Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

चेहर्‍यावर पिंपल्स किंवा अ‍ॅक्ने वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. आता हा त्रास कोणत्याच विशिष्ट वयोगटापुरता सीमित राहिलेला नाही. प्रदूषण, ताणतणाव, खाण्या पिण्याच्या सवयी, हार्मोन्समध्ये होणारे चढ उतार अशा अनेक कारणांमुळे अ‍ॅक्नेचा त्रास उद्भवतो. अ‍ॅक्नेचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्हांला त्याचं नेमकं कारण ठाऊक असणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावर उपाय करता येऊ शकतो. मग अशा उपचारांचा अधिक सकारात्मक परिणाम दिसावेत असे तुम्हांला वाटत असेल तर आहारात काही पदार्थांचा समावेश टाळणं गरजेचे आहे.

लो फॅट प्रोडक्ट -
आहारत प्रामुख्याने लो फॅट पदार्थांचा समावेश करताना त्यामधील फॅट काढले तरीही साखर मिसळली जाते. यामुळे त्याचा फ्लेवर तसाच ठेवला जातो. जर्मन क्लिनिकल डर्मटॉलॉजीच्या एका अभ्यासानुसार, साखरेमुळे शरीरात कोलायजन फायबरचं नुकसान होते. हे नुकसान भरुन काढणं कठीण जातं.

ब्रेड -
युरोपियन जर्नल ऑफ डर्मटॉलॉजीच्या अहवालानुसार, एका अभ्यासानुसार, ग्लुटन इंटॉलरन्स आणि पिंपल्स हे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे तुम्हांला ग्ल्यूटन इंटॉलरन्सचा त्रास असेल तर ग्ल्युटनयुक्त पदार्थ आहारात टाळा.


स्किम मिल्क -
जर्नल ऑफ अमेरिकन अ‍ॅकेडमी ऑफ डर्मटॉलॉजीमध्ये छापण्यात आलेल्या अभ्यासानुसार, स्किम मिल्क पिणार्‍यांमध्ये इतरांच्या तुलनेत पिंपल्सचा त्रास अधिक असतो. दूधातील हार्मोन्स आणि बायोअ‍ॅक्टिव्ह मॉल्युकल्स त्वचेशी निगडीत समस्या वाढवतात.

फ्रुट स्मुदी -
स्मुदीज आरोग्यदायी असतात परंतू बाजारात मिळणार्‍या पॅकेटबंद किंवा अति फ्रुक्टोजचा समावेश असणार्‍या स्मुदीज टाळा. जर्नल एक्सपरिमेंटल डायबेटीस रिसर्चच्या अहवालानुसार फ्रुक्टोजचा आहारात अधिक समावेश केल्यास त्वचेला नुकसान होते.

सोयाबीन ऑईल -
सोयाबीनच्या तेलामध्ये ट्रान्सफॅट आणि ओमेगा 6 मुबलक प्रमाणात असते. जर्नल ऑफ क्लिनिकल अ‍ॅन्ड एस्थेस्टिक डर्मटॉलॉजीच्या अहवालानुसार, या तेलामुळे त्वचेचे नुकसान होते.

वातावरणामध्ये थोडासा बदल झाला की लगेजच सर्दी, खोकला, व्हायरल इंफेक्शन वाढते. अशामध्ये अनेकदा खोकल्यामुळे घशाजवळ खवखव जाणवते. हा त्रास वेदनादायी असतो त्या सोबतच यामुळे चिडचिड होते. खोकला किंवा कफ कमी झाला असला तरीही खवखवीमुळे बोलताना, गिळताना त्रास होतो. यामुळे अशा समस्यांवर डॉक्टरांच्या उपचारापेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

का ठरते लवंग फायदेशीर ?
लवंगामध्ये फेनोलिक कम्पाऊंड्स असतात.त्यामधील दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे वेदना, कफाचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे घशातील खवखव कमी होण्या सोबतच खोकल्यामुळे घसा दुखत असल्यास त्याच्या वेदना कमी होतात. लवंगामधील इसेन्शिअल ऑईल श्वसनाचा मार्ग मोकळा करण्यास मदत करते.

सुक्या खोकल्यामुळे होणारा त्रासही कमी करण्यास लवंग फायदेशीर ठरते. अ‍ॅन्टीव्हायरल आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकून रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

कसा कराल लवंगाचा वापर ?
लवंग आणि सैंधव मीठाचे मिश्रण एकत्र करून चघळावे. यामुळे घरातील खवखव कमी होते. यामुळे दाह कमी होण्यास मदत होते. नाक, अन्ननलिका आणि तोंडातील मार्ग मोकळा होण्यास मदत होते. सुका खोकला किंवा दीर्घकाळ चालणार्‍या खोकल्याचा त्रास कमी करण्यास मदत होते. हा उत्तम घरगुती उपाय आहे.

खोकल्याचा त्रास खूप होत असल्यास लवंग भाजून ती चघळावी. लवंगाचे तेल मधात मिसळून प्यायल्यास खोकल्याचा त्रास कमी करण्यास मदत होते. घरी लवंगाचे तेल नसल्यास मधामध्ये लवंग बुडवून चोखावी. यामधील दाहशामक घटक त्रास कमी करतात.

Under eye skin is one the most delicate parts of our body. Consuming alcohol, lack of sleep, ageing, caffeine and lack of proper intake of water can result in dark circles around our eyes. Sometimes dark circles are so stubborn that we end up trying all the possible remedies in attempts to get rid of them but no happy results. What we usually don't think of is that maintaining a better lifestyle and consuming vitamin-rich food may help us in getting rid of these dark circles. We need to be more conscious about the intake of our food. Consuming foods that are rich in vitamin K, vitamin C, vitamin A and vitamin E may help in reducing your dark circles. Drinking at least 2 litres of water every day and taking eight hours of sleep daily can fix the problem. Hydrating foods, mineral-rich foods and the foods that have circulation-boosting antioxidants are a plus.

Having said that, we have rounded up a list of foods that may help you to get rid of your dark circles:

Cucumber

Cucumber is a classic beauty food that has a high-water content, which hydrates our body and helps to fight against dark circles. It contains collagen-boosting silica, skin-strengthening sulphur along with vitamins A, C, E, and K, which increase the elasticity of blood vessels and helps remove the dark circles.

Watermelon

Watermelon has a high-water content, almost 92%, which helps to balance the water ratio in our body. It also contains beta carotene, lycopene, fibre, vitamin B1 and B6, vitamin C, potassium, and magnesium that support our eye health.

Tomato

Tomato consists of powerful antioxidants that help in protecting the delicate blood vessels under our eyes and further encourages better blood circulation. Tomatoes are also rich in lycopene, lutein, beta carotene, quercetin, and vitamin C that are known for maintaining healthy skin regime.

Sesame

Sesame is regarded as a 'magic food', and you ask why? It is rich in vitamin E that helps to ease the formation of dark circles. It is known to eliminate the dark circles by nourishing the eyes and the ocular.

Black Currant

Black currant is known to improve our blood circulation, especially to the optical nerve of our eyes. It contains anthocyanins that supply more oxygen to the tissues, further helping to reduce dark circles under the eyes.

By eating these foods, you may get rid of your dark circles naturally. But, remember dark circles take time to cure and require great discipline. A regular healthy diet and skin care program should be followed to notice the positive change.

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे. या समस्येबाबत फार खुलेपणाने बोलले जात नसल्याने अनेकजण मूळव्याधीचा त्रास सहन करतात. मात्र यामुळे ही समस्या अधिक गंभीर होते. कालांतराने मूळव्याधीच्या वेदनादायी समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते. म्हणूनच हा त्रास अत्यंत गंभीर होऊ नये म्हणून सुरुवातीच्या टप्प्यावरच या आजाराकडे लक्ष देणं गरजेचे आहे.

मूळव्याधीची लक्षणं कोणती ?
खाज येणे - गुद्द्वाराजवळ खाज येणे हे मूळव्याधीतील एक प्रमुख लक्षण आहे. त्यामागील निदान करण्यासाठी अ‍ॅनल पॅथोलॉजी करावी. हा त्रास कमी न झाल्यास त्वचेवर इंफेक्शन पसरण्याची शक्यता असते.

वेदना जाणावणे - वैद्यकीय सल्ल्यानुसार, शौचाच्या ठिकाणी वेदना किंवा त्रास जाणवणे हे मूळव्याधीचे लक्षण आहे. कोलनोस्कॉपी किंवा एमआयआर सारख्या निदान पद्धतीतून त्याचे योग्यपद्धतीने निदान होऊ शकत नाही. त्यामुळे गुद्द्वाराजवळ तीव्र वेदना जाणवत असल्यास गॅस्ट्रोइंटरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. काही लोकांना फिशरच्या त्रासामध्येही वेदना जाणवू शकतात.

सूज, गाठ - अनेकांना गुद्द्वाराजवळ गाठ किंवा सूज आढळत असल्यास त्याकडे लक्ष द्यावे. कॅन्सरची गाठ गुद्द्वाराजवळ आढळण्याची वेळ फारशी येत नाही. मात्र मूळव्याधीमध्ये हे लक्षण आढळून येते.

शौचाच्यावेळी वेदना - मूळव्याधीच्या त्रासामध्ये गुद्द्वाराजवळील रक्तवाहिन्यांवर दाब आल्याने मलविसर्जनाच्या वेळेस रक्त पडते. सोबतच वेदना जाणवतात. त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा आयबीएसच्या त्रासापेक्षा मूळव्याध अधिक तीव्र असतो. यामध्ये पोटाच्या खालच्या बाजूला वेदना होतात.

शौचातून रक्त पडणे - पोटाच्या कॅन्सरपासून ते मूळव्याधीपर्यंत रक्त पडणे हे लक्षण आढळून येते. त्यामुळे तुम्हांला हे लक्षण आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मूळव्याध किंवा इतर कोणत्या नेमक्या आजारामुळे हा त्रास होत आहे हे वेळीच समजणं गरजेचे आहे.

आवळा हा अत्यंत औषधी आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्याचबरोबर शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते. आवळ्याचे सेवन जितके फायदेशीर आहे. तितकेच त्याचे तेलही केसांसाठी उपयुक्त आहे. आवळ्याचे गुणधर्म जाणून तुम्ही बाजारातील तेल वापरता? पण त्यात केमिकल्स असण्याची शक्यता असते. तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आवळ्याचे तेल बनवू शकता. पाहा तेल बनवण्याची प्रक्रिया...

आवळ्याचे तेल बनवण्याची कृती
आवळ्याचे तेल बनवण्यासाठी आवळा कापून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर पेस्ट खोबरेल तेलात घालून आठवडाभरासाठी बाटली बंद करुन ठेवा. आठवडाभरानंतर तेल गाळून घ्या. आवळ्याचे तेल तयार.

तेल वापरण्याची पद्धत
आठवड्यातून दोनदा तेलाने स्कॉल्पला मसाज करा. मसाज हलक्या हाताने बोट्यांच्या साहाय्याने करावा. त्यानंतर ३०-४० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा.

तेल लावण्याचे फायदे

आवळ्याचे तेल कॅल्शियम, व्हिटॉमिन सी, आयर्न आणि फॉस्फोरस याने युक्त असते. त्यामुळे केस आणि स्कॉल्प हेल्दी राहण्यास मदत होते.

याशिवाय केस पांढरे होण्यास आळा बसतो.

केस मजबूत व दाट होतात.

केस वाढण्यास मदत होते.

केस मऊ मुलायम होतात.

Dr. Jetin Anand
Dr. Jetin Anand
BAMS, Ayurveda Clinic, 12 yrs, Mumbai Suburban
Dr. Sandeep Jagtap
Dr. Sandeep Jagtap
MD - Allopathy, HIV Specialist Pain Management Specialist, 15 yrs, Pune
Dr. Dr.Rajendra  Chavat
Dr. Dr.Rajendra Chavat
MBBS, Family Physician, 35 yrs, Pune
Dr. Ashwinikumar Kale
Dr. Ashwinikumar Kale
MD - Homeopathy, Homeopath Gynaecologist, 10 yrs, Pune
Dr. Pruthviraj  Ugale
Dr. Pruthviraj Ugale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diabetologist, 1 yrs, Pune
Hellodox
x