्रक्रिया किंवा तत्सम मदत घ्यावी लागते त्यांना संसर्ग होण्याची भीती जास्त असते. या संसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास महिलेला मोठय़ा आजाराला तोंड द्यावे लागते. योनीमार्गातील अस्वच्छता आणि सततच्या संसर्गामुळे योनीमार्गाचा कर्करोग होण्याचीही शक्यता असते. वयाच्या पन्नासीनंतर मासिक पाळी बंद झाल्यावरही योनीमार्गातील ससंर्ग होऊ शकतो. यामध्ये त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसल्यास महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या वेळी पॅप स्मीअर फॉर मॅलिग्नसी नावाची तपासणी करण्यात येते. ही तपासणी फार सोपी असते. यामध्ये दूषित भागातील स्राव काचेच्या स्लाइडवर पसरवून त्यावर समभाग अल्कोहोल व स्पिरिट ओतले जाते. ती स्लाइड वाळल्यावर लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोपखाली पाहून कर्करोगाच्या पेशी दिसतात किंवा नाही याचे निदान केले जाते.

योनीमार्गातील संसर्गाची लक्षणे

लघवी करताना घाई होणे, जळजळ होणे किंवा लघवी सुटण्यास अडथळा जाणवणे असे त्रास डिस-युरिया आजारात मोडतात. लघवी संपत आली की दाह होतो. योनीमार्गातून पांढरे पाणी जाण्याचे प्रमाण वाढणे आणि त्याचा आंबट वास येणे. अधिक प्रमाणात पांढरे पाणी गेल्यामुळे कंबर दुखणे व ओटीपोटात दुखणे यांसारखी लक्षणे दिसतात. योनीमार्ग लाल होणे किंवा चट्टे येणे. योनीमार्गात खाज सुटणे. योनी लालसर होणे. लैंगिक संबंधाच्यावेळी वेदना होणे.

संसर्ग होऊ नये म्हणून..

महिलांचे अंतर्वस्त्र हे स्वच्छ व सुती असावे. दुसऱ्यांची किंवा योनीमार्गाचा संसर्ग असलेल्या व्यक्तीचे अंतर्वस्त्र वापरू नये. मासिक पाळीत वापरले जाणारे सॅनिटरी पॅड चांगल्या दर्जाचे असावेत. दिवसात किमान दोन ते तीन वेळा हे पॅड बदलावे. मासिक पाळीत कापड वापरणाऱ्यांनी मात्र याबाबत अधिक काळजी घ्यावी. कापड वापरल्यानंतर र्निजतुक करावे आणि ते कोरडय़ा जागेत जंतूचा वावर नसलेल्या ठिकाणी ठेवावे.

लघवीच्या मार्गात दाह होऊ नये, याकरिता रुग्णाने आठ-दहा ग्लास पाणी रोज प्यावे. यामुळे मूत्राशयातील जिवाणू शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत होते. दर दोन ते तीन तासांच्या अंतराने लघवी करून मूत्राशय रिकामे करावे.

शौचाला गेल्यानंतर अथवा लघवीला जाऊन आल्यावर तेथील भाग स्वच्छ करताना नेहमी हात पुढून मागे नेणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीच्या स्वच्छतेमुळे योनीमार्गात जंतू जाऊन संसर्ग होण्याची शक्यता असते. योनीमार्गातील त्वचा दमट राहू नये यासाठी प्रयत्न करा, कारण अशा ओलसर भागावर विषाणू, जिवाणू किंवा बुरशी सहज वाढतात.

शरीरसंबंध करण्यापूर्वी आणि केल्यानंतर लघवी करून मूत्राशय व मूत्रमार्ग साफ करावा. योनीमार्गातील संसर्ग झाल्यास उपचार घेत असताना आपल्या साथीदाराचीही तपासणी करून घ्यावी कारण अनेकदा हा संसर्ग लैंगिक संबंधातून आलेले असतात.

योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी पावडर किंवा रासायनिक द्रव्य असलेला साबण वापरत असाल तर काळजीपूर्वक वापर करा. ही पावडर किंवा साबण योनीमार्गात जाणार नाही याची काळजी घ्या. यामुळे येथील त्वचा कोरडी पडते आणि संसर्ग होतो.

गर्भाशयाचा कर्करोग
भारतीय महिलांमध्ये गर्भाशयासंबंधित कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, बीजांडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग असे अनेक कर्करोगाचे प्रकार आहेत. योनीमार्गात अस्वाभाविकरीत्या रक्तस्राव, अस्वच्छता या प्रमुख कारणांमुळे कर्करोगाची लागण होते. गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयवांच्या ऊतींमध्ये तयार होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग. हा आजार पॅपिल्लोमा व्हायरसमुळे (एचपीव्ही) उद्भवतो. या आजारामागे योनीमार्गातील रक्तस्राव हे प्रमुख लक्षण आहे. धूम्रपान, अनेकदा प्रसूती, दीर्घकाळासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर किंवा एचआयव्हीबाधित स्त्रियांना याचा जास्त धोका असतो. अनेकदा गर्भाशयाचा कर्करोग आनुवंशिकही असतो. स्त्रीच्या आईला किंवा बहिणीला गर्भाशयाचा कर्करोग असेल तर कुटुंबामध्येही कर्करोग असण्याची शक्यता वाढते. कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. त्यामुळे योनीमार्गात काही अडथळा येत असेल, सतत संसर्ग होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती तपासणी करून घ्यावी.

बॅक्टेरियल वैगिनोसिसच्या चाचणीसाठी योनिमधून द्रवांचे नमुने घेतले जाते. नमुन्यामध्ये लक्षणे दिसतात का हे पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले जाते.
बॅक्टिरियल योनीसिस योनीतील बॅक्टेरियाच्या संतुलनात बदल झाल्यामुळे होतो. सामान्यपणे,योनिमध्ये बरेच "चांगले" जीवाणू आणि काही "खराब" जीवाणू असतात. चांगले जीवाणू खराब जीवाणूच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. परंतु जेव्हा आपल्याला बॅक्टेरियल योनिओसिस होते तेव्हा पुरेसे चांगले बॅक्टेरिया नसतात आणि खराब बॅक्टेरिया बरेच असतात.
बॅक्टेरियल योनीसिस असलेल्या बऱ्याच स्त्रियांना लक्षणे दिसत नाहीत. योनि डिस्चार्ज हे सर्वात सामान्य लक्षण आहे. या प्रकारच्या डिस्चार्जमध्ये वास असतो.
गर्भधारणेदरम्यान ज्या महिलांना ही समस्या आहे त्यांना गर्भपात, लवकर प्रसूती आणि प्रसूतीनंतर संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून गर्भवती महिलांसाठी लक्षणे तपासणे महत्वाचे आहे.

चाचणी
बॅक्टेरियाय योनिओसिसच्या चाचणी मध्ये खालील समाविष्ट आहेत:
ओले माउंट योनि डिस्चार्जचा नमुना जीवाणू, पांढर्या रक्त पेशी आणि क्लू कोशिका म्हटल्या जाणाऱ्या असामान्य पेशींसाठी तपासला जातो. जर क्लू पेशी उपस्थित असतील तर याचा अर्थ तुम्हाला बॅक्टेरियल योनीसिसिस असू शकते.
व्हिफ चाचणी विशेष रसायन तयार केल्यानंतर मजबूत गंध तयार होतो की नाही याचा निर्वाळा करण्यासाठी नमुना तपासला जातो. अस्वस्थ गंध म्हणजे सामान्यतः आपल्याला बॅक्टेरियल योनिओसिस आहे.
योनिअल पीएच.योनि डिस्चार्जच्या नमुनाचे पीएच मोजले जाते. बॅक्टेरियाय योनिओसिस बहुतेकदा सामान्यपेक्षा जास्त असलेले पीएच बनवते.
ऑलिगॉन्यूक्लियोटाइड प्रोब. योनि डिस्चार्जचा नमुना या बॅक्टेरियाच्या अनुवांशिक पदार्थासाठी किंवा डीएनएसाठी तपासला जातो. ही चाचणी सहसा वापरली जात नाही.

चाचणी का करण्यात येते ?
असामान्य योनि डिस्चार्ज,जळजळ किंवा वेदना यासारख्या लक्षणांचे कारणे शोधण्यासाठी बॅक्टेरियाय योनिओसिसची चाचणी केली जाते.

चाचणीकरिता काय तयारी करावी ?
या चाचणीच्या 24 तासांपूर्वी पाण्याचा वापर ,शारीरिक संबंध किव्वा योनी संबंधी कुठलेही औषध घेऊ नका
चाचणीची आवश्यकता,त्याचे धोके,ते कसे केले जाईल या परिणामांचा अर्थ काय असेल याबद्दल आपल्याला काही चिंता असल्यास आपल्या डॉक्टरांशी बोला.

चाचणी कशी केली जाते ?
आपण कमरेखालील आपले कपडे काढून ठेवा.आपल्या कमरच्या सभोवतालचे कपडे घालण्यासाठी आपल्याकडे एक गाउन दिला जाईल . त्यानंतर तुम्हाला टेबलावर आपल्या पाठीवर झोपण्यास सांगितले जाईल. आपले पाय उभे केले जातील. हे पेल्विक परीक्षा किंवा पाप तपासणीसारखेच आहे.
आपले डॉक्टर आपल्या योनिमध्ये एक लूब्रिकेटेड स्पेकलम नावाचा साधन घालतील. स्पेकलम हळूवारपणे योनि भिंती दूर करण्यास मदत करते . हे आपल्या डॉक्टरांना योनी आणि गर्भाशयाचा आतल्या भाग पाहण्याची अनुमती देते.
योनीच्या आत द्रवपदार्थाचे नमुने नंतर एक तलम किंवा लाकडी चिकट्याने गोळा केले जातात.

चाचणी नंतर कसा अनुभव येऊ शकतो ?
स्पेकलम योनीमध्ये टाकल्यांनंतर आपल्याला काही अस्वस्थता वाटू शकते,विशेषकरून जर योनि मध्ये जळजळ आणि वेदना असेल तर.

धोके
बॅक्टेरियल योनीसिस चाचणीमधून समस्या येत नाही.

परिणाम
बॅक्टेरियल योनीनोसिसच्या चाचणीसाठी योनिमधून द्रवांचे नमुने घ्या. नमुने सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले जाते जेणेकरून त्यात संक्रमणाची चिन्हे आहेत का ते पाहण्यासाठी.

Dr. Sachin Patil
Dr. Sachin Patil
BHMS, Family Physician Homeopath, 11 yrs, Pune
Dr. Rahul Pherwani
Dr. Rahul Pherwani
BHMS, 22 yrs, Pune
Dr. Niranjan Vatkar
Dr. Niranjan Vatkar
MDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 10 yrs, Pune
Dr. Dr Amrut Oswal
Dr. Dr Amrut Oswal
Specialist, Orthopaedics Joint Replacement Surgeon, 29 yrs, Pune
Dr. Mahesh Yadav
Dr. Mahesh Yadav
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Hellodox
x