Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी, फीटनेससाठी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी आहार, व्यायामाचं गणित सांभाळणं आहे. पण यासोबतच तुम्हांला झोपेचं चक्र सांभाळणंदेखील गरजेचे आहे. मात्र आपल्या काही सवयींमुळे झोपेमध्ये बिघाड होऊ शकतो. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणूनच चुकूनही झोपण्यापूर्वी या गोष्टी करू नकाच.

चहा, कॉफी पिणं
अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी पिण्याची सवय असते. मात्र रात्री झोपण्यापुर्वी चहा, कॉफी पिण्याची सवय आरोग्याला त्रासदायक आहे. कॅफीन घटकामुळे झोप बिघडते सोबतच रात्री सतत वॉशरूमला जाण्याची सवय बळावते.

उशीरा जेवणं
धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, व्यस्त कामामुळे अनेकांना रात्री घरी पोहचण्यास उशीर होतो. नाईट शिफ्टमध्ये काम करावं लागत असल्याने अनेकांना रात्री जेवणाची वेळ पाळता येत नाही. रात्रीची झोप आणि जेवणाची वेळ यामध्ये वेळ पाळणं गरजेचे आहे.

गोड पदार्थ टाळा
रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय टाळा. जेवतानाही सुरूवातीला गोड आधी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण साखरेचे रक्तात रूपांतर करायला अधिक वेळ लागतो. यामुळे वजन वाढण्याचा धोका बळावतो.

मोबाईलचा वापर
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करणं टाळा. मोबाईल किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या स्क्रिनवरील रेडिएशनचा झोपेवर परिणाम होतो. म्हणून झोपण्यापूर्वी तसेच जेवतानाही मोबाईल, टीव्ही स्क्रिनचा वापर टाळा. ..

गरोदरपणाचा काळ संपल्यानंतर पोटावर स्ट्रेचमार्क येतात. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर काही दिवसातच जेव्हा तुमचं पुन्हा रूटिन सुरू होतं तेव्हा स्ट्रेचमार्कमुळे काही कपडे घालण्यावर बंधनं येतात. क्रॉप टॉप, लो वेस्ट जीन्स घालताना स्ट्रेचमार्क दिसू नयेत म्हणून प्रयत्न सुरू होतात. अशावेळेस स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरणार आहेत. सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य !

अंड्यांचा पांढरा बल्क -
स्ट्रेच मार्क्सच्या भागाला नीट स्वच्छ करा. त्यावर अंड्याचा पांढरा भाग लावा. हे सुकल्यानंतर पुन्हा थंड पाण्याने पोटाजवळचा भाग स्वच्छ करा. त्यानंतर ऑलिव्ह ऑईलचा मसाज करा.

बटाटा -
बटाट्याचा रस काढा. हा रस स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर लावा. तीन आठवडे हा उपाय नियमित करा. हळूहळू स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल.


कोरफड -
स्ट्रेचमार्क्सवर कोरफडीचा गर नियमित लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने सारा भाग स्वच्छ करा. सलग काही आठवडे हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास दूर होईल.

तेलाचा मसाज -
तेलाचा मसाज नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल. याकरिता नारळ, बदाम, ऑलिव्ह ऑईलचा मसाज करणं फायदेशीर ठरत.

कॉफी आणि कोरफड पॅक -
कॉफी आणि कोरफडीचा गर एकत्र मिसळा. हा पॅक स्ट्रेच मार्कवर लावा. 15-20 मिनिटांनी हा पॅक पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर मॉईश्चरायझर क्रिम लावा. महिनाभार हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सच्या त्रासातून तुमची सुटका होऊ शकते.

आहारात पुदिन्याचा वापर करणं फायदेशीर आहे. हे तुम्हांला ठाऊक असेल. नेहमीच्या वाटपापासून ते अगदी मिंट मोहितोसारख्या ड्रिंकमध्ये आपण हमखास पुदीन्याचा वापर करतो. पुदीना थंड प्रवृत्तीचा आणि रेचक असल्याने पचनकार्य सुरळीत करण्यासाठी त्याचा हमखास वापर केला जातो. पण हाच पुदीना त्वचेला खुलवण्यासाठीदेखील केला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का?

आरोग्यदायी पुदीना
पचनक्रिया सुधारण्यासोबतच तोंडातील दुर्गंधीचा त्रास कमी करण्यासाठीदेखील पुदीना फायदेशीर ठरतो. त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील पुदीन्याचा वापर केला जातो.

त्वचेसाठी पुदीना कसा ठरतो फायदेशीर ?
पुदिन्याच्या पानांमध्ये मिन्थॉल आणि अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. उन्हात फिरल्यामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुदिना फायदेशीर ठरतो. चेहर्‍यावर अ‍ॅक्ने, ब्रेकआऊट्स, सनबर्न, त्वचा लालसर होणं, रॅशेस येणं अशा समस्यांवर ते परिणामकारक ठरतं. त्वचाविकारांना दूर ठेवण्यासाठीदेखील पुदीन्याची पानं फायदेशीर आहेत.


कसा कराल पुदीन्याच्या पानांचा समावेश?
त्वचेसाठी मुलतानी माती गुणकारी आहे हे तुम्हांला ठाऊकच आहे. प्रामुख्याने तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये त्वचेशी निगडीत अनेक समस्या वाढतात. त्वचेतील तेल दूर करण्यासाठी, क्लिंजिंगसाठी मुलतानी मातीसोबतच पुदीनाही फायदेशीर ठरतो.

मुलतानी माती, ताजी पुदिन्याची पानं, मध आणि दही एकत्र करा. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटं त्वचेवर लावा. फेसपॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याच्या मदतीने हा पॅक काढून टाका. या पॅकमुळे त्वचा मॉईश्चराईज होण्यास मदत होते.

गुलाबपाणीदेखील त्वचेची पीएच व्हॅल्यू सुधारण्यास मदत करतात. यामधील दाहशामक गुणधर्म त्वचेचे सौंदर्य खुलवते. पुदीन्याच्या पानांसोबत मध आणि गुलाबपाणी मिसळणंदेखील फायदेशीर आहे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

ऋतूमानामध्ये बदल झाला की सहाजिकच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. साथीचे आजार जसे पसरतात तसेच त्वचेवरही त्याचा परिणाम दिसून येतो. अनेकांना स्किन पिलिंगचा त्रास होतो. वेळीच लक्ष न दिल्यास हा त्रास भयंकर स्वरूप घेऊ शकतो. स्किन पिलिंगचा त्रास वेदना नसल्याने अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. मात्र घरगुती उपायांनी त्यावर मात करण्यास मदत होते.

स्किन पिलिंगचा त्रास कसा ठेवाल आटोक्यात ?
रोज बाऊलभर कोमट पाण्यात 10 मिनिटं हात बुडवा. तुमच्या इच्छेनुसार यामध्ये मध आणि लिंबाचा रसदेखील मिसळू शकता. या पाण्यामध्ये हात बुडवल्याने हाताची त्व्चा मुलायम होते आणि शुष्क त्वचा होण्याचं प्रमाण कमी होते.

व्हिटॅमिन ई युक्त तेल
स्किन पिलिंगचा त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ईयुक्त तेलाचा वापर करा. नियमित या तेलाच्या मालिशामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते.


ओट्स
बाऊलभर कोमट पाण्यामध्ये ओट्स मिसळा. ओट्स मऊ झाल्यानंतर 10-15 मिनिटं त्यामध्ये हात बुडवून ठेवावेत. त्यानंतर हात साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. हात कोरडे केल्यानंतर मॉईश्चरायझर लावा.

कोरफड
झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर हातावर लावा. काही वेळ मसाज करून झोपावे. सकाळी कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवावेत. त्यानंतर मॉईश्चराझर लावा. यामुळे स्किन पिलिंगचा त्रास कमी होतो.

स्किन पिलिंगचा त्रास कायम राहिल्यास केवळ नैसर्गिक उपायांवर अवलंबून राहू नका. वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.

अनेकजण सकाळी उठल्यावर ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात करतात. कोमट पाणी प्यायल्याने तुम्हांला अधिक फायदा होऊ शकतो. हे ठाऊक आहे का ? सामान्यपणे दिवसाला 7-8 ग्लास पाणी पिणं गरजेचे आहे. शरीराला आवश्यक पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सोबतच त्वचेचं सौंदर्य खुलते, घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते.

सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने त्वचा आरोग्यदायी होते. पाण्यामुले रक्तामध्ये मिसळणारे अनेक घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे रक्त शुद्ध होते. त्वचा अधिक चमकदार होते.

रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांचेही कार्य सुधारते. मसल्स अधिक मजबूत होतात.


कोमट पाण्यामुळे शरीराचे मेटॅबॉलिझम देखील सुधारते. त्यामुळे वजन घटवण्यास मदत होते.

नियमित कोमट पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने कॅन्सर, टीबी सारखे आजारांचा धोका कमी होतो. किडनी, युरिन इंफेक्शनचा त्रास कमी होण्यासही मदत होते.

पोटदुखी, पोटात गॅस होणं, डोकेदुखी, उलट्या होणं अशा समस्यांवरही कोमट पाणी पिणं फायदेशीर आहे.

सकाळी कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्याने रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास मदत होते.

बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठीदेखील सकाळी कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते.

Dr. Surekha Borade
Dr. Surekha Borade
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda General Physician, 16 yrs, Raigad
Dr. Prasang Bharadwaj
Dr. Prasang Bharadwaj
MBBS, General Medicine Physician General Physician, 3 yrs, Mumbai
Dr. Rajesh Jagdale
Dr. Rajesh Jagdale
BAMS, Pune
Dr. Rajendra kadam
Dr. Rajendra kadam
BAMS, Ayurveda, 10 yrs, Pune
Dr. Praisy David
Dr. Praisy David
BAMS, Pune
Hellodox
x