Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

उन्हाळ्यामध्ये त्वचेसोबतच आरोग्याचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. उन्हाळ्यामध्ये बाहेरील पदार्थ खाल्याने पोट लवकर खराब होतं. अशातच काहीही खाल्याने उलट्या होणं, डोकेदुखी, पोटाच्या समस्या इत्यादी होऊ शकतात. याव्यतिरिक्त जर उन्हाळ्यामध्ये खाण्या-पिण्याकडे लक्षं दिलं नाही तर टायफॉइडही होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो बाहेरी पदार्थांचं सेवन करणं टाळा. आहारामध्ये पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यांचा उन्हाळ्यामध्ये आहारात समावेश करणं शक्यतो टाळावं. जाणून घेऊया अशा पदार्थांबाबत...

1. मसाले

अनेक लोकांना सर्वात जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असते. मसालेदार अन्नपदार्थ उन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी नुकसानदायी ठरतात. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. मिरची, आलं, काळी मिरी, जीरं आणि दालचिनी या पदार्थांचा मसाल्याच्या पदार्थांमध्ये समावेश होतो. हे पदार्थ उष्ण असतात. यांच्या सेवनाने शरीरातील उष्णता वाढते. तसेच मसालेदार पदार्थांच्या सेवनाने मेटाबॉलिज्मही वाढतं.

2. तेलकट पदार्थ आणि जंक फूड

जास्त तेलकट पदार्थ आणि जंक फूडपासून दूर रहा. ऑयली आणि जंक फूड कोलेस्ट्रॉल लेव्हल, फॅट इत्यादी वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे याच्या सेवनाने पौट खराब होतं आणि फूड पॉयझनिंग होण्याचीही शक्यता असते.

3. चहा किंवा कॉफी

अनेक लोक अशी असतात जी उन्हाळ्यामध्ये ऑफिसमध्ये सतत चहा किंवा कॉफीचं सेवन करत असातात. असं केल्याने शरीरातील उष्णता वाढते. यामध्ये अस्तित्वात असणारं कॅफेन आणि शुगर यांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे उन्हाळ्यातही हेल्दी राहण्याची इच्छा असेल तर यांपासून दूर रहा.

4. चिकन किंवा मासे

चिकनचं अधिक सेवन करणं टाळा. तसेच फिश ग्रेवी, तंदूरी चिकन किंवा सीफूड खात असाल तर उन्हाळ्यामध्ये यापासून थोडं लांब रहा. यामुळे पचनशक्ती कमजोर होते. तसेच डायरियाही होण्याची शक्यता असते. मांसाहारी पदार्थ शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करणं टाळावं.

5. ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक असतात. परंतु उन्हाळ्यामध्ये यांचंही सेवन कमी करावं. या पदार्थांमध्ये निसर्गतः उष्ण गुणधर्म असतात. जे शरीराची उष्णता वढविण्याचंकाम करतात.

6. सॉस कमी प्रमाणात खा

उनहाळ्यामध्ये चीज सॉसचं सेवन करणं शक्यतो टाळा. काही सॉस तयार करताना त्यामध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट असतं.जे आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्याऐवजी तुम्ही घरीच तयार केलेल्या चटणीचं सेवन करा. पुदिना, कोथिंबीर, लसूण, आवळा, हिरवी मिरची यांपासून तयार करण्यात येणारी हिरवी चटणी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

7. आइसक्रीम आणि कोल्ड ड्रिंक

खरं तर हे पदार्थ थंड असतात पण बॉडी वॉर्मिंग फूड आहेत. हे पदार्थ खाल्याने तुम्हाला थोड्या वेळासाठी बरं वाटेल परंतु तुमच्या हृदयासाठी हे नुकसानदायी असतं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

अनेकजण आपल्या धावपळीच्या दिनक्रमामधून थोडासा वेळ सकाळी वॉक घेण्यासाठी काढतात. अशातच वातावरणातील वाढता उकाडा वाढल्यामुळे सकाळी वॉकसाठी जाणं नकोसं वाटतं. अशातच उन्हाळ्यामध्ये सकाळी वॉक घेण्याऐवजी संध्याकाळी वॉक घेणं जास्त सोयीस्कर असतं, असा विचार आला किंवा असं कोणी सांगितलं तरि अनेकजण त्या व्यक्तीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतात. पण खरचं संध्याकाळची वेळ फिरण्यासाठी व्यवस्थित ठरते का? बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे लोकांचा दिनक्रम पूर्णपणे बदलून गेला आहे. सध्या लोक सकाळी उठल्यानंतरही ऑफिस किंवा आपल्या कामाचा विचार करतात. त्यामुळे ते दिवसभरामध्ये कोणतंही वर्कआउट करू शकत नाहीत.

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, एका संशोधनातून याबाबत एक खुलासा करण्यात आला होता की, संध्याकाळी 6 ते 7 ची वेळ शरीराचा वर्कआउट करण्यासाठी सर्वात उत्तम असते. जाणून घेऊया याबाबत काही खास गोष्टी...


एक्सरसाइजसाठी उत्तम वेळ

जर तुम्ही दिवसभराच्या कामानंतर थकला असाल आणि हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करणं तुमच्यसाठी शक्य नसेल तर त्याऐवजी तुम्ही वॉक करू शकता. यामुळे तुम्ही स्वतःला अगदी सहज फिट आणि हेल्दी ठेवू शकता. एवढचं नाही तर यामुळे तुमची एनर्जी लेव्हल वाढण्यासाठीही मदत होते.

आराम मिळतो

दिवसभर कम्प्यूटरवर काम केल्यामुळे मसल्सला एक्सरसाइज करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. परंतु, इव्हनिंग वॉकमार्फत तुम्ही असं करू शकता. ज्यामुळे तुमचं शरीर आणि मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी अर्ध्या तासासाठी संध्याकाळच्या वेळी वॉक घेणं आवश्यक असतं.

शांत झोप

शरीराचा थकवा घालवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शांत झोप गरजेची असते. तुम्हाला शांत झोप मिळण्यासाठी संध्याकाळी घेतलेला वॉक फार फायदेशीर ठरतो. कारण यामुळे तुम्हाला तणाव जाणवत नाही.

पचनसंस्था सुरळीत होण्यासाठी

जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर वॉकसाठी जाता. त्यावेळी तुम्हाला खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी मदत होते. दरम्यान एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं की, जेवल्यानंतर जवळपास अर्ध्या तासांनी वॉकसाठी जा.

रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठी

तुम्हाला कदाचित याबाबत माहिती नसेल की, संध्याकाळी वॉक केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते. दरम्यान संध्याकाळी वॉक घेतल्याने शरीरातील सर्व अवयवांचा आराम होतो. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबुत होण्यासाठी मदत होते.

उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वातावरणात उकाडा वाढला आहे. अशातच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. पण खरं तर उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्याकडे दुर्लक्षं केलं तर ते आजारी पडू शकतात. खरं तर उन्हाळ्यामध्ये सन स्ट्रोक लहान मुलांना होण्याची जास्त भिती असते. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मुलांमध्ये उकाडा किंवा ऊन सहन करण्याची शक्ती फार कमी असते. यामुळे ते लगेच आजारी पडतात. अशातच मुलांना उष्णतेपासून दूर ठेवण्यासाठी काही हेल्थ टिप्स अत्यंत फायदेशीर ठरतात. ज्यांचा वापर करून त्यांना उष्णतेपासून दूर ठेवणं सहज शक्य होतं आणि त्यांचं आरोग्य राखण्यासही मदत होते.


उन्हाळ्यामध्ये मुलांना किती पाणी द्यावं?

उन्हाळ्यामध्ये मुलांना शाळेला सुट्टी असते. अशातच ते दिवसभर घराबाहेर असतात. जर तुम्ही मुलांना जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी द्या. पण अनेकदा मुलं पाणी पिण्यास नकार देतात किंवा पितो सांगून न पिताच घराबाहेर निघून जातात. अशावेळी मुलांना असे काही पदार्थ खाण्यासाठी द्या, ज्यांच्यामध्ये वॉटर कन्टेंट जास्त असेल.

उन्हाळ्यामध्ये मुलांची देखभाल करण्यासाठी कपड्यांची काळजी

उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान राखण्यासाठी हलक्या रंगाचे कपडे फायदेशीर ठरतात. एकीकडे गडद रंगाचे कपडे सूर्याची उष्णता शोषून घेतात. तर दुसरीकडे हलक्या रंगाचे कपडे उष्णता परावर्तित करतात. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

यावेळी उन्हाळ्यात मुलांना जास्त बाहेर जाऊ देऊ नका

उन्हाळ्यामध्ये मुलांना आजारांपासून दूर ठेवायचं असेल तर त्यांना दुपारच्यावेळी 12 ते 4 वाजेपर्यंत बाहेर पाठवू नका. यादरम्यान घरातच ठेवा आणि इनडोर गेम्स खेळण्यासाठी प्रवृत्त करा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळची वेळ घरातून बाहेर पडण्यासाठी उत्तम वेळ असते.

उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी डाएट प्लॅन

उन्हाळ्यामध्ये मुलांना शक्य तेवडं जंक फूडपासून दूर ठेवा. कारण मसालेदार पदार्थांमुळे शरीराची उष्णता वाढते. जंक फूडऐवजी मुलांना कंलिगड, टरबूज आणि किवी यांसारखी ताजी फळं खाण्यासाठी द्या. याव्यतिरिक्त जेव्हही मुलं बाहेर खेळण्यासाठी जातात. तेव्हा त्यांना सनस्क्रिन लावा. सनस्क्रिन हानिकारक सूर्याची किरणं आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानांपासून बचाव करण्यासाठी मदत करतात.

दिवसेंदिवस वाढते ऊन अनेकांसाठी तब्येतीच्या तक्रारी सुरु करणारे आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात फिरून डोळे दुखणे, डोकं दुखणे, चक्कर येणे किंवा गरगरणे अशा अनेक दुखण्यांना सामोरं जावं लागत. हे सर्व होऊ नये यासाठी अगदी लहान पण घरगुती उपाय केले तरी उन्हाळ्याच्या विकारांपासून सुटका होऊ शकते. त्यासाठी काही खास घरगुती उपाय.

1. उन्हाळ्यात उन्हामुळे अनेकदा डोळे चुरचुरणे, पाणी येणे, लाल होणे अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. अशावेळी थंड पाण्याने (फ्रीजच्या नव्हे) डोळे धुणे महत्वाचे ठरते. शिवाय रात्री झोपताना डोळ्यांवर गुलाबपाण्यात बुडवलेल्या कापसाच्या घड्यांचाही फायदा होतो.


2. उन्हाळ्यात शरीर उन्हात बाहेर काढण्यासाठी घामातून पाणी बाहेर काढते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे पाणी, सरबत, ताक पिणे योग्य ठरते. दोन तासांनी किमान एक ग्लास पाणी शरीरात गेलेच पाहिजे.


3. उन्हाळ्यात तेलकट, मसालेदार आहार अनेकदा अपचन, पित्त, जळजळ अशा आजारांना आमंत्रण देते. या काळात हलके, बेताचे तिखट आणि मुख्य म्हणजे ताजे जेवण घ्यावे. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. त्यामुळे ताजे जेवण घेण्यावर भर द्यावा.


4. उन्हामुळे त्वचा काळवंडण्याचं प्रमाणही वाढते. अशावेळी बाहेर पडण्यापूर्वी शकतो अंगभर कपडे परिधान करावेत. शिवाय उघडया भागावर सन्सक्रीम लोशन वापरण्यास विसरू नये.


5. उन्हाळ्यात घट्ट, कडक, गडद कपडे वापरणे टाळावे. जीन्स तर अजिबात वापरू नये. त्याऐवजी मऊ, सुती, सौम्य रंगाचे कपडे वापरल्यास दिवस अधिक आनंददायी जाईल.


6. उन्हातून थेट ए.सी.मध्ये न जाता शरीराचे तापमान आधी नॉर्मलला आणावे आणि त्यानंतर थंड हवेत जावे. त्यामुळे अंगदुखी टळते.

उन्हाळ्यात मिळणार्‍या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असतं, म्हणून अश्या फळांचे सेवन अवश्य करावे.

जसे टरबूज, खरबूज, काकडी इतर नियमित सेवन केल्याने पाण्यासोबतच खनिज-लवण पूर्ती होण्यात मदत मिळते.

उन्हाळ्यात सामान्य आहार जसे वरण, भात, भाजी, पोळी खाणे योग्य ठरतं.

उन्हाळ्यात भुकेपेक्षा कमी आहार घेतला पाहिजे. याने हजमा देखील चांगला राहील आणि शरीरात स्फूर्ती राहील.

यासोबत तेलकट पदार्थ खाऊ नये.

उन्हाळ्यात सर्वाधिक पाणी घामामुळे बाष्पीभवित होतं म्हणून दिवसातून किमान चार लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात नारळ पाणी, ताक आणि लस्सी पिण्याने पाण्याचे संतुलन राहण्यात मदत मिळते.

उन्हाळ्यात मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळावे. जेवण्यात अती प्रमाणात मीठ सेवन करणे टाळावे.

नमकीन, शेंगदाणे, तळलेले पापड-चिप्स, अती प्रमाणात तेलाचे लोणचे खाणे टाळावे.

Dr. Pramod Thombare
Dr. Pramod Thombare
BAMS, Ayurveda Yoga and Ayurveda, 7 yrs, Pune
Dr. Sabir Patel
Dr. Sabir Patel
MBBS, General Medicine Physician General Physician, 2 yrs, Bharuch
Dr. Akash Grampurohit
Dr. Akash Grampurohit
MS - Allopathy, ENT Specialist, Dharwad
Dr. C  L Garg
Dr. C L Garg
MBBS, Family Physician General Medicine Physician, 46 yrs, Pune
Dr. SS Bansal
Dr. SS Bansal
MBBS, Obstetrics and Gynecologist, 32 yrs, Pune
Hellodox
x