Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

वाढत्या वयाच्या खुणा आपल्या चेह-यावर स्पष्ट दिसत असतात. त्यात जर मनावर ताण असेल तर त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर होत असतो. त्यामुळे चेह-यावर सुरकुत्या येणे, त्वचा सैल पडणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. मनावरील ताण योगा, प्राणायम, ध्यान करुन कमी करता येऊ शकतो. मात्र चेहऱ्यावरील तणावाची चिन्हे कमी करण्यासाठी प्रसाधनांपेक्षा सकस आहाराची गरज आहे. योग्य आहारामुळे शरीराला पोषकद्रव्ये मिळतात. त्यांच्या सेवनामुळे शरीराची झीज भरुन निघते आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या चेह-यावर दिसून येतो. अवघ्या ३० दिवसांत चेहऱ्यावरील थकवा कमी करण्यासाठी अंशिका शारदा यांनी सुचवले काही खास उपाय

१. योग्य प्रमाणात झोप – मानवी शरीराला २४ तासांपैकी ७-८ तासांच्या झोपेची गरज असते. शरीराला योग्य प्रमाणात झोप मिळाल्यावर त्याचा परिणाम आपल्या चेह-यावर आपोआप दिसून येतो. योग्य प्रमाणात झोप मिळाल्यास त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते. पुरेशी झोप झाल्यास रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे फायद्याचे ठरते.

२. व्यायाम करणे – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कमी वयात स्थुलतेची समस्या सध्या सर्वत्र पहायला मिळते. स्थूलतेमुळे चेह-यावरील चरबीही वाढते. ही चेहऱ्यावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठीही व्यायामाचा उपयोग होतो. व्यायामामुळे चेहऱ्यावर प्रसन्नता येते. त्यामुळे दररोज किंवा आठवड्यातून तीन दिवस व्यायाम करणे गरजेचे आहे.

३. अतिनील किरणांपासून संरक्षण करणे – सुर्यापासून निघणा-या अतिनील किरणांचा परिणाम थेट आपल्या चेह-यावर होत असतो. त्यामुळे त्वचा टॅन होणे, काळवंडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. तसेच चेह-यावर सुरकुत्यादेखील लवकर पडतात. यासाठी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उन्हात बाहेर पडताना चेहरा रुमालाने झाकून घेणे गरजेचे आहे. तसेच घरी करण्यात आलेला टोमॅटोचा किंवा काकडीचा लेप चेह-यावर लावणे फायद्याचे ठरेल.

४. पोषकद्रव्यांचे सेवन – ज्या पदार्थांमध्ये पोषकद्रव्यांचे प्रमाण अधिक असते अशा पदार्थांचे सेवन करणे. यामध्ये असलेल्या ‘ओमेगा ३’मुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. तणाव कमी होतो. याबरोबरच त्वचेवर सूज असल्यास ती कमी करण्यास उपयोग होतो.

५ फळांचे सेवन- आहारामध्ये फळांच्या सेवनाला विशेष स्थान देण्यात आले आहे. यात सफरचंद, अननस, किवी यासारख्या फळांमध्ये अॅंटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होऊन चेह-याचा पोत सुधारण्यास मदत होते.

चेह-याला नवतजेला देण्यासाठी अनेक उपाय आहेत. मात्र आपण करत असलेल्या उपायांमध्ये सातत्य महत्वाचे आहे. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास त्याचे परिणाम नक्कीच दिसून येतात. यासाठीच चेह-यावरील थकवा घालवायचा असेल तर वरील दिलेले उपाय एक महिनाभर रोज करणे गरजेचे आहे.

आरोग्यदायी आहारामुळे महिलांमधील कर्णबधीरतेची जोखीम कमी होते, असे अभ्यासात दिसून आले आहे. अमेरिकेतील ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलमध्ये तीन प्रकारच्या आहारपद्धती व कर्णबधीरता यांच्या संबंधावर संशोधन करण्यात आले आहे. भूमध्य सागरी आहारातील (एएमइडी) ७०९६६ महिलांच्या २२ वर्षांतील आहाराची नोंद यात तपासण्यात आली. या आहारात ऑलिव्ह तेल, धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दाणे, मासे व माफक अल्कोहोल यांचा समावेश आहे. डाएटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन (डॅश) व दी अल्टरनेटिव्ह हेल्दी इटिंग इंडेक्स २०१० या आणखी दोन आहारांचा संशोधनात समावेश करण्यात आला होता. डॅश आहारात कमी मेद, फळे, भाज्या व कमी सोडियम यांचा समावेश आहे. जर्नल न्यूट्रीशनमध्ये प्रसिद्ध संशोधन अहवालानुसार आरोग्यदायी आहारामुळे महिलांमधील कर्णबधीरत्व कमी होते.

जे लोक आरोग्यदायी आहार घेतात त्यांच्यात कर्णबधीरतेची जोखीम कमी होत असल्याचा दावा ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलच्या श्ॉरॉन कुरहान यांनी केला आहे. चांगल्या आरोग्यात कर्णबधीरता नसण्याला महत्त्व आहे. संशोधकांच्या मते एमएइडी व डॅश आहारपद्धतीत कर्णबधीरत्वाचा धोका ३० टक्के कमी होतो. इतर आहारपद्धती वापरणाऱ्या महिलांच्या तुलनेत त्यांच्यात कर्णबधीरत्व कमी असते.

यात एकूण एएचइआय २०१० प्रकारच्या आहारात ही शक्यता आणखी ३० टक्के कमी होते असे ३३ हजार महिलांच्या अभ्यासातून दिसून आले आहे.

ध्यानधारणा व प्राणायामासारख्या श्वासपद्धतीमुळे मेंदूची शक्ती वाढते, त्यामुळे कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते, असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे.

डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजच्या संशोधकांनी म्हटले आहे, की श्वसन व लक्ष केंद्रित करणे या दोन गोष्टींचा संबंध प्रथमच जोडण्यात आला आहे. जर्नल सायकोफिजिऑलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे, की ध्यानधारणा व प्राणायामामुळे मेंदूतील रासायनिक संदेशवाहक असलेल्या नोराड्रेनलाइन या रसायनाची पातळी वाढते. जेव्हा आपल्या मनात कुतूहल असते, आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो किंवा भावना उद्दीपित होतात तेव्हा या रसायनाची निर्मिती होत असते. त्यामुळे मेंदूत नवीन जोडण्या तयार होतात.

योगी व बौद्ध आध्यात्मिक पद्धती यात श्वास हा महत्त्वाचा मानला जात असतो, असे ग्लोबल ब्रेन हेल्थ इन्स्टिटय़ूटचे आयन रॉबर्टसन यांनी सांगितले. श्वासाकडे लक्ष देऊन व तो नियंत्रित करून आपण प्राणायाम करतो त्याचा मोठा फायदा शरीरातील बदल व भावना नियंत्रित करण्यास होतो. त्यातून ध्यानधारणा करणाऱ्या साधकास मोठा फायदा होतो. श्वासाशी निगडित योगसाधना व स्थिर मन यांचा मोठा संबंध आहे. त्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता खूप वाढते.

संशोधकांच्या मते योगासनांची सुरुवात होऊन २५०० वर्षे झाली असून, त्याचा मनाच्या स्थिरतेवर चांगला परिणाम होतो असा दावा नेहमीच केला गेला, पण आम्ही तो प्रयोगात सिद्ध केला आहे, असे मायकेल मेलनचुक यांनी सांगितले.

शाळेतून १५ मिनिटांची सुटी देऊन विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम शिकविण्याचा उपक्रम ‘द डेली माइल’ या ब्रिटनमधील संस्थेने राबविला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

ब्रिटनमधील स्टर्लिग आणि एडिनबर्ग विद्यापीठांतील संशोधकांनी ‘द डेली माइल’ ही संस्था जगभरातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यात मोलाची भूमिका बजावत असल्याचे म्हटले आहे. संशोधकांनी नोंदविलेल्या निष्कर्षांवरून ‘द डेली माइल’ ही संस्था कमी शारीरिक हालचाली, संथपणा, लठ्ठपणा या जागतिक पातळीवरील शारीरिक समस्यांविरोधात लढा देते.

‘द डेली माइल’च्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले. हा उपक्रम न राबविलेल्या इतर शाळांमधील विद्यार्थ्यांची तुलना केल्यानंतर हे स्पष्ट झाल्याचे स्टर्लिग विद्यापीठातील संशोधक कोलिन मोरान यांनी सांगितले.

‘द डेली माइल’ या संस्थेची स्थापना फेब्रुवारी २०१२ मध्ये एलिन वेली यांनी केली. त्यानंतर सेंट निनियास शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध शारीरिक उपक्रम राबविले. १५ मिनिटांच्या सुटीत शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांना धावणे, चालणे आणि इतर शारीरिक क्षमता वाढविणाऱ्या व्यायामांसाठी प्रोत्साहन देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर स्कॉटलंड सरकारने ‘द डेली माइल’च्या उपक्रमाला देशात मान्यता दिली. ब्रिटनमध्ये या उपक्रमाला पाठिंबा मिळाला असून नेदरलँड, बेल्जियम या देशांतही या उपक्रमाला मान्यता मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

कैरी असे नुसते ऐकले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. मग शाळेच्या बाहेर तिखट मीठ लावून ठेवलेले कैरीचे काप असोत कींवा शेजारच्या काकूंच्या झाडावरची दगड मारुन पाडलेली कैरी असो. आंबट गोड चवीची ही कैरी खायला तर चविष्ट असतेच पण तितकीच ती आरोग्यासाठीही उपयुक्त असते. कैरीचे लोणचे, मुरांबा, मेथांबा, गुळांबा, साखरांबा असे अनेक प्रकार या सिझनमध्ये जेवणाचा स्वाद वाढवतात. याबरोबरच वर्षभरासाठी करुन ठेवले जाणारे हे पदार्थ आपल्या कधी कामी येतील सांगता येत नाही. याबरोबरच पन्हे, कैरीचा भात, कैरीची डाळ हे पदार्थही तितकेच चविष्ट असतात. आता काही दिवसांतच आंब्याचा सिझन कमी होईल आणि घरोघरी हे साठवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरु होईल. पाहूयात आहारात कैरीचा नेमका काय आणि कसा उपयोग होतो.

पोटाच्या तक्रारींसाठी उपयुक्त

या दिवसांत पोटाशी निगडित समस्या उद्भवतात. गॅसेस, अपचन यांसारख्या तक्रारी वाढतात आणि पचनशक्ती क्षीण होते. मात्र कैरीमुळे या तक्रारी दूर होण्यास निश्चितच मदत होते. कैरीचे पदार्थ खाल्ल्याने ही बिघडलेली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

हिरड्यांच्या मजबूतीसाठी फायदेशीर

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. काहींना विविध कारणांनी हिरड्यांमधून रक्त येते. ते रोखण्यासाठी कैरी अतिशय उत्तम काम करते. कैरीमुळे दात मजबूत राहतात. तसेच तोंडाचा वास येण्याची समस्याही कमी होते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

आंबा खाल्ल्याने वजन वाढते असे आपण या काळात अनेकदा ऐकतो. पण आंब्यामुळे वजन वाढत नाही. तसेच कैरी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. शरीरावर वाढलेल्या अतिरिक्त चरबीला कमी करण्यासाठी कैरीचे सेवन फायदेशीर ठरते.

त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय

उन्हामुळे त्वचेवर येणारे रॅशेस कमी करण्यासाठी कैरीचा उपयोग होतो. उन्हामुळे शरीरात वाढणारा थंडावा कमी करण्यासाठी कैरीचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात घाम येणे हे अतिशय सामान्य आहे. मात्र कैरीचा रस प्यायल्यास घाम येणे कमी होते. घामाद्वारे शरीरातील आयर्न आणि सोडियम क्लोराईडची पातळी कमी होते. मात्र कैरीचा आहारातील समावेश ही पातळी भरुन काढण्यास उपयुक्त ठरतो.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत

सध्या मधुमेह ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहणे आवश्यक असते. कैरीच्या सेवनाने हे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठीही कैरीची मदत होते.

Dr. Sandeep Darunde
Dr. Sandeep Darunde
BAMS, Optician Ophthalmologist, 3 yrs, Pune
Dr. Ashwin Prasad
Dr. Ashwin Prasad
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Cosmetic Surgeon, 2 yrs, Pune
Dr. Urmila Kauthale
Dr. Urmila Kauthale
BAMS, Ayurveda, 7 yrs, Pune
Dr. Ashish Babel
Dr. Ashish Babel
BHMS, Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Dennis David
Dr. Dennis David
MS - Allopathy, General and Laparoscopic Surgeon, 7 yrs, Palakkad
Hellodox
x