Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

लेप्टोस्पायरोसिस हे एक बॅक्टेरियल इंफेक्शन आहे. साचलेल्या पाण्यात प्राण्यांच्या मूत्र आणि विष्ठा मिश्रीत झाल्यानंतर Leptospira interrogans या बॅक्टेरियाची वाढ होते. साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर शरीरातील जखमा, ओरखड्यांच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया शरीरात जातात. क्वचित प्रसंगी हे इंफेक्शन माणसातून पसरू शकते.

लक्षणं कोणती?
लॅप्टोची लागण झाल्यानंतर डोकेदुखी, उलट्या, स्नायूंचे दुखणे, थंडी वाजणं, त्वचेवर रॅश येणे अशा समस्या वाढतात. लॅप्टोच्या लक्षणांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ श्कते. अन्यथा हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

लॅप्टोच्या आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी काही घरगुती उपाय
पुरेसे पाणी -
लॅप्टोचा त्रास अतिशय गंभीर असल्यास शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. काही वेळेस रूग्णांमध्ये काविळीचा त्रासही होतो. अशावेळेस शरीरात पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणृ आवश्यक आहे. मीठ,साखर आणि पाण्याचे मिश्रण पिणे फायद्याचे ठरते.


आल्याचा वापर -
लॅप्टोसोरायसिसचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी आलं अत्यंत फायदेशीर आहे. आल्यातील दाहशामक घटक अवयवांचं नुकसान टाळण्यासाठी मदत करते असे एका प्रयोगातून समोर आलं आहे. आहारात सूप, डाळ यांच्यामध्ये आल्याचा वापर करा. आले - आरोग्यासाठी हे पाच फायदे

हळद -
हळदीमध्ये दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हळद अत्यंत फायदेशीर आहे. हळदीच्या दुधाचे होतात 10 फायदे

कचर्‍याच व्यवस्थापन -
उंदीर किंवा इतर उपद्रवी प्राणी कचर्‍यांकडे अधिक आकर्षित होतात. त्याअमुळे पावसाळ्याच्या दिवसात घाणीचं साम्राज्य पसरू नये याकडे लक्ष देणं गरजेचे आहे.

स्विमिंग करताना काळजी घ्या
पावसाळ्याच्या वर्षासहलींमध्ये किंवा फीटनेस रीजिमचा एक भाग म्हणून स्विमिंग करत असाल तर काळजी घ्या. स्विमिंग करण्यापूर्वी पाणी स्वच्छ आहे की नाही ? याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. तुमच्या त्वचेवर जखमा असतील तर पावसाळ्यात स्विमिंग करताना काळजी घ्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढवा -
पावसाळ्याच्या दिवसात व्हायरल, बॅक्टेरियल इंफेक्शन वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लेप्टोसोबतच इतर आजार दूर ठेवण्यासाठी आहारात व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ,लसूण, प्रो बायोटिक्सचा समावेश वाढवा.

आजकाल लाईफस्टाईलमध्ये इतके बदल झाले आहेत की त्याचा कळत नकळत आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशामधूनच तरूणांमध्ये वाढणारी एक समस्या म्हणजे 'निद्रानाश'. निद्रानाशाची समस्या अनेकांना क्षुल्लक वाटते. निद्रानाशेवर वेळीच उपचार न केल्यास त्यामधून अनेक आजार वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच औषधगोळ्यांऐवजी काही घरगुती उपायांनी निद्रानाशेच्या समस्येवर उपाय करणं शक्य आहे.

केळं फायदेशीर
निद्रानाशेचा त्रास दूर करण्यासाठी केळं हे अत्यंत फायदेशीर आहे. केळं बारमाही उपलब्ध असल्याने त्याचा आहारात समावेश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. केळ्याच्या सेवनाने शरीराला तात्काळ उर्जा मिळते. वाफवलेलं केळं निद्रानाशाची समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत करते.

आरोग्याला फायदेशीर
रात्री झोप येत नसल्यास केळं खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. केळ्यातून कॅल्शियम घटक मिळतात यामुळे हाडं मजबूत होतात.


निद्रानाशेची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी केळ्याचा सालीसकट आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे शांत झोप मिळणयस मदत मिळते.

कसा बनवाल केळ्याचा काढा ?
कपभर पाणी उकळा. त्यामध्ये दालचिनीची पावडर मिसळा. उकळी आल्यानंतर त्यामध्ये पिकलेल्या केळ्याचे लहान लहान तुकडे टाका. काही वेळाने हे मिश्रण गाळून थंड करून प्या. प्रामुख्याने रात्री झोप न येणार्‍यांमध्ये हा काढा अत्यंत फायदेशीर आहे. केळ्याच्या सालीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते.

अनेकदा नवीन चप्पल किंवा सॅंडल घातल्याने पायाला इजा होते. पायाची त्वचा निघते, जळजळ होते. चप्पल, सॅंडल घालून चालणे कठीण होते. याचा अनुभव तुम्हीही नक्कीच घेतला असेल. अशावेळेस पाय ओलसर राहिल्यास अल्सर होण्याची शक्यता वाढते. यावर काही सोपे घरगुती उपाय कामी येतील. तसंच याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तर तुम्ही करुन पाहा हे घरगुती उपाय..

कोरफड
कोरफड बहुगुणी आहे, हे आपण जाणतोच. त्यामुळे शू बाईट झाल्यानंतर त्यावर कोरफड जेल लावा. त्यामुळे सूज कमी होऊन जळजळीवर आराम मिळेल. त्याचबरोबर याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. कोरफड जेल पूर्णपणे सुकल्यावर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा. अधिक चांगल्या परिणामांसाठी कोरफड जेल दिवसातून दोनदा लावा.

ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये अॅंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यातील अॅंटीऑक्सीडेंट आणि व्हिटॉमिन्स वेदना, सूज कमी करतात. गरम पाण्यात ग्रीन टी आणि बेकिंग सोडा घाला. टी बॅग थंड झाल्यावर काही वेळ शू बाईट झालेल्या ठिकाणी लावा. बेकिंग सोड्यातील अॅँटीसेप्टीक गुणधर्मांमुळे इंफेक्शनला आळा बसतो. असे दिवसातून २-३ वेळा करा. लवकर आराम मिळेल.


मीठ
शू बाईटमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी थंड पाण्यात मीठ घाला. पाण्यात कपडा घालून शू बाईटवर लावा. या कपड्याने १५ मिनिटे पाय शेका. सूज आणि वेदन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

अॅपल व्हिनेगर
शू बाईट दूर करण्याचा हा सोपा घरगुती उपाय आहे. अॅपल व्हिनेगर कापसाच्या बोळ्यावर घेऊन शू बाईटवर लावा. त्यामुळे वेदना, सूज कमी होईल. इंफेक्‍शन दूर होण्यास मदत होईल. कांद्याच्या पेस्टमध्ये अॅपल व्हिनेगर घालून शू बाईटवर लावा आणि सुकल्यानंतर पाण्याने धुवा. यामुळे नक्कीच आराम मिळेल.

एरंडेल तेल
कोरडेपणा, खाज, त्वचेचा लालसरपणा दूर करण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त ठरते. रात्री झोपण्यापूर्वी शू बाईटवर एरंडेल तेल लावा.

पेट्रोलिअम जेली
फक्त फाटलेल्या ओठांसाठी नाही तर शूट बाईट दूर करण्यासाठीही पेट्रोलिअम जेली फायदेशीर ठरते. यामुळे वेदना आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. पाय दिवसातून दोनदा १५ मिनिटांसाठी पाण्यात बुडवून ठेवा. नंतर टॉवेलने कोरडे करा आणि त्यावर पेट्रोलिअम जेली लावा. गरम पाण्यामुळे वेदना आणि इंफेक्‍शन दूर होईल. तर पेट्रोलिअम जेली त्वचा मॉईश्चराईज ठेवण्यास मदत करेल.

तणावग्रस्त आणि झपाट्याने बदलत जाणार्‍या आपल्या लाईफस्टाईलचा आरोग्यावर गंभीरपणे परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढता ताणताणाव रक्तदाबाची समस्या वाढवण्यामागील एक कारण आहे. हा त्रास कमी करण्यासाठी केवळ औषध उपचार पुरेसे नाहीत. कारण एका टप्प्यानंतर औषधोपचारांचेही साईड इफेक्ट्स दिसतात. त्यामुळे तुम्हांलाही उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यावर मात करण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचीही मदत होऊ शकते.

उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नैसर्गिक उपाय -
स्ट्रेन्थ ट्रेनिंग -
स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते. वेट ट्रेनिंग, क्रन्चेस अशा व्यायाम नियमित करणं फायदेशीर ठरते.

स्विमिंग -
स्विमिंगदेखील एक उत्तम व्यायामप्रकार आहे. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी स्विमिंग हा उत्तम कार्डिओ व्यायामप्रकार आहे.


ब्रिस्क वॉकिंग -
30 मिनिटांचा ब्रिस्क वॉकिंग हा व्यायामप्रकार उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी उत्तम व्यायामप्रकार आहे.

ट्रेड मिल -
उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी ट्रेड मिलवर चालणं फायदेशीर आहे. 10 मिनिटं ट्रेड मिलवर चालायला सुरूवात करा. हळूहळू तुमचा वेग वाढवा.

योगा -
नियमित योगासनं केल्यानेही उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. योगासनाचा अभ्यास कोणीही आणि कुठेही करू शकतो त्यामुळे योगासनं करणं हा सोयीस्कर मार्ग आहे. यामध्ये पुरेशी काळजी घेतल्यास इजा होण्याचा धोका कमी होतो.

घरच्या घरी व्यायाम -
घरच्या घरी रश्शी उड्या मारणं, मेडिसीन बॉलसोबत व्यायाम करणं, हलकेच स्ट्रेचिंग करणं अशा व्यायामप्रकारांमुळे उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

मसाज -
उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी व्यायामापूर्वी वॉर्म अप करणं आणि व्यायामानंतर शरीराला थंड होण्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचे आहे. वाढलेली हृद्याची धडधड पुन्हा सामान्य स्वरूपात आणण्यासाठी त्याची मदत होते.

मुली प्रामुख्याने त्वचा आणि सौंदर्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतात. त्यामध्येही चेह्र्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात. तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये ओपन पोअर्सचा त्रास अधिक जाणवतो. वाढत्या वयानुसार ओपन पोअर्स वाढतात. म्हणूनच सुरूवातीच्या टप्प्यावर ओपन पोअर्स जाणवल्यास या उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

ओपन पोअर्सच्या समस्येवर घरगुती उपाय -

केळं -
केळ्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हांला ठाऊक असतील परंतू त्याचा फायदा सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो. त्वचेवरील मृत पेशींचा थर हटवणयसाठी, चेहर्‍यावर पुन्हा तजेला येण्यासाठी केळं फायदेशीर ठरते. आठवड्यातून दोनदा केळ स्मॅश (कुस्करून) करून चेहर्‍यावर लावल्याने ओपन पोआर्सचा त्रास कमी होतो.

काकडी आणि लिंबू -
ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठी काकडीमध्ये लिंबू पिळा. या मिश्रणाचा रस चेहर्‍यावर लावा. यामुळे चेहर्‍यावरील ओपन पोअर्स टाईट होण्यास मदत होते.

दूध आणि ओट्स -
दोन चमचे ओट्स आणि चमचाभर गुलाबपाणी, मध यांचे एकत्र मिश्रण बनवा. ही पेस्ट 10 मिनिटं चेहर्‍यावर लावा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवाव. यामुळे ओपन पोअर्ससोबतच चेहर्‍यावरील डागही कमी होण्यास मदत होते.

Dr. Joginder Singh
Dr. Joginder Singh
BPTh, Behavioral Pediatrician Clinic, 17 yrs, Gautam Buddha Nagar
Dr. Rajendra Lahore
Dr. Rajendra Lahore
MS/MD - Ayurveda, Ophthalmologist, 11 yrs, Pune
Dr. Tushar Suryavanshi
Dr. Tushar Suryavanshi
BAMS, Garbh Sanskar Panchakarma, 24 yrs, Nashik
Dr. Ajay Rokade
Dr. Ajay Rokade
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 15 yrs, Pune
Dr. Aakash Bora
Dr. Aakash Bora
BHMS, Homeopath, 12 yrs, Pune
Hellodox
x