Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : चटका देणाऱ्या उन्हाळ्यातही तुम्हाला हवी तशी स्टाईल करायची असेल तर, तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. आम्ही तुम्हाला काही स्टायलीश शूजच्या बाबतीत सांगत आहोत. जे तुमच्या पायांचे उन्हापासून संरक्षणही करतील आणि थंडावाही देतील. तुम्हाला उष्णतेचा जर फारच त्रास असेल तर तुम्ही स्नीकर्स शूज वापरू शकता. हे शूज केवळ स्टायलीशच नव्हे तर, आरामदाईसुद्धा असतात. सध्या बाजारात वेगवेगळया स्टाईलमधले शूजही मिळतात.

तुम्ही जर लांब मॅक्सी किंवा काहीसा इंडो-वेस्टर्न लूक स्वत:ला देऊ इच्छिता तर, तुम्ही मोजडी वापरू शकता. जे तुमच्या पायाला ऐन उन्हाळ्यात थंडावा तर देतीलच पण, तुमचा लुकही छान ठेवेल. मोजडी घालून तुम्ही कार्यक्रमात तुमचे व्यक्तिमत्वही काहीसे वेगळे दाखवू शकता.

तुम्ही जर उंचीने काहीसे कमी असाल तर, आम्ही तुम्हाला उंच टाचेचे शूज सूचवू. हे शूज तुमची उंची काही प्रमाणात वाढवण्यासही मदत करतील. तसेच, तुमचा लूक काहीसा सेक्सीही दाखवतील. खास करून असे शूज मिनी ड्रेसवर खुलून दिसतात.

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना सुट्ट्या असतात, अनेकजण सहलींचं प्लॅनिंग करतात तर हाच काळ लग्नमौसमांचा असतो. उन्हाळ्यात प्रखर झालेलं उन तुमची भूक मंदावण्याचं कारणं असतं पण एन्जॉयमेंटच्या आनंदात अनेकदा चटपटीत आणि बाहेरचे पदार्थ खाण्याकडे तुमचा ओढा असल्यास आरोग्य बिघडू शकते. उन्हाळ्याच्या दिवसात संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे. या दिवसात डीहायड्रेशनचा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच आहारात कोणते पदार्थ टाळावेत याबाबतही सतर्क राहणं आवश्यक आहे.

आईस्क्रिम सॅन्डव्हिच -
आईस्क्रिम आणि उन्हाळा हे अतुट नातं आहे. या दिवसामध्ये तुम्ही 'कूल' राहण्यासाठी घरच्या घरी आईस्क्रिम बनवू शकता. किंवा आईस्क्रिम सॅन्डव्हिचची तयारीदेखील घरी करू शकता. मात्र बाजारातील विकतचे आईस्क्रिम सॅन्डव्हिच टाळा. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स अधिक असतात.

तिखट जेवण -
तिखटाचे जेवण उन्हाळ्यात टाळावे. यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. मसाल्याच्या पदार्थांमुळे शरीरात मेटॅबॉलिझम वाढते.

मांसाहार -
जड मांसाहार उन्हाळ्याच्या दिवसात टाळावा. मंदावलेल्या पचनसंस्थेच्या कार्यामुळे पचन न झाल्यास डायरियाचा त्रास बळावू शकतो. उन्हाळ्यात मांसाहार जपूनच करावा.

तेलकट पदार्थ -
बर्गर, मीट पॅटीस, फ्राईज यासारखे तेलकट पदार्थ आहारात टाळावेत.

खारट स्नॅक-
खारट स्नॅक्सच्या पदार्थांमध्ये MSG घटक आढळतो. यामुळे भूक आणि वजनही वाढण्याचा धोका असतो.

शिळे पदार्थ -
वारंवार गरम केलेले किंवा नेहमीच शिळे पदार्थ खाणं टाळा. उन्हाळ्यात पदार्थ खराब होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पचनाशी निगडीत काही आजार बळावण्याची शक्यता असते.

पुर्वीपासून आपण आजीच्या बटव्यातल्या खास गोष्टींचा वापर करत आलेलो आहोत. अगदी लहान मुल असो किंवा वयस्क व्यक्ती, वेळ आल्यावर आजीचा बटवाच आपल्या कामी येतो. कालांतराने या बटव्यामध्ये नवनवीन गोष्टींची भर पडत गेली. केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती पदार्थांपासून आपण आपल्या सौंदर्यांत भर पाडू शकतो. सध्या अनेक तरुणी सुंदर दिसण्याच्या नादात विचार न करता नवनवीन प्रसाधनांचा वापर करताना दिसतात. काही तरुणी तर यावर भाळून ही प्रसाधने विकत घेतात. मात्र या केमिकलयुक्त प्रसाधानांच्या वापरामुळे त्वचा काही काळ चांगली दिसत असली तरी सततच्या वापराने त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

प्रवासादरम्यान अनेक वेळा धूळ,माती उडाल्यामुळे हे धुलीकण चेह-यावर जमा होतात. यामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होऊन त्वचेला ऑक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे चेह-यावर डाग, पुटकुळ्या येतात. तसचे प्रखर उन्हाचा सतत भडीमार झाल्यामुळेही त्वचा टॅन होते. सूर्यामधून बाहेर पडणा-या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा प्रभाव सरळ आपल्या त्वचेवर होत असतो. यामुळे त्वचेच्या मूळ रंगात बदल होऊन त्वचा काळवंडते. ही काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ करण्यासाठी फळभाज्यांमधली काकडी उपयुक्त ठरु शकते.

१. काळवंडलेली त्वचा तसेच तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी अनेक वेळा टोनरचा वापर केला जातो. टोनिंग केल्याने चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन चेहरा पुर्ववत होण्यास मदत होते.

२. टोनर हे एक प्रकारचे अॅस्ट्रिंजेट आहे. मात्र बाजारात मिळणारे टोनर केमिकलयुक्त असते. यामुळे चेह-याला त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त होता. या कारणामुळे बाजारात मिळणा-या टोनरपेक्षा जर घरी असलेल्या साधनांचा वापर करुन टोनिंग केले तर चेह-याची हानी होणारी नाही. टोनिंगसाठी काकडी हा सर्वात्तम पर्याय आहे. काकडीमध्ये अँटीऑक्सि़डंट, अँटी बॅक्टीरिअल, अँटी फंगल याव्यतिरिक्त अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो. ही पोषकतत्वे त्वचेची हानी होण्यापासून वाचवतात.

३. त्वचेला डायड्रेटेड ठेवण्याचे काम काकडी करत असून काकडीमुळे चेह-याचा रंग उजळतो. या काकडीचे टोनर करण्यासाठी प्रथम काकडीचे साल काढून काकडी मिक्सरच्या सहाय्याने बारीक करुन तिच्यातील पाणी गाळणीने वेगळे करावे. हे पाणी स्प्रेच्या बाटलीमध्ये भरुन रोज दिवसातून दोन वेळा चेह-यावर शिंपडल्यास चेह-याचा पोत सुधारण्यासाठी मदत होते.

४. दरम्यान, अवनीन वर्मा यांनी स्पष्ट केलेल्या काही मुद्द्यांनुसार, काकडी, लिंबू आणि मध यांच्या मिश्रणाचे टोनरही उपयुक्त असते. याच्या वापरामुळे चेह-यावरील डाग कमी होतात. तसेच मध नैसर्गिकरित्या ब्लिचचे कामही करते.

५. काकडीचा रस काढल्यानंतर राहिलेला चोथा फेकून न देता त्याचा उपयोग फेसपॅक तयार करण्यासाठीही होऊ शकतो. त्याप्रमाणेच डोळ्यांखालील वर्तुळे कमी करण्यासाठी आयमास्क म्हणूनही वापर करु शकतो. त्यामुळे काकडी केवळ जेवणाची चव वाढविण्यासाठी नसून शारीरिक सौंदर्यात भर घालण्याचेही काम करताना दिसून येते.

उन्हाळा संपत आला असला तरीही त्याचा तडाखा अजिबात कमी झालेला नाही. उन्हाळ्यामुळे होणारी शरीराची लाहीलाही आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यां यांवर काही उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जास्तात जास्त पाणी पिणे आवश्यक असते. मात्र याबरोबरच शहाळं पाणी, ताक, सरबते घेणेही आवश्यक असते. यात सर्वात उपयुक्त असे लिंबू सरबत उन्हाळ्यातील त्रासांवर रामबाण उपाय ठरु शकतो. उन्हामध्ये लिंबू सरबत घेतल्यामुळे ताजेतवाने राहण्यास मदत होते. उन्हामुळे शरीरातील कमी झालेली ताकद भरुन येण्यास याची मदत होते. लिंबातल गुणधर्म आरोग्यासाठी उपयुक्त असतातच मात्र साखर आणि मीठाचाही थकवा कमी होण्यासाठी चांगला उपयोग होतो. पाहूयात लिंबू सरबताचे आरोग्याला होणारे फायदे…

१. दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास लिंबूपाण्यामुळे मदत होते.

२. सध्या लठ्ठपणा ही एक मोठी समस्या झाली आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही वजन कमी करायचे असल्यास लिंबूपाणी घेणे उपयुक्त ठरते. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते.

३. साखर न घालता घेतलेले पाणी मधुमेहींसाठीही उपयुक्त असते. तसेच यामध्ये कॅलरीज नसल्याने शरीरात साठणारे फॅटस साठत नाहीत.

४. लिंबात असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

५. दुपारी जेवणानंतर लिंबूपाणी प्यायल्यास खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.

६. उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो.

मुंबई : उन्हाळा सुरू होताच वीज कपात होऊ लागते. मग शहर असो किंवा गाव. वीज गुल होतेच. अशावेळी या समस्येवर तोडगा म्हणून इनवर्टर किंवा जेनरेटरचा पर्याय वापरला जातो. त्यामुळे काही वेळ निवांत जातो. पण उन्हाळ्यात एसी शिवाय राहणे कठीण होते. त्यासाठी अशा काही टिप्स ज्यामुळे तुम्ही एसीशिवाय निवांत झोपू शकता.

कॉटन बेडशीटचा वापर
उन्हाळ्यात सिंथेटिक बेडशीट्ला बाय बोला. कारण त्यामुळे वेटींलेशन नीट होत नाही. म्हणून कॉटन बेडशीटचा वापर करा. त्यामुळे वेटींलेशन नीट होईल आणि घामही येणार नाही.

फ्रिजमध्ये ठेवा बेडशीट
ही आयडीया तुम्हाला थोडी विचित्र वाटेल. पण हा अत्यंत परिणामकारक उपाय आहे. बेडशीट रोल करुन फ्रिजमध्ये ठेवा आणि झोपण्यापूर्वी बेडवर घाला. तुम्हाला झोप लागेपर्यंत तरी थंडावा मिळेल. यामुळे पंख्याची हवाही थंड वाटेल.

टेबल फॅनचा वापर
उन्हाळ्यात टेबल फॅनचा जरुर वापर करा. आजकाल बाजारात विविध प्रकराचे टेबलफॅन्स उपलब्ध आहेत. जर एसी, कूलर किंवा इनवर्टरचा नसेल तर टेबल फॅन हा उत्तम पर्याय आहे.

आहाराकडे लक्ष द्या
झोपण्यापूर्वी टरबूज, काकडी, दही, ताक यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी अंड, सायट्रस फळे, तिखट, मसालेदार पदार्थ रात्री खावू नका. कारण यामुळे तुम्हाला शरीर जड झाल्यासारखे वाटेल आणि पचनासाठीही हे पदार्थ योग्य नाहीत.

बर्फाचा वापर
बर्फाचे क्युब्स एका मोठ्या भांड्यात डाका आणि हे भांडे टेबल फॅनजवळ ठेवा. त्यामुळे थंड हवा मिळेल आणि चांगली झोप लागेल.

पातळ कपड्यांचा वापर
उन्हाळ्यात सर्व नाईट सूट बाजूला ठेवा. त्याऐवजी पातळ टी-शर्ट, कुर्ता, पायजमा, शॉर्ट्स असे कपडे घालून झोपा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. या कपड्यांमुळे हवा खेळती राहील आणि थंड वाटेल.

झोपण्यापूर्वी अंघोळ करा
झोपण्यापूर्वी नेहमी साध्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. पाण्यामुळे शरीराचे तापमान कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. त्यामुळे झोपही चांगली लागेल.

Dr. Amar B.  Shah
Dr. Amar B. Shah
ND, Ophthalmologist, 25 yrs, Pune
Dr. Sandeep Awate
Dr. Sandeep Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Lalitkumar Thakare
Dr. Lalitkumar Thakare
BPTh, Homecare Physiotherapist Neuro Physiotherapist, 9 yrs, Pune
Dr. Ravindra Borade
Dr. Ravindra Borade
BAMS, Allergist Ayurveda, 11 yrs, Pune
Hellodox
x