Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

धूम्रपानाचे एकदा जडलेले व्यसन अनेकांच्या बाबतीत सुटता सुटत नाही. काही दिवस ते त्यापासून दूर राहतातही, पण पुन्हा त्याकडे आकर्षित होतात.

अशा लोकांसाठी शास्त्रज्ञांनी आता एक ऑटोमॅटिक अलर्ट सिस्टिम विकसित केली आहे. प्रेरणादायी टेक्स्ट आणि व्हिडिओ संदेश पाठवून ते धूम्रपानापासून सुटका करून घेण्यास मदत करते.


अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही सिस्टिम विकसित केली असून त्यांच्या माहितीनुसार, एका स्मार्टफोन सोबतही ही सिस्टिम जोडण्यात आली आहे.

अंगावर परिधान करण्यायोग्य सेन्सरच्या मदतीने ही सिस्टिम धूम्रपानासंबंधी हालचालींची ओळख झाल्यास लोकांना 20 ते 120 सेकंदांचा व्हिडिओ संदेश पाठवते.

धूम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी निकोटिन गमपासून विविध प्रकारची उत्पादने आज बाजारात उपलब्ध आहेत.

मात्र आजच्या काळात या सवयीपासून सुटका करून घेण्यासाठी शरीरावर परिधान केल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाची लोकप्रियता वाढत आहे. या दिशेने ही नवी अलर्ट सिस्टिम पहिलेच पाऊल असू शकते.

या सिस्टिममध्ये दोन आर्मबँड सेन्सरही असून ते धूम्रपान हालचाली ओळखतात. चाचणीमध्ये ही सिस्टिम 98 टक्के खरी उतरली.

धुम्रपनामुळे बहिरेपणाचा धोका असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासासाठी 50,000 लोकांचा आठ वर्षांसाठी अभ्यास करण्यात आला होता. जपानधील जागतिक आरोग्य आणि औषध केंद्रातील संशोधकांनी लोकांच्या वर्षिक आरोग्य चाचणीतून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले.


यामध्ये अभ्यासात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तींना आरोग्य आणि जीवनशैलीविषयक प्रश्र्न विचारण्यात आले. अभ्यासात धू्म्रपान करणार्‍या, धू्म्रपान सोडून दिलेल्या आणि कधीही धू्म्रपान न केलेल्या लोकांची तपासणी केली. यावेळी एका दिवसात किती वेळा धू्म्रपान केले जाते आणि किती प्रमाणात धू्म्रपान केल्याने श्रवण यंत्रणेला धोका होतो याचे विश्लेषण करण्यात आले.
कामाच्या ठिकाणी किंवा इतरत्र मोठ्या प्रमाणात असणारे ध्वनिप्रदूषण आदी घटकांचे समायोजन केल्यानंतर धू्म्रपान करणार्‍यांमध्ये कधीही धू्म्रपान न करणार्‍यांच्या तुलनेत 1.2 ते 1.6 टे जास्त धोका असल्याची संशोधकांनी नोंद केली. धू्म्रपानामुळे कमी तीव्रतेच्या ध्वनी लहरींच्या तुलनेत उच्च तीव्रतेच्या ध्वनिलहरी ऐकण्याची क्षमता कमकुवत होते. धू्म्रपान सोडण्याच्या पाच वर्षांनंतर बहिरेपणाचा धोका कमी होतो.

मोठ्या कालावधीसाठी भरपूर लोकांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून धू्म्रपान बहिरेपणाचा धोका निर्माण करू शकत असल्याचे सबळ पुरावे समोर आले आहेत, असे जपानधील जागतिक आरोग्य आणि औषध केंद्रातील हुआनहुआंग हू यांनी सांगितले. बहिरेपणाचा धोका टाळण्यासाठी तंबाखूचे सेवन टाळणे गरजेचे असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे, असेही हू यांनी सांगितले. हा अभ्यास निकोटिन आणि टोबॅको रिसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

धू्म्रपान आणि मद्यपान करणार्‍या व्यक्तीला आयुष्यभर एट्रियल फायब्रिलेशन (एएफ) नामक आजाराने ग्रस्त होण्याचा धोका असतो. या आजारामध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात, त्यामुळे रुग्ण ह्रदयविकाराचा झटका, पक्षघात, स्मृतिभ्रंश आदींची शिकार ठरू शकतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अध्ययनानुसार, धू्म्रपान व मद्यपानामुळे 55 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये एट्रियल फायब्रिलेशन आजाराचा धोका सुमारे 37 टक्के जास्त असतो. शास्त्रज्ञांनी सांगितले की, आजाराच्या अल्पकाळ धोक्यासोबतच दीर्घकालीन धोक्याचा अंदाज बांधणे आवश्यक आहे.

त्यामुळे आजाराची जलद ओळख होण्यासोबतच जीवनशैलीमध्ये बदल करून तिला नियंत्रित करणे सोपे जाते. या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी सुमारे 5 हजार लोकांच्या रक्तदाबाची आकडेवारी बॉडी मास इंडेक्स, मधुमेहासोबतच त्याचे धू्म्रपान व मद्यसेवानाची माहिती गोळा करण्यात आली.

आज जगभरात World No Tobacco Day हा दिवस पाळला जातो. तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी लाखों लोकांचा मृत्यू होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं तंबाखूच्या विळख्यात अडकली आहेत. तंबाखूमुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या विविध आजारांसोबतच हाडांचीही समस्या होते. अशा जर तुम्हाला तंबाखू सोडायचा असेल तर आणि त्यासाठी उपाय शोधत असाल तर खालीलप्रमाणे काही गोष्टींचा वापर करु शकता.

सकारात्मक रहा

तुम्ही जर दिवसभर तंबाखूचं सेवन करत असाल तर ही सवय मोडणे तुमच्यासाठी मोठं आव्हानच असणार आहे. अशावेळी तुम्ही सकारात्मक विचार करणे आणि मनाची तयारी करणे आवश्यक आहे. आपण हे करु शकतो अशी गाठ मनात बांधून ठेवा. स्वत:वर विश्वास ठेवा. अशात तुमच्या मनात अनेक चुकीचे विचार येणार आणि पुन्हा तुम्ही त्याच मार्गावर जाण्याचा प्रयत्न कराल अशावेळी स्वत:ला रोखण्याची तुमची परीक्षा असेल.

प्लॅन आखून काम करा

तंबाखूची सवय मोडण्यासाठी एक दिवस ठरवा. तंबाखू खाण्याचे नुकसान, त्याने काय होतं याबाबात जे वाचायला मिळेल ते वाचा. मनाची पूर्ण तयारी करा.

स्वत:ला बिझी ठेवा

तंबाखूची सवय मोडायची असेल तर सर्वात चांगला उपाय म्हणजे स्वत:ला कामात व्यस्त करुन घेणे. लोकांसोबत वेळ घालवा, सतत पाणी प्यायला हवे, टीव्ही बघा. हे सगळं करताना काही दिवस तुम्हाला त्रास होईल पण याने तुमचं मन डालव्हर्ट होईल आणि तुमची सवय मोडण्यास मदत होईल.

या गोष्टींपासूनही रहा दूर

त्या गोष्टींपासूनही दूर रहा ज्यामुळे तंबाखूचं सेवन करण्यास प्रोत्साहन मिळतं. कॉफी ब्रेक किंवा ड्राईव्ह करताना याची खास काळजी घ्या. घरातून तंबाखू बाहेर फेकून द्या. जे तंबाखू खाणारे लोक आहे त्यांच्यापासून दूर रहा.

हे ट्राय करा

तंबाखूचं व्यसन मोडण्यासाठी तुम्हाला तुमचं मन दुसऱ्या गोष्टीत लावावं लागेल. तुम्हाल जर तंबाखू खाण्याची तलब आली तर च्यूईंगम, ओवा खावा. याने तुम्हाला आलेली तबल त्या वेळेपुरती मारली जाते.

ताणतणाव हा आजकाल आपल्या जीवनशैलीचा जणू एक भाग झालाच आहे. मात्र अनेकजण या तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यसनाची मदत घेतात. मद्यपान किंवा सिगारेट पिण्याची सवय आरोग्याला घातक असते. अनेकदा सिगारेट ओढण्याचे दुष्परिणाम माहित असुनही केवळ व्यसन म्हणून टोबॅकोचं सेवन केलं जातं. कालांतराने आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम दिसून आल्यानंतर अनेकजण भानावर येतात. मग हे टोबॅकॉचं व्यसन दूर कसं करायचं या तुमच्या मनातील प्रश्नावर आयुर्वेदामधील काही घरगुती उपाय मदत करू शकतात.

अश्वगंधा -

अश्वगंधाची पावडर पाण्यात मिसळून प्यायल्याने धुम्रपानाची सवय कमी होण्यास मदत होते.

तुळशीची पानं -

तुळशीची पानं नियमित सकाळी चघळल्याने अनेक व्हायरल इंफेक्शनपासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. सोबतच तुम्हांला सतत धुम्रपान किंवा टोबॅको सेवनाचं व्यसन लागलं असल्यास त्यापासून तुमची सुटका होण्यास मदत होऊ शकते.

मध -

मधाच्या सेवनानेही सिगारेट पिण्याची सवय हळूहळू कमी होते.

त्रिफला -

त्रिफळाचं सेवन तंबाखू आणि धुम्रपानाची सवय आटोक्यात ठेवण्यास मदत करते.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं -

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याची सवय आरोग्याला फायदेशीर आहे. अनेक आजारांपासून तुमची सुटका करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं हितावह आहे. परंतू टोबॅकोचं सेवन आटोक्यात ठेवण्यासही मदत होणार आहे.

द्राक्षांच्या बीयांचा अर्क -

द्राक्षाच्या बीयांचा अर्क फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. धुम्रपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा त्रास टाळण्यासाठी द्राक्षांच्या बीयांचा अर्क मदत करतो.

दालचिनी -

गोड- तिखट चवीची दालचिनी इन्फेक्शनचा त्रास कमी करण्यास मदत करते. त्यामुळे सिगारेट ओढायची इच्छा झाल्यास दालचिनीची एखादी काडी चघळा. यामुळे हळूहळू तुमचं व्यसन कमी होण्यास मदत होईल.

ओवा -

धुम्रपानाची इच्छा झाल्यास ओव्याचे काही दाणे चघळा. यामुळे तुमची धुम्रपानाची सवय कमी होईल. अवघ्या 2 दिवसात तंबाखू, गुटख्याचं व्यसन कमी करायला मदत करेल 'हा' घरगुती उपाय.

Dr. Sapna Mahajan
Dr. Sapna Mahajan
BAMS, Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Richa
Dr. Richa
BAMS, Mumbai Suburban
Dr. Pankaj  Patidar
Dr. Pankaj Patidar
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune
Dr. Ramesh Ranka
Dr. Ramesh Ranka
MS - Allopathy, Orthopaedics, 25 yrs, Pune
Dr. Dharmendra Singh
Dr. Dharmendra Singh
MS/MD - Ayurveda, Cardiologist Diabetologist, 1 yrs, Pune
Hellodox
x