Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

अनेकदा काम करताना, टीव्ही पाहताना कानाजवळ डास भूणभूण करतात. डासांचा हा आवाज अत्यंत त्रासदायक असतो. डासांच्या या आवाजामुळे कामामध्ये लक्ष लागत नाही. पण हे डास चावणे जितकं त्रासदायक आहे तितकीच त्यांची भूणभूण कंटाळवाणी आहे. पण हे डास नेमकी अशी भूणभूण का करतात ? या '5' कारणांंमुळे विशिष्ट लोकांंनाच डास अधिक प्रमाणात चावतात !


का करतात डास भूणभूण ?

डास आपल्या कानाजवळ जी भूणभूण करतात तो मूळात त्यांच्या पंखांचा आवाज असतो. डास फार वेगाने पंख फडफडवत असतात. डासांचे पंख अत्यंत लहान असतात. जेव्हा ते अत्यंत वेगाने त्याची उघडझाप करतात तेव्हा हा आवाज ऐकू येतो. हा आवाज लांबून ऐकता येऊ शकत नाही त्यामुळे डास कानाजवळ आला की तो भूणभूण आवाज येतो.

डासांचा हा आवाज कशाचा संकेत ?

काही वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, डास या आवाजाद्वारा त्यांच्या विरूद्ध लिंगाचा शोध घेत असतात. डासांच्या पंखाची फडफड केवळ कानाच्या पडद्यांना नव्हे तर तुमच्या मेंदूच्या कार्यावरही प्रभाव टाकतात.

डासांच्या या आवाजामुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव असलेल्या पेशींना चालना मिळते. या आवाजामुळे लोकांना त्रास होतो. चिडचिड होते. डासांना पळवून लावतील हे घरगुती उपाय!

डास पळवण्यासाठी काही झाडांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. ही झाडे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलीत तर डास नक्कीच कमी होतील.

1) सिट्रोनेलो
पावसाळा सुरु होताच डासांची समस्या मोठ्या प्रमाणात सुरु होते. डास चावल्याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. यात अनेकांना काही गंभीर आजारही होऊ शकतात. अशावेळी डास पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण या उपायांनी डास काही वेळेसाठी दूर जातात. पण पुन्हा येऊ लागतात. अशात डास पळवण्यासाठी काही झाडांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. ही झाडे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलीत तर डास नक्कीच कमी होतील.

सिट्रोनेला ही एक सुंगधी वनस्पती आहे. या वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या अगरबत्तीही तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतील. या वनस्पतीच्या मदतीने डास पळवता येऊ शकतात.कारण या वनस्पतीच्या वासामुळे डास पळतात. त्यांना या वनस्पतीचा वास सहन होत नाही. ही वनस्पती तुम्ही तुमच्या अंगणात किंना बाल्कनीमध्ये लावू शकता.

2) पेटूनिया
पेटूनिया हे एक फारच आकर्षक फूल आहे जे तुम्ही अनेकदा कुठेना कुठे पाहिलं असेल. हे फूल बाराही महिने उगवतं. या फुलाला नैसर्गिक किटकनाशकही म्हटलं जातं. या फूलाचं झाड तुमच्या घराच्या आवारात किंवा घरात लावल्यास डास कमी येतील.

3) लॅव्हेंडर
लॅव्हेंडरचा सुंगध हा डासांना तुमच्या घरात येण्यापासून रोखतो. जांभळ्या रंगाचं फूल असलेलं हे झाड उन्हाळ्यात सहज मिळतं. हे झाड तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत लावू शकता.

4) लेमनग्रास(गवताचा प्रकार)
लेमनग्रास हे साइट्रोनला या प्रजातीचं गवत आहे. ज्या ठिकाणी लेमनग्रास असते त्या ठिकणी डास जास्त काळ राहू शकत नाहीत.

5) पुदीना
तसा तर पुदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पुदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पुदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.














Dr. Sucheta  Mokashi
Dr. Sucheta Mokashi
BDS, Dentist, 3 yrs, Pune
Dr. Lalitkumar Thakare
Dr. Lalitkumar Thakare
BPTh, Homecare Physiotherapist Neuro Physiotherapist, 9 yrs, Pune
Dr. Jyoti Sharma
Dr. Jyoti Sharma
BHMS, Homeopath, 5 yrs, Pune
Dr. Sandeep Awate
Dr. Sandeep Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Devendra Khairnar
Dr. Devendra Khairnar
MD - Allopathy, Pediatrician, 8 yrs, Pune
Hellodox
x