Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पावसाळा आणि किडे हे जणू समिकरणच. पावसाळ्यात किड्यांचे पेवच फुटलेले दिसते. पहावे तिकडे किडेच किडे दिसू लागतात. अशा वेळी हे किडे चावण्याचाही संभव असतो. किंबहुना चावतात. किडा चावल्यास शरीराला मोठा त्रास होतो. त्वचेला खाज सुटणे, त्वचा लालसर होणे, काही प्रमाणात सूज येणे असे प्रकार संभवतात. काही किडे हे विषारी असतात तर, काही अविषारी. कोणत्याही प्रकारचा किडा चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण, तोपर्यंत किडे चावल्यास तुम्ही घरगूती उपायही करू शकता.

बर्फाचा शेक
मुंगी, मधमाशी, किंवा इतर कोणता किडा चावल्यास त्वचा लालसर होते. काही प्रसंगात त्वचेला सूजही येते. अशा वेळी किडा चावल्याच्या ठिकाणी बर्फ ठेवा. बर्फाचा शेख घेतल्याने आराम मिळतो. तसेज, सूज कमी यायलाही मदत होते. कापडामध्ये बर्फाचे खडे घेऊन ते वेदनेच्या ठिकाणी २० मिनिटे ठेवा. वेदना कमी होण्यास मदत होते.

टूथपेस्ट
जर तुम्हाला मुंगी, मधमाशी किंवा तसाच एखादा किडा चावला तर तुमच्याकडे असलेली कोणतीही टुथपेस्ट त्या ठिकाणी लावा. आराम पडेल. टुथपेस्टमध्ये अँटीबॅक्टीरिअल आणि अँटीसेप्टीक गुण असतो. जो वेदना आणि सूज कमी करतो.


तुळशीची पाने
तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतो. ही पाने तुम्ही किडा चावल्याच्या ठिकाणी लावली तर, त्वचेची खाज आणि सूज कमी करण्यास मदत होते. तुळशीची पाने चोळून तो लेप १० मिनिटे वेदनेवर लावा. त्यामुळे इन्फेक्शनचा धोकाही टळतो.

मधही फायदेशीर
किडा चावल्यावर होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळवायचा असेल तर, मध फायदेशीर ठरते. किडा चावलेल्या जागेवर मध चोळा. मधातील औषधी गुणधर्म वेदना दूर करतो.

डास पळवण्यासाठी काही झाडांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. ही झाडे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलीत तर डास नक्कीच कमी होतील.

1) सिट्रोनेलो
पावसाळा सुरु होताच डासांची समस्या मोठ्या प्रमाणात सुरु होते. डास चावल्याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. यात अनेकांना काही गंभीर आजारही होऊ शकतात. अशावेळी डास पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण या उपायांनी डास काही वेळेसाठी दूर जातात. पण पुन्हा येऊ लागतात. अशात डास पळवण्यासाठी काही झाडांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. ही झाडे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलीत तर डास नक्कीच कमी होतील.

सिट्रोनेला ही एक सुंगधी वनस्पती आहे. या वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या अगरबत्तीही तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतील. या वनस्पतीच्या मदतीने डास पळवता येऊ शकतात.कारण या वनस्पतीच्या वासामुळे डास पळतात. त्यांना या वनस्पतीचा वास सहन होत नाही. ही वनस्पती तुम्ही तुमच्या अंगणात किंना बाल्कनीमध्ये लावू शकता.

2) पेटूनिया
पेटूनिया हे एक फारच आकर्षक फूल आहे जे तुम्ही अनेकदा कुठेना कुठे पाहिलं असेल. हे फूल बाराही महिने उगवतं. या फुलाला नैसर्गिक किटकनाशकही म्हटलं जातं. या फूलाचं झाड तुमच्या घराच्या आवारात किंवा घरात लावल्यास डास कमी येतील.

3) लॅव्हेंडर
लॅव्हेंडरचा सुंगध हा डासांना तुमच्या घरात येण्यापासून रोखतो. जांभळ्या रंगाचं फूल असलेलं हे झाड उन्हाळ्यात सहज मिळतं. हे झाड तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत लावू शकता.

4) लेमनग्रास(गवताचा प्रकार)
लेमनग्रास हे साइट्रोनला या प्रजातीचं गवत आहे. ज्या ठिकाणी लेमनग्रास असते त्या ठिकणी डास जास्त काळ राहू शकत नाहीत.

5) पुदीना
तसा तर पुदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पुदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पुदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.














गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात ते खरेच, युगांडातील एका व्यक्तीला मलेरिया झाला असताना निदान होण्यास विलंब लागत होता त्यामुळे ब्रायन गिट्टा या रुग्णानेच कुठलीही सुई वगैरे न टोचता करता येईल, अशी मलेरियाची रोगनिदान चाचणी शोधली आहे. तो रुग्ण २५ वर्षीय संगणक अभियंता असून त्याला या शोधासाठी पुरस्कारही मिळाला आहे. मातीबाबू हे या चाचणी संचाचे नाव असून गिट्टा याला त्यासाठी ब्रिटनच्या रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग संस्थेने २५ हजार युरोचा पुरस्कार जाहीर केला. आफ्रिकेत मलेरियाचे प्रमाण खूपच जास्त आहे. २०१६ मध्ये २१६ दशलक्ष रुग्ण होते. २०१५ मध्ये हे प्रमाण २११ दशलक्ष होते. मृतांची संख्याही २०१६ मध्ये एक हजाराने कमी होऊन ४४,५०० झाली आहे. स्वाहिली भाषेत उपचार या शब्दाला मातीबाबू हा प्रतिशब्द आहे. त्यावरून या निदान संचाचे नाव तसे ठेवले आहे.

पोर्तुगालमधील एक संस्था आता या संचाचे व्यावसायिक उत्पादन करणार असल्याचे परीक्षक रिबेका एनॉनचोंग यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या मलेरियाची चाचणी करण्यासाठी २०० संच उपलब्ध असून त्यात आता हा नवीन संच जास्त सोपा ठरणार आहे. गिट्टा याने या चाचणी संचाची अचूकता ९० टक्क्य़ांपर्यंत नेण्याचे ठरवले आहे. या संचाची किंमत १०० डॉलर असेल.

हा संच वापरण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही, शिवाय ग्रामीण भागात तो फार उपयोगी पडणार आहे, कारण तेथे सुविधा नसतात. या पद्धतीत एक लाल रंगाचा किरण हाताच्या बोटावर टाकला जातो, त्यामुळे लाल रक्तपेशींचा आकार, संख्या व रंग यातील फरक कळतो. तो एका मिनिटात मोबाइल किंवा संगणकावर घेऊन मलेरियाचे निदान करता येते.

हिवतापाची लस बनविण्यासाठी घातक जिवाणूंची मदत घेणे शक्य असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी हिवतापाशी संबंध असलेला प्रथिनांचा लहान समूह शोधला आहे. त्यामुळे मलेरियाची लागण होते.

हे संक्रमण प्रतिकारशक्ती विकसित न झालेल्या लहान मुलांसाठी अधिक घातक असते. पाच वर्षांखालील मुलांमध्ये हिवतापामुळे मृत्युदर अधिक आहे, असे मेलबर्न विद्यापीठातील संशोधक मायकेल डफी यांनी सांगितले. हिवतापामुळे मुलांच्या मृत्यूचा धोका अधिक का? मुलांचा मृत्यू होताना शास्त्रज्ञ आणि डॉक्टर मात्र यावरील प्रभावी उपचार पद्धतीचा शोध लागत नसल्याने त्रस्त होते, असे डफी म्हणाले.

हिवतापाचा सखोल अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी यातील परजीवींचा अभ्यास सुरू केला. या परजीवींमुळेच सौम्य किंवा गंभीर हिवतापाचा धोका बळावतो. रोगप्रतिबंधक औषधांद्वारे या परजीवींवर हल्ला करणे शक्य आहे, असे डफी म्हणाले. हिवतापाचे वेगवेगळे परजीवी ओळखण्यासाठी संशोधकांनी ‘फिंगर प्रिंट’ यंत्रणा विकसित केली. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील जिवाणूंचा सखोल अभ्यास करणे शक्य झाले. संशोधकांनी पपुआ, इंडोनेशिया येथील ४४ जणांवर संशोधन केले. मात्र हिवतापाच्या काही घातक जिवाणूंद्वारे लस बनविणे शक्य असून यावर संशोधन सुरू असल्याचे डफी यांनी स्पष्ट केले.

Dr. Ankita Bora
Dr. Ankita Bora
BHMS, Homeopath, 5 yrs, Pune
Dr. Vijaykumar Raut
Dr. Vijaykumar Raut
BAMS, Family Physician Physician, 18 yrs, Pune
Dr. Pratima Kokate-Ghode
Dr. Pratima Kokate-Ghode
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diet Therapeutic Yoga, 9 yrs, Pune
Dr. Shrikant Tile
Dr. Shrikant Tile
MBBS, Gynaecologist, 10 yrs, Pune
Dr. Rohan Shirole
Dr. Rohan Shirole
MS/MD - Ayurveda, Dermatologist Family Physician, 4 yrs, Pune
Hellodox
x