Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  

उन्हाळ्यात जास्त घाम येण्याने वजन होतं कमी? जाणून घ्या खरं-खोटं!

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

उन्हाळ्याला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी हा फेव्हरेट काळ आहे. कारण अनेक लोकांना असं वाटतं की, गरमीमुळे जास्त घाम आल्याने वजन कमी करण्यास मदत होते. या वातावरणात अनेक जिम ट्रेनरही हे सांगतात असतील की, याचा वातावरणात तुम्ही वजन कमी करु शकता. इतकेच काय तर अनेक फिटनेस ट्रेनर्स हे लोकांना फॅन बंद करुनही वर्कआउट करण्यास सांगतात, जेणेकरुन जास्त घाम यावा.

पण खरंच जास्त घाम येण्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते का?

जर असं असेल तर हिवाळ्यात तुमच्या शरीरातून अजिबातच फॅट बर्न होत नसेल. कारण हिवाळ्यात अजिबातच घाम येत नाही. या लॉजिकनुसार डोंगराळ भागात किंवा थंड ठिकाणांवर राहणाऱ्या लोक जाडेपणाचे शिकार व्हायला पाहिजेत. कारण त्या ठिकाणांवर फार घाम येत नाही. तसेच एका सामान्य धारणा अशी आहे की, हिवाळ्यात तुमचं वजन वाढतं आणि उन्हाळ्यात कमी होतं.

काय सांगतं सायन्स?

आपल्या शरीरात एडिपोज टिशूच्या रुपात फॅट(चरबी) जमा होते. जेव्हाही शरीराची एनर्जी गरज बाहेरुन पूर्ण होत नाही तेव्हा शरीर या जमा झालेल्या फॅटला एनर्जी मध्ये बदलतं आणि आपण फॅट कमी करतो. तुम्ही हिवाळ्यात वर्कआउट करा किंवा उन्हाळ्यात शरीरातून फॅट बर्न होण्याची प्रक्रिया एकसारखीच आहे.

घामाच्या रुपात फॅट बाहेर येतं?

असं अजिबात होत नाही. शरीराचं तापमन संतुलित करण्यासाठी घाम येतो. उन्हाळ्यात बाहेरचं तापमान इतकं जास्त असतं की, शरीराला थंड ठेवण्यासाठी खूप जास्त घाम येतो. तेच हिवाळ्यात जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा शरीरातील तापमान कमी करण्यासाठी घाम येतो.

काय उन्हाळ्यात वजन वाढतं?

वजन वाढणं हे वातावरणावर नाही तर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर अवलंबून असतं. जेव्हा तुमच्या खाण्यात कॅलरीचं प्रमाण फार जास्त असतं तेव्हा कॅलरी फॅट स्वरुपात शरीरात जमा होतात आणि जाडेपणा वाढतो. जेव्हा शरीरात कॅलरी कमी होतात तेव्हा शरीरातील फॅट एनर्जी होऊन निघून जातं आणि याने वजन कमी होतं.

Published  

फक्त 7 दिवसांमध्ये 3 किलो वजन करा कमी; फॉलो करा हा डाएट प्लॅन

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण सतत प्रयत्नशील असतात. पण हे वाढलेलं वजन कमी करणं फारसं सोपं काम नसतं. त्यामुळे मुली एखाद्या खास फंक्शनसाठी डाएटिंग आण एक्सट्रा वर्कआउट करणं सुरू करतात. जेणेकरून आपल्या ड्रेसमध्ये त्या सुंदर दिसतील. वभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्हालाही लवकर वजन कमी करायचं असेल तर सात दिवस हा डाएट प्लॅन फॉलो करा. त्यामुळे तुम्हाला 3 किलो वजन कमी करणं शक्य होईल.


सात दिवसांपर्यंत एकाच प्रकारचा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे कंटाळा येतो. त्यामुळे दोन प्रकारचे डाएट प्लॅन फॉलो करू शकता.

डाएट प्लान 1

सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पोट साफ होण्यासोबतच चरबी कमी करण्यासाठी मदत होइल.
नाश्त्यामध्ये एक ग्लास दूध आणि दोन टेबलस्पून ओट्स किंवा कॉर्नफ्लॅक्स खा.
दुपारच्या जेवणामध्ये दोन छोट्या वाट्या भाज्या असलेला दलिया खा. भाज्या आणि दलियामध्ये अस्तित्वात असणारं फायबर खाल्याने पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे वाटते.
चहा पिण्याची इच्छा झाली तर ग्रीन टी प्या.
रात्रीच्या जेवणामध्ये दूध आणि दलिया खा.


डाएट प्लान 2

दिवसाची सुरूवात एक ग्लास पाण्याने करा. त्यानंतर तुम्ही गरम ब्लॅक टी किंवा ग्रीन टी घेऊ शकता.
नाश्त्यामध्ये मोठा बाउलमधये सूप पिउ शकता ज्यामध्ये भाज्या असतील.
दुपारच्या जेवणामध्ये व्हिट ब्रेडच्या दोन स्लाइस खा. त्यासोबत एक कप सूप घेऊ शकता.
संध्याकाळी ग्रीन टी पिउ शकता. चहा किंवा कॉफ शक्यतो अवॉइड करा.
रात्रीच्या जेवणामध्ये भाज्यांपासून तयार करण्यात आलेलं सॅन्डविच खा. ब्रेड ओट्स किंवा व्हिट ब्रेड असेल तर उत्तम ठरतं.
हा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी दररोज जवळपास 30 मिनिटांसाठी व्यायाम करा. ब्रेकफास्ट अजिबात स्किप करू नका. तसेच कोणत्याही पदार्थामध्ये साखरेचा जास्त वापर करणं टाळा.


टिप : एक गोष्ट लक्षात ठेवा की, सर्वांचं शरीर समान नसतं. वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Published  

वजन कमी करण्यासाठी मदत करते मेथी; असा करा वापर

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

साधारणतः आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात मेथीचा वापर करण्यात येतोच. फक्त पाल्याभाज्यांमध्ये समावेश होणाऱ्या मेथीच्या पालेभाजीचाच नाही तर मेथीच्या दाण्यांचाही अनेक पदार्थांमध्ये समावेश करण्यात येतो. मेथीच्या भाजीचे आणि मेथीच्या दाण्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मेथीच्या दाण्यांचा कढी आणि सांबार यांसारख्या पदार्थांमध्ये फोडणी देण्यासाठी वापर करतात. मेथी फक्त पदार्थांची चव वाढविण्यासाठी नाही तर ब्लड शुगर आणि बीपी यांसारख्या आजारांवरही परिणामकारक ठरते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? मेथी वजन कमी करण्यासाठीही गुणकारी ठरते.

मेथी ठरते फायदेशीर
जर तुम्ही वाढणाऱ्या वजनामुळे त्रस्त असाल आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मेथी तुमची मदत करेल. फक्त तुम्हाला मेथीचा योग्य वापर करता आला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी मेथीचा कसा वापर करावा त्याबाबत जाणून घेऊया...

भाजून वाटलेले मेथीचे दाणे
वजन कमी करण्यासाठी तुम्ही मेथीचे दाणे एका पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्यावे. त्यानंतर ते वाटून त्याची पावडर तयार करावी. दररोज सकाळी एक चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्यावी.

मेथीचं पाणी
मेथीच्या दाण्यांच पाणीही वजन कमी करण्यासाठी मदत करतं. रात्री दोन चमचे मेथी एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावी. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावं. दररोज असं केल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. दरम्यान मेथीचं पाणी प्यायल्याने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंगपासून दूर रहाता.

मेथी स्प्राउट्स
मेथीचे दाणे तुम्ही स्प्राउट्स म्हणूनही खाऊ शकता. परंतु लक्षात ठेवा की, दाण्यांना पूर्णपणे मोड आलेले असावेत. मेथी स्प्राउट्समध्ये मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी, ई, बी याव्यतिरिक्त कॅल्शिअम, झिंक आणि कॅरोटिन असतं. सकाळी रिकाम्यापोटी मोड आलेले मेथीचे दाणे खाल्याने अनेक तासांपर्यंत पोट भरल्याप्रमाणे वाटते.

मेथीचा चहा
मेथीचा चहा वजन कमी करण्यासाठी मदत करतो. आतापर्यंत तुम्ही मिल्क टी किंवा ग्रीन टी ट्राय केला असेल. परंतु आता वेट लॉस करण्यासाठी मेथीचा चहा ट्राय करा. हा वजन कमी करण्यासाठी मदत करण्यासोबतच डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतं. तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हा चहा मदत करतो.

Published  

वजन कमी करण्यासोबतच आरोग्याच्या इतर समस्यांवरही गुणकारी ठरते पपई!

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

पपई म्हणजे अनेक आरोग्यदायी फळांपैकी एक... निसर्गतः उष्ण असलेले हे फळ अरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने शरीरासोबतच त्वचा आणि केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदा होतो. पपईमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्व जसं अ‍ॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळून येतात. जे शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी उपयोगी ठरतात. पपईमध्ये लायकोपीनही मोठ्या प्रमाणात असतं, जाणून घेऊया आहारामध्ये पपईचा समावेश केल्याने होणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

वजन कमी होण्यासाठी

पपईमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे बऱ्याच वेळापर्यंत पोट भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे तुम्ही ओव्हर इटिंगपासून दूर राहता. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर पपई तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी

पपईमध्ये शक्तीशाली अ‍ॅन्टीऑक्सिडंट आढळून येतात. जसं कॅरोटिन्स, फ्लॅवोनॉएड्स, व्हिटॅमिन-सी इत्यादी. याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी शरीरातं अनेक आजारांपासून रक्षण होतं.

डोळ्यांसाठी उत्तम

पपईमध्ये व्हिटॅमिनी ए मुबलक प्रमाणात आढळून येतं. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी जिजेनेरेट होण्यापासून बचाव होतो. त्याचबरोबर मेक्यूलर डिजेनरेशन यांसारख्या डोळ्यांच्या समस्यांपासूनही सुटका होते.

हाडांच्या मजबूतीसाठी

हाडांचे आरोग्य स्वस्थ आणि मजबूत ठेवण्यासाठी दररोज पपईचे सेवन करा. पपईचं सेवन शरीरातील हाडांच्या मजबूतीसाठी मदत करतं. यामध्ये अ‍ॅन्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन-सी असल्यामुळे हे अर्थरायटिस यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी मदत होते.

पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी

पपईमध्ये डायजेस्टिव एंजाइम्ससारखं पपेन असतं, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर यामध्ये असलेलं फायबर शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं.

Published  

वजन कमी करण्यासोबतच यासाठीही फायदेशीर ठरतात दोरीच्या उड्या!

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

लहाणपणीच्या खेळांमध्ये समाविष्ट होणारा आणि प्रत्येकालाच आवडणारा खेळ म्हणजे, दोरीच्या उड्या. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही लहानपणी गंमत म्हणून खेळत असलेल्या खेळाचा वर्कआउटमध्येही समावेश होतो. खेळ आणि फिटनेसशी निगडीत असणाऱ्या व्यक्ती आपल्या वर्कआउटमध्ये दोरीच्या उड्यांचा समावेश करत असतात. फक्त दोरीच्या उड्यांचेच शरीराला अनेक फायदे होतात. याचा वापर आपण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही करण्यात येतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही साइड इफेक्टशिवाय वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या वर्कआउटमध्ये दोरीच्या उड्यांचा समावेश करायला विसरू नका. जाणून घेऊया दोरीच्या उड्यांचा वर्कआउट प्लॅनमध्ये समावेश केल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत...

1. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, 10 मिनिटांसाठी दोरीच्या उड्या मारणं 8 मिनिटं धावण्या समान असतं. एक मिनिटापर्यंत दोरीच्या उड्या मारल्याने 10 ते 16 कॅलरी उर्जा खर्च होते.

2. बॉक्सर्स आपल्या वर्कआउट प्लॅनमध्ये दोरीच्या उड्यांचा अवश्य समावेश करतात. दोरीच्या उड्यांचा सराव केल्याने शरीराची बॅलेन्सिग इम्प्रूव होते आणि पायांच्या मूव्हमेंट्समध्ये वेग आणि कंट्रोल वाढत असून बॉक्सर्ससाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर सुपरमॉम मेरी कॉमने एका कॉम्पिटिशन दरम्यान आपलं वेट कमी करण्यासाठी दोरीच्या उड्यांचा आधार घेतला होता. त्यावेळी तिचे व्हिडीओ व्हायल झाले होते.

3. दोरीच्या उड्यांमुळे हाडं मजबुत होण्यासही मदत होते. दोरीच्या उड्या मारणं हे मेंदूसाठीही फायदेशीर ठरतं.

4. वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या मारणं एक व्यायाम आहे. दररोज जर अर्ध्या तासापर्यंत दोरीच्या उड्यांचा सराव केला तर एक आठवड्यापर्यंत सतत असं केल्याने 500 ग्रॅमपर्यंत वजन कमी करण्यासाठी मदत होते. वजन कमी करण्यासाठी इच्छुक लोकांनी दोरीच्या उड्या (Rope skipping) आपल्या रूटिनमध्ये एक्सरसाइज म्हणून समावेश करावा.

5. पहिल्या दिवशी दोरीच्या उड्या मारल्याने होउ शकतं की, तुमच्या पायांमध्ये प्रचंड वेदना होतील. अनेकदा हे इतर वर्कआउटमध्येही होतं. त्यामुळे दोरीच्या उड्या मारताना हळूहळू सुरुवात करा.

6. दोरीच्या उड्यांमुळे शरीरातील रक्तप्रवाह वेगने होतो. ज्यामुळे त्वचेला पोषण मिळण्यास सुरुवात होते आणि शरीरातील विषारी घटक घामाच्या स्वरूपात शरीरातून बाहेर टाकले जातात. दोरीच्या उड्यांचा एक फायदा म्हणजे, यामुळे हार्मन बॅलेन्स (Hormone Balance) होण्यास मदत होते. ज्यामुळे टेन्शन आणि डिप्रेशनपासून सुटका होते.

7. दोरीच्या उड्या मारताना शरीराच्या सर्वच अवयवांचा समावेश होतो. यामध्ये तुमचे पाय, पोटाचे स्नायू, खांदे आणि मनगट, हृदय आणि आंतरिक अवयवांचाही व्यायाम होतो.

8. दोरीच्या उड्यांमुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. फुफ्फुसं मजबुत होतात आणि चेहऱ्यावर चमक येते. एवढचं नाही तर दोरीच्या उड्यांमुळे शरीराचा Stamina वाढतो आणि अनियंत्रित हृदयाची गतिही सुधारण्यास मदत होते.

9. धावण्याऐवजी दोरीच्या उड्या मारल्याने तुमच्या गुडघ्यांवर त्याचा विपरित परिणाम होत नाही. कारण उड्या मारताना पायांना जो झटका लागतो तो पूर्ण पायंमध्ये पसरतो आणि थेट गुडघ्यांवर त्याचं प्रेशर येत नाही.

Dr. Varghese Jibi
Dr. Varghese Jibi
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Sushma Todkar
Dr. Sushma Todkar
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Dr. Chandrashekhar Jadhav
Dr. Chandrashekhar Jadhav
BAMS, Ayurveda Child Abuse Pediatrician, 15 yrs, Pune
Dr. Virag  Kulkarni
Dr. Virag Kulkarni
BAMS, Ayurveda Panchakarma, 14 yrs, Pune
Dr. Sairandhri Shinde
Dr. Sairandhri Shinde
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Hellodox
x