Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
कार्डिअॅक अरेस्ट
#रोग तपशील#हृदयरोग#हृदय अपयश



कार्डिअॅक अरेस्ट

कार्डिअॅक अरेस्टचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कार्डिअॅक अरेस्ट हे हार्ट अटॅकपेक्षा वेगळं असतं. हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा नसांमध्ये ब्लॉकेजमुळे रक्तपुरवठा होण्यात अडचण येते. हृदय शरीराच्या इतर भागात रक्तपुरवठा सुरु असतो आणि व्यक्ती देखील शुद्धीत असतो.कार्डिअॅक अरेस्टमध्ये रक्तपुरवठा अचानक बंद होतो. यामध्ये व्यक्ती अचानक बेशुद्ध होतो आणि श्वासोच्छवासही बंद होतो.

कार्डिअॅक अरेस्ट​ म्हणजे काय ?
- इलेक्ट्रिकल सिग्नलच्या अडचणींमुळे शरीरात जेव्हा रक्त नाही पोहोचत. तेव्हा कार्डिअॅक अरेस्टचा धोका वाढतो.


- जेव्हा व्यक्तीचं शरीर रक्त पंप करणं बंद करतो तेव्हा डोक्यात ऑक्सीजनची कमतरता तयार होते.

- यानंतर व्यक्ती बेशुद्ध होतो आणि श्वास घेणं बंद होतं.

- कार्डिअॅक अरेस्ट अचानक होतो. शरीराकडून याबाबत कोणती पूर्णकल्पना देखील नाही मिळत.

- इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये गडबड झाल्याने हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड होतो.

- यामुळे हृद्याची पंप करण्य़ाची क्षमता कमी होते. त्यामुळे मेंदु, हृद्य आणि शरीरातील इतर गोष्टींना रक्त पोहोचणं अशक्य होऊन जातं.

- काही मिनिटात यामध्ये व्यक्ती बेहोश होतो. लगेचच जर उपचार नाही झाले तर कार्डिअॅक अरेस्टध्ये काही मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होतो.

कार्डिअॅक अरेस्टची कारणे :
- कोरोनरी हार्ट डिसीज
- ह्रदयविकाराचा झटका
- कार्डिओमायोपॅथी
- जन्मजात हृदयरोग
- हृदय झडप मध्ये समस्या
- हृदयाच्या स्नायूमध्ये जळजळ
- लाँग क्यू टी सिंड्रोमसारख्या व्याधी
- विद्युत शॉक
- जास्त औषधे घेणे
- रक्तसंक्रमणामुळे होणारे नुकसान
- पाण्यात बुडणे

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणांपासून वयोवृद्धांमध्ये हृद्यविकार जडण्याचे प्रमाण वाढते आहे. गेल्या ४-५ दिवसांमध्ये अशाच हृद्यविकाराच्या झटक्यामुळे महाराष्ट्रातील तीन उमदे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले. अवघ्या 23 वर्षांचा आरजे शुभम केचे असो किंवा भरत नाट्य मंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ कार्यक्रमादरम्यान गिरकी घेऊन कोसळलेली अभिनेत्री अश्विनी एकबोटे असो. ऐन उमेदीच्या काळात हृद्यविकाराने त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे ठरले आहे. हद्यविकार म्हणजे केवळ हार्ट अटॅक नव्हे. तर काही वेळेस कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळेदेखील मृत्यू ओढावू शकतो. पण मग कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे नेमके काय हे नक्की जाणून घ्या .

कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यामध्ये फरक काय ?

कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक स्थिती असते. ज्यामध्ये हृद्याचे पंपिंग होणं आणि रक्ताभिसरणाचे कार्य थांबते. अनेकदा हार्ट अटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट यामध्ये लोकांची गफलत होते. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेसमुळे हृद्याला रक्तपुरवठा करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. परिणामी हार्ट अटॅक येतो.
कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये रक्तप्रवाहादरम्यान शरीरात इतर अवयवांना ऑक्सिजन पुरवण्याच्या कार्यात अडथळा येतो.मेंदूला ऑक्सिजनच्याअभावी त्याच्या कार्यातही अडथळा येतो. अशावेळेस श्वासावरील नियंत्रण सुटते, शुद्ध हरपते. कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक ‘मेडिकल इमरजन्सी’ असून त्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे असते. प्रामुखाने अशावेळेस रुग्णाला Cardio Pulmonary Resuscitation (CPR) सोबतच ठराविक इलेक्ट्रिक शॉक दिला जातो.
हृद्याच्या अनेक विकारांमुळे कार्डिअ‍ॅक अरेस्टचा धोका वाढतो. म्हणूनच हृद्यविकाराचा धोका वाढवणार्‍या या भारतीय खाद्यसंस्कृतीतील काही त्रासदायक सवयी तुम्ही नक्की बदला.

कार्डीअ‍ॅक अरेस्टची काही लक्षण –

अचानक चक्कर येणं,

थकवा जाणवणं,

डोळ्यासमोर अंधारी येणं,

छातीत वेदना जाणवणं,

दम लागणं

कार्डीअ‍ॅक अरेस्ट हा अनेकदा कोणतेही लक्षण किंवा संकेत न देता येऊ शकतो म्हणूनच स्वतःची थोडी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Dr. Dennis David
Dr. Dennis David
MS - Allopathy, General and Laparoscopic Surgeon, 7 yrs, Palakkad
Dr. Yogeshwar Sanap
Dr. Yogeshwar Sanap
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Mahesh Mahjan
Dr. Mahesh Mahjan
BAMS, Ayurveda, 19 yrs, Pune
Dr. Suryakant Bhise
Dr. Suryakant Bhise
BAMS, Ayurveda, 11 yrs, Pune
Dr. Amrut Gade
Dr. Amrut Gade
BHMS, Homeopath, 4 yrs, Pune