Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पुदीना म्हटलं की त्याचा पहिल्यांदा त्याचा गंध आठवतो आणि मग त्याची चटपटीत चटणी लक्षात येते. पुदीना आरोग्यदायी असून अनेक ड्रिंक्समध्ये त्याचा वापर केला जातो. पोटाला थंडावा देण्यासाठी पुदीना गुणकारी ठरतो.

पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी पुदीना उपयुक्त ठरतो. पण पुदीना फक्त आरोग्यदायी आहे असे नाही तर तो सौंदर्यवर्धकही आहे.

त्वचेसाठी लाभदायी असलेला पुदीना नेमका कसा वापरावा, पाहुया...

# पुदीन्यात मिंथॉल आणि अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. पिंपल्स, रॅश, घामोळ्या, सनबर्न यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी पुदीन्याची पाने उपयुक्त ठरतात.

# मुलतानी माती देखील त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्वचेतील ऑईल नियंत्रित करून त्वचा स्वच्छ करण्याचे काम मुलतानी माती करते. मुलतानी मातीत पुदीन्याची पान्यांची पेस्ट, मध, दही घालून त्वचेवर लावा. २० मिनिटांनंतर चेहरा धुवा. त्यानंतर त्वचेवर मॉईश्चरायजर लावा. तेलकट त्वचेचा त्रास कमी होईल.

# त्वचेची पीएच लेव्हल सुरळीत ठेवण्यासाठी, अतिरिक्त ऑईल नियंत्रित करण्यासाठी गुलाबपाणी फायदेशीर ठरते. त्यामुळे पुदीन्याची पाने, मध आणि गुलाबपाणी एकत्र मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. त्वचा मुलायम होईल व हायड्रेट राहिल.

विराट कोहलीपासून रणबीर कपूर आणि रणवीर सिंहच्या बियर्ड लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सेलिब्रिटींमुळे पुन्हा मुलांच्या बिअर्ड लूककडे मुली आकर्षित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे मुलींना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हीदेखील दाढी वाढवत असाल तर काही गोष्टींचं भान सांभाळणं आवश्यक आहे. सोबतच रूबाबदार दाढी वाढवण्यासाठी कोणत्या घरगुती टीप्स फायदेशीर ठरतील? हेदेखील नक्की जाणून घ्या.

रूबाबदार दाढी वाढवण्यासाठी खास टीप्स -
दालचिनी आणि लिंबू -
दालचिनीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट चेहर्‍यावर किमान 15 मिनिटं लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. संवेदनशील त्वचा असल्यास दालचिनी आणि लिंबू या दोन्हींमुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. यामुळे पॅच टेस्ट करूनच हा उपाय करावा.

खोबरेल तेल -
खोबरेल तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत. दाढी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात कढीपत्त्याची काही पानं मिसळून तेल उकळा. हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचा मसाज करा. शेव्ह करण्यापूर्वी कोमट पाण्यात खोबरेल तेलाचे थेंब मिसळून चेहरा स्वच्छ धुवावा.


आवळा -
आवळा केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. दाढीचे केस वाढवण्यासाठी आवळ्याचं तेल फायदेशीर ठरतं. त्यामुळे किमान 20 मिनिटं आवळ्याच्या तेलाने मसाज करा. आवळ्याचा आहारात समावेश करणंदेखील फायदेशीर ठरतं. थेट आवळ्याचं तेल त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे यासोबत ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाचं तेल मिसळून मसाज करा.

केसांच्या वाढीसाठी या बाह्य उपचारांसोबतच आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील गरजेचे आहे. यासाठी मुबलक पाणी प्या. आहारात संतुलित जेवणाचा समावेश करावा.मद्यपान आणि धुम्रपानापासूनही दूर रहा.

चेहरा हा मनाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. मनातील भाव चेहऱ्यावर उमटतात. त्याचबरोबर सौंदर्याचे प्रमुख अंग म्हणजे चेहरा. म्हणून सौंदर्य खुलवण्यासाठी आपण महागडे प्रॉडक्ट्स वापरतो, ट्रिटमेंट्स घेतो. पण आजकालच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण जीवनशैलीचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळे चेहरा दिवसातून दोनदा धुणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते आणि त्वचाही चांगली राहते. पाहुया दिवसातून दोनदा चेहरा धुण्याचे फायदे...

आर्द्रता टिकून राहण्यास मदत
नियमित त्वचा स्वच्छ केल्याने त्वचा चांगली राहण्यास मदत होते. त्वचा मऊ, चमकदार होते, त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते.

मृत त्वचा निघून जाते
फेसवॉश केल्याने चेहऱ्यावरील धूळ, माती, घाण, तेलकटपणा निघून जातो. त्याचबरोबर मृत पेशीही दूर होतात. त्यामुळे चेहरा उजळ, फ्रेश दिसतो.


तरुण दिसण्यासाठी
योग्य पद्धतीने चेहरा धुतल्याने त्यावरील अनावश्यक घटक दूर होतात. त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते. परिणामी त्वचेतील आर्द्रता टिकून राहते आणि तुम्ही तरुण दिसता.

रक्ताभिसरण सुधारते
चेहरा धुताना आपण फेसवॉश लावून चेहऱ्यावर काही वेळ हात गोलाकार पद्धतीने फिरवतो. त्यामुळे नकळत मसाज केल्यासारखे होते. परिणामी पेशी कार्यरत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेवर चमक येते.

मीठाशिवाय आपण जेवणचा विचारही करू शकत नाही. मात्र मीठ आहरात चव वाढवण्याचं काम करत नाही तर त्याचा आरोग्यदायी फायद्यांसाठीही अनेकप्रकारे वापर करता येऊ शकतो. सौंदर्य खुलवण्यासाठीही मीठ अत्यंत फायदेशीर आहे.

चेहर्‍यासाठी फायदेशीर मीठ
मीठामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. यामुळे चेहरा तजेलदार होतो. उन्हाळ्यात त्वचेवर मृत पेशी साचून राहण्याचं प्रमाण अधिक असतं. अशावेळेस डेड स्कीनचा थर नैसर्गिकरित्या हटवण्यासाठी मीठ अत्यंत फायदेशीर आहे.

घरगुती स्क्रब -
मीठामध्ये ऑलिव्ह ऑईल, लॅव्हेंडर ऑईल, बदामाचं तेल मिसळा. या स्क्रबरने चेहरा स्वच्छ केल्यास मृत पेशींचा थर निघून जाण्यास मदत होते.


व्हिटॅमिन्सच्या कमीमुळे अनेकदा नखं कमजोर होतात. अशावेळेस चमचाभर मीठामध्ये, चमचाभर लिंबाचा रस, चमचाभर बेकिंग सोडा आणि कपभर कोमट पाणी मिसळा. ही पेस्ट नखांवर लावल्यास ते मजबूत आणि चमकदार होतात.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी एक चमचा मीठ, दोन चमचा बेकिंग पावडर मिसळा. ही पेस्ट टुथब्रशवर घेऊन लावा. यामुळे दात स्वच्छ होतात.

श्रावण महिना सुरू झाला की सणा-वरांची रेलचेल सुरू होते. सत्यनारायणाची पूजा, मंगळागौरपासून येत्या काही दिवसात रक्षाबंधनाचा सण येईल. पावसाळ्याच्या दिवसात हवामानात बदल झाल्यानंतर तुमच्या आहरात बदल करणंही गरजेचे आहे. आरोग्याप्रमाणेच तुमचं सौंदर्यही जपायचं असेल तर ब्युटी एक्सपर्ट शह्नाझ हुसेन यांच्या या खास टीप्स नक्कीच तुम्हांला फायदेशीर ठरतील.

कलिंगडाचा रस -

त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी कलिंगडाचा रस फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला तजेला देण्यास, शुष्कता कमी होण्यास मदत होते. कलिंगडामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. आहारात कलिंगडाचा समावेश करण्यासोबतच चेहर्‍यावर किमान 20 मिनिटं कलिंगडाचा रस लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.

फ्रुट मास्क -

केळं, सफरचंद, पपई, संत्र या फळांचा त्वचेचा पोत सुधारण्यास फयादा होतो. किमान अर्धा तास चेहर्‍यावर या फळांचा मास्क लावा. यामुळे त्वचेतील दाह कमी होण्यास मदत होते. मृत त्वचेचा थर कमी करण्यास तसेच चेहर्‍यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते.

कुलिंग मास्क -

काकडी ही थंड प्रवृत्तीची असल्याने त्वचेतील दाह कमी करण्यास ती फायदेशीर आहे. काकडीच्या गरामध्ये दोन चमचे दूध पावडर, अंड्याचा पांढरा भाग मिसळून लावा. या पेस्टचा चेहर्‍यावर, मानेवर हलका थर पसरवा. सुमारे अर्धा तासाने मास्क सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

गुलाबपाणी -

डोळ्यांवरील थकवा, डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी गुलाबपाण्यात भिजवलेला कापसाचा बोळा डोळ्यांवर ठेवा. यासोबतच टी बॅग्स देखील फायदेशीर ठरतील. आयपॅडसाठी भिजवलेले ग्रीन टीच्या बॅग़्स भिजवून, त्यातील थोडं पाणी काढून डोळ्यांवर ठेवा.

Dr. Meghana Karande
Dr. Meghana Karande
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 1 yrs, Pune
Dr. Rahul Pherwani
Dr. Rahul Pherwani
BHMS, 22 yrs, Pune
Dr. Abhay Singh
Dr. Abhay Singh
MBBS, Family Physician, 2 yrs, South Delhi
Dr. AMITRAJ MHETRE
Dr. AMITRAJ MHETRE
MBBS, Pediatrician, 8 yrs, Pune
Dr. Niket Lokhande
Dr. Niket Lokhande
MDS, Dentist Root canal Specialist, 14 yrs, Pune
Hellodox
x