Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

For the first time, scientists have induced natural sensations in the arm of a paralysed man by stimulating a certain region of the brain with a tiny array of electrodes.

The patient in the US has a high-level spinal cord lesion and, besides not being able to move his limbs, also cannot feel them. The work could one day allow paralysed people using prosthetic limbs to feel physical feedback from sensors placed on these devices.

The somatosensory cortex is a strip of brain that governs bodily sensations, both proprioceptive sensations (sensations of movement or the body's position in space) and cutaneous sensations (those of pressure, vibration, touch, and the like).


Previously, neural implants targeting similar brain areas predominantly produced sensations such as tingling or buzzing in the hand.

The implants developed by California Institute of Technology in the US is able to produce much more natural sensation via intracortical stimulation, akin to sensations experienced by the patient prior to his injury.

The patient had become paralysed from the shoulders down three years ago after a spinal cord injury. Two arrays of tiny electrodes were surgically inserted into his somatosensory cortex.

Using the arrays, the researchers stimulated neurons in the region with very small pulses of electricity. The participant reported feeling different natural sensations - such as squeezing, tapping, a sense of upward motion, and several others - that would vary in type, intensity, and location depending on the frequency, amplitude, and location of stimulation from the arrays.

It is the first time such natural sensations have been induced by intracortical neural stimulation.

"It was quite interesting. It was a lot of pinching, squeezing, movements, things like that. Hopefully it helps somebody in the future," the patient said.

Though different types of stimulation did indeed induce varying sensations, the neural codes governing specific physical sensations are still unclear.

In future work, researchers hope to determine the precise ways to place the electrodes and stimulate somatosensory brain areas in order to induce specific feelings and create a kind of dictionary of stimulations and their corresponding sensations.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



ब्रेन स्ट्रोकची लक्षणं अन् उपचार

भारतात दरवर्षी जवळपास १५ लाख लोकांना स्ट्रोक हा आजार सतावतो. स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याचा आजार असला, तरी अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.

स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा अॅटॅक अथवा लकवा. याला ब्रेन अॅटॅक असंही म्हटलं जातं (ज्याप्रमाणे हृदयविकाराच्या झटक्याला ‘हार्ट अॅटॅक’ म्हटलं जातं). स्ट्रोक हे जगातील मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आणि अपंगत्वाचे चौथ्या क्रमांकाचे कारण आहे. भारतात दरवर्षी जवळपास १५ लाख लोकांना स्ट्रोक हा आजार सतावतो. स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याचा आजार असला, तरी अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. ब‌ी १२ जीवनसत्त्वाची कमतरता, होमोसिस्टीन या घटकाचं जास्त प्रमाण, हृदयाच्या झडपांचे आजार ही तरुण वयातील स्ट्रोकची कारणं असू शकतात.

मेंदूला पुरेसा प्राणवायू चा पुरवठा न मिळाल्याने मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा अॅटॅक अथवा लकवा,याला ब्रेन अॅटॅक असंही म्हटलं जातं. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्त पुरवठा करणारी धमनी फाटली असता हा त्रास उद्भवू शकतो. यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणे आवश्यक आहे. याबाबत बहुसंख्य लोकांना माहिती नसते. चालू तासांच्या आत विशिष्ट गुठळी कमी करण्याकरिता उपाय केले गेले नाहीत तर मृत्यू ओढवू शकतो. छातीत धडधडण हि गोष्ट वरकरणी साधी वाटली तरीही प्रत्येक वेळी याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्याच बरोबर धाप किंवा अस्वस्थता वाटत असेल तर हि कदाचित ब्रेन स्ट्रोक च्या अटॅक ची लक्षणही असू शकतात. उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.

ब्रेन स्ट्रोक एक घातक रोग आहे आजकल १० पैकी ६ व्यक्ती कधी न कधी स्ट्रोक च्या समस्या चे शिकार होतात बहुतेक वाढत्या युगामध्ये अशा प्रकारच्या समस्या दिसतात ज्या कारणाने बऱ्याच वेळा मानवी व्यक्तीचा मृत्यूही होतो. ब्रेन स्ट्रोक येण्यानंतर रुग्णांना बहुतेक त्यांच्या बोलण्यातून आणि ऐकण्याची शक्ती गमावून बसतो. जीवन जगण्यासाठी त्यांना दुसऱ्या लोकांचा सहारा घ्यावा लागतो. या व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये अडचणी, शरीराचा एक भाग सुन्न पडणे, मासपेशींमध्ये कमजोरी येणे इत्यादि अनेक प्रकारची समस्या आहे.

ब्रेन स्ट्रोक झाल्यावर मेंदूत गुठळ्या होतात. उत्तर गुठळ्या हृदयाकडून मेंदूपर्यंत पोहोचतात. ह्या गुठळ्या विरघळवण्यासाठी अत्यंत पॉवरफुल इंजेक्शन घ्यावे लागतात. हृदयाचे ठोके अनियमित असतील तर आणि त्यावर वेळेत उपचार केले नाही तर त्याचा गुठळ्या तयार होतात. या गुठळ्या मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होतो आणि हृदय बंद पडते. हि समस्या जगभरात आढळून येते. आणि दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या संदर्भात २०१० साली लोकसंख्येवर आधारित करण्यात आलेल्या पाहणीत तीन कोटी ३५ लाख व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके अनियमित असल्याचे आढळून आले आणि यात दरवषी सुमारे ५० लाख व्यक्तींची भर पडत आहे. हि काळजी करण्यासारखी बाब आहे. कारण यामुळे हृदयात गुठळ्या तयार होऊन त्या शरीरातील इतर अवयवपर्यंत विशेषतः मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका असतो.

स्ट्रोकचे प्रकार :
सर्वसाधारणपणे स्ट्रोक दोन प्रकारचे असू शकतात.
१) इश्केमिक म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्याने (रक्तवाहीनीत गाठ (थ्रोम्बस) तयार होऊन रक्तपुरवठ्यास अडथळा निर्माण होतो).
२) हेमरेजिक म्हणजे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने आलेला स्ट्रोक सर्वसाधारणपणे उच्च रक्तदान हे अशा स्ट्रोकचं महत्त्वाचं कारण असतं.

- ब्रेन स्ट्रोकची लक्षणं: लकवा हा अचानक येतो. तोंड वाकडं होणं, बोलताना बोबडी वळणं, एका बाजूच्या हातापायाची ताकद कमी होणं, चालताना तोल जाणं, डोकं दुखणं, झटके येणं ही सर्वसाधारणपणे स्ट्रोकची लक्षणं असतात.

- निदानासाठी आवश्यक चाचण्या : प्रत्येक स्ट्रोकच्या निदानासाठी एमआरआय, ब्रेन अँजिओग्राम या चाचण्या केल्या जातात. रिस्क फॅक्टर शोधण्यासाठी हिमोग्लोबीन, रक्तातील साखर, लिपीड प्रोफाईड, होमोसिस्टिन २ डी इको या चाचण्या केल्या जातात.

- ब्रेन स्ट्रोकवरील उपचार: अलीकडे इश्केमिक स्ट्रोकच्या उपचारात बरीच क्रांती झाली आहे. जर स्ट्रोक झाल्याच्या साडे चार तासाच्या आत आपण रुग्णालयात पोहोचला आणि सीटी स्कॅनमध्ये रक्तस्त्राव नसेल, तर इंट्राव्हेनस टीपीए (टिश्यू प्लास्मिनोजेन अॅक्टिवेटर) नावाचं रक्तातील गाठ वितळवणारं औषध दिल्यास बराच फायदा होऊ शकतो. अर्थात हे औषध देण्यापूर्वी डॉक्टर काही गोष्टींची खात्री करुन घेतात. कधी-कधी या औषधाने मेंदूत रक्तस्त्राव होणं यासारखी गंभीर गुंतागुंत देखील होऊ शकते. कधी कधी सहा ते बारा तासाच्या दरम्यान डीएसए (डीजीटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी) नावाची चाचणी करुन रक्तवाहीनीतील अडथळा अचूक ओळखता येतो आणि तो अडथळा ‘मेकॅनिकल अॅम्बेक्टमी’ या प्रक्रियेद्वारा दूरही करता येतो. पण याहून जास्त कालावधी झाला असेल तर अॅस्थिरिन कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधं देऊन पुन्हा लकवा होण्याची शक्यता कमी करता येते. उच्च, रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान यांचे नियंत्रण करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. हातापायाची ताकद हळूहळू सहा महिन्यांपर्यंत सुधारते. पण त्यासाठी फिज‌िओथेरपी खूप महत्त्वाची असते. हेमरेजिक स्ट्रोकच्या उपचारासाठी कधीकधी न्युरोसर्जरीची वेळ येऊ शकते.

ब्रेन स्ट्रोक कसा ओळखावा
- बोलायला आणि समजायला अवघड जाते. आवाजात फरक पडतो किंवा काही गोष्टी समजण्यास अडचण येते.
- चेहऱ्यावर, हात किंवा पाय यावर कमजोरी येते किंवा ते सुन्न होतात. विशेषतः शरीराच्या एका बाजूला भागाला जास्त जाणवते.
- एक किंवा दोन्ही आंखांपासून ते अडखळणे आपण अचानक एका किंवा दोन्ही डोळेाने अंधुक किंवा काळे दिसू शकता किंवा एकाचे दोन दिसू शकतात.
- अचानक डोक्यात खूप दुखणे आणि त्याच्याबरोबरच उलटी,चक्कर आणि बेशुद्ध होण्याची शक्यता आहे.
- चालताना अडचणी येतात.

हा रोग कोणाला होऊ शकतो?
- ५५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कोणालाही विशेषता: पुरुषांना होऊ शकतो.
- आनुवंशिकता असल्यास
- उच्च रक्तदाब असलेल्यांना
- शरीरात कोलेस्टेरॉलच प्रमाण अधिक असलेल्यांना होतो.
- धुम्रपान करणाऱ्यांना होतो.
- मधुमेहाचे रुग्ण
- माइल्ड स्ट्रोक अॅटॅक आलेले
- नैराश्य आलेले किंवा मानसिक तणावाखाली असणारे
- अल्कोहोलच अतिरिक्त सेवन करणारे

आहार
पोषक पदार्थांचे सेवन सगळ्यांसाठी ते आवश्यक आहेत, परंतु विशेषतः त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहेत, जे ब्रेन स्ट्रोक पासून पीडित आहेत पोषक अन्न खाणे नाही फक्त मस्तिष्क क्षतिग्रस्त होणारी कोशांची पुनर्रचना होऊ शकते,पण भविष्यात स्ट्रोक होण्याची शक्यता आहे. अस जेवण करा कि ज्यामध्ये मीठ, कोलेस्ट्रॉल,ट्रान्सफॅट आणि सेचुरेटेड फॅट ची मात्रा कमी असेल. आणि एंटीऑक्सीडंट, विटामिन ई, सी आणि ए मात्रा अधिक असेल. संपूर्ण अन्नधान्य खाणे, कारण हे फायबर चांगले स्त्रोत आहेत आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अदरक चे सेवन करा,कारण ह्यामुळे रक्त पातळ होते आणि थाप तयार होणे आशंका कमी होतो. ओमेगा फॅटीऍसिड युक्त खाद्य पदार्थ जसे की मासे,अखरोट,सोयाबीन इ. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात आणि रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण कमी होतो. जांभूळ,गाजर,टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्या भाज्या निश्चितपणे खाऊन घ्यावे कारण त्यात अँटी ऑक्सीडंटचे प्रमाण खूप जास्त आहे.
लक्षण
लहान स्वरूपाच्या स्ट्रोक मध्ये मात्र अशी कोणतीही लक्षण दिसत नाहीत. मात्र तरीही मेंदूच्या पेशी निकामी करण्याच काम होत असत.

- अशक्तपणा येणे
- डोळ्यांसमोर अंधारी येणे.
- चालताना अडखळत चालणे
- शरीराच संतुलन बिघडणे
- स्मरणशक्ती वर परिणाम होणे
- बधीरपणा येण
- धुरकट किवा दुहेरी प्रतिमा दिसण
- लकवा येणे
- तोंड वाकडं होणं बोबडी बोलणे
- एका बाजूच्या हातापायाची ताकद कमी होणं,
- डोकं दुखणं
- झटके येणं

उपाय
आपल्याला असणाऱ्या उच्च रक्तदाबाची आपल्याला पूर्ण माहिती असं आवश्यक आहे. तसचं त्यावर संयम कसा ठेवावा याचीही तितकीच माहिती असण गरजेच आहे. जेणेकरून पटकन उपचार करता येऊ शकतो.

- धुम्रपान टाळावे
- कोलेस्टेरॉल वाढवणारे चरबीयुक्त पदार्थ टाळावेत. विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात.
- आहारात टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटोचा अॅटिआॉक्सिडंट असल्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव होतो.
- अॅरोबिकसारखे व्यायाम नियमित करावेत.
- मानसिक ताणावर नियंत्रण ठेवाव.
- विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात.



अर्धांगवायू (पॅराल‌सिीस) :
पॅराल‌सिीसमध्ये टाईम इज ब्रेन असं म्हणतात. कारण यामध्ये वेळेला अतिशय महत्त्व आहे. उपचारासाठी तुम्ही जितका वेळ दवडाल तितका गंभीरपणा वाढतो. अनेक केसेसमध्ये उपचाराला वाव खूप कमी असतो. पॅराल‌सिीस होण्याचं प्रमाण वयाच्या साठीनंतर असलं तरी सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये देखील त्याचं प्रमाण वाढत आहे. पॅराल‌सिीसचे प्रकार :

मेंदूचा पॅराल‌सिीस : १०० टक्के रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांना रक्तवाहिनीतील रक्त गोठल्यामुळे (थ्राँबॉसिस) पॅराल‌सिीस होतो. तर उर्वरित २० टक्कयातील १५ ते १८ टक्के रुग्णांना मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे रक्ताची गाठ निर्माण होऊन पॅराल‌सिीस होतो. डायबेटीस, ब्लडप्रेशरच्या रुग्णांमध्ये अचानक रक्तस्त्राव वाढतो आणि रक्तवाहिनी फुटून पॅराल‌सिीस होऊ शकतो.

सेन्ट्रल व्हिनस थ्राँबॉसिस : याप्रकारच्या पॅराल‌सिीसमध्ये मेंदूमधून ह्रदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये (सेरेब्रल व्हेन) रक्त गोठल्यामुळे मेंदूला अचानक सूज येऊन रक्तस्त्राव होतो. मद्याचे अतिप्रमाणात सेवन करणं, शरीराच्या संप्रेरकातील असमतोल, अतिशय कमी प्रमाणात पाणी पिणं, धूम्रपान तसंच स्त्रियांमध्ये मूल न होण्यासाठी औषधं घेणं आदी कारणांमुळे सेन्ट्रल व्हिनस थ्राँबॉसिसचे प्रमाण वाढत आहे.

अन्युरिझमल हिमरेज : रक्तदाब वाढल्यामुळे मेंदूमधील रक्तवाहिनीला फुगवटा येऊन तो फुटतो आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो. यामध्ये रुग्ण लगेच दगावू शकतो.

सबड्युरल हिमोटमा : वयोमानानुसार मेंदू आकुंचित होतो. त्यामुळे मेंदू आणि कवटीमध्ये जागा निर्माण होते. छोटासा धक्का बसल्याने मेंदू आणि कवटीमध्ये रक्तस्त्राव होतो. तो रक्तस्त्राव कालांतराने वाढून मेंदूवर दाब येतो आणि पॅराल‌सिीसची लक्षणं आढळतात.

मणक्याच्या विकारामुळे पॅराल‌सिीस: मज्जातंतूवर दाब आल्याने शरीराच्या दोन्ही बाजूला पॅराल‌सिीस होऊ शकतो. मणक्याचं हाड मोडणं, मणक्यातील गादी निसटणं, मणक्याच्या हाडांना टी.बीमुळे पू झाल्याने मज्जातंतूवर दाब येतो. तसंच मणक्याचे विकार किती प्रमाणात गंभीर आहेत, यावरुन पॅराल‌सिीस किती आणि कुठे होईल हे ठरतं.

जंतूसंसर्ग : लहान मुलांमध्ये जंतूसंसर्गामुळे पॅराल‌सिीस होण्याचा संभव असतो. पोलिओचा डोस योग्य वेळी न दिल्यास पॅराल‌सिीस होऊ शकतो. पोलिओचा विषाणू नसांमधून मज्जांततूमध्ये आल्याने पॅराल‌सिीस होतो. ट्रान्सर्व्स मायलेटीसमुळे या आजारामुळे वयाच्या ३० ते ५० च्या रुग्णांना पॅराल‌सिीस होण्याचा संभव असतो.

अर्धांगवायूची लक्षणे व निदान
आतापर्यंत आपण प्रत्येक प्रकारच्या स्ट्रोकमध्ये नेमके उपचार काय असतात, ते पाहिले. त्या व्यतिरिक्त रुग्णाची विविध रूपाने काळजी घ्यावी लागते. स्ट्रोकच्या रुग्णांना सुरुवातीचे काही दिवस आयसीयू (अतिदक्षता विभाग) किंवा स्ट्रोक युनिटमध्ये (स्ट्रोक युनिट- स्ट्रोक रुग्णांची विशेष काळजी घेण्यास सक्षम असलेला दक्षता विभाग) भरती ठेवावे. रुग्णाची विशेष देखरेख करावी लागते. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण, हृदयाची स्पंदने, रक्तदाब, त्याची शुद्ध हरपली आहे का, मेंदूचे कार्यचालन व्यवस्थित चालले आहे का, अशा अनेक गोष्टींवर डोळ्यांत तेल घालून देखरेख करावी लागते. काही कमी-जास्त झाल्यास नवीन उपचार करावे लागतात. औषधे बदलावी लागतात. मास्कमधून प्राणवायूचा पुरवठा करावा लागतो, रक्तदाब व साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागते. रुग्णाची शुद्ध हरपत आहे किंवा श्वसनक्रिया कमजोर होत आहे, असे वाटल्यास त्याला कृत्रिम श्वसन द्यावे लागते.

याशिवाय रुग्णाचे पुनर्वसन करावे लागते. यात प्रामुख्याने फिजिओथेरपी व स्पीच थेरपी समाविष्ट आहे. रुग्ण बिछान्यावर पडून असेपर्यंत त्याला खास प्रकारची गादी (ज्याला हवा किंवा पाण्याने भरलेली) वापरावी लागते. त्याचबरोबर दर अर्ध्या, एक तासानंतर कुशी बदलावी लागते. यामुळे त्याला पाठीला व पार्श्वभागाला जखमा (बेडसोर्स) होत नाहीत.

आता पॅरालिसिस कसा टाळाल?
सर्वप्रथम डॉक्टरांनी रक्त पातळ होण्यासाठी, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, साखर कमी राहण्यासाठी औषधे सांगितलेली असतात, ती खंड न पडता नियमित घेणे. त्याबरोबर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'जीवनशैली बदलणे'. म्हणजे काय, तर तंबाखू, मद्यपान यांसारख्या वाईट सवयी सोडणे. त्याबरोबर रोज अर्धा तास तरी एरोबिक स्वरूपाचा व्यायाम करणे, उदा. चालणे, सायकलिंग, लठ्ठपणा व वजन कमी करणे, दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी १०-१५ मिनिटे ध्यानधारणा करणे.

सरतेशेवटी असे सांगावेसे वाटते, की पॅरालिसिसला वेळेत उपचार मिळाले, तर नुसता जीवावरचा धोकाच टाळता येतो, असे नाही, तर आलेली विकलांगतादेखील बरीच कमी करता येते. मात्र, उपचार वेळेत झाले पाहिजेत. 'टाइम इज ब्रेन'! त्याबरोबरच विविध प्रकारच्या औषधांच्या मदतीने व जीवनशैलीत बदल घडवून भविष्यात टाळतादेखील येतो.



चेहऱ्याचा लकवा (facial Paralysis)

लकवा (Paralysis) झाल्यावर लगेच कराल हे उपाय तर रुग्णास काहीही होणार नाही:

लकवा मारणे ही एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराचा एखादा भाग निकामी होतो. यास इंग्रजी मध्ये पैरालिसिस म्हणतात, हा आजार साधारणपणे 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना होतो. पण आजकाल हा आजार तरुण वयात म्हणजे अगदी 30 पेक्षा कमी वयाच्या लोकांना झाल्याचे पण पाहण्यात आले आहे.

जर सावधानी घेतली गेली नाही तर लकवा कधीही होऊ शकतो. जर दुर्भाग्याने लकवा झाला तर त्यादरम्यान काय उपाय केले पाहिजेत याबद्दल आज आम्ही येथे माहीती देत आहोत, येथे दिलेल्या टिप्स फॉलो करून लकवाग्रस्त रोगी बिलकुल ठीक होऊ शकतो.

लकवा होण्याची 3 कारणे असू शकतात.

- शरीराचा एखादा भाग जास्त वेळ दबलेला राहिल्यामुळे देखील लकवा होऊ शकतो. जास्तवेळ एखादा भाग दाबलेला राहिल्यामुळे त्या भागात रक्त प्रवाह व्यवस्थित होऊ शकत नाही, ज्यामुळे आपला मेंदू त्या भागाचा रक्तप्रवाह थांबवून टाकतो. रक्तप्रवाह थांबल्यामुळे तो भाग निकामी होतो आणि लकवाग्रस्त होतो.

- अमलीपदार्थ सेवन केल्यामुळे रक्तातील अम्लाचे प्रमाण वाढते ज्यामुळे धमन्या बाधित होतात आणि लकवा होतो.

- कधी कधी जास्त तणावात राहिल्यामुळे डोक्यात रक्त गोठले जाते ज्यामुळे पैरालिसीस होण्याची शक्यता वाढते. यासाठी जास्त चिंता आणि काळजी केली नाही पाहिजे.

## लकवा झाल्यास करा लगेच हे उपाय

लकवा झाल्यावर लगेच रुग्णाला एक चमचा मध मध्ये 2 लसून मिक्स करून खाऊ घाला. यामुळे लकव्या पासून सुटका मिळू शकते.

कोणाला लकवा झाला असेल तर कबुतर चे मिट खाऊ घाला असे केल्यामुळे लकवा लगेच ठीक होऊ शकतो. हे उपचार लकवा झाल्यास सर्वात जास्त वापरले जातात.


कलौंजी (काळे जिरे) चे तेलाने लकवा झालेल्या जागी मालिश करा.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



अर्धांगवायू(Bells palsy):

अर्धांगवायू म्हणजे काय?

अर्धांगवायू म्हणजे इंग्रजीत ज्याला पॅरॅलिसीस म्हणतात तो आजार. याला लकवा, पक्षाघात, ब्रेन अ‍ॅटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक या नावानेही ओळखले जाते. आपल्या देशात दरवर्षी पंधरा-सोळा लाख लोक या आजाराच्या विळख्यात येतात. अचूक माहिती नसल्याने किंवा वेळेवर उपचार न मिळाल्याने यातील एकतृतीयांश लोक मृत्युमुखी पडतात आणि आणखी एकतृतीयांश लोक आयुष्यभर विकलांग होतात. आपल्या कुटुंबीयांवर त्यांना अवलंबून राहावे लागते. केवळ एकतृतीयांश लोकांना योग्य उपचार, तेही वेळेवर मिळतात आणि ते बरे होतात.

अर्धांगवायूची कारणे

-मेंदू आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि अर्धांगवायूचा थेट संबंध मेंदूशी आहे. शरीरातील सर्व अवयवांचे आणि त्यांच्या हालचालींचे तसेच कामांचे नियंत्रण मेंदू करत असतो. बोलणे, चालणे, फिरणे, पाहणे अशा सर्व क्रिया या मेंदूकडूनच नियंत्रित होतात. जेव्हा मेंदूच्या रक्‍तवाहिन्यांत काही गडबड निर्माण होते, तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो आणि तो पॅरॅलिसीस म्हणजे अर्धांगवायूचे कारण बनतो.

-शरीराच्या अन्य भागांप्रमाणे मेंदूतही दोन प्रकारच्या रक्‍तवाहिन्या असतात. एक म्हणजे हृदयापासून मेंदूपर्यंत रक्‍त वाहून नेतात त्या आणि दुसर्‍या मेंदूकडून पुन्हा हृदयाकडे रक्‍त नेणार्‍या वाहिन्या. ज्या वाहिन्या मेंदूला रक्‍तपुरवठा करतात, त्यांना धमनी (आर्टरी) म्हणतात आणि ज्या वाहिन्या मेंदूकडून हृदयाकडे रक्‍त नेतात त्यांना शिरा (व्हेन) म्हणतात. या धमनी आणि शिरांत बिघाड झाल्यावर अर्धांगवायू होतो; पण बहुतांश अर्धांगवायू आर्टरी किंवा धमन्यांत बिघाड झाल्यामुळे होतो.

- हृदयापासून मेंदूपर्यंत चार मुख्य रक्‍तवाहिन्यांतून रक्‍त जाते. मानेतील पुढच्या दोन आणि मानेतील मागच्या दोन रक्‍तवाहिन्यांतून. आत गेल्यावर या वाहिन्या अगदी पातळ पातळ अशा वाहिन्यांमध्ये विभागल्या जातात, जेणे करून मेंदूच्या प्रत्येक भागात रक्‍त पोचेल. एखाद्या पाईपलाईनप्रमाणे या रक्‍तवाहिन्यांचे काम चालते. म्हणजे वेगवेगळ्या घरांमध्ये पाईपलाईनने पाणी पोचवले जाते. त्यातील काही पाईपलाईन मोठ्या असतात, तर काही लहान. पाण्याच्या या पाईपलाईनमध्ये जर काही बिघाड झाला, तर साधारणपणे दोन परिणाम घडतात. पाण्याच्या दबावामुळे एक तर पाईपलाईन फुटते किंवा गळू लागते. अशा प्रकारे मेंदूपर्यंत रक्‍त घेऊन जाणार्‍या धमन्यांमध्ये काही बिघाड झाला तर ती एक तर फुटते किंवा गळू लागते.

- जर मेंदूच्या आत रक्‍तवाहिनी फुटली, तर रक्‍त बाहेर येऊन एके ठिकाणी जमा होते. त्याला ब्लड क्‍लॉट किंवा रक्‍ताची गाठ म्हणतात. रक्‍ताचे प्रमाण जसे वाढत जाते, तसा क्‍लॉटचा आकार वाढत जातो आणि मग तो क्‍लॉट रक्‍तवाहिनी किंवा तिच्या जखमेला बंद करतो. त्यामुळे रक्‍त बाहेर पडणे बंद होते; पण अनेक रुग्णांच्या बाबतीत इतके रक्‍त वाहते की डोक्याच्या आत दबाव वाढत जातो आणि त्यामुळे मेंदू काम करायचेच बंद होतो. अशा वाढत्या दबावामुळे डोकेदुखी किंवा उलटी होऊ लागते. दबाव जास्तच वाढला, तर बेशुद्धी, पॅरॅलिसीस, श्‍वास घेणे जिकिरीचे होणे, असा त्रास होऊ लागतो.

- रक्‍तवाहिनी बंद झाल्यावर मेंदूचा संबंधित भाग ऑक्सीजनच्या अभावामुळे उपासमारीने तडफडू लागतो आणि काम करणे बंद करतो. जर मेंदूच्या या भागाला आसपासच्या भागातूनही रक्‍त नाही मिळाले किंवा रक्‍तवाहिनीतील क्‍लॉट जशाच्या तसा राहतो तेव्हा मेंदूच्या या भागाला मोठे नुकसान होते. स्ट्रोक हे एक सर्वात मोठे आणि मुख्य कारण असते. स्ट्रोकमध्ये रक्‍ताची गाठ किंवा गुठळी रक्‍तवाहिनीच्या आत असते आणि त्यामुळे रक्‍तप्रवाह बंद किंवा कमी होतो. अशा वेळी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे जिथे रक्‍तवाहिनी फुटून रक्‍त बाहेर येते, तेथून रक्‍ताची गुठळी ताबडतोब काढणे आणि दुसरे म्हणजे जी धमनी जिथे रक्‍त घेऊन जात होती, तेथे लवकरात लवकर रक्‍त पोहोचवणे. योग्य वेळेत हे केले नाही तर त्याचा परिणाम मेंदूवर होतो आणि समस्या आणखी वाढली तर जीवावरही बेतू शकते. म्हणूनच अर्धांगवायूत वेळेत उपचार होणे महत्त्वाचे असते. लवकर इलाज झाले तर अधिक नुकसान होणे टळते.

मेंदूतील रक्‍तस्राव आणि स्ट्रोक यातील फरक

ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूतील रक्‍तस्रावात रक्‍तवाहिनी मेंदूच्या आत किंवा बाहेर फुटते. जर अचानक किंवा खूप डोके दुखत असेल, उलटी होत असेल, बेशुद्धी येत असेल तर त्यात मेंदूतील रक्‍तस्रावाची शक्यता जास्त असते. ब्रेन हॅमरेजमुळे पॅरॅलिसीसही होतो. यात मेंदूच्या बाहेर रक्‍त येते आणि त्याची गुठळी होते. ती घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. कोणत्याही अडथळ्यामुळे मेंदूला रक्‍तपुरवठा होण्यात अडथळा आला तर त्याला स्ट्रोक म्हणतात. स्ट्रोक आणि हॅमरेज या दोन्हींमुळे अर्धांगवायू होऊ शकतो.

कसा होतो?

-हॅमरेज असो वा स्ट्रोक, मेंदूचा प्रभावित भाग काम करायचे बंद करतो. मेंदूच्या आत तयार झालेली गुठळी आसपासच्या भागांना दाबून निष्क्रिय करते, त्यामुळे इतर भागही निष्क्रिय होतो. अशा वेळी त्या भागाचे जे काम असते, त्यावर परिणाम होतो. हातापायांची हालचाल बंद होऊ शकते, द‍ृष्टीवर परिणाम होतो, घास गिळायला त्रास होतो, बोलताना त्रास होतो आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते. स्ट्रोकमुळे मेंदूचा अधिक भाग प्रभावित झाला असेल तर ते जीवघेणेही ठरू शकते.

- पॅरॅलिसीस अचानक होतो. रुग्ण रात्री जेऊन वगैरे व्यवस्थित झोपायला जातो. सकाळी जाग आल्यावर त्याच्या लक्षात येते की आपले हात-पाय नीट चालत नाहीत. तो उभे राहण्याचा प्रयत्न करतो तर खाली कोसळतो. अनेक वेळा दिवसा काम करताना, उभ्या उभ्या किंवा बसल्या बसल्याही अचानक पॅरॅलिसीस होतो. हॅमरेजमध्ये तीव्र डोकेदुखी आणि उलटी होते. त्यानंतर शरीराचा कोणता तरी भाग काम करणे बंद करतो आणि बेशुद्धी होऊ लागते.

- फेशियल पॅरॅलिसीसही खूप सामान्य आहे. यात चेहर्‍याचे स्नायू कमजोर होतात. व्हायरल इन्फेक्शनमुळे हे होऊ शकते. रुग्णात या प्रकारचे कोणतेही लक्षण किंवा हिस्ट्री नसतानाही असे होऊ शकते.

कारणे

उच्च रक्‍तदाब, मधुमेह, धूम्रपान, हृदयविकार, लठ्ठपणा, वार्धक्य यामुळे अर्धांगवायू होऊ शकतो.

धोका कुणाला जास्त?

-महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त धोका असतो.
-अशा प्रकारच्या आजारांचा कौटुंबिक इतिहास असेल तर 40-45 वर्षे वयात तपासणी करून घ्यावी.
-वाढत्या वयाबरोबर धोका वाढतो; पण आपल्या देशात अर्धांगवायूचे रुग्ण तरुणच जास्त आहेत. आपल्या देशात 55 ते 60 या वयात अर्धांगवायूचा धोका असतो. पाश्‍चात्त्य देशांत हा धोका वयाच्या सत्तरीनंतर वाढतो.

नियंत्रण

अर्धांगवायूपासून बचाव करण्यासाठी आपण आपला रक्‍तदाब, शुगर, वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. हृदयविकार असेल तर वेळच्या वेळी तपासणी करून घेतली पाहिजे. अगदी वीस ते पंचवीस वय वर्षापासून रक्‍तदाब व्यवस्थित तपासण्याची सवय लावा. आहाराच्या योग्य सवयी लावून घ्या, तसेच नियमितपणे व्यायामही करणे गरजेचे आहे.

Dr. Ganesh Pachkawade
Dr. Ganesh Pachkawade
MS/MD - Ayurveda, Cupping Therapist Dermatologist, 4 yrs, Pune
Dr. Shyamsundar Jagtap
Dr. Shyamsundar Jagtap
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Yogesh Gholap
Dr. Yogesh Gholap
BAMS, Ayurveda General Physician, 12 yrs, Pune
Dr. Sachin  Bhor
Dr. Sachin Bhor
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Rohan Shirole
Dr. Rohan Shirole
MS/MD - Ayurveda, Dermatologist Family Physician, 4 yrs, Pune
Hellodox
x