Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

आजच्या धावपळीच्या जीवनात केसांचं पोषण होणं खूप गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यामुळेच केस मोठ्या प्रमाणात गळतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याच्या आधीही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याआधी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकतात.

१. एरंडेल, ऑलिव्ह किंवा बदाम यापैकी दोन प्रकारचे तेल एकत्र करून लावावे. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल आणि केस गळणे थांबेल.

२. केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नये. गरम पाण्यामुळे तुमचे केस कडक आणि कोरडे होतात.

३. अंघोळीआधी केसांना दही आणि अंडं यांचे मिश्रण लावावे. हे मिश्रण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर मानले जाते. मध आणि दही यांचे मिश्रणही कंडिशनर म्हणून वापरता येईल.

४. काळी डाळ रात्री भिजत ठेवावी. त्यानंतर सकाळी ती व्यवस्थित वाटून त्यात अंडं, लिंबाचा रस आणि दही टाकून ती केसांना लावल्याने फायदा होतो.

५. केस धुण्यापूर्वी केसांना तेला लावून २० मिनिटं मालिश करावी.

शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी कमी किंवा प्रमाणात जेवण करायचं असल्यास एकट्याने जेवण करा. मित्र, कुटुंबासोबत व्यक्ती अधिक प्रमाणात जेवण करत असल्याचं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

एकत्रित जेवण करताना व्यक्ती अधिक जेवण करतो. तर एकट्याने जेवताना, एकत्र जेवण्यापेक्षा कितीतरी पट व्यक्ती कमी जेवण करतो, असं अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अध्ययनातून समोर आलं आहे.

ब्रिटनमध्ये, बर्मिघम विद्यापिठातील संशोधक हेलेन रुडॉक यांनी सांगितलं की, आम्हाला असे पुरावे सापडले आहेत की, एखादी व्यक्ती एकट्याने खाण्यापेक्षा कुटुंब आणि मित्रांसह अधिक खाते.


गेल्या काही अध्ययनातून असं समोर आलं की, एकट्याने जेवणाऱ्यांच्या तुलनेत, एकत्रित भोजन करणाऱ्यांनी ४८ टक्के अधिक भोजन ग्रहण केले. तर स्थूलतेने ग्रासलेल्या महिलांनी एकत्रित भोजन करणाऱ्यांच्या तुलनेत २९ टक्के अधिक भोजन केले.

मित्र, कुटुंबांसोबत भोजन करताना जेवणाची मात्रा वाढते. तसंच एकत्रितपणे जेवण करणं आनंददायीही असल्याने, व्यक्ती मित्र, कुटुंबासोबत एकत्र जेवताना अधिक भोजन ग्रहन करत असल्याचे काही संशोधकांनी अभ्यासातून सांगितलं आहे.

सध्या स्ट्रेट हेअरचा ट्रेंड आहे. हेअर स्ट्रेट करण्यासाठी अनेक उपकरने बाजारात उपलब्ध आहेत. परंतू त्या उपकरनांमुळे केसांचे नुकसान देखील होते. त्याचप्रमाणे यासाठी लोकं महागडे ट्रीटमेंट करतात. पण घरातही तुम्ही आता स्ट्रेट करू शकता. हे उपाय केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

व्हिनेगर : केसांना शैम्पू केल्यावर कंडिशनर करा. कंडीशनरनंतर गार पाण्यात व्हिनेगरचे काही थेंब टाकावे त्यानंतर केस धुवावे.

केळी आणि मध : दोन केळी बारीक करून त्यात २ चमचे मध, २ चमचे ऑलिव्ह तेल आणि २ चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट आपल्या पूर्ण केसांवर लावून शॉवर कॅपने केस कव्हर करा. अर्ध्या तासाने केस धुऊन टाका.

एरंडेल तेल : गरम एरंडेल तेल ने मालीश करा. नंतर गरम टॉवेलने केसांना वाफ द्या आणि ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्यात धूवा.

आता सर्वच महिला त्याचप्रमाणे पुरूष देखील सतत आकर्षक आणि उठाव दिसण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात. त्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधने देखील बाजारात उपलब्ध आहेत. परंतू हे रसायन मिश्रीत प्रसाधने काहींच्या त्वचेला घातक ठरतात. त्यामुळे अशा व्यक्तिंच्या त्वचेसाठी लसून एकमेव उपाय आहे.

स्ट्रेच मार्क्स दूर होतात : अनेकांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स असतात. हे स्ट्रेच मार्क्स लठ्ठपणामुळे, आनुवंशिकता किंवा इतर कारणांमुळे शरीरावर येत असून ते लवकर जात नाही. लसणाचा रस काढून हा रस ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळा. हे मिश्रण गरम करा आणि थंड झाल्यानंतर ते स्ट्रेच मार्क्सवर लावून मसाज करा. दररोज हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवू शकतो.

चेहऱ्यावरील मुरूम दूर होतात : लसूण घासून त्याचा रस काढून घ्या आणि हा रस चेहऱ्यावरील मुरुमांवर लावा. ५ मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या. या उपायाने तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

आपले ओठ अधिक सुंदर दिसावेत यासाठी महिला लिपस्टिकचा वापर करतात. मात्र, लिपस्टीकमध्ये असलेल्या केमीकल्समुळे ओठांवर याचा दुष्परीणाम होवून ओठ काळे पडतात. चेहऱ्याचे सौंदर्य ओठांवर अवलंबून असते आणि ओठांची त्वचा संवेदनशील असल्याने हवामानाचा ओठांवर लवकर प्रभाव दिसून येतो. त्यामुळे ओठांचे आरोग्य राखण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा.

- ओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस ओठांवर लावा. यामुळे काळसरपणा तर दूर होईल शिवाय ओठांचा ओलावाही वाढण्यास मदत होईल.

- साखर आणि मध प्रत्येकी एक चमका घ्यावे. यात आल्याचा एक तुकडा बारीक कापून टाकावा हे मिश्रण व्यवस्थीत मिसळुन जेलप्रमाणे नियमित ओठांना लावावे.

- लिपस्टिकच्या अती वापरामुळे ओठांचे नुकसान होते. यासाठी बीटरूटचा एक तुकडा, मसाज केल्यासारखा हळूवारपणे ओठावरून फिरवा. यामुळे ओठांचे आरोग्य टिकून सौंदर्यही वाढण्यास मदत होईल.

Dr. Vishnu Gawande
Dr. Vishnu Gawande
BHMS, Family Physician, 9 yrs, Pune
Dr. Shubham Hukkeri
Dr. Shubham Hukkeri
BPTh, 1 yrs, Mumbai
Dr. Sachin  Bhor
Dr. Sachin Bhor
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Sonawane Shivani
Dr. Sonawane Shivani
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 3 yrs, Pune
Dr. Sanjay  Salve
Dr. Sanjay Salve
MBBS, Orthopaedics, 16 yrs, Pune
Hellodox
x