Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

What is Aphasia?
Aphasia is a condition that robs you of the ability to communicate. It can affect your ability to speak, write and understand language, both verbal and written. Aphasia typically occurs suddenly after a stroke or a head injury. But it can also come on gradually from a slow-growing brain tumour or a disease that causes progressive, permanent damage (degenerative). Where and how bad the brain damage is and what caused it determine the degree of disability.
Once the cause has been addressed, the main treatment for aphasia is speech and language therapy. The person with aphasia relearns and practices language skills and learns to use other ways to communicate. Family members often participate in the process, helping the person communicate.

What are the symptoms for Aphasia?
Aphasia is a sign of some other condition, such as a stroke or a brain tumour. A person with aphasia may:
Speak in short or incomplete sentences
Speak in sentences that do not make sense
Substitute one word for another or one sound for another
Speak unrecognizable words
Not understand other people's conversation
Write sentences that don't make sense
The severity and scope of the problems depend on the extent of damage and the area of the brain affected.


What are the types of Aphasia?
Your doctor may refer to aphasia as non-fluent, fluent or global:

Non-fluent Aphasia: Damage to the language network near the left frontal area of the brain usually results in Broca aphasia, which is also called non-fluent aphasia. People with this disorder struggle to get words out, speak in very short sentences and omit words. A person might say "Want food" or "Walk Park today." A listener can usually understand the meaning. People with Broca aphasia may understand what other people say better than they can speak. They are often aware of their difficulty communicating and may get frustrated. People with Broca aphasia may also have right-sided paralysis or weakness.

Fluent Aphasia: People with this form of aphasia may speak easily and fluently in long, complex sentences that don't make sense or include unrecognizable, incorrect or unnecessary words. They usually don't understand spoken language well and often don't realize that others can't understand them. Also known as Wernicke aphasia, this type of aphasia is the result of damage to the language network in the middle left side of the brain.

Global Aphasia: Global aphasia results from extensive damage to the brain's language networks. People with global aphasia have severe disabilities with expression and comprehension.



When to see a doctor?
Because aphasia is often a sign of a serious problem, such as a stroke, seek emergency medical care if you suddenly develop:

Difficulty speaking
Trouble understanding speech
Difficulty with word recall
Problems with reading or writing


What causes Aphasia?
The most common cause of aphasia is brain damage resulting from a stroke due to blockage or rupture of a blood vessel in the brain. Loss of blood to the brain leads to brain cell death or damage in areas that control language.

Brain damage caused by a severe head injury, a tumour, an infection or a degenerative process also can cause aphasia. In these cases, the aphasia usually occurs with other types of cognitive problems, such as memory problems or confusion.

Primary progressive aphasia is the term used for language difficulty that develops gradually. This is due to the gradual degeneration of brain cells located in the language networks. Sometimes this type of aphasia will progress to a more generalized dementia.

Sometimes temporary episodes of aphasia can occur. These can be due to migraines, seizures or a transient ischemic attack (TIA). A TIA occurs when blood flow is temporarily blocked to an area of the brain. People who've had a TIA are at an increased risk of having a stroke in the near future.


Complications
Aphasia can create numerous quality-of-life problems because communication is so much a part of your life. Communication difficulty may affect your.
Job
Relationships
Day-to-day function
Language barriers may lead to embarrassment, depression and relationship problems.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



वाचाभंग होणे (Aphasia):

वाचा
मानवप्राणी आपले विचार व माहिती दुसऱ्यास कळविण्यासाठी आपली बुद्धी आणि स्वरयंत्रणा वापरून जी गुंतागुंतीची ध्वनींची पद्धत वापरतो तिला संभाषण असे म्हणतात. काही शारीरिक अवयवांच्या (श्वसनाचे अवयव, स्वरयंत्र व उच्चारण अवयव) संघटित व सुसंबद्ध हालचालींद्वारे हवेत कंपने निर्माण करून निर्माण केलेल्या श्राव्य ध्वनींच्या संचास वाचा असे म्हणता येईल. स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास कळविण्यासाठी मानवप्राणी या ध्वनींना विशिष्ट सांकेतिक अर्थ देऊन त्याचा वापर करतो.यालाच वाचा असे म्हणतात.

वाचानिर्मिती
श्वसन, ध्वनिनिर्मिती व उच्चारण या संलग्न व परस्परावलंबी क्रियांच्या साहाय्याने वाचानिर्मिती होते. या क्रियांना चालना देणे, त्यांचे सुसूत्र संचालन करणे आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे या गोष्टी श्रवणीय व गतिबोधक प्रतिसंभरणाच्या साहाय्याने तंत्रिका तंत्राद्वारे (मज्जासंस्थेद्वारे) केल्या जातात.

ध्वनिनिर्मिती
मानवी ध्वनिनिर्मिती अवयव ही एक निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे व्यास असलेल्या नळीच्या स्वरूपातील ध्वनिकीय प्रणाली असून तिचा सर्वांत खालचा किंवा पहिला भाग स्वरयंत्राने बनलेला असतो. त्यानंतर घशाची पोकळी असून शेवटचा भाग नाकाची पोकळी व तोंडाची पोकळी यांमध्ये दुभागलेला असतो. शिवाय नाकाच्या पोकळीला जोडून हाडांतील अनेक पोकळ्या असून त्यांचा उपयोग आवाज मोठा करण्यासाठी वा घुमण्यासाठी होतो. ध्वनिमार्गाची पुरुषांमध्ये सरासरी लांबी १६ सेंमी. असते आणि ती ओठ आवळून वा स्वरयंत्र खाली घेऊन वाढविता येते.

वाचाविकृती
वाचानिर्मिती ही गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने व बाह्य उद्दीपकांना प्रतिक्रिया म्हणून किंवा (बाह्य उद्दीपकांशिवाय) अंतस्थ वैचारिक क्रियेचे प्रकटीकरण म्हणून वाचानिर्मिती होत असल्याने या सर्व प्रक्रियांच्या साखळीत (याच नोंदीतील ‘वाचा साखळी’, ‘वाचा आकलन’ व ‘संभाषण प्रक्रिया’ या उपशीर्षकांखालील माहिती पहावी) अनेक ठिकाणी अनेक कारणांनी दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या वाचाविकृती निर्माण होऊ शकतात. सोयीसाठी व अभ्यासासाठी उपयुक्त होण्याकरिता वाचाविकृतींचे कारणांप्रमाणे, विकृती होण्याच्या वाचा-साखळीतील ठिकाणाप्रमाणे किंवा लक्षणांप्रमाणे इ. अनेक प्रकारे वर्गीकरण करता येते.

कारणांप्रमाणे वर्गीकरण
वाचाविकृतींची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे

शारीरिक रोग
यात वाचेशी संबंधित श्रवण अवयव, तंत्रिका तंत्र व ध्वनिनिर्मिती अवयवांचे रोग, विकृती किंवा अभाव यांमुळे होणाऱ्या वाचाविकृतींचा समावेश होतो.

अनुकरणात्मक व पर्यावरणात्मक विकृती
यांमध्ये चुकीच्या वा अयोग्य भाषिकवातावरणामुळे मुलाने वा चुकीच्या उच्चारणपद्धती व भाषिक/वाचिक वैशिष्ट्यांचे अनुकरण करण्यामुळे निर्माण होणाऱ्या वाचाविकृतींचा समावेश होतो.

मानसिक रोग किंवा विकृतींचा परिणाम
म्हणून आढळणाऱ्या वाचाविकृतींना मानसोद्‌भव वाचाविकृती असे म्हणता येईल. या प्रकारचे वर्गीकरण अनुभवात्मक ज्ञानावर अवलंबून असून उपचारांसाठी उपयुक्त ठरते; परंतु यात शारीरिक रचना व कार्य वेगळे करता येत नाहीत, हा त्यावरील मुख्य आक्षेप आहे. वरील मुख्य गटांमध्ये ऐकू येणाऱ्या वाचाध्वनींतील दोषांवरून उपविभागणी करण्यात येते. ती ऐकणाऱ्याच्या वैयक्तिक जाणिवेवर अवलंबून असून ती मूळ कारणांऐवजी शेवटच्या श्रवणीय परिणामांनुसार असते, हे त्यावरील आक्षेप आहेत. आता वैद्यकीय, मानसशास्त्रीय, मनोविकृतिवैज्ञानिक शिक्षणशास्त्रीय व वर्तणूकशास्त्रीय अभ्यासाने वर्गीकरणाच्या जास्त चांगल्या पद्धती उपलब्ध होत आहेत आणि त्यांत वर्गीकरण मुख्यतः मूळ कारणाप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु हे शारीरिक विकृतींच्या संदर्भात सोपे असले, तरी मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या क्रियात्मक विकृतींच्या संदर्भात अवघड आहे.

बोलण्याची लय व वेग बदलल्याने होणाऱ्या विकृती

तोतरेपणा
ही विकृती मोठ्या प्रमाणात आढळून येत असून वयाच्या साधारण तिसऱ्या चवथ्या वर्षापासून व मुलग्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसते. तोतरेपणाच्या कारणांचे स्पष्टीकरण देणाऱ्या अनेक उपपत्ती आहेत; परंतु कोणतीही समाधानकारक नाही. प्राथमिक तोतरेपणात शब्दाच्या सुरुवातीचा ध्वनी, प्रथम अवयव, पूर्ण शब्द किंवा वाक्याचा सुरुवातीचा भाग बोलणाऱ्याला नकळत पुनःपुन्हा उच्चारला जातो. याउलट दुय्यम तोतरेपणात बोलणाऱ्याला कळत असूनही ध्वनिनिर्मितीचे स्नायू बराच काळ अंगग्रह अवस्थेत (अनैच्छिक व अपसामान्य आकुंचित अवस्थेत) राहिल्याने त्–त्, प्–प् असे अर्धवट उच्चार वारंवार केले जातात. त्याचबरोबर शारीरिक व मानसिक ताणाची लक्षणे, काही वेळा चेहेरा व शरीर वेडेवाकडे होणे व शरीराला झटके येणे इ. गोष्टी दिसून येतात. मानसिक ताण वाढविणाऱ्या विशिष्ट परिस्थितीत हा तोतरेपणा वाढतो. ही काही वैशिष्ट्ये रोग्याच्या इतर नातेवाईकांतही आढळतात आणि त्या कुटुंबातील वातावरण व वागणुकीच्या कल्पना इतरांहून वेगळ्या आढळतात

अनेकदा तोतरेपणा, डावखोरेपणा, अधिहृषता (ॲलर्जी), जुळी होण्याची प्रवृत्ती, वारंवार श्वसनमार्गाचे रोग इ. गोष्टी एकत्र, एकाच कुटुंबात व पिढ्यान्‌पिढ्या आढळतात. त्यामुळे आनुवांशिकता हे तोतरेपणाचे कारण असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नीतिनिष्ठुर, ध्येयाने भारलेले, पाप पुण्याचा अती विचार करणारे कौटुंबिक वातावरण व साधे, नम्र, पापभिरू, ध्येयवादी, प्रावीण्यवादी व्यक्तिमत्व यांवरून तोतरेपणाची मानसिक व पर्यावरणात्मक कारणेही असू शकतील. तसेच लोकमताला भिऊन वागण्याची व स्वतःच्या तोतरेपणाला स्वतःच्या पापांची शिक्षा मानण्याचीही प्रवृत्ती असू शकते.

यांशिवाय तोतरेपणाच्या रोग्यांत रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण वाढलेले आढळणे, मधुमेह होण्याची शक्यता, हृदयाच्या ठोक्यांचा अनियमितपणा, केसांचा रंग, कातडी, डोळे, शरीराची ठेवण, हाडांचा बळकटपणा इत्यादींमधील विकृती चयापचयाच्या (शरीरात सतत घडून येणाऱ्या भौतिक–रासायनिक घडामोडींच्या) व हार्मोनांच्या (शरीरात उत्पन्न होणाऱ्या विशिष्ट उद्दीपक द्रव्यांच्या) असंतुलनाचे परिणामही आढळून येतात. यावरून तोतरेपणा हा सर्वसाधारण चयापचयाच्या व ⇨ अंतःस्त्रावी ग्रंथींच्या असंतुलनाच्या परिणामांपैकी एक परिणाम असण्याचीही शक्यता आहे. प्राथमिक तोतरेपणात तोतरेपणाची जाणीव न देता व मुख्यतः वाचाशिक्षणाद्वारे उपचार करावे लागतात. दुय्यम तोतरेपणात, शारीरिक रोग आढळल्यास त्यावरील उपचार व रोग्यास विकृतीची पूर्ण माहिती देणे, आत्मविश्वास वाढविणे, जाणीवपूर्वक अनावश्यक हालचाली कमी करण्यास शिकविणे व वाचा उपचार इ. मार्गांनी उपचार करावे लागतात.

घसरट वाचा
यामध्ये अयोग्य शब्दयोजना, अयोग्य वाक्यरचना व उच्चारणाचा अनावश्यक जास्त वेग यामुळे बोलताना शब्दांचे काही अवयव वगळले जातात व काहींचा उच्चार निसटता, वरवर व घसरट केला जातो.

तंत्रिका तंत्राच्या काही विकृतींत वा रोगांमध्येही बोलण्याची लय बिघडल्याने होणाऱ्या वाचाविकृती दिसतात.उदा. (१) प्रमस्तिष्क पक्षाघातात अनेकावयवी शब्दोच्चारांस आवश्यक असलेल्या श्वसनाच्या स्नायूंवरील व एका ध्वनीतून दुसऱ्या ध्वनीत सफाईदार बदल करण्यास आवश्यक असलेल्या उच्चारणाच्या स्नायूंवरील ताबा कमी असणे यांमुळे अंगग्रही वाचा ही विकृती निर्माण होते. (२) पार्किनसन रोग [ ⟶ कंपवात], बहु-कर्कशीभवन (मेंदूत वा मेरुरज्जूत कठीण झालेल्या ऊतकांचे तुकडे आढळून येणारी विकृती) व निमस्तिष्काची अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असलेल्या गाठी) यांमुळे नेहमीच्या बोलण्याच्या ओघात हिसके व खटके आल्याने अडथळा निर्माण होऊन हातापायांना सतत मंद गती देण्याच्या प्रवृत्तीसह वाचा विकृती निर्माण होते. उच्चारित ध्वनींतील दोषांमुळे होणाऱ्या विकृती


ध्वनिस्तरातील दोष
लहान स्वरयंत्र किंवा मानसिक ताणामुळे स्वरयंत्रातील स्नायू जास्त ताणलेल्या अवस्थेत असणे यामुळे जरूरीपेक्षा जास्त वरच्या ध्वनिस्तरात बोलले जाते. तसेच काही वेळा स्वतःच्या बोलण्याच्या ध्वनिस्तरांतील चढ-उतार समजून घेण्यात अडथळा आल्याने व्यक्ती एकाच ध्वनिस्तरात किंवा वारंवार येणाऱ्या स्वरांच्या एकाच आकृतिबंधात बोलत राहते.

आवाजाच्या जातीतील वा गुणवत्तेतील दोष

घोगरेपणा
स्वरयंत्राच्या किंवा घशाच्या रोगांत, विशेषतः ध्वनिपटलांना सूज असल्याने, इजा झाल्यास आवाजाच्या अयोग्य वापराने व कर्करोग इ. कारणांमुळे ध्वनिपटलांची कंप पावण्याची क्षमता कमी झाल्याने आवाजात घोगरेपणा येतो. स्वरयंत्र तंत्रिकेच्या पक्षाघातानेही घोगरेपणा येतो.

अनुनासिक आवाज
या प्रकारचा दोष ⇨ खंडतालू या विकृतीत किंवा मृदू तालूच्या स्नायूंच्या पक्षाघातामध्ये दिसून येतो. कारण काही उच्चार करताना आवश्यक असलेली, नाकाचा मार्ग पूर्ण बंद करण्याची क्रिया करण्यास तालू असमर्थ बनते किंवा तालूतील फट उघडीच राहते. त्यामुळे सर्वच ध्वनींना व विशेषतः स्वरांना अनुनासिकत्व येते.

प्रक्रियेतील दोष
ध्वनी किंवा अक्षराच्या खुणांना अर्थ देणे व विशिष्ट भाषिक वैशिष्ट्ये आत्मसात करणे इ. प्रक्रिया (भाषा तयार होण्याच्या प्रक्रिया) व त्या आधारे भाषेचे आकलन करणे वा ती व्यक्त करणे यांमध्ये दोष निर्माण झाल्याने होणाऱ्या वाचाविकृतींचा यात समावेश होतो.

वाचाभंग
बोली किंवा लिखित भाषेचा प्रतीकात्मक पद्धतीने उपयोग (वाचा आकलन आणि वाचानिर्मिती) करण्याच्या असमर्थतेस वाचाभंग असे म्हणतात. तो मस्तिष्काच्या इजेमुळे वा रोगांमुळे वा विकृतींमुळे होत असून उच्चारण अवयवांतील स्नायूंचा पक्षाघात, या स्नायूंची असंबद्ध व समकालिक नसलेली हालचाल, श्रवणदोष किंवा दृष्टिदोष, बेशुद्धी आणि संदेशवहनाच्या वा व्यक्त करण्याच्या इच्छेचा अभाव ही त्याची कारणे असू शकत नाहीत.

वाचाभंगाचे खालीलप्रमाणे प्रकार करण्यात येतात.

सुव्यक्तिकरणात्मक वाचाभंग
या विकृतीत आकलन आणि विचारशक्ती सुस्थितीत असते; परंतु मनातील प्रतिक्रियात्मक अथवा विचारात्मक संकल्पना भाषेच्या माध्यमातून (बोलून किंवा लिहून) व्यक्त करणे अशक्य होते (वाचानिर्मितीशी संबंधित असलेले स्नायू कार्यक्षम असतानाही हे होते).

ग्रहणक्षम वाचाभंग
भाषिक प्रतीकांचे (ऐकलेले ध्वनी व पाहिलेली अक्षरे) आकलन व झाल्याने ही विकृती होते (ऐकणे व पाहण्याशी संबंधित असलेली ज्ञानेंद्रिय कार्यक्षम असतानाही हे होते).

आ. ९. ज्यांना अपाय झाल्यास वाचाभंग होतो असे मानण्यात येणारी प्रमस्तिष्क बाह्यकातील क्षेत्रे. तुटक रेषांच्या आतील क्षेत्रांना विद्युत् रीत्या उद्दीपित केले असता वाचाभंगाला प्रतिरोध होतो असे दिसून आले आहे

सुव्यक्तिकरणात्मक वाचाभंग,
लेखनाघात,
ग्रहणक्षम वाचाभंग,
विस्मृतीय वाचाभंग
विस्मृतीय वाचाभंग
वस्तूचे किंवा व्यक्तीचे नाव, घटना किंवा नातेसंबंध (वस्तु–वस्तूंतील; वस्तु–माणसातील किंवा माणसामाणसांतील) योग्य वेळी न आठवणे असे या विकृतीचे स्वरूप असते.काही वेळा वरील तिन्ही प्रकारांच्या कमी अधिक मिश्रणाने निर्माण झालेल्या विकृती दिसतात. तसेच काही वेळा लिहिण्याची व वाचण्याची कुवत नाहीशी होते तेव्हा त्या विकृतीस लेखनाघात असे म्हणतात. व्याकरणशुद्ध व अर्थपूर्ण वाक्यरचना पूर्ण करण्याची कुवत नष्ट झाल्यास ‘वाक्यरचनात्मक वाचाभंग’ असे म्हणतात. ऐकलेला एकच शब्द किंवा वाक्याचा भाग किंवा म्हण पुनःपुन्हा उच्चारत राहण्याच्या विकृतीस ‘पुनरुच्चारण विकृती’ असे म्हणतात. अनेक भाषा बोलणाऱ्या पंडितांच्या मेंदूस इजा पोचल्यास मातृभाषेशिवाय इतर भाषांवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.

मस्तिष्काचे रोग (शोथ, क्षय, उपदंश, विद्रधी–म्हणजे भोवती शोथयुक्त ऊतक असलेल्या स्थानीकृत पुवाचा संचय–इ.) इजा, मस्तिष्क वाहिनी–अपघात, मस्तिष्काची अर्बुदे व अपकर्षकारक विकृतिस्थळे ही सर्वसाधारण वाचाभंगाची कारणे असतात. जन्म होण्याआधी, जन्म होताना किंवा जन्म झाल्यावर लगेच मस्तिष्काला इजा पोहोचल्यास (प्रत्यक्ष इजा किंवा ऑक्सिजन पुरवठ्यातील व्यत्ययामुळे झालेली इजा) किंवा मस्तिष्काची वाढ खुंटल्यास अगदी लहान मुलांमध्येही या प्रकारच्या विकृती आढळून येतात. तसेच कोणत्याही उघड कारणाशिवाय, अगदी वृद्ध व्यक्तींत वृद्धापकाळच्या विस्मरणाचा भाग म्हणूनही या विकृती दिसू शकतात.

निरनिराळ्या वाचाभंग विकृतींच्या स्वरूपावरून निरनिराळ्या वाचाकेंद्रांची संकल्पना तंत्रिका तज्ञांनी मांडलेली आहे. मस्तिष्कातील सिल्व्हिअस नालाच्या (फ्रांस्वा दे ले बोए सिल्व्हिअस या फ्रेंच शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या नालाच्या) भोवतालच्या ललाट, शंखक, पार्श्वललाट खंडांच्या भागांना भाषा किंवा वाचा क्षेत्र समजण्यात येते. ही क्षेत्रे उजव्या हाताच्या व्यक्तींत प्रामुख्याने प्रमस्तिष्काच्या डाव्या अर्धगोलात निर्माण होतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या प्रमस्तिष्काच्या डाव्या भागात इजा व रोग झाल्यासच वाचाभंगाच्या विकृती निर्माण होऊ शकतात. डावखोऱ्या व्यक्तीत वाचा क्षेत्रांची अशी बाजूनिश्चिती झालेली नसते व व्यक्तीपरत्वे अनियमितपणे काही क्षेत्रे डाव्या व काही उजव्या अर्धगोलात निर्माण झालेली असतात. त्यामुळे दोन्ही अर्धगोलांतील इजांमुळे वा रोगांमुळे अशा व्यक्तींना वाचाभंग होऊ शकतो.

वाचाभंगाचे अनेक रोगी पाहिल्यावर लक्षणांचे काही विशिष्ट प्रकार व आकृतीबंध सर्वसाधारणपणे दृष्टीस येतात. मस्तिष्क इजेच्या स्थानाप्रमाणे फक्त उच्चारणात, फक्त संकल्पनांची नावे आठवण्यात, वाक्यरचना करण्यात, ऐकलेला ध्वनी व लिखित शब्द समजण्यात व पुनरुच्चारणात दोष निर्माण होतात. तसेच बोलण्यात चुकीचे शब्द येणे किंवा शब्दांच्या वा ध्वनींच्या निरर्थक संयोगांचा उपयोग करणे व तोंडी वाचनात किंवा लेखनात दोष निर्माण होणे इ. विकृती संभवतात.

इजेच्या स्थानाप्रमाणे सर्वसाधारणपणे दिसणारे लक्षणसमूह खालीलप्रमाणे :स्खलित वाचाभंग
लूईजी रोलांदो या इटालियन शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या रोलांदिक किंवा मध्य सीतेच्या (खाचेच्या) अग्रभागी असलेल्या वाचाक्षेत्रास (ब्रॉका क्षेत्रास) इजा पोहोचली, तरी श्रवणीय व दृश्य आकलन चांगले टिकून राहिलेले असते; परंतु वाक्यरचना योग्य प्रकारे करता येत नाही व उच्चारण कष्टसाध्य असते. याच प्रकारांना सुव्यक्तिकरणात्मक किंवा प्रेरक वाचाभंग म्हणता येईल.

Dr. Divya Prakash
Dr. Divya Prakash
MDS, Dentist Implantologist, 6 yrs, Pune
Dr. Pradnya  Gurav
Dr. Pradnya Gurav
MD - Homeopathy, Adolescent And Child Psychiatrist Homeopath, 8 yrs, Pune
Dr. Pujitha Chowdary
Dr. Pujitha Chowdary
MD - Allopathy, General Medicine Physician Diabetologist, 6 yrs, Chennai
Dr. C  L Garg
Dr. C L Garg
MBBS, Family Physician General Medicine Physician, 46 yrs, Pune
Dr. Yogesh  Lohade
Dr. Yogesh Lohade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Hellodox
x