Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.ब्रेन टय़ूमर

‘ब्रेन टय़ूमर झाला की सगळे संपले!’ अशी अनेकांची भूमिका असते. ‘टय़ूमर म्हणजे कॅन्सरच’ अशा भ्रमातही अनेकजण असतात. या चुकीच्या समजामुळे ब्रेन टय़ूमर हा ‘भीतीचा गोळा’ ठरतो! ब्रेन टय़ूमर म्हणजे नेमके काय, तो कसा होतो, त्यावरील अत्याधुनिक उपचारपद्धती कोणत्या, याबद्दल माहिती घेऊया या लेखामधून..

बंद कवटीत जेव्हा ब्रेन टय़ूमरची गाठ जागा व्यापू लागते तेव्हा तिचा दाब मेंदूवर पडायला लागतो. त्यामुळे ब्रेन टय़ूमरच्या ७५ ते ८० टक्के रुग्णांमध्ये टय़ूमर झाल्याची लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, उलटी होणे अशा लक्षणांबरोबरच मेंदूच्या ज्या भागावर दाब पडतो आहे त्या भागाशी संबंधित असलेल्या शारीरिक कार्यात बिघाड होणे अशी लक्षणे दिसू शकतात. या प्रकारात दृष्टी अधू होणे, दृष्टीस पडलेल्या गोष्टी लक्षात न राहणे, रंग ओळखता न येणे, बोलताना अडखळणे, हाता-पायातली ताकद कमी होणे अशा तक्रारीही आढळतात, पण वीस टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. काही रुग्णांत ब्रेन टय़ूमर खूप सावकाश वाढतो. त्यामुळे मेंदूतली जागा व्यापली जाण्याची प्रक्रियाही सावकाश होते. अशा रुग्णांमध्ये मेंदूला या गाठीची सवय होत जाते आणि त्यामुळे कोणतीही लक्षणेही दिसत नाहीत.

‘टय़ूमर झाला म्हणजे तो कॅन्सरच असणार’, असा सार्वत्रिक समज आपल्याकडे आढळून येतो, हे मात्र खरे नाही. टय़ूमरची गाठ कॅन्सरची नसलेलीही असू शकते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मेंदूतील टय़ूमरची गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता साधारणपणे ५० ते ६० टक्के असते. म्हणजेच उरलेल्या ५० टक्के रुग्णांचा टय़ूमर हा कॅन्सर नसतो. मेंदूतील कॅन्सरच्या नसलेल्या गाठी शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे बाहेर काढता येतात. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अल्पावधीत बरा होऊन अगदी पूर्वीसारखे आयुष्यही जगू लागतो. हे बऱ्याच रुग्णांना माहिती नसल्यामुळे ‘टय़ूमर झाला म्हणजे सगळे संपले’ या भावनेने रुग्ण आधीच मनाने खचतात. ‘टय़ूमरची शस्त्रक्रिया म्हणजे मरण’ या चुकीच्या कल्पनेमुळे काही रुग्ण शस्त्रक्रियेलाच नकार देऊन ‘असेल-नसेल ते आयुष्य तरी बरे जगावे!’ अशी भूमिका घेतात. त्यामुळे रुग्णांनी आपल्याला काय झाले आहे याविषयी वाचनाद्वारे माहिती मिळवत राहणे आवश्यक आहे. त्याद्वारे त्यांची दिशाभूल होणे टळेल.

गेल्या तीस वर्षांत ब्रेन टय़ूमरच्या शस्त्रक्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाले आहेत. पूर्वी जे टय़ूमर असाध्य मानले जात ते आज साध्य आहेत. ज्या शस्त्रक्रिया करायला पूर्वी दहा-दहा तास लागत त्या शस्त्रक्रिया आता दोन तासांतही होऊ शकतात. एमआरआय प्रतिमांसारख्या तंत्रांद्वारे टय़ूमरची गाठ खूप लहान असतानाच लक्षात येते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दहा मिनिटांत रुग्ण शुद्धीवर येतो, बोलायलाही लागतो! लहान शस्त्रक्रियेनंतर तर रुग्णाला दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडणेही शक्य होते. हा आमूलाग्र बदल गेल्या दहा वर्षांत झाला आहे.

परदेशात ज्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात त्याही आज मुंबई-पुण्यात यशस्वीपणे केल्या जाऊ शकतात, पण राज्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्य़ांत ब्रेन टय़ूमरच्या शस्त्रक्रिया होण्याइतपत सुविधा नक्कीच उपलब्ध आहेत. मेंदूत रक्ताची गुठळी झालेल्या रुग्णालाही वाचवणे पूर्वी अवघड होत असे. आता तालुका पातळीवरही या शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. अद्ययावत दुर्बिणींचा शस्त्रक्रियेसाठी वापर, ‘क्यूसा’ म्हणजे ‘कॅव्हिट्रॉन अल्ट्रासाऊंड अ‍ॅस्पिरेटर’ चा वापर यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुकर बनल्या आहेत. टय़ूमरचे लहान तुकडे करून काढण्याऐवजी क्यूसा या यंत्रणेद्वारे टय़ूमरला ‘व्हेपराईज’ करून म्हणजे वाफ स्वरूपात आणून शोषून घेता येते. आता ‘स्टिरिओटॅक्टिक सर्जरी’ त मेंदूतील कोणत्याही भागापर्यंत अचूकतेने पोहोचून टय़ूमरची ‘बायोप्सी’ करता येते. यात सर्वच रुग्णांना पूर्ण भूल देण्याचीही गरज नसते. ‘लोकल अ‍ॅनास्थिशिया’ देऊनही बायोप्सी करता येते. रुग्ण एकीकडे बोलत असताना त्याच्या मेंदूत सरळ ‘प्रोब’ घालून टय़ूमरची बायोप्सी काढणे म्हणजे पुढील निदानासाठी टय़ूमरचा तुकडा किंवा पस काढणे शक्य होते. या तुकडय़ाचा दुर्बिणीखाली अभ्यास केला जातो. त्यात कोणत्या प्रकारच्या पेशी आहेत यावर ती गाठ साधी आहे की कॅन्सरची आहे, याचे निदान होते. त्यावर पुढील उपचारांची दिशा ठरते.

मानवी जनुकांमध्ये होणारे बदल टय़ूमरसाठी मूलत: कारणीभूत ठरतात. प्रत्येक पेशीत आपल्यासारखीच पेशी निर्माण करण्याचा गुणधर्म असतो. ही नवी पेशी जुन्या पेशीसारखीच असते. त्यामुळेच शरीरातील काही पेशी खराब झाल्या तरी त्यांची कमतरता नव्या पेशी भरून काढतात. जनुकावर विपरीत परिणाम झाला तर नव्याने तयार होणारी पेशी वेगळ्या प्रकारची असू शकते. अशा वेगळ्या पेशींपासूनच पुढे गाठ निर्माण होण्याची शक्यता असते. भोवतालच्या नैसर्गिक बदलांचे दूरगामी परिणामही जनुकीय बदलांमध्ये दिसू शकतात. मोबाईल फोनचा अतिवापर ब्रेन टय़ूमरला कारणीभूत ठरतो असे म्हटले जाते. हे पुराव्यानिशी जरी सिद्ध करता येत नसले तरी प्रबळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी मानवातील जनुकीय बदलांसाठी कारणीभूत ठरू शकतात.

‘अमुक एक गोष्ट केली तर ब्रेन टय़ूमर होईल’, आणि ‘अमुक एक केले तर तो टाळता येईल’, अशी सोपी विभागणी करणे अशक्य आहे. पण ब्रेन टय़ूमर झाल्यानंतरही जीवन असाध्य नक्कीच नाही! त्यातून वाट काढायचे मार्ग आहेत. ते अगदी अत्याधुनिक आणि यशस्वितेच्या कसोटीवर उतरलेले आहेत.उपचारांनंतर रुग्ण त्याचे उरलेले आयुष्य अगदी पुर्वीसारखेच जगू शकतो. त्यामुळे ब्रेन टय़ूमर रुग्णाच्या आयुष्यात एखाद्या परीक्षेसारखा असेल कदाचित् पण तो भीतीचा गोळा ठरायला नको!
ब्रेन कर्करोग
ब्रेन ट्यूमरमध्ये मेंदूच्या कर्करोगाचे प्रकार समाविष्ट असतात, परंतु सर्व मेंदूच्या ट्यूमर ह्या कर्करोगात नसतात.

ब्रेन ट्यूमरचा त्यांच्या वर्तनामुळे 1-4 वाढ होतो जसे की वाढीचा वेग आणि ते कसे पसरवायचे. या ग्रेड नंतर निम्न ग्रेड (1-2) आणि उच्च ग्रेड (3-4) मध्ये विभाजित केले जातात, कमी श्रेणीचे ट्यूमर कर्करोग म्हणून गैर-कर्करोग आणि उच्च दर्जाचे ट्यूमर म्हणून परिभाषित केले जातात.

तथापि, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की फक्त ट्यूमर कमी दर्जाचा आहे, याचा अर्थ असा नाही की आरोग्यविषयक जोखीम किंवा समस्या संबंधित नाहीत. आपल्याकडे उच्च किंवा निम्न ग्रेड ट्यूमर असला तरीही नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे.

मेंदूचे कर्करोग म्हणजे काय?
मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, 'मस्तिष्क कर्करोग काय आहे' असा प्रश्न आपण विचारू शकता.

आमच्याकडे आपल्या शरीरात कोट्यवधी सेल्स आहेत, जी आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रिया आणि कार्य सुधारण्यासाठी मदत करते ज्यामुळे हानी दुरुस्त केली जाऊ शकते.

तथापि, जर मेंदूतील पेशी अनपेक्षित मार्गाने वाढू लागतात तर दुरुस्ती करण्याऐवजी ते अनपेक्षितपणे कारणीभूत ठरतात.

जर हे असामान्य मस्तिष्क पेशी मेंदूच्या आत वाढतात, तर हा प्राथमिक मेंदूतील ट्यूमर होतो. जर पेशी वेगाने वाढतात आणि मेंदूच्या आत पसरतात तर अशाप्रकारे कर्करोगाच्या ट्यूमर तयार होतात आणि परिणामी मेंदूच्या कर्करोगाचे निदान होते.

जर पेशी शरीरात इतरत्र गहाळ झाल्यास, फुफ्फुसा आणि त्या पेशी मेंदूत पसरतात, हे दुय्यम मेंदूचे कर्करोग म्हणून किंवा मेटास्टेसेस म्हणून ओळखले जाते.

मेंदूचा कर्करोग कसा क्रमबद्ध केला जातो
150 पेक्षा जास्त भिन्न ब्रेन ट्यूमर प्रकार आहेत, प्रत्येक नावाचे सेल ज्या प्रकाराने वाढतात त्या नंतर, मेंदूमध्ये त्यांची जागा कशी पसरवायची दर्शवले जाते.

ब्रेन ट्यूमर जो वेगाने वाढतात त्यांना उच्च श्रेणी (ग्रेड 3 मेंदू कर्करोग आणि ग्रेड 4 मेंदू कर्करोग) म्हणून ओळखले जाते.

कधीकधी, लोक या स्टेज 3 मस्तिष्क कर्करोगाचे किंवा चरण 4 मेंदू कर्करोग म्हणून संदर्भित करतील. तथापि 'स्टेज' शब्द बर्याचदा कर्करोगाच्या इतर स्वरूपात वापरला जातो, परंतु मेंदूच्या कर्करोगावर चर्चा करताना हे चुकीचे आहे.

ब्रेन ट्यूमर जे हळूहळू वाढतात आणि सामान्यत: ते कर्करोग नसतात, त्यांना निम्न श्रेणी (ग्रेड 1 मेंदू ट्यूमर आणि ग्रेड 2 मेंदू ट्यूमर) म्हणून ओळखले जाते.

मेंदूचे कर्करोग होण्याची शक्यता वैयक्तिकरित्या भिन्न असते आणि आपल्या वैयक्तिक परिस्थिती आणि मेंदूच्या कर्करोगाच्या निदानानुसार आपल्या वैद्यकीय कार्यसंघाला याबद्दल सल्ला देण्यासाठी सर्वोत्तम स्थान दिले जाते.

मेंदूच्या कर्करोगाचे कारण काय आहे
हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मेंदूचे कर्करोग टाळण्यासाठी आपण काय केले किंवा काहीच केले नाही.
मोठ्या प्रमाणात, मेंदूच्या कर्करोगाचे ज्ञात कारण नाही, परंतु आपल्या आनुवांशिक किंवा किरणांच्या प्रदर्शनास सामोरे जाणारे जोखमीचे घटक आहेत हे आम्हाला ठाऊक आहे.

एक जीन घेण्यामुळे आपल्याला मेंदूच्या कर्करोगाचा विकास होण्याची अधिक शक्यता असते: असे अनुमान आहे की मेंदूच्या ट्यूमरच्या 20 पैकी एका प्रकरणात आनुवांशिक जीन आढळते. काही अनुवांशिक परिस्थितीमुळे कमी किंवा उच्च दर्जाचे ब्रेन ट्यूमर विकसित होण्याचा धोका वाढू शकतो.

विकिरण प्रदर्शनामध्ये: आपल्या मुलाला रेडिओथेरपी असल्यास काही ब्रेन ट्यूमर प्रकारांचा (मेनिंगिओमा किंवा ग्लिओमा) जास्त धोका आहे, क्वचितच अश्या केस असतात ज्या पाच वर्ष्याच्या आत एकदा येतात.

मेंदूचा कर्करोग बरा होऊ शकतो का?
मेंदू कर्करोगाने निदान झालेले बरेच लोक हे जाणून घेऊ इच्छितात की मेंदूच्या कर्करोगाचे निदान होईल का, तरीही हे वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो.

मेंदूचे कर्करोग मस्तिष्कच्या इतर भागामध्ये कमी ब्रेन ट्यूमरपेक्षा पसरतो आणि यशस्वी उपचारानंतर देखील मेंदूचा कर्करोग परत येऊ शकतो.

तथापि, हे ट्यूमरचे स्थान, उपचारांवर त्याचा प्रतिसाद किंवा शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे आणि काही प्रमाणात, आण्विक / आनुवंशिक सारख्या बर्याच घटकांवर अवलंबून असते. आपल्या वैद्यकीय कार्यसंघाला आपल्या वैयक्तिक परिस्थिति आणि रोगनिदान संबंधी सल्ला देण्यासाठी सर्वोत्तम केले जाईल.

मेंदूच्या कर्करोगाचे प्रकार
प्रौढांमधील प्राथमिक मेंदूचे सर्वात सामान्य प्रकार ग्लिओब्लास्टोमा आहे.

ग्लिओब्लास्टोमाचे प्राथमिक व दुय्यम प्रकार आहेत. प्राथमिक ग्लियोब्लास्टोमा मेंदूचा उगम होतो आणि प्रथम श्रेणी 4 ग्लियोब्लास्टोमा म्हणून दिसून येतो.

माध्यमिक मेंदू कर्करोग
बहुतेकदा, माध्यमिक कर्करोग हा शरीराच्या एका भागातून कर्करोगाचा प्रसार दुसर्या भागाकडे असल्याचे दर्शवितो, तथापि एक माध्यमिक ग्लियोब्लास्टोमा अद्यापही मेंदूमध्ये उद्भवतो परंतु निम्न श्रेणीतील ब्रेन ट्यूमर प्रकारातून विकसित झाला आहे, ज्याला एस्ट्रोसाइटोमा म्हणतात.

मेंदू कर्क रोग
मेंदूच्या कर्करोगाच्या प्रकारांचे निदान हे वेगवेगळ्या प्रकारांपासून व व्यक्तीस भिन्न असते आणि ट्यूमरचे ठिकाण, उपचारांवर त्याचा प्रतिसाद किंवा शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासारख्या बर्याच घटकांवर अवलंबून असते. आपल्या वैद्यकीय कार्यसंघाला आपल्या वैयक्तिक परिस्थिती आणि आपल्या मेंदूच्या कर्करोगाच्या निदानानुसार आपल्याला सल्ला देण्यासाठी सर्वोत्तम स्थान दिले जाईल.

जर आपण मेंदूतील कर्करोगाचा प्रकार असमात्र म्हणून वर्गीकृत केला असेल तर याचा अर्थ असा की आपला वैद्यकीय संघ ट्यूमरच्या स्थानासारख्या कारणास्तव शस्त्रक्रिया करण्यास सक्षम नाही. उदाहरणार्थ जर ती मेंदूच्या महत्त्वपूर्ण संरचनांच्या जवळ असेल किंवा कर्करोग ठोस नसेल तर त्यामुळे ट्यूमरच्या काठा ओळखणे कठिण आहे. अशा परिस्थतींमध्ये परिचालन केल्यास निरोगी मेंदूतील ऊतक आणि मेंदूच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांना हानी होऊ शकते जे हालचाल, दृष्टी किंवा श्वास नियंत्रित करतात.
आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते. पण मेंदूच्या, डोक्याच्या आजारांबद्दल आपण कमी जागृक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर. कारण याचा अंदाजच लागत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

भारतात प्रत्येक वर्षी ४०-५० हजार लोकांना ब्रेन ट्यूमरचे निदान होते. यामध्ये सर्वाधिक संख्या लहान मुलांची आहे. मुलांमध्ये ब्रेन ट्युमरचे प्रमाण सुमारे २०% आहे. तज्ञांनुसार, ब्रेन ट्युमरची लक्षणे ट्युमरच्या स्थितीवरुन ठरतात. ट्युमरचे मेंदूच्या त्या भागात असेल ज्या भागात डोळे, हाता-पायाचे नियंत्रण होते तर शरीरातील ते भाग कमजोर होऊ लागतात.

पाहुया नेमकी काय आहेत ब्रेन ट्युमरची लक्षणे...
सारखे सारखे डोके दुखणे
सामान्यपणे डोकेदुखी हा ट्युमरचा संकेत मानला जातो. पण खरंतर डोकेदुखी मोठा ट्युमर असताना जाणवते. ट्युमरच्या सुरुवातीच्या स्टेजला डोकेदुखी जाणवत नाही.


चालताना अचानक झटका लागणे
कोणत्याही प्रकारच्या ट्युमरमध्ये हे सुरुवातीचे लक्षण असते. मेंदूतील ट्युमरमुळे न्युरॉन्स अनियंत्रित होतात. त्यामुळे व्यक्तीची हालचाल सामान्य राहत नाही. या स्थितीत पूर्ण शरीराबरोबरच कोणत्याही एका अंगाला झटका लागल्यासारखे वाटू शकते.

अचानक तोल जाणे
जर तुम्ही वस्तू नीट उचलू शकत नसाल किंवा पायऱ्या नीट चढू शकत नसाल. तुमचा तोल जात असेल तर ही धोक्याची घंटा आहे. बोलणे, गिळणे किंवा चेहऱ्यावरील हावभाव नियंत्रित करु न शकणं, हे देखील याचेच लक्षण आहे.

कोणताही एक भाग सुन्न होणे
शरीरातील कोणताही भाग किंवा चेहरा सुन्न पडत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जेव्हा ट्युमर ब्रेन स्टेममध्ये असतो, तेव्हा ही समस्या उद्भवते.

स्मरणशक्ती कमी होणे
ट्युमरमुळे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तित्त्व बदलते. ट्युमर असलेल्या व्यक्ती अनेक गोष्टी विसरू लागतात. संभ्रमात असतात. त्यांना लहानशी गोष्टीही त्रास देते.

उलटीसारखे होणे
पोट खराब होत असल्यास किंवा उलटीसारखे वाटत असल्यास हे देखील काळजीचे कारण ठरेल. असे सातत्याने होत असल्यास आणि या समस्येचे कारण स्पष्ट होत नसल्यास ही चिंतेची बाब आहे.

अंधुक दिसणे
अंधुक दिसणे, डबल दिसणे किंवा दृष्टी जाणे, हे ट्युमरचे लक्षण आहे. काही चिन्ह किंवा निशाण देखील दिसू लागतात.

आज ब्रेन ट्युमर दिवस असून या दिवशी ब्रेन ट्युमरबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाते. जर तुमंच सतत डोकं दुखत असेल. औषध घेतल्यावर आराम मिळत असेल आणि पुन्हा डोक्याचं दुखणं उमळून येत असेल तर सावध व्हा, कारण असं होणे ब्रेन ट्युमरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये येतं. ब्रेन ट्युमरबाबात तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल. हा एक भयंकर आजार असून याची वेळेवर माहिती मिळाली तर यावर उपचार होऊ शकतात. या आजारावर वेळेवर उपचार न झाल्यास जीवाला धोका होऊ शकतो. हा आजार होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. चला जाणून घेऊया ब्रेन ट्युमरची लक्षणे....

डोकं दुखणे

ब्रेन ट्युमरचं सर्वात पहिलं आणि सामान्य लक्षण म्हणजे डोकं दुखणे. या आजारात होणारी डोकेदुखी ही साधारण सकाळच्या वेळी अधिक होते. पुढे ती वाढते. या वेदना कधी कधी इतक्या जास्त असतात की, व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडतं. त्यामुळे तुम्हालाही अशाप्रकारची डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

उलटी आणि मळमळ

ब्रेन ट्युमरचं दुसरं लक्षण हे आहे की, डोकं दुखण्यासोबतच उलटी सुरु होते. कधी कधी डोकं दुखत असेल तर दिवसभर मळमळ व्हायला लागते. हे लक्षणही सकाळच्यावेळी अधिक बघायला मिळतं.

शारीरिक संतुलन

ब्रेन ट्युमर असेल तर सतत चक्कर येतात आणि कधी कधी चक्कर येऊन काही लोक पडतातही. जर ट्युमर सेरिबॅलम असेल तर त्याने शारीरिक संतुलन प्रभावित होतं. त्याचाच हा भाग आहे.

झटके येणे

ब्रेन ट्युमर असेल तर ज्या प्रभावित कोशिका जाळं तयार करतात. त्यामुळे आजूबाजूच्या कोशिकाही प्रभावित होतात. त्यामुळे त्या व्यक्तीला झटके येणे सुरु होते.

पॅरालिसीससारखे वाटणे

ब्रेन ट्युमरच्या स्थितीत अनेकदा व्यक्तीच्या मेंदुवरील कंट्रोल सुटतो. त्यामुळे शरीराची कोणतीही हालचाल जाणवत नाही. त्या व्यक्तीला पॅरालिसीस झाल्यासारखं वाटतं. अशा स्थितीत हात आणि पाय काम करणं बंद करतात.

बोलण्यात अडचण

ट्युमर जसजसा वाढत जातो त्यानुसार शरीरातील इतरही अंगांवर प्रभाव पडत जातो. हा ट्युमर पुढे सरकत सरकत टॅपोरल लोबमध्ये येतो आणि त्या व्यक्तीला बोलण्यात अडचण निर्माण होते. अशात त्या व्यक्तीचा आवाज जाण्यासोबतच तोंड एकीकडे वाकडं होतं.

चिडचिड आणि स्वभावात बदल

या आजारामुळे तुमच्या स्वभावावरही प्रभाव पडतो. त्या व्यक्तीची चिडचिड वाढते आणि स्वभावातही फरक पडतो.

अशक्तपणा वाढणे

ब्रेन ट्युमरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोकं दुखण्यासोबतच अशक्तपणाही येतो. डोक्यात ट्युमर तयार होत असतो. त्यामुळे संपूर्ण शरीर कमजोर होऊ लागतं.

Dr. Dr.Sandip Narkhede
Dr. Dr.Sandip Narkhede
MS/MD - Ayurveda, Infertility Specialist Lactation Consultant, 10 yrs, Pune
Dr.  Awale Tukaram
Dr. Awale Tukaram
MD - Homeopathy, Homeopath Diabetologist, 12 yrs, Pune
Dr. Ashish Babel
Dr. Ashish Babel
BHMS, Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Sneha Jain
Dr. Sneha Jain
MD - Homeopathy, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. Urmila Kauthale
Dr. Urmila Kauthale
BAMS, Ayurveda, 7 yrs, Pune
Hellodox
x