Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

ताणतणाव येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र तणाव आपल्यावर हावी झाला तर तो एक आजाराचं रूप घेतो.काही जण तणावावर सहजपणे मात करतात. मात्र ताण वाढल्यास अनेकांचं मनोधैर्य खचतं. त्याचा परिणाम कामावर आणि खाजगी आयुष्यावरही होतो.

जर आपण आपल्या दिनचर्येत थोडासा बदल केला तर इच्छाशक्तीद्वारे तुम्ही ताणावर नियंत्रण मिळवू शकता. जाणून घ्या त्यासाठीच काही टीप्स..

ताण (Stress) :
ताणतणावापासून पूर्णपणे मुक्ती मिळविण्यासाठी आपल्या दररोजच्या आयुष्यात व्यायामाला अतिशय महत्त्वाचं स्थान द्या. नियमित व्यायाम केल्यानं ताण कमी होण्यास मदत मिळते. जर सकाळी शक्य नसेल तर किमान संध्याकाळी वॉकला जा.

जर आपण एखाद्या आजारानं किंवा शरीरातील बदलामुळं तणावग्रस्त आहात, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उदा. डोक्यावर केस गळत आहेत, याचं टेंशन तुम्ही घेतलं असेल तर काळजी करण्यापेक्षा त्यावर उपाय करा, हेअर ट्रान्सप्लांट करा, औषधं घ्या आणि प्राणायाम करा. जेवणात प्रोटीन असलेले पदार्थ असू द्या.

जर आपल्यासोबत काहीसं असं घडत असेल, ज्याचा विचार करून आपला ताण वाढतोय. तर आपल्या आयुष्यातील या नकारात्मक घटना दूर सारा आणि त्याचा विचार न करता चांगल्या गोष्टींचा विचार करा.

जर नवरा - बायकोच्या नात्यात ताणतणाव असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत किंवा घरातील मंडळींसोबत चर्चा करा. आपण यासाठी मॅरेज काउंसलरची मदत घेऊ शकता.

आर्थिक परिस्थितीच्या कारणानं तणावग्रस्त असाल तर शांत डोक्यानं आपल्याजवळ किती पैसा आहे आणि कायदेशीर मार्गानं आपण आपला इन्कम कसा वाढवू शकतो, याबाबत विचार करा. उगाच टेंशन घेत बसू नका.

Dr. Kshitija Kulkarni
Dr. Kshitija Kulkarni
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda Panchakarma, 5 yrs, Pune
Dr. Snehal Deshmukh
Dr. Snehal Deshmukh
BDS, Dentist, 3 yrs, Pune
Dr. Mayur Narayankar
Dr. Mayur Narayankar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Deepali Ladkat
Dr. Deepali Ladkat
BHMS, Homeopath, Pune
Dr. Rashmi Mathur
Dr. Rashmi Mathur
BPTh, Physiotherapist Homecare Physiotherapist, 5 yrs, Pune
Hellodox
x