Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे काय आहेत ?
#ब्रेन ट्यूमर#डोकेदुखी

आज ब्रेन ट्युमर दिवस असून या दिवशी ब्रेन ट्युमरबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाते. जर तुमंच सतत डोकं दुखत असेल. औषध घेतल्यावर आराम मिळत असेल आणि पुन्हा डोक्याचं दुखणं उमळून येत असेल तर सावध व्हा, कारण असं होणे ब्रेन ट्युमरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये येतं. ब्रेन ट्युमरबाबात तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल. हा एक भयंकर आजार असून याची वेळेवर माहिती मिळाली तर यावर उपचार होऊ शकतात. या आजारावर वेळेवर उपचार न झाल्यास जीवाला धोका होऊ शकतो. हा आजार होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. चला जाणून घेऊया ब्रेन ट्युमरची लक्षणे....

डोकं दुखणे

ब्रेन ट्युमरचं सर्वात पहिलं आणि सामान्य लक्षण म्हणजे डोकं दुखणे. या आजारात होणारी डोकेदुखी ही साधारण सकाळच्या वेळी अधिक होते. पुढे ती वाढते. या वेदना कधी कधी इतक्या जास्त असतात की, व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडतं. त्यामुळे तुम्हालाही अशाप्रकारची डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

उलटी आणि मळमळ

ब्रेन ट्युमरचं दुसरं लक्षण हे आहे की, डोकं दुखण्यासोबतच उलटी सुरु होते. कधी कधी डोकं दुखत असेल तर दिवसभर मळमळ व्हायला लागते. हे लक्षणही सकाळच्यावेळी अधिक बघायला मिळतं.

शारीरिक संतुलन

ब्रेन ट्युमर असेल तर सतत चक्कर येतात आणि कधी कधी चक्कर येऊन काही लोक पडतातही. जर ट्युमर सेरिबॅलम असेल तर त्याने शारीरिक संतुलन प्रभावित होतं. त्याचाच हा भाग आहे.

झटके येणे

ब्रेन ट्युमर असेल तर ज्या प्रभावित कोशिका जाळं तयार करतात. त्यामुळे आजूबाजूच्या कोशिकाही प्रभावित होतात. त्यामुळे त्या व्यक्तीला झटके येणे सुरु होते.

पॅरालिसीससारखे वाटणे

ब्रेन ट्युमरच्या स्थितीत अनेकदा व्यक्तीच्या मेंदुवरील कंट्रोल सुटतो. त्यामुळे शरीराची कोणतीही हालचाल जाणवत नाही. त्या व्यक्तीला पॅरालिसीस झाल्यासारखं वाटतं. अशा स्थितीत हात आणि पाय काम करणं बंद करतात.

बोलण्यात अडचण

ट्युमर जसजसा वाढत जातो त्यानुसार शरीरातील इतरही अंगांवर प्रभाव पडत जातो. हा ट्युमर पुढे सरकत सरकत टॅपोरल लोबमध्ये येतो आणि त्या व्यक्तीला बोलण्यात अडचण निर्माण होते. अशात त्या व्यक्तीचा आवाज जाण्यासोबतच तोंड एकीकडे वाकडं होतं.

चिडचिड आणि स्वभावात बदल

या आजारामुळे तुमच्या स्वभावावरही प्रभाव पडतो. त्या व्यक्तीची चिडचिड वाढते आणि स्वभावातही फरक पडतो.

अशक्तपणा वाढणे

ब्रेन ट्युमरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोकं दुखण्यासोबतच अशक्तपणाही येतो. डोक्यात ट्युमर तयार होत असतो. त्यामुळे संपूर्ण शरीर कमजोर होऊ लागतं.

Dr. Ramesh Ranka
Dr. Ramesh Ranka
MS - Allopathy, Orthopaedics, 25 yrs, Pune
Dr. Nilima  Pawar
Dr. Nilima Pawar
BHMS, General Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Amol Pharande
Dr. Amol Pharande
MDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 14 yrs, Pune
Dr. Tushar Ghode
Dr. Tushar Ghode
BDS, Dentist, 6 yrs, Pune
Dr. Reshma P. Ransing
Dr. Reshma P. Ransing
BHMS, Family Physician, Pune