Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
हृदयाघात
#रोग तपशील#हृदय अपयश



हृदयाघात

हृदयाघात म्हणजे ह्रदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे कार्यक्षमता कमी होऊन त्यांचे काम विस्कळीत होणे होय.

शरीरक्रिया व शरीरविकृती विज्ञान
हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना परिहृद् धमनी (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात.
आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून रक्तातील चरबी कोलेस्ट्रॉल चे थर साठू लागतात, ज्यात परिहृद् धमनी (कोरोनरी आर्टरी)चा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चरबीचा पापुद्रा तयार होऊन रक्तवाहिन्या चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. अशाच एखाद्या चिंचोळ्या परिहृद् धमनीत (कोरोनरी आर्टरी) रक्तगुठळी अडकल्याने रक्तपुरवळा मंदावतो किंवा प्रसंगी खंडीत होतो.जर धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाच्या स्नायुंना रक्त मिळत नाही व त्यातील पेशी मरतात व ह्र्दयाचे कार्य मंदावते यालाच हृदयविकार म्हणतात. हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायूंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमुळे हृदयाला होणाऱ्या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो, त्याला रक्तसंलयी हृदय विफलता (कंजेस्टीव हार्ट फेल्यूअर) म्हणतात व त्यामुळे पावलांना घाम फुटून श्वसनाचा त्रास होतो.

जोखिमा
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला स्त्री-संप्ररके इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतासहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :

- धूम्रपान करणे
- मधूमेह
- उच्च रक्तदाब
- लठ्ठपणा
- उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल
- शारिरीक श्रमाची कमतरता
- आनुवंशिकता
- तणाव, रागीटपणा आणि चिंता

लक्षणे
काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यतः

- छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
- घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत.
- साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
- उलट्या
- अस्वस्थता
- कफ
- कंप

अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मिनिटापेक्षा जास्त काळ टिकतात. काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन रक्तसंलयी हृदय विफलता येऊन मृत्यू येतो.

उपचार
हृदयविकारावर झटकन उपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते.

- जोपर्यंत वैद्यकिय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे.
- जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत ऑक्सिजन द्यावे.
- जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरीत त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी.
- पाण्यात ढवळून अ‍ॅस्प्रीन द्यावे.

हृदयविकारावर झटकन वैद्यकिय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनीटे आणि तास जरा संकट पूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात.

- डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.
- इलेक्ट्रोकारडिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
- ईसीजी मुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते. मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परिक्षणात दिसून येते.
- छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.
- हृदयाच्या माहितीसाठी इकोकारडिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कँन चाचणी आहे ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.
- कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी एंजियोग्राम काढला जातो व हा निर्णायक शाबीत होतो.

हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते.

- जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
- प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते.
- कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात कोरोनरी एंजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.

प्रतिबंध
हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत : जीवन शैलीत परिवर्तन:

- आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल कर्बोदके उच्च मात्रेत असावेत.
- वजन जास्त असणाऱ्यांनी वजन कमी करावे. 3.शारिरीक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
- धूम्रपान करु नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
- मधूमेह, रक्तदाब किंवा जास्त कॅलेस्ट्रोल असणाऱ्यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.
- अ‍ॅस्पिरीन च्या किंवा इतर रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या.
- स्टॅटिन प्रकारातील चरबी नियंत्रित ठेवणाऱ्या औषधी. (स्टॅटिन चा फायदा होतो कि नाही यावर मोठ्या प्रमाणात मतभेद तज्ज्ञांमध्ये असून मोठ्या क्लिनिकल ट्रायल्स नंतरच याबद्दलचे सत्य समजू शकते.)
- आहारात संतृप्तचरबी ऐवजी असंतृप्त चरबी प्रकार वापरावे. (भारतात तसेच अनेक देशात त्रास फॅट वर बंदी घालण्यात आली आहे.)

Dr. Amit Murkute
Dr. Amit Murkute
MBBS, Dermatologist Hair Transplant Surgeon, 6 yrs, Pune
Dr. Vinod Shinde
Dr. Vinod Shinde
BAMS, Ayurveda Dietitian, 17 yrs, Pune
Dr. Prasang Bharadwaj
Dr. Prasang Bharadwaj
MBBS, General Medicine Physician General Physician, 3 yrs, Mumbai
Dr. Sujit Shinde
Dr. Sujit Shinde
BHMS, Family Physician Homeopath, 24 yrs, Pune
Dr. Akshay Choudhari
Dr. Akshay Choudhari
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 2 yrs, Pune