Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पावसाळा आला त्यासोबत अस्वच्छता आणि त्यामधून वाढणारे साथीचे आजार बळावतात. पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे डेंगी पसरण्याचा धोका बळावतो. काही वर्षांपूर्वी देशभर डेंगीच्या साथीने हाहाकार पसरवला होता. मात्र आता डेंगी अधिक गंभीर स्वरूपात पसरण्याची शक्यता असल्याचे स्वास्थ्य विभागाने सांगितले आहे. एनवीबीडीसीपीने दिलेल्या अहवालानुसार, डेंगीशी सामना करण्यासाठी आता आरोग्य यंत्रणाला अधिक सक्षमपणे लढण्याची गरज आहे.

काय आहे धोका ?

नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम (NVBDCP)ने दिल्ली सरकार आणि दिल्ली नगर निगमला सावधानतेचा सल्ला दिला आहे. यंदा डेंगी अधिक गंभीर स्वरूपात समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

डेंगी दर 3 वर्षांनंतर अधिक तीव्रतेने हल्ला करतो. त्यामुळे यंदा डेंगीच्या डासांची आक्रमता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्याची आणि सरकारसोबतच नागरिकांनी काळजी घेण्याची गरज वाढली आहे. या '5' कारणांंमुळे विशिष्ट लोकांंनाच डास अधिक प्रमाणात चावतात !

काय आहेत उपाय ?

दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने, दिल्लीमध्ये डेंगीशी सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी वेळोवेळी औषधांची फवारणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नक्की वाचा : ताप नेमका डेंगी की चिकनगुनियाचा, हे कसं ओळखाल ...

एडीस एजिप्टी या डासामुळे जगभरात डेंगी, झिका, चिकनगुनिया यासरख्या जीवघेण्या आजाराची साथ पसरते.लोकांमध्ये डेंगी, चिकनगुनियाच्या साथीबाबत, त्यांच्या लक्षणांबाबत सजगता वाढवण्यासाठी काम सुरू करण्यात आलं आहे. जागोजागी औषध फवारणी केल्याने डासांचे लार्वा म्हणजेच अळ्यांना वेळीच नष्ट करण्यासाठी मदत होते. त्यामुळे भविष्यातील धोका रोखण्यास मदत होणार आहे.

त्वचेचा रंग ठरवण्यासाठी मेलॅनिन हा घटक सर्वात महत्त्वाची भूमिका साकारतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तेव्हा त्वचेचा रंग अधिक गडद होतो. या समस्येला हायपर पिंगमेंटेशन असेही म्हणतात.

हळूहळू विशिष्ट भाग अधिक गडद होण्यास सुरूवात होते. प्रामुख्याने चेहर्‍यावर हायपरपिंगमेंटटेशनमुळे त्वचा काळवंडणं अनेकींना सौंदर्याच्या दृष्टीने नकोसं वाटतं. यावर मात करण्यासाठी अनेकदा ब्युटी ट्रीटमेंटसची मदत घेतली जाते. महागड्या ब्युटी ट्रीटमेंटपेक्षा काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते.

हायपर पिंगमेंटेशनवर घरगुती उपाय
1. लिंबू -
लिंबातील सायट्रिक अ‍ॅसिड त्वचा ब्लिच करण्यास मदत करतात. नियमित लिंबाचा त्वचेवर वापर केल्यास यामुळे हायपर पिगमेंटेशनचा त्रास दूर करण्यास मदत होते.
चेहर्‍यावर लिंबाचा रस लावून 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. संवेदनशील त्वचा अस्णार्‍यांनी लिंबाचा रस थेट त्वचेवर लावणं त्रासदायक ठरू शकते अशावेळेस लिंबामध्ये थोडं पाणी मिसळून ते त्वचेवर लावणं फायदेशीर आहे.


2. बटाटा -
बटाट्यामध्येही ब्लिचिंग घटक मुबलक प्रमाणात असतात. चेहर्‍यावर बटाट्याचा रस लावल्याने हायपर पिगमेंटटेशनचा त्रास कमी होतो.

3. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर -
हायपर पिंगमेंटेशनचा त्रास कमी करण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरदेखील फायदेशीर आहे. यामधील अ‍ॅसिडीक गुणधर्म त्वचेचे सौंदर्य खुलवण्यास मदत करतात.

4. कोरफड
कोरफडीचा गरदेखील त्वचेसाठी वरदानचं आहे. मृत पेशींचा थर हटवून नव्या पेशींना पुन्हा ताजंतवानं करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. नियमित कोरफडीचा गर त्वचेवर लावल्यास हायपर पिगमेंटशनच्या समस्येपासून सुटका मिळते.

तणावग्रस्त जीवनशैली आणि संतुलित, पोषक आहाराचा अभाव यामुळे लाईफस्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका बळावला आहे. अशापैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास त्याचा परिणाम हृद्यावर आणि मेंदूवर होण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबामुळे हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. म्हणूनच औषधोपचारांसोबत आहारात काही योग्य घटकांचा समावेश केल्यास त्रास कमी होण्यास मदत होते.

उच्च रक्तदाबाच्या आहारात कोणते पदार्थ असावेत ?
केळ -
केळ हे बारमाही फळ बाजारात सहज उपलब्ध होते. केळ्यात पोटॅशियम घटक मुबलक प्रमाणात असतात. सकाळी दूधासोबत पूर्ण पिकलेले गोड केळं खाल्ल्यास रक्तदाबासोबतच अनेक आजार नियंत्रणात राहण्यास मदत होते. केळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे

पालक -
पालकमध्ये फायबरसोबतच मॅग्नेशियम, पोटॅशियम घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.


लसूण -
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लसणाचा वापर हमखास केला जातो. प्रामुख्याने रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी आहारात लसणाचा वापर केलाच पाहिजे. यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते.

ओटमील -
ओटमील्समुळे रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. यामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. सोडियम कमी प्रमाणात असल्याने ओटमीलच्या सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहतो.

बीट -
बीटाच्या सेवनामुळे रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामधील नायट्रेट घटक रक्तवाहिन्यांचे आरोग्य जपण्यास मदत करते. जेवणासोबत रोज सलाड, फ्रेश ज्यूसच्या स्वरूपात बीटाचा आहारात समावेश केल्यास यामुळे रक्तदाब नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते.

कानामध्ये मळ निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. कानाचं आरोग्य त्यावर अवलंबून असतं. मात्र कानामध्ये अतिप्रमाणात मळ साचल्यास इंफेक्शन, कानदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे कानात खाज येण्याचाही त्रास अनेकांना जाणवतो. अशावेळेस सतत कानात पिन, टोकदार वस्तू घालणं त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच कानातला मळ मऊ करून बाहेर काढणयसाठी काही विशिष्ट तेल मदत करतात.

कोणत्या तेलाचा करा वापर?

कानातील मळ साफ आणि मऊ करण्यासाठी बेबी ऑईल आणि ऑलिव्ह ऑईल मदत करते. 1-2 चमचे बेबी ऑईल थोडं गरम करा. त्यानंतर मान थोडी वाकडी करून कानामध्ये त्याचे थेंब टाका. तेल टाकण्यासाठी बोटांचा किंवा आयड्रॉपरचा वापर करा. रात्री झोपण्यापूर्वी सलग 3-4 दिवस हा उपाय केल्याने मळ मोकळा होण्यास मदत होते.

बेबी ऑईलसोबत अल्कोहलचे काही थेंबही मिसळणं फयादेशीर ठरू शकतं. यामुळे बॅक्टेरियल इंफेक्शन कमी होण्यास मदत होते.

अन्य घरगुती उपाय
आल्याचा आणि लिंबाचा रसदेखील कान साफ करण्यास मदत करतात. कानात आल-लिंबाचा रस टाकल्यानंतर अर्धा तासाने कापसाच्या गोळ्याने कान स्वच्छ करा.

तुळशीचा रस, कांद्याचा रसदेखील फायदेशीर ठरतो. यामुळे कानातील मळ मोकळा होतो. या घरगुती उपायांनी कानदुखीचा किंवा कानातील मळ मोकळा होण्याचा त्रास कमी न झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तणावग्रस्त जीवनशैलीचा आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होत असतो. त्यापैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. उच्चरक्तदाबाच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. हृद्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी औषधोपचार फायदेशीर आहेत. मात्र औषधाच्या मार्‍यामुळे आरोग्यावर परिणाम होतात. मग ही औषध कमी करायची असतील तर त्यासोबत आहारात काही पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर आहे.

आहाराचं पथ्यपाणी
औषधांशिवाय तुम्हांला रक्तदाबावर नियंत्रण ठेवायचं असेल तर आहाराचं पथ्यपाणी सांभाळा. आहारामध्ये फळं, पालेभाज्या, लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स, मीठाचा समावेश कमी करा. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात हवेत हे '5 पदार्थ

मांसाहार कमी करा -
बोनलेस चिकन, मासे, रेड मीट, समुद्रातील मासे टाळणं हेच उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे. आहारात ताजी फळ आणि भाज्यांचा समावेश वाढवणं अधिक फायदेशीर आहे.


चालणं -
नियमित चालणं किमान इतका व्यायाम केलात तरीही तुम्हांला अनेक आजारांचा धोक दूर ठेवायला मदत होईल. तुम्ही फिजिकली अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. आठवड्यातून किमान 5 दिवस अर्धा तास चालणं हा रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फार महत्त्वाचा व्यायाम आहे. ही योगासने ठेवतात रक्तदाब नियंत्रणात

वजन घटवणं -
कंबरेचा वाढता घेर हा उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फार त्रासदायक ठरतो. आहारात आणि व्यायामात बदल करून तुम्ही पोटाजवळील चरबी नक्कीच हटवू शकता.

सोडीयम घटक कमी करा -
उच्च रक्तदाबाचा त्रास वाढण्यामागे आहारातील सोडियमचे वाढते प्रमाण कारणीभूत ठरते. त्यामुळे खारावलेले पदार्थ, अळणी पदार्थांवर वरून मीठ टाकून खाणं टाळा. त्याऐवजी आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश वाढवा. केळं, भोपळ्याच्या बीया अधिक फायदेशीर आहेत.

मद्यसेवनावर नियंत्रण -
मद्यपान हे आरोग्याला अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेतल्यानंतर किंवा आधी मद्यपान करत असलात तर त्यामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो.

ताण तणाव कमी करा -
ताण तणावापासून पूर्णपणे दूर राहणं शक्य नाही. मात्र त्याच नियोजन करता येऊ शकतं. मानसिक धक्का बसेल किंवा तणाव अचानक वाढेल अशा परिस्थितींपासून शक्यतो दूर रहा. तुमच्या आवडत्या छंदामध्ये, योगाभ्यासामध्ये मन रमवा. यामुळे हळूहळू ताण हलका होण्यास मदत होते.

Dr. D. Malekar
Dr. D. Malekar
MBBS, Family Physician, 21 yrs, Pune
Dr. Hema Chandrashekhar
Dr. Hema Chandrashekhar
BAMS, Ayurveda Family Physician, 28 yrs, Pune
Dr. Mahesh Zagade
Dr. Mahesh Zagade
BHMS, Homeopath General Physician, 3 yrs, Pune
Dr. Krishnath Dagade
Dr. Krishnath Dagade
BAMS, General Physician Family Physician, 28 yrs, Pune
Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune
Hellodox
x