Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

There are numerous people worldwide who suffer from chronic pain. The experience can be quite annoying and painful, not only for the affected person but also for their loved ones and family members. Coping with the situation can be quite a challenge. Chronic pain can leave a person physically as well as emotionally exhausted. Thus, proper management is needed to deal with the situation better.

Causes of chronic pain
Chronic pain can be due to numerous reasons such as

Use of wrong footwear (especially high heels in case of women).
Injury due to rigorous and strenuous exercise.
Unhealthy lifestyle habits, poor posture.
Chronic pain can also result from a traumatic injury.
Medical conditions such as Fibromyalgia (a condition characterized by muscular pain, especially in the shoulder and neck region), AIDS, Cancer, Arthritis (Osteoarthritis and Rheumatoid Arthritis), Multiple sclerosis, to name a few, can give rise to chronic pain. Obese people are at a greater risk of suffering from chronic pain.
In some people, incorrect sleeping posture and the wrong choice of sleeping mattress can cause chronic pain.
With age, a person is likely to suffer from chronic pain (age related problems and disorders).
The effectiveness of the treatment depends on the severity as well as the factors responsible for the chronic pain.

Medications such as NSAID (Nonsteroidal Anti-Inflammatory Drugs), Tylenol, provide relief in case the pain is not very severe.
In severe cases, doctors may recommend the use of corticosteroid injection as well as powerful painkillers such as Fentanyl, Lortab or Roxicet.
Certain antidepressants and antianxiety drugs such as Duloxetine and Valium respectively may also be used to improve the condition.
Physiotherapy and Bioelectric therapy (the bioelectric therapy works by blocking the pain messages or signals to the brain, thereby relieving the pain) also bear fruitful results.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि बदलत्या जीवनशैलीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. थकवा, तणाव, नैराश्य इत्यादी गोष्टींभोवती माणसाचं आयुष्य फिरत आहे. या सगळ्या कारणांमुळे हृदयरोग होण्याची दाट शक्यता असते. हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी अत्यंत काळजी घेण्याची गरज असते. सलग एका जागी बसून काम करत असाल तर, दर २० मिनिटांनंतर ब्रेक घेण्याची आवश्यकता असते.

संगणकावर काम करणाऱ्या ह्रदयरोगींनी दर २० मिनिटांनी कामातून सात मिनिटांचा ब्रेक घेणं फार गरजेचं आहे. यादरम्यान त्यांनी चालणे किंवा हातपाय हलविल्यासारख्या काही हलक्याफुलक्या शारीरिक हालचाली करायला हव्यात. जे लोक सुट्टी घेतात त्यांच्यात हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते,

पूर्वीच्या अध्ययनातून दीर्घकाळपर्यंत बसून राहिल्यामुळे जीवनकाळ छोटा होऊ शकतो, मात्र कामातून अधूनमधून ब्रेक घेतल्याने हा धोका कमी होऊ शकतो, असे समोर आले होते. कामात ब्रेक घेतल्याने दररोज सुमारे ७७० किलो कॅलरी ऊर्जा कमी केली जाऊ शकते.हार्ट फेल्युअर :

आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे नियमित लक्ष देणे म्हणजेच हृदयाचे ऐकणे होय. असे आपल्या हृदयाचे नियमितपणे ऐकत गेल्यास काही दिवसांनी त्यातून आरोग्याचे मधूर संगीत ऐकू येऊ लागेल. आपण नेहमी आपली त्वचा, नखे, केस इत्यादी शरीराच्या बाह्यांगांची काळजी घेत असतो, कारण त्यांची देखभाल न केल्यास त्याचे परिणाम दिसतात. पण शरीरांतर्गत भागांची मात्र काळजी घेत नाही. याचे परिणाम उशीरा दिसतात, पण ते दूरगामी असतात. आपल्या अंतर्गत अवयवांपैकी एक महत्त्वाचा व संवेदनशील अवयव म्हणजे आपले हृदय होय. हृदयाच्या आरोग्याच्या बाबतीत आपण पुरेसे सजग असत नाही, याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात.

माणसाचे हृदय मिनिटाला 60 ते 90 वेळा धडधडते. पण काहीवेळा एखाद्या कारणाने याचे संतुलन बिघडते. हृदयाचे ठोके जास्त वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयाच्या ठोके अनियमित होण्यामागे अ‍ॅनिमिया हेही कारण असू शकते. कारण अ‍ॅनिमियामुळे लाल रक्तपेशी कमी होतात, त्यामुळे शरीरात रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. ताणतणावामुळेही हृदयाचे ठोके वाढू शकतात. याशिवायही हृदयासंबंधी अनेक रोग आहेत. त्यांची माहिती घेतल्यास त्यांच्यापासून वाचण्यासाठी प्रतिबंधक उपाय करणे सोपे होईल.

कार्डिओमायोपॅथी :

हा हृदयाच्या स्नायूंशी संबंधित रोग आहे. हृदयाचा आकार अनियमितपणे वाढणे, किंवा हृदय कडक होणे इत्यादींमुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्याचे काम नीट करता येत नाही. वेळेत उपाय न केल्यास याचे स्वरूप गंभीर होत जाते व परिणामी हृदय निकामी होऊन मृत्यू येऊ शकतो.

कार्डिअ‍ॅक अरेस्ट :

भारतात एकूण हृदयरोगांनी होणार्‍या मृत्यूंमध्ये सर्वात मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टने होतात. यामध्ये रुग्णाला इस्पितळात घेऊन जाण्याइतकाही वेळ मिळत नाही. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे हृदय संपूर्णतः बंद पडून रक्तप्रवाह संपूर्णतः बंद होतो. याला कार्डिअ‍ॅक पल्मनरी अरेस्टही म्हणतात. हृदयरोगांनी ग्रस्त असलेल्या किंवा हृदयरोगाची समस्या अनुवांशिक असलेल्या लोकांमध्ये कार्डिअ‍ॅक अरेस्टची समस्या जास्त तीव्र बनते. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, धुम्रपानाचा अतिरेक इत्यादींमुळे कार्डिअ‍ॅक अरेस्ट होऊ शकतो.

हृदय बंद पडणे :

इंग्रजीत याला ‘हार्ट फेल्युअर’ असे म्हणतात. हृदयाचे स्नायू जेव्हा जास्तीत जास्त निकामी होतात व शरीराला रक्तपुरवठा करण्यास असमर्थ बनतात, तेव्हा हृदय बंद पडते. वयस्कर व्यक्तींना हा रोग होण्याचा जास्त धोका असतो. यामध्ये श्‍वास आखूड होणे, तळवे सुजणे इत्यादी लक्षणे दिसतात. हार्ट फेल्युअरमध्ये हृदय कायमचे बंद नाही पडत, तर शरीराला पुरेसा रक्ताचा पुरवठा करण्यास असमर्थ बनते. कोरोनरी हार्ट डिसीज किंवा हृदयाचे स्नायू दुखावणे इत्यादींमुळे हृदय बंद पडू शकते.

वॉल्व्युलर हार्ट डिसीज :

हृदयातील वॉल्वमुळे संपूर्ण हृदयात रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होऊ शकतो. या वॉल्व काहीवेळा अरुंद होतात किंवा यांच्यामध्ये गळती सुरू होते. कधी कधी या वॉल्व नीट बंद न झाल्यानेही समस्या उत्पन्न होतात.

अ‍ॅन्झाईना :

छातीत दुखणे हे अ‍ॅन्झाईनाचे प्राथमिक लक्षण आहे. अ‍ॅन्झाईना हा ऑथरेस्क्लेरॉसिसमुळे होतो. यामुळे हृदयाद्वारे होणारा रक्तप्रवाह खंडित होतो. छातीशिवाय डावा हात, खांदा किंवा जबडा इत्यादी ठिकाणी वेदना होतात. शारीरिक श्रमाच्यावेळी ही वेदना वाढते व आराम करताना थोडी कमी होते.

कोरोनरी हार्ट डिसीज :

कोरोनरी हार्ट डिसीजला मराठी हृदयाच्या धमण्यांचा रोग असेही म्हणतात. याला वैद्यकीय भाषेत दुसरे नाव इसकेमिक हार्ट डिसीज असे आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये मेद साचल्यामुळे रक्तप्रवाहास अडथ्ळे निर्माण होतात. हृदयरोगाच्या प्रमुख प्रकारांपैकी हा एक प्रकार आहे. यामुळे अ‍ॅन्झाईना, हृदयविकाराचा झटका येणे व हृदय बंद पडणे इत्यादी जीवावर बेतणारे परिणाम होऊ शकतात.

नवे तंत्रज्ञान आणि उपचार :

हृदयरोग हा आरोग्याच्या गंभीर समस्यांपैकी एक आहे. रोग झाल्यावर उपाय करण्यापेक्षा शक्यतो रोग होऊच नयेत म्हणून उपाययोजना कराव्यात. आपल्याला हा रोग झाला असेल, तरी घाबरू नये. आजकाल वैद्यकीय तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, जवळजवळ प्रत्येक असाध्य रोगावर वैद्यकशास्त्राकडे उपचार आहेत. हृदयरोगांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांकडे धाव घेतल्यास हृदयरोगावर उपचार करता येतात. हृदयरोगावर उपचार करताना अनेक टेस्ट्स केल्या जातात. यामध्ये रक्ताची तपासणी व छातीचा एक्सरे काढण्याव्यतिरिक्त अनेक चाचण्या केल्या जातात. यासाठी आणखीही काही टेस्ट्स केल्या जातात.

इलेक्ट्रो कार्डिओग्राम (ईसीजी) : हृदयाच्या अनियमित ठोक्यांची माहिती घेण्यासाठी ही तपासणी केली जाते. ईको कार्डिओग्राम : यामध्ये हृदयाद्वारे होणार्‍या रक्तप्रवाहाची माहिती घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड तरंगांचा उपयोग केला जातो.

कार्डिअ‍ॅक कम्प्युटराईज्ड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन : ही एक्सरे चाचणी असून यामध्ये हृदयाच्या आडव्या छेदाचा अभ्यास केला जातो. कार्डिअ‍ॅक मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) : यामध्ये शक्तीशाली चुंबकीय किंवा किरणोत्सारी तरंगांद्वारे हृदयाचे व त्याच्या आसपासच्या उतींचे छायाचित्र घेतले जाते.

स्ट्रेस टेस्ट : या टेस्टमध्ये शारीरिक श्रम वा व्यायाम करताना हृदयाच्या ठोक्याचे मूल्यमापन केले जाते. यापैकी आवश्यक किंवा काहीवेळा सर्व चाचण्यांनंतर डॉक्टरांना नेमक्या रोगाचे निदान करता येते. हृदयाच्या उपचाराच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी अ‍ॅन्जिओप्लास्टी, एअरॉटिक वॉल्व रिप्लेसमेंट, हार्ट ट्रान्सप्लांट, इत्यादी काही उपचार हृदयरोगावर प्रभावी आहेत.

आपले हृदय व त्याची कार्यक्षमता यांचे मूल्यमापन करण्यासाठी ‘इजेक्शन फ्रॅक्शन’ या नावाची पद्धती वापरली जाते. इजेक्शन फ्रॅक्शनचा वापर करून आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत रक्त किती वेगाने प्रवाहित होते हे पाहिले जाते. ‘लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन’ आणि ‘राईट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन’ असे इजेक्शन फ्रॅक्शनचे दोन प्रकार आहेत. यामध्ये अनुक्रमे हृदयाच्या डाव्या व उजव्या व्हेंट्रिक्युलरमधून किती रक्त बाहेर पडते व आत जाते याचे मूल्यमापन केले जाते.

आपला अत्यानंद, उत्साह, भिती, उत्सुकता या सर्व भावनांना आपल्या हृदयाचे ठोके प्रतिसाद देतात. आपल्या भावनिक स्तरावरही हृदयाच्या ठोक्यांचे सामान्य असणे किंवा नसणे हे अवलंबून असते. त्यामुळे आपला भावनिक स्तर नेहमी सामान्य ठेवावा व ताणतणाव इत्यादी गोष्टी टाळाव्यात. टीव्हीवरही एखादा आनंद देणारा व हसवणारा चित्रपट किंवा कार्यक्रम पाहावा. नेहमी सकारात्मक विचार करावा व आपल्या आसपासचे वातावरणही नेहमी हलकेफुलके ठेवण्याचा प्रयत्न करावा.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consultहृदयाघात

हृदयाघात म्हणजे ह्रदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे कार्यक्षमता कमी होऊन त्यांचे काम विस्कळीत होणे होय.

शरीरक्रिया व शरीरविकृती विज्ञान
हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना परिहृद् धमनी (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात.
आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून रक्तातील चरबी कोलेस्ट्रॉल चे थर साठू लागतात, ज्यात परिहृद् धमनी (कोरोनरी आर्टरी)चा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चरबीचा पापुद्रा तयार होऊन रक्तवाहिन्या चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. अशाच एखाद्या चिंचोळ्या परिहृद् धमनीत (कोरोनरी आर्टरी) रक्तगुठळी अडकल्याने रक्तपुरवळा मंदावतो किंवा प्रसंगी खंडीत होतो.जर धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाच्या स्नायुंना रक्त मिळत नाही व त्यातील पेशी मरतात व ह्र्दयाचे कार्य मंदावते यालाच हृदयविकार म्हणतात. हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायूंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमुळे हृदयाला होणाऱ्या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो, त्याला रक्तसंलयी हृदय विफलता (कंजेस्टीव हार्ट फेल्यूअर) म्हणतात व त्यामुळे पावलांना घाम फुटून श्वसनाचा त्रास होतो.

जोखिमा
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला स्त्री-संप्ररके इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतासहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :

- धूम्रपान करणे
- मधूमेह
- उच्च रक्तदाब
- लठ्ठपणा
- उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल
- शारिरीक श्रमाची कमतरता
- आनुवंशिकता
- तणाव, रागीटपणा आणि चिंता

लक्षणे
काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यतः

- छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
- घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत.
- साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
- उलट्या
- अस्वस्थता
- कफ
- कंप

अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मिनिटापेक्षा जास्त काळ टिकतात. काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन रक्तसंलयी हृदय विफलता येऊन मृत्यू येतो.

उपचार
हृदयविकारावर झटकन उपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते.

- जोपर्यंत वैद्यकिय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे.
- जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत ऑक्सिजन द्यावे.
- जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरीत त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी.
- पाण्यात ढवळून अ‍ॅस्प्रीन द्यावे.

हृदयविकारावर झटकन वैद्यकिय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनीटे आणि तास जरा संकट पूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात.

- डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.
- इलेक्ट्रोकारडिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
- ईसीजी मुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते. मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परिक्षणात दिसून येते.
- छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.
- हृदयाच्या माहितीसाठी इकोकारडिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कँन चाचणी आहे ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.
- कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी एंजियोग्राम काढला जातो व हा निर्णायक शाबीत होतो.

हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते.

- जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
- प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते.
- कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात कोरोनरी एंजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.

प्रतिबंध
हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत : जीवन शैलीत परिवर्तन:

- आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल कर्बोदके उच्च मात्रेत असावेत.
- वजन जास्त असणाऱ्यांनी वजन कमी करावे. 3.शारिरीक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
- धूम्रपान करु नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
- मधूमेह, रक्तदाब किंवा जास्त कॅलेस्ट्रोल असणाऱ्यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.
- अ‍ॅस्पिरीन च्या किंवा इतर रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या.
- स्टॅटिन प्रकारातील चरबी नियंत्रित ठेवणाऱ्या औषधी. (स्टॅटिन चा फायदा होतो कि नाही यावर मोठ्या प्रमाणात मतभेद तज्ज्ञांमध्ये असून मोठ्या क्लिनिकल ट्रायल्स नंतरच याबद्दलचे सत्य समजू शकते.)
- आहारात संतृप्तचरबी ऐवजी असंतृप्त चरबी प्रकार वापरावे. (भारतात तसेच अनेक देशात त्रास फॅट वर बंदी घालण्यात आली आहे.)कार्डिअॅक अरेस्ट

कार्डिअॅक अरेस्टचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कार्डिअॅक अरेस्ट हे हार्ट अटॅकपेक्षा वेगळं असतं. हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा नसांमध्ये ब्लॉकेजमुळे रक्तपुरवठा होण्यात अडचण येते. हृदय शरीराच्या इतर भागात रक्तपुरवठा सुरु असतो आणि व्यक्ती देखील शुद्धीत असतो.कार्डिअॅक अरेस्टमध्ये रक्तपुरवठा अचानक बंद होतो. यामध्ये व्यक्ती अचानक बेशुद्ध होतो आणि श्वासोच्छवासही बंद होतो.

कार्डिअॅक अरेस्ट​ म्हणजे काय ?
- इलेक्ट्रिकल सिग्नलच्या अडचणींमुळे शरीरात जेव्हा रक्त नाही पोहोचत. तेव्हा कार्डिअॅक अरेस्टचा धोका वाढतो.


- जेव्हा व्यक्तीचं शरीर रक्त पंप करणं बंद करतो तेव्हा डोक्यात ऑक्सीजनची कमतरता तयार होते.

- यानंतर व्यक्ती बेशुद्ध होतो आणि श्वास घेणं बंद होतं.

- कार्डिअॅक अरेस्ट अचानक होतो. शरीराकडून याबाबत कोणती पूर्णकल्पना देखील नाही मिळत.

- इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये गडबड झाल्याने हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड होतो.

- यामुळे हृद्याची पंप करण्य़ाची क्षमता कमी होते. त्यामुळे मेंदु, हृद्य आणि शरीरातील इतर गोष्टींना रक्त पोहोचणं अशक्य होऊन जातं.

- काही मिनिटात यामध्ये व्यक्ती बेहोश होतो. लगेचच जर उपचार नाही झाले तर कार्डिअॅक अरेस्टध्ये काही मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होतो.

कार्डिअॅक अरेस्टची कारणे :
- कोरोनरी हार्ट डिसीज
- ह्रदयविकाराचा झटका
- कार्डिओमायोपॅथी
- जन्मजात हृदयरोग
- हृदय झडप मध्ये समस्या
- हृदयाच्या स्नायूमध्ये जळजळ
- लाँग क्यू टी सिंड्रोमसारख्या व्याधी
- विद्युत शॉक
- जास्त औषधे घेणे
- रक्तसंक्रमणामुळे होणारे नुकसान
- पाण्यात बुडणे

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणांपासून वयोवृद्धांमध्ये हृद्यविकार जडण्याचे प्रमाण वाढते आहे. गेल्या ४-५ दिवसांमध्ये अशाच हृद्यविकाराच्या झटक्यामुळे महाराष्ट्रातील तीन उमदे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले. अवघ्या 23 वर्षांचा आरजे शुभम केचे असो किंवा भरत नाट्य मंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ कार्यक्रमादरम्यान गिरकी घेऊन कोसळलेली अभिनेत्री अश्विनी एकबोटे असो. ऐन उमेदीच्या काळात हृद्यविकाराने त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे ठरले आहे. हद्यविकार म्हणजे केवळ हार्ट अटॅक नव्हे. तर काही वेळेस कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळेदेखील मृत्यू ओढावू शकतो. पण मग कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे नेमके काय हे नक्की जाणून घ्या .

कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यामध्ये फरक काय ?

कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक स्थिती असते. ज्यामध्ये हृद्याचे पंपिंग होणं आणि रक्ताभिसरणाचे कार्य थांबते. अनेकदा हार्ट अटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट यामध्ये लोकांची गफलत होते. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेसमुळे हृद्याला रक्तपुरवठा करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. परिणामी हार्ट अटॅक येतो.
कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये रक्तप्रवाहादरम्यान शरीरात इतर अवयवांना ऑक्सिजन पुरवण्याच्या कार्यात अडथळा येतो.मेंदूला ऑक्सिजनच्याअभावी त्याच्या कार्यातही अडथळा येतो. अशावेळेस श्वासावरील नियंत्रण सुटते, शुद्ध हरपते. कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक ‘मेडिकल इमरजन्सी’ असून त्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे असते. प्रामुखाने अशावेळेस रुग्णाला Cardio Pulmonary Resuscitation (CPR) सोबतच ठराविक इलेक्ट्रिक शॉक दिला जातो.
हृद्याच्या अनेक विकारांमुळे कार्डिअ‍ॅक अरेस्टचा धोका वाढतो. म्हणूनच हृद्यविकाराचा धोका वाढवणार्‍या या भारतीय खाद्यसंस्कृतीतील काही त्रासदायक सवयी तुम्ही नक्की बदला.

कार्डीअ‍ॅक अरेस्टची काही लक्षण –

अचानक चक्कर येणं,

थकवा जाणवणं,

डोळ्यासमोर अंधारी येणं,

छातीत वेदना जाणवणं,

दम लागणं

कार्डीअ‍ॅक अरेस्ट हा अनेकदा कोणतेही लक्षण किंवा संकेत न देता येऊ शकतो म्हणूनच स्वतःची थोडी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Dr. Palavi Gholap
Dr. Palavi Gholap
BAMS, Ayurveda Family Physician, 9 yrs, Pune
Dr. Ajita Garud-Shinde
Dr. Ajita Garud-Shinde
MS - Allopathy, Ophthalmologist Eye Specialist, 4 yrs, Pune
Dr. Vijay Shirke
Dr. Vijay Shirke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 17 yrs, Pune
Dr. Sanjay  Salve
Dr. Sanjay Salve
MBBS, Orthopaedics, 16 yrs, Pune
Dr. Ajit kadam
Dr. Ajit kadam
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 20 yrs, Pune
Hellodox
x