Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

झोप आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक अशा विविध समस्या जडतात. तसंच यामुळे आपली कार्यक्षमता आणि आरोग्य खालावते. प्रत्येकाला आपल्या वय, प्रकृतीनुसार आवश्यक असणाऱ्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक आहे. आवश्यकतेनुसार झोप न मिळाल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात. तर #WorldSleepDay च्या निमित्ताने जाणून घेऊया कोणत्या वयात किती झोपेची आवश्यकता आहे.

नवजात बाळ (३-११ महिने) - कमीत कमी १४-१५ तास.
१२-३५ महिन्यांचे बाळ- १२-१४ तास.
३-६ वर्षांचे मुल- ११-१३ तास.
६-१० वर्षांचे मुल- १०-११ तास.
११-१८ वर्षात- ९:३० तास.
मध्यम वयात- ८ तास.
वृद्ध- ८ तास.

मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गुढी उभारताना आपण त्याला कडूलिंबाचा पाला लावतो आणि प्रसाद म्हणून खातोही. ही आपली परंपरा नक्कीच काहीतरी आरोग्यदायी संदेश देत असणार. कारण आपल्या सर्वच परंपरा तशा अर्थपूर्ण आहेत. तर कडूलिंबाचे काय फायदे आहेत आपण जाऊन घेऊया...

शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी-
गरम पाण्यात कडूलिंबाची पाने ३० मिनिटे ठेवा. त्यानंतर त्या पाण्याने अंघोळ करा. त्यामुळे शरीराची दुर्गंधी आणि इंफेक्शन दूर होण्यास मदत होईल.

रक्तातील सारखेचे प्रमाण नियंत्रित होण्यासाठी-
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी एक परिणामकारक आणि नैसर्गिक उपाय म्हणजे कडूलिंब. उत्तम परिणामांसाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा कडूलिंबाचा रस प्या.

कोंड्यापासून बचावात्मक-
कडूलिंबाची काही पाने वाटून त्याची पेस्ट बनवा. ती खोबरेल तेलात मिक्स करा. केसांना हे तेल लावा. १५-२० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. कोंडा कमी होईल आणि केसगळतीही दूर होण्यास मदत होईल.

फंगल इंफेक्शनपासून सुटका-
कडूलिंबाची काही पाने सुकवून वाटून त्याची पावडर बनवा. त्यात चंदन पावडर आणि गुलाबपाणी नीट मिक्स करा. फंगल इंफेक्शनवर उपाय म्हणून ही पेस्ट संबंधित जागी लावा.

घसादुखी-
एक ग्लास पाण्यात ३ कडूलिंबाची पाने टाकून पाणी उकळवा. त्यात चमचाभर मध घाला आणि त्या पाण्याने गुळण्या करा. घसादुखी दूर होईल.

उन्हाळ्यात धूळ, प्रदषूण, कडक ऊन यांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी काही घरगुती मास्क फायदेशीर ठरतात. शॅम्पू, कंडीशनिंगसोबत हेअर मास्क तुमच्या केसांचे सौंदर्य अधिक खुलवले. तसंच तुम्हाला कुलिंग इफेक्टचा अनुभव घेता येईल. पाहुया उन्हाळ्यात केसांसाठी उत्तम असलेले हेअर मास्क...

दह्याचा मास्क
उन्हाळ्यात दही खाणे जितके फायदेशीर असते तितकेच केसांचे पोषण होण्यासाठीही उपयुक्त ठरते. दह्यामुळे केसांचे उत्तमरित्या कंडीशनिंग होते. केस चमकदार व मुलायम होतात. त्याचबरोबर कोंड्याची समस्याही दूर होते. त्यासाठी केसांना दही लावा आणि ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा.

दुधाचा मास्क
दुधात प्रोटीन असते. जे केसांसाठी उपयुक्त ठरते. केस घनदाट, मुलायम होण्यासाठी दुधाचा मास्क लावणे फायदेशीर ठरले. त्यासाठी एक कप दूधात काही थेंब ऑलिव्ह ऑईल आणि मध घाला. याचे नीट मिश्रण बनवून केसांना लावा. सुकल्यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा.

भाताचे पाणी
भाताच्या पाण्यात खूप सारे व्हिटॉमिन्स असतात. त्यामुळे केसांचे पोषण होते. भाताचे पाणी केसांना लावल्याने केस स्वच्छ होतात. तसंच भाताच्या पाण्यात आवळा, शिकेकाई आणि संत्र्याच्या सालीची पावडर एकत्र करुन ते मिश्रण केसांना लावा. त्यामुळे केसांचे चांगले पोषण होईल.

आपण फिट एन फाईन असावं असं प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्नही केले जातात. कधी जिमला जात तर कधी घरच्या घरी व्यायाम करत फिट राहण्याचा प्रयत्न अनेक तरुणांकडून होतो. यामध्ये शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठीही डाएट प्लॅन नाहीतर आणखी काही केले जाते. पण तुम्हाला फिट रहायचे असेल तर काही गोष्टी योग्य पद्धतीने आणि नियमित पाळणे आवश्यक आहे. या गोष्टी केवळ तुमच्या आहारावर नाही तर संपूर्ण जीवनशैलीवर अवलंबून असतात. हे बदल केल्यानंतर नकळत तुम्ही फिट असल्याचे तुम्हाला जाणवेल. पाहूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही फिट राहू शकाल…

१. फिट राहण्यासाठी तुमचा दिवस चहा किंवा कॉफीने सुरु न करता एखाद्या फळाने करा. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. याबरोबरच तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुकाही खाऊ शकता.

२. तुमचा नाष्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण या प्रत्येक खाण्यात एक चमचा तूपाचा समावेश करा. तुपामुळे तुमची बद्धकोष्ठतेची तक्रार कमी होईल, त्याचप्रमाणे रक्ताची आणि साखरेची पातळी चांगली राहण्यासाठी आणि अॅसिडिटी कमी होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. याबरोबरच गूळ आणि तूप सोबत खाल्ल्यासही ताण कमी होण्यास मदत होते.

३. व्यायाम करताना ज्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत त्या करायचा प्रयत्न करा. काही व्यायामप्रकार करायला जास्त अवघड असतात, तरीही ते करायचे सोडून देऊ नये. आपल्या फिटनेससाठी ते कसे जमतील याचा प्रयत्न करत रहावा.

४. आपण दिवसातील बराच काळ विविध तांत्रिक उपकरणांबरोबर असतो. हा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न करावा. हातात सतत असणारा मोबाईल, डोळ्यासमोर असणारा लॅपटॉप यामुळे मानदुखी, शरीराची ठेवण अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या समस्या कमी करायच्या असतील तर उपकरणांचा वापर कमीत कमी होईल याकडे लक्ष द्यायला हवे.

५. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे बंद करा. प्रक्रिया केलेले अन्न आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे ताजे आणि शक्यतो घरात तयार केलेले अन्न खाण्याचा प्रयत्न करा.

६. आरोग्य चांगले रहायचे असेल तर पुरेशी झोप आवश्यक असते. व्यक्तीला किमान ७ ते ८ तासांची झोप गरजेची असते. त्यामुळे फिट राहण्यामध्ये झोपेचाही महत्त्वाचा रोल असतो.

तुमचे स्मोकींग सोडण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी 'नाही' म्हणायला शिका. कारण फक्त एकच यापासूनच सुरुवात होते आणि मग त्याचे व्यसनात रूपांतर होते. म्हणून स्मोकींगच्या इच्छेला आळा घालण्यासाठी परिणामकारक अशा काही टीप्स.

स्ट्रॉ चा वापर:
स्मोकिंगची सवय असणाऱ्या अनेकांना जेवल्यानंतर सिगरेटचा झुरका ओढावा वाटतो. आणि ते सोडण्याचा विचारनेच अनेकांना ताण येतो. पण जेवल्यानंतर स्ट्रॉ चा वापर करा. म्हणजे एखादे पेय पिताना आपण स्ट्रॉ ज्या पद्धतीने वापरतो किंवा ओढतो त्यापद्धतीने ओढा. त्यामुळे स्मोकिंगच्या इच्छेवर मात करण्यास मदत होईल.

रबरबँडचा वापर:
जेव्हा कधी तुम्हाला स्मोकिंगची इच्छा होईल तेव्हा रबर बँड मनगटाभोवती गुंडाळा. त्यामुळे तुमचं लक्ष दुसरीकडे वेधलं जाईल.

पदार्थ बनवा:
स्मोकींगचा मोह टाळण्यासाठी स्वयंपाकघरात जा आणि कोणतातरी पदार्थ बनवायला सुरुवात करा. कारण ओल्या हातात तुम्ही सिगरेट धरू शकत नाही. त्यामुळे त्या मोहापासून दूर होण्यास मदत होईल.

विणकाम शिका:
तुम्ही जितके जास्त स्ट्रेस असाल तितका तुम्हाला सिगरेट ओढण्याचा मोह होईल. म्हणून विणकाम शिकून घ्या. त्यामुळे तुमचा ताण कमी होण्यास मदत होईल. परिणामी सिगरेटची आठवण होणार नाही.

व्यायामावर लक्ष केंद्रित करा:
शरीर-मनाचे आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम करणे अतिशय उत्तम. हे तुम्हाला माहीतच असेल पण स्मोकिंगची इच्छा होताच व्यायाम केल्यास त्या इच्छेकडे दुर्लक्ष होण्यास मदत होते. ५-१० पुशअप्स किंवा क्रन्चेस यामुळे स्मोकिंगच्या इच्छेला दूर करण्यास मदत होईल.

तुमचा विजय सेलिब्रेट करा:
स्मोकींगच्या इच्छेवर ताबा मिळवल्याचा विजय सेलिब्रेट करा. त्यामुळे तुम्ही अधिक प्रोत्साहीत होता व स्मोकींग सोडण्यास मदत होते.

Dr. Abhijeet  Shinde
Dr. Abhijeet Shinde
DNB, Cardiologist Diabetologist, 13 yrs, Pune
Dr. Seema
Dr. Seema
BAMS, Pune
Dr. Gauri Karve
Dr. Gauri Karve
MBBS, 6 yrs, Pune
Dr. Yogesh Gholap
Dr. Yogesh Gholap
BAMS, Ayurveda General Physician, 12 yrs, Pune
Dr. Amol Pharande
Dr. Amol Pharande
MDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 14 yrs, Pune
Hellodox
x