Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
वजन काट्यावर लक्ष आहे ना?
#निरोगी जिवन#वजन कमी होणे#व्यायाम

मला वजन कमी करायचं आहे. त्यासाठी डाएट करतेय आणि वर्कआउटही सुरू केलंय; पण अपेक्षित बदल काही होत नाही, असंच काहीसं तुमचंही म्हणणं आहे का? पण स्टार्टरवर ताव मारल्याशिवाय आणि डेझर्टनं शेवट गोड केल्याशिवाय तुमचं जेवण पूर्ण होत नाही? वजन कमी करण्याचं लक्ष्य तर गाठायचंय; पण आवडत्या खाद्यपदार्थांची चवही चाखायची आहे. तर मग या काही स्मार्ट टिप्स तुमची नक्की मदत करतील.

वैविध्य असावं

डम्बेल्स, वेट्स उचलणं हा वर्कआउटमधला स्ट्रेंथ ट्रेनिंगचा भाग झाला. शरीराची ताकद वाढवण्यासाठी या व्यायाम प्रकारांकडे अधिक लक्ष द्यायला हवं. वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करून व्यायाम प्रकारांमध्ये वैविध्य आणता येईल. नियमितपणे मेहनत घेतली, तर शरीराला अपेक्षित आकार देण्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

चाला आणि तंदुरूस्त राहा

दररोज किमान तीस मिनिटं चालणं हा अतिशय सोपा आणि सर्वोत्तम व्यायामप्रकार आहे. जॉगिंग करणं किंवा पोहायला जाणं हे पर्यायही कॅलरीचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

खा आणि पचवा

सावकाश चावून खाल्लं, की जेवण व्यवस्थित पचतं. पटापट खाल्लं, की खूप जास्त खाल्लं जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे थोड्याथोड्या वेळानं खा, म्हणजे पचनक्रियाही व्यवस्थित पार पडेल.

आळस झटका

शरीर आणि मन क्रियाशील असलं, की आळस आपोआपच पळून जातो. रोजच्या वेळापत्रकातही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा उत्साह वाढेल.

वर्कआउटचं नियोजन करा

दर सहा आठवड्यांनी वर्कआउट बदलायला हरकत नाही. सततचे बदल करणं कटाक्षानं टाळा, कारण शरीराला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

अधिकृत सल्लागाराची मदत घ्या

वर्कआउटचं तंत्र आत्मसात करण्यासाठी अधिकृत ट्रेनरचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल. म्हणजे मूलभूत चुका टाळता येतील आणि तुम्ही प्रगतीच्या दिशेनं वाटचाल कराल.

चतुराईनं खाऊची निवड करा

वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, तर विशेषतः बाहेर जेवायला गेल्यावर ब्रेड, क्रीम, तळलेले पदार्थ कटाक्षानं टाळा. त्याऐवजी सूप, वाफवलेल्या अथवा बेक केलेल्या पदार्थांचा आरोग्यदायी पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे.

सकारात्मक विचार करा

दिवसभरात खूप हसा. आनंदी राहा. म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेलं ध्येय गाठण्याचा तुमचा प्रवासही तितकाच छान होईल.

Dr. AMITRAJ MHETRE
Dr. AMITRAJ MHETRE
MBBS, Pediatrician, 8 yrs, Pune
Dr. Mukund Ghodke
Dr. Mukund Ghodke
BAMS, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Himashree Wankhede
Dr. Himashree Wankhede
MBBS, Ophthalmologist Cataract surgeon, 5 yrs, Pune
Dr. Gauri Karve
Dr. Gauri Karve
MBBS, 6 yrs, Pune
Dr. Rekha Y Sanap
Dr. Rekha Y Sanap
MD - Homeopathy, 13 yrs, Pune