Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

तुम्हाला असं कधी झालयं का की, तुम्ही कधी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेलात आणि तिथे जाऊन अचानक तुमचं ब्लड प्रेशर वाढलं आहे? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर समजून जा की, तुम्हाला व्हाइट कोट हायपरटेन्शन (White Coat Hypertension) म्हणजेच, व्हाइट कोट सिंड्रोमचे शिकार झाला आहात. पण या समस्येकडे अजिबात दुर्लक्षं करू नका. असं केलंत तर ही समस्या वेळेनुसार आणखी गंभीर रूप घेऊ शकते.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या व्यक्ती व्हाइट कोट हायपरटेन्शनमुळे पीडित आहेत आणि त्यावर काहीच उपचार करत नसतील तर अशा व्यक्तींमध्ये सामान्य ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांच्या तुलनेत हार्ट संबंधित आजारांमुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो.

काय आहे व्हाइट कोट हायपरटेन्शन?

व्हाइट कोट हायपरटेन्शन एक अशी स्थिती आहे, ज्यांमध्ये मेडिकल इन्वाइरनमेंटमध्ये एखाद्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर वाढतं. परंतु ब्लड प्रेशर सामान्य वातावरणामध्ये नॉर्मल असतं. खरं तर ही समस्या जेव्हा या व्यक्ती हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाते. त्यामुळे या हायपरटेन्शनच्या समस्येला डॉक्टरांच्या व्हाइट कोटमुळे 'व्हाइट कोट हायपरटेन्शन' असं नाव दिलं आहे.

व्हाइट कोट हायपरटेन्शनची कारणं

साधारणतः जेव्हाही तुम्ही एखादं काम करता, त्यावेळी तुमचं ब्लड प्रेशऱ त्यानुसार वाढत आणि कमी होत राहतं. ही एक सामान्य परिस्थिती आहे. परंतु व्हाइट कोट हायपरटेन्शनची समस्या तेव्हाच उद्भवते, जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाताना नर्वस होता किंवा घाबरून जाता. अशावेळी जर ब्लड प्रेशर चेक केलं गेलं तर ते सामान्य ब्लड प्रेशरच्या तुलनेमध्ये वाढलेलं दिसतं. जास्तीत जास्त लोक डॉक्टरांकडे किंवा मेडिकल इन्वाइरनमेंटमध्ये घाबरून जातात. याचा थेट परिणाम ब्लड प्रेशरवर होत असतो.

व्हाइट कोट हायपरटेन्शनपासून बचाव

व्हाइट कोट हायपरटेन्शन तसं पाहायला गेलं तर फार लोकांमध्ये आढळून येत नाही. परंतु ही समस्या कोणालाही आणि कधीही होऊ शकते. त्यामुळे यापासून बचाव करणं अत्यंत आवश्यक ठरतं. जाणून घेऊया यापासून बचाव करण्यासाठी काही उपाय :

1. नियमितपणे आपलं ब्लड प्रेशर चेक करावं आणि त्याचा रेकॉर्ड मेन्टेन करावा. 24 तास ब्लड प्रेशरचं रीडिंग घ्यावं आणि जाणून घ्यावं दिवसभरामध्ये तुमचं ब्लड प्रेशर कधी वाढतं आणि कमी होत आहे.

2. सोडिअमचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांच्या सेवनानेही ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडिअमचे प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.

3. जर डॉक्टरांकडे जाण्याची भिती वाटत असेल किंवा मेडिकल इन्वाइरनमेंटमध्ये गेल्यानंतर नर्वस होत असाल तर ब्लड प्रेशरचं रिडिंग घेण्याआधी रिलॅक्स करा आणि शांत व्हा. स्वतःला समजावून सांगा की, घाबरण्याची अजिबात गरज नाही. डॉक्टर किंवा नर्सला लगेच ब्लड प्रेशर चेक करू देऊ नका.

4. मनामध्ये डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल यांबाबत विचार करण्याऐवजी इतर गोष्टींचा विचार करा. त्यामुळे तुमचं मन डायवर्ट होऊन तुम्हाला भिती वाटणार नाही. तसेच तुम्ही शांत होण्यासाठी गाणीही ऐकू शकता.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

सध्याचं धावपळीची जीवनशैली आणि कामाचा ताण यांमुळे अनेक लोकांना तणावाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकांमध्ये डिप्रेशनची समस्या उद्भवते. अनेकदा यापासून सुटका करण्यासाठी अनेक लोकं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेत असतात. पण यांसारख्या अनेक समस्यांवर तुम्ही घरच्या घरी स्वतःच उपचार करू शकता. यामुळे तुमचा ताण कमी होतोच पण त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वासही वाढतो. यासाठी तुम्हाला ध्यान करणं आवश्यक आहे. फक्त 10 मिनिटांमध्येच तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

आपण अनेकदा दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या तणावांचा सामना करत असतो. अशातच अनेक नकारात्मक विचारांची डोक्यामध्ये गर्दी होते. पण अशा समस्यांना दूर करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून सल्ला घेणं आवश्यक नाही. असं आम्ही नाही सांगत आहोत, तर हे एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. कॅनडामधील वाटरलू यूनिवर्सिटीच्या संशोधकांच्या एका टिमने सांगितले की, दररोज फक्त 10 मिनिटांसाठी ध्यान केल्याने सतत येणाऱ्या नकारात्मक विचारांपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच तणावाबाबत जागरूकता पसरवल्यानेही यापासून सुटका करण्यासाठी मदत मिळते.

वाटरलू यूनिवर्सिटीचे संशोधक मेंग्रान शु यांनी सांगितले की, संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षांमधून असं सिद्ध झालं की, ध्यान केल्यामुळे तणावामध्ये असलेल्या लोकांच्या विचारांमध्ये परिणाम घडून येतो. नकारात्मक विचारांचे प्रमाण कमी होते. तसेच एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणं शक्य होतं.

तणावाने पीडित असणाऱ्या 82 लोकांवर हे संशोधन करण्यात आले. या संशोधनांतर्गत सहभागी व्यक्तींना कम्प्यूटरवर काम करण्यास सांगण्यात आले. ज्यामध्ये असं आढळून आलं की, आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याच्या त्यांच्या क्षमतेमध्ये काही अडथळे येत आहेत. त्यानंतर संशोधकांनी सर्व लोकांना दोन गटांमध्ये विभागले आणि एका गटाला गोष्ट ऐकण्यास सांगितले तर दुसऱ्या गटाला थोड्या वेळासाठी ध्यान लावण्यासाठी सांगितले. त्यावेळी ज्या गटाला ध्यान लावण्यास सांगितले होते त्यांच्यावर चांगला प्रभाव दिसून आला होता.

तणावामुळे काय होतं नुकसान?

तणावामुळे तुमची विचार करण्याची, समजून घेण्याची प्रक्रिया प्रभावित होते. याच्या सामान्य लक्षणांमध्ये सतत डोकेदुखी, वजन कमी-जास्त होणे, झोन न येणे, जेवण योग्य प्रमाणात न होणे, सतत आजारी पडणे, लक्ष केंद्रीत न करु शकणे, मूड स्विंग होणे आणि हायपरअॅक्टिव किंवा ओव्हर सेन्सीटीव्ह होणे. काही वेळी हे डिप्रेशनही असू शकतं.

कामाच्या ठिकाणी चार वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या, विचारधारणेची लोकं एकत्र काम करत असतात. आजकाल कॉपरेट क्षेत्रामध्ये 'टार्गेट'मागे धावताना दिवसातला सर्वाधिक वेळ अनेकजण ऑफिसमध्ये असतात. अशावेळेस ताणतणावामुळे, वैचारिक मतभेदांमुळे भांडणं किंवा वाद होणं स्वाभाविक असतो. सतत अशा वातावरणात राहिल्याने सहाजिकच तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. कामाचा ताण किंवा राग तुमच्या प्रिय व्यक्तीवर किंवा कुटुंबावरही नकळत काढला जातो. तुमच्या या एका लहानशा चूकीमुळे सारं बिघडू शकतं. मग हे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.

भांडणं टाळा -
तुमचे काही लोकांसोबत मतभेद असले तरीही त्याचे परिवर्तन भांडणामध्ये होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हांला एखादी गोष्ट, व्यक्ती पटत नसेल तर त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा.

इसेन्शियल ऑईल -
ताण हलका करण्यासाठी इसेन्शियल ऑईल फायदेशीर आहे. तुमच्या डेस्कवर आवडीचं इसेन्शियल ऑईल ठेवा. त्याच्या मंद सुवासामुळे ताण हलका होतो.


विनोदी व्हिडिओ
ताण हलका करायचा असेल किंवा एखाद्या गोष्टीवरून तुमचं लक्ष हटवायचं असेल तर कामातून वेळ काढून विनोदी व्हिडिओ पहा. यामुळे ताण हलका होण्यास मदत होईल.

मित्रांसोबत बोला
तुम्हांला एखाद्या गोष्टीचा ताण जाणवत असेल तर त्याच्याबाबत तुमच्या मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीसोबत बोला. बोलल्याने ताण हलका होण्यास मदत होते. ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी कदाचित त्यांच्याकडून काही मार्ग निघू शकतो.

योग्य आहार
आहारात आरोग्याचं गणित लपलं आहे. त्यामुळे ताण हलका करायचा असेल आहारत जंकफूड टाळा. व्यायामासोबत संतुलित आहाराचा समावेश करा.

कामातून वेळ काढून फिरा
कामातून थोडा वेळ काढून दहा मिनिटं बाहेर फिरा. तुमच्या ऑफिसमध्ये बाग असेल तर तेथे फेरफटका मारा. यामुळे एन्ड्रॉर्फिन हार्मोन्सचा प्रवाह होतो. या हार्मोनमुळे शरीरातील ताण कमी होण्यास मदत होते.

भूक लागणं ही एक सामान्य क्रिया आहे. त्याद्वारा शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचं कार्य सुरळीत चालतं. मात्र भूकेचे गणित बिघडणं हे शरीरात काही दोष वाढत असल्याचे लक्षण आहे. डिहायड्रेशन किंवा गरोदरपणात सतत भूक लागू शकते. मात्र तुम्हांला सतत भूक लागत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.

सतत भूक लागण्याची कारण आणि आजार

1. मधुमेह -
भारताला मधुमेहाची राजधानी म्हणतात. मधुमेह हा आजार आबालवृद्धांमध्ये झपाट्याने वाढत आहे. बदलत्या लाईफस्टाईमुळे हा आजार वयाच्या कोणत्याही टप्प्यावर बळावण्याचा धोका वाढला आहे. सतत भूक लागणं हे मधुमेहातील एक लक्षण आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.

2. इटिंग डिसऑर्डर
बुलूमिया ही एक इटिंग डिसऑर्डर आहे. यामध्ये रूग्ण अनियमितपणे खातात. अति खाल्ल्याने अनेकदा रूग्णांना उलटीचा त्रास होतो.

3.पोटात जंत
पोटात जंत झाल्यास तुम्हांला सतत भूक लागू शकते. कारण जंत परजीवी असतात. अनेकदा ते पोटातील आहारातून मिळणारी पोषकद्रव्यं शोषून घेतात. यामधूनच शरीरात फॅट वाढणं, रक्तातील साखरेची पातळी वाढणं अशा समस्या बळावतात. जंताचा त्रास समूळ हटवण्यासाठी टोमॅटोसोबत 'हा' मसाल्याचा पदार्थ खाणं फायदेशीर

4. औषधं -
काही औषधांमुळेही सतत भूक वाढते. या समस्येला हायपरफेजिया म्हणतात. कोर्टिकोस्टेरोइड्स, साइप्रोफेटेडाइन आणि ट्राईसाइक्लिक अशा अ‍ॅन्टी डिसप्रेसंट औषधांच्या सेवनामुळे अधिक भूक लागू शकते.

5. पीएमएस -
पीएमएस म्हणजेच प्रिमेंस्ट्राईल सिंड्रोमच्या समस्येमध्ये सतत भूक लागणं हे लक्षण आढळते. यासोबतच डोकेदुखी, पोटात मुरडा मारणं, बद्धकोष्ठतेचा त्रास बळावू शकतो.

6. ताण तणाव
ताणतणावामध्ये असणार्‍या व्यक्तीदेखील अनियमितपणे खात असतात. यामुळे त्यांच्यामध्ये सतत खाण्याची इच्छा बळावत राहते. मेंदूवर ताण आल्यानंतर कॉर्टिकोट्रोपिनचा प्रवाह वाढतो. यामधूनच अड्रेनालाइनचं प्रमाणही वाढतं. हे भूकेचं प्रमाण वाढण्याचं एक कारण आहे. ... म्हणून भूक लागल्यावर राग अनावर होतो

नोकरी करणार्‍या महिलांना पुरूषांच्या तुलनेत अधिक ताण असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. अधिक तणावामुळे डिप्रेशनचा धोकाही पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनियॉसमधील संशोधकांनी हे मत मांडले.

संशोधनानुसार ज्या महिलांना अधिक पगार असतो त्यांच्यामध्ये तणावाचे प्रमाण अधिक असल्याचेही आढळले. संशोधनानुसार, घरात सर्वाधिक आर्थिक मदत कोण करते याचा त्या व्यक्तीच्या मनोविज्ञानावरही परिणाम होतो. कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न वाढल्यास त्यांच्यात डिप्रेशनची म्हणेच नैराश्य, औदासिन्याची लक्षणे दिसू लागतात. संशोधकांनी केलेल्या या संशोधनात 1463 पुरूष आणि 1769 महिलांचा समावेश करण्यात आला.

दुसरीकडे मात्र पुरूषांमध्ये याउलट स्थिती असते. पुरूषांच्या पगारामध्ये जसजशी वाढ होते तसतसे त्यांची जीवनशैलीच सुधारत नाही तर त्यांच्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.

Dr. Ashish Ingale
Dr. Ashish Ingale
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 7 yrs, Pune
Dr. Avinash Deore
Dr. Avinash Deore
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 15 yrs, Pune
Dr. Prakash Dhumal
Dr. Prakash Dhumal
BHMS, Family Physician Dietitian, 5 yrs, Pune
Dr. Khushbu Kolte
Dr. Khushbu Kolte
BDS, Dentist Cosmetic and Aesthetic Dentist, 8 yrs, Pune
Dr. Sanjeev Parmar
Dr. Sanjeev Parmar
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 16 yrs, Pune
Hellodox
x