Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

आपली शरीरयष्टी चांगली दिसावी यासाठी अनेक तरुण व्यायामशाळेत घाम गाळत असतात. नियमित व्यायाम, व्यवस्थित झोप, योग्य आहार यामुळे ते काही महिन्यात चांगली शरीरयष्टी कमावतात पण यावरच त्यांचं समाधान होत नाही. आपल्या शरीरातील नसा दिसायला हव्या अशी काहींची इच्छा असते.

आहाराकडे लक्ष

बॉडीतील नसं दिसतायत का ? यावरूनही चर्चा करणारे अनेकजण असतात. सिनेमांमध्येही हिरोने टी शर्ट काढल्यावर त्याच्या शरीरावरील नसं दिसतात. त्यामुळे या तरुणांची इच्छाशक्ती अधिक दृढ होते. अस शरीर कमावण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं गरजेच आहे. याबद्दल आपण जाणून घेवूया...

सोडियम सेवन वर्ज्य

सोडियमचे सेवन शरीरात वॉटर रिटेंशनच कारण बनतं. वॉटर रिटेशनमुळे आपल्या नसं अस्पष्ट दिसतात. त्यामुळे जेवणातही कमी मीठाचा उपयोग करणं गरजेच आहे.

स्नायू बनवा

शरीरयष्टी कमावताना तुमच्या आहारासोबतच तुम्हाला स्नायूंकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्नायू हे प्रोट्युडिंग वेन्स तयार करतात.

खूप पाणी प्या

शरीरात मुबलक पाणी गेल्यास स्नायू हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहिल्याचा खूप फायदा होतो. शरीरातील पाणी टॉक्सिंसला फ्लश करते यामुळे बाइसेप्सच्या नस स्पष्टपणे दिसतात.

एकाच जागी सतत बसून राहणे हे सर्वच दृष्टीने हानिकारक आहे. आपल्याकडे प्राचीन ग्रंथांमध्ये म्हटले आहे की तुम्ही चालू लागला की तुमचे दैवही चालू लागते, धावू लागला की धावू लागते आणि तुम्ही बसला की तुमचे दैवही बसकण मारते! आरोग्याबाबात तर ही गोष्ट अक्षरक्ष: सत्य आहे.

आता ब्रिटिश संशोधकांनी म्हटले आहे की चालण्याने केवळ आरोग्यच सुधारत नाही तर आयुर्मानही वाढते. तुम्ही दरररोज 25 मिनिटे चालतात, तर तुमे आयुष्य सात वर्षांनी वाढते. हृदय रोगाचे सध्या प्रमाण खूपच वाढलेले असून 50 ते 60 वयोमानातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ब्रिटनमध्ये तर हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रत्येक सात सेकंदात या देशात एकाचा मृत्यू हृदयविकाराने होत असल्याचे चित्र आहे. या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे चालणे, असे या संशोधकांनी सांगितले. यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी मध्ये या संशोधकांनी आपला संशोधनावर अहवाल सादर केला. या संशोधकांनी 30 ते 60 वयोगटांतील 69 व्यक्तींची तपासणी केली. त्यांना दररोज चालण्याचा व्यायाम करण्यास सांगण्यात आले.

नियमित व्यायाम करणारे लोक फक्त निरोगी व ताजेतवानेच राहत नाहीत, तर आजारही त्यांच्यापासून कोसो दूर राहतात. सामान्य लोकांप्रमाणेच गर्भवती महिलांनाही व्यायाम केल्याने चांगला लाभ मिळतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नियमितपणे व्यायाम करणार्‍या महिलांना प्रसववेदनांचा वेळ 50 मिनिटांनी कमी होतो. स्पेनमधील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ माद्रिदच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांनी असे सांगितले की, गर्भावस्थेदरम्यान नियमितपणे व्यायाम करणार्‍या महिलांना जास्तवेळ प्रसववेदना सहन कराव्या लागत नाहीत.

या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी 508 महिलांच्या माहितीचे पहिल्या तिमाहीपासूनच अध्ययन करण्यास सुरुवात केली. त्यात निम्म्या महिलांना दर आठवड्याला तीन तास व्यायाम करण्याचा सल्ला दिला. उरलेल्या अर्ध्या महिलांना आरामाचा सल्ला देण्यात आला.

त्यानंतर शास्त्रज्ञांना मुलाच्या जन्मवेळच्या प्रसववेदनेचा कालावधी व नियमित व्यायाम यांच्यात संबंध दिसून आला. त्यांनी सांगितले की, नियमित व्यायाम करणार्‍या महिलांचे स्नायू प्रसूतीच्या प्रक्रियेत पूर्ण योगदान देण्यास सक्षम होते.

या अध्ययनाच्या निष्कर्षामुळे गर्भवती महिलांना नियतिम व्यायामासाठी प्रेरित केले जाऊ शकते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार गर्भावस्थेदरम्यान तंदुरुस्तीवर लक्ष देणे धोकादायक ठरते, हा विचार आता जुनाट झाला. उलट प्रसववेदनांदरम्यान जिवासमोरचे संकट दूर करण्यासाठी व्यायाम चांगला उपाय असल्याचे या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत शारीरिक हालचालींचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लहान वयातच शारीरिक दुखणी मागे लागतात. पाठदुखी, कंबरदुखी अशा प्रकारचे आजार सुरू होतात. या आजारांवर आता घरगुती उपाय करून ते बरे होऊ शकतात. ते कसे..?

रोज कमीत कमी वीस ते पंचवीस उठाबशा काढाव्या. त्यामुळे कंबरेचा घेर वाढत नाही.

जमिनीवर पालथे झोपून पाय एकमेकांना चिकटून ठेवावे. हात खालीच सरळ रेषेत ठेवावे. हळूहळू फक्त कंबरेचा भाग वर उचलावा व खाली करावा. ही क्रिया म्हणजेच अशा प्रकारचा व्यायाम केल्यासही कंबरदुखी थांबते.

हा व्यायाम तुम्हाला नियमित करावा लागेल.

तसेच दुसरी पद्धत म्हणजे पाठीवर झोपावे आणि दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून वर उचलावे. पायांना हाताचा आधार देत एकदा डाव्या कुशीवर तर एकदा उजव्या कुशीवर वळावे. यामुळेही कंबरेचा घेर आटोपशीर राहतो.

जमिनीवर पाय फाकवून उभे राहावे. एकदा संपूर्ण शरीर उजवीकडे वळवावे तर काही वेळ त्या स्थितीत राहून नंतर डावीकडे शरीर वळवावे. हा व्यायाम हातात बॉल घेऊनही करता येतो. दोन व्यक्तीनी एकमेकांकडे पाठ करून वळून परस्परांकडे बॉल पास करण्याचा प्रयत्न केल्यास आपोआप हा व्यायाम होतो. त्यामुळेही कंबर सडपातळ राहते.

मला वजन कमी करायचं आहे. त्यासाठी डाएट करतेय आणि वर्कआउटही सुरू केलंय; पण अपेक्षित बदल काही होत नाही, असंच काहीसं तुमचंही म्हणणं आहे का? पण स्टार्टरवर ताव मारल्याशिवाय आणि डेझर्टनं शेवट गोड केल्याशिवाय तुमचं जेवण पूर्ण होत नाही? वजन कमी करण्याचं लक्ष्य तर गाठायचंय; पण आवडत्या खाद्यपदार्थांची चवही चाखायची आहे. तर मग या काही स्मार्ट टिप्स तुमची नक्की मदत करतील.

वैविध्य असावं

डम्बेल्स, वेट्स उचलणं हा वर्कआउटमधला स्ट्रेंथ ट्रेनिंगचा भाग झाला. शरीराची ताकद वाढवण्यासाठी या व्यायाम प्रकारांकडे अधिक लक्ष द्यायला हवं. वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करून व्यायाम प्रकारांमध्ये वैविध्य आणता येईल. नियमितपणे मेहनत घेतली, तर शरीराला अपेक्षित आकार देण्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

चाला आणि तंदुरूस्त राहा

दररोज किमान तीस मिनिटं चालणं हा अतिशय सोपा आणि सर्वोत्तम व्यायामप्रकार आहे. जॉगिंग करणं किंवा पोहायला जाणं हे पर्यायही कॅलरीचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

खा आणि पचवा

सावकाश चावून खाल्लं, की जेवण व्यवस्थित पचतं. पटापट खाल्लं, की खूप जास्त खाल्लं जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे थोड्याथोड्या वेळानं खा, म्हणजे पचनक्रियाही व्यवस्थित पार पडेल.

आळस झटका

शरीर आणि मन क्रियाशील असलं, की आळस आपोआपच पळून जातो. रोजच्या वेळापत्रकातही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा उत्साह वाढेल.

वर्कआउटचं नियोजन करा

दर सहा आठवड्यांनी वर्कआउट बदलायला हरकत नाही. सततचे बदल करणं कटाक्षानं टाळा, कारण शरीराला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

अधिकृत सल्लागाराची मदत घ्या

वर्कआउटचं तंत्र आत्मसात करण्यासाठी अधिकृत ट्रेनरचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल. म्हणजे मूलभूत चुका टाळता येतील आणि तुम्ही प्रगतीच्या दिशेनं वाटचाल कराल.

चतुराईनं खाऊची निवड करा

वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, तर विशेषतः बाहेर जेवायला गेल्यावर ब्रेड, क्रीम, तळलेले पदार्थ कटाक्षानं टाळा. त्याऐवजी सूप, वाफवलेल्या अथवा बेक केलेल्या पदार्थांचा आरोग्यदायी पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे.

सकारात्मक विचार करा

दिवसभरात खूप हसा. आनंदी राहा. म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेलं ध्येय गाठण्याचा तुमचा प्रवासही तितकाच छान होईल.

Dr. ATUL KALE
Dr. ATUL KALE
MS/MD - Ayurveda, Ayurveda Neurotologist, 15 yrs, Pune
Dr. Bhushan Khedkar
Dr. Bhushan Khedkar
Specialist, Dietitian dietetics, 8 yrs, Pune
Dr. Shivangi Patil
Dr. Shivangi Patil
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Sanjeev Sambhus
Dr. Sanjeev Sambhus
BAMS, Family Physician Physician, 34 yrs, Pune
Dr. Mahesh Yadav
Dr. Mahesh Yadav
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Hellodox
x